Maharashtra

Nagpur

CC/10/225

Shri Rajendra Baliram Fulbandhe - Complainant(s)

Versus

Bhushan Vinodraoji Deshmukh - Opp.Party(s)

Adv. A.M. Rewatkar

13 Jan 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/225
1. Shri Rajendra Baliram FulbandheNagpur ...........Appellant(s)

Versus.
1. Bhushan Vinodraoji DeshmukhNagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 13 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलींद केदार, सदस्‍य
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 13/01/2011)
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्‍यांची तक्रार अशी आहे की, त्‍यांनी गैरअर्जदाराच्‍या मौजा हिवरी, प.ह.नं.34, शिट नं.313/13, सिटी सर्व्‍हे नं.778, रा.नि. मंडळ पारडी, वार्ड नं.21, ख.क्र.22 मधील प्‍लॉट क्र.43 वर बांधण्‍यात येणा-या इमारतीमधील खोली क्र. 43/3 हा एकूण क्षेत्रफळ 150 चौ.फु.चा रु.8,00,000/- मध्‍ये विकत घेण्‍याकरीता दि.06.06.2008 रोजी करारनामा करुन त्‍याबाबत रु.2,00,000/- व त्‍याबाबतची पावतीही गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला दिली. उर्वरित रक्‍कम रु.6,00,000/- ही विक्रीपत्र नोंदवितांना द्यावयाची होती. परंतू गैरअर्जदाराने बांधकाम पूर्ण न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने उर्वरित रक्‍कम गैरअर्जदाराला दिली नाही. तसेच बांधकाम पूर्ण न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराला नोटीस पाठविला. परंतू नोटीस प्राप्‍त होऊनही गैरअर्जदाराने बांधकाम पूर्ण करुन विक्रीपत्र करुन दिले नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन विवादित खोलीचे गैरअर्जदाराने बांधकाम करुन विक्रीपत्र करुन द्यावे, तक्रारीचा खर्च व मानसिक व आर्थिक त्रासाबाबत भरपाई मिळावी अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
2.    सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारावर बजावण्‍यात आला. गैरअर्जदारास नोटीस प्राप्‍त होऊनही त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले नाही किंवा मंचासमोर हजरही झाले नाही, म्‍हणून मंचाने त्‍यांच्‍याविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश दि.15.12.2010 रोजी पारित केला.
 
3.    सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता मंचासमोर आले असता मंचाने तक्रारकर्त्‍याचा युक्‍तीवाद ऐकला. गैरअर्जदार गैरहजर होते. तसेच मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
4.    तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदारासोबत विक्रीपत्राचा करार दि.06.06.2008 रोजी केल्‍याचे व मौजा हिवरी, प.ह.नं.34, शिट नं.313/13, सिटी सर्व्‍हे नं.778, रा.नि. मंडळ पारडी, वार्ड नं.21, ख.क्र.22 मधील प्‍लॉट क्र.43 वर बांधण्‍यात येणा-या इमारतीमधील खोली क्र. 43/3 घेण्‍याकरीता रु.2,00,000/- दिल्‍याचे दस्‍तऐवज क्र.1 वरुन स्‍पष्‍ट होते. तसेच सदर भुखंडावर गैरअर्जदार यांनी अनेक दुकाने बांधली आहेत व त्‍यापैकी दुकान क्र. 3 हे तक्रारकर्त्‍यांना विकलेले आहे. यावरुन सदर भुखंडावर गैरअर्जदार यांनी दुकाने बांधून विकली व व्‍यवसाय केला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ते हे गैरअर्जदाराचे ग्राहक ठरतात.
 
5.    तसेच उर्वरित रक्‍कम ही दि.15.07.2008 रोजी विक्रीपत्र नोंदणीचे वेळेस व ताबा घेतांना द्यावयाचे करारनाम्‍यानुसार ठरलेले होते ही बाब दस्‍तऐवज क्र. 1 मध्‍ये नमूद आहे. तक्रारकर्त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार गैरअर्जदाराने सदर कालावधी दरम्‍यान बांधकाम पूर्ण न केल्‍याने त्‍यांनी उर्वरित रक्‍कम रु.6,00,000/- गैरअर्जदाराला दिलेली नाही व गैरअर्जदारानेही कधीच तक्रारकर्त्‍याला विक्रीपत्र नोंदणी करण्‍याकरीता व ताबा देण्‍याकरीता कळविलेले नाही. गैरअर्जदाराने सदर बाब मंचासमोर हजर होऊन नाकारलेली नाही किंवा सदर म्‍हणणे खोडून काढण्‍याकरीता दस्‍तऐवजासह आपले लेखी म्‍हणणे दाखल न केल्‍याने मंच तक्रारकर्त्‍याने शपथपत्रावर सादर केलेली तक्रार व त्‍यादाखल असलेले दस्‍तऐवज सत्‍य समजण्‍यास मंचाला हरकत वाटत नाही. मंचाचे मते गैरअर्जदाराने बांधकाम पूर्ण झाल्‍यावर किंवा दि.06.06.2008 ते 15.07.2008 पर्यंत बांधकाम पूर्ण करुन तक्रारकर्त्‍याकडून उर्वरित रक्‍कम स्विकारुन त्‍याला सदर खोली क्र. 43/3 चा ताबा द्यावयास पाहिजे होता. करारनाम्‍याप्रमाणे गैरअर्जदाराने विक्रीपत्र करुन न दिल्‍याने सेवेत त्रुटी केलेली आहे, म्‍हणून तक्रारकर्ता सदर प्रकरणी दाद मिळण्‍यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍यांकडून रु.6,00,000/- घेऊन मौजा हिवरी, प.ह.नं.34, शिट नं.313/13, सिटी सर्व्‍हे नं.778, रा.नि. मंडळ पारडी, वार्ड नं.21, ख.क्र.22 मधील प्‍लॉट क्र.43 वर बांधण्‍यात येणा-या इमारतीमधील खोली क्र. 43/3 चे विक्रीपत्र तक्रारकर्त्‍यांना करुन द्यावे. तसेच सदर खोलीचा ताबा द्यावा. विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.
6.    तक्रारकर्त्‍याने मानसिक व आर्थिक त्रासाबाबत भरपाईची मागणी केलेली आहे. मंचाचे मते सदर मागणी ही अवास्‍तव आहे. परंतू गैरअर्जदाराने बांधकाम पूर्ण न करुन विवादित खोलीचा ताबा न दिल्‍याने तक्रारकर्त्‍यांना निश्चितच मानसिक त्रास सहन करावा लागला, म्‍हणून तक्रारकर्ते मानसिक व आर्थिक त्रासाची भरपाई म्‍हणून रु.3,000/- मिळण्‍यास पात्र ठरतात असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्‍यास पात्र ठरतात. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍यांकडून रु.6,00,000/- घेऊन मौजा हिवरी, प.ह.नं.34,  शिट नं.313/13, सिटी सर्व्‍हे नं.778, रा.नि. मंडळ पारडी, वार्ड नं.21, ख.क्र.22    मधील प्‍लॉट क्र.43 वर बांधण्‍यात येणा-या इमारतीमधील खोली क्र. 43/3 चे  विक्रीपत्र तक्रारकर्त्‍यांना करुन द्यावे. तसेच सदर खोलीचा ताबा द्यावा. विक्रीपत्राचा  खर्च तक्रारकर्त्‍यांनी सोसावा.
3)    मानसिक व आर्थिक त्रासाची भरपाई म्‍हणून रु.3,000/- गैरअर्जदाराने  तक्रारकर्त्‍यांना द्यावे. तसेच तक्रारीचा खर्चाबाबत रु.2,000/- गैरअर्जदाराने     तक्रारकर्त्‍यांना द्यावे.
4)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाच्‍या       आत करावे.
 
 
      (मिलिंद केदार)                    (विजयसिंह राणे)
         सदस्‍य                           अध्‍यक्ष
       

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT