Maharashtra

Nagpur

CC/10/771

Pramod Rewaji Ninawe - Complainant(s)

Versus

Bhushan Vinaodraoji Deshmukh - Opp.Party(s)

Adv. A.M. Rewatkar

18 Oct 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/771
 
1. Pramod Rewaji Ninawe
Plot No. 637, Hiwari Layout,
Nagpur
Maharahstra
...........Complainant(s)
Versus
1. Bhushan Vinaodraoji Deshmukh
Plot No. 43, Hiwari Nagar,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. A.M. Rewatkar, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

श्री.नरेश बनसोड, मा. सदस्‍य यांचे कथनांन्‍वये. 
 
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 18/10/2011)
 
 
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, तीद्वारे मागणी केली आहे की, दुकान खोली क्र.43/1 बांधकाम करुन विक्रीपत्र करुन द्यावे, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत भरपाई मिळावी अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
                  तक्रारकर्त्‍याची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, वि.प./गैरअर्जदाराद्वारा मौजा-हिवरी, प.ह.क्र.34, शिट नं. 313/13, सिटी सर्व्‍हे नं.778, वार्ड नं.21, ख.क्र.22, प्‍लॉट क्र. 43, हिवरीनगर येथील बांधण्‍यात येणा-या इमारतीमधील खोली क्र.43/1, एकूण क्षेत्रफळ 150 चौ.फु. विकत घेण्‍याचे ठरले. जेथे ही बांधकाम योजना होती, त्‍याच प्‍लॉटच्‍या बाजुला त्‍याचे स्‍टेशनरी दुकान आहे. सदर विक्रीचा करारनामा दि.20.10.2008 रोजी करण्‍यात येऊन सदर खोलीची किंमत रु.9,00,000/- ठरविण्‍यात आली होती. त्‍यापैकी रु.2,00,000/- तक्रारकर्त्‍याने कराराचे वेळेस वि.प./गैरअर्जदाराला दिले. उर्वरित रक्‍कम रु.7,00,000/- विक्रीपत्र नोंदणीचे वेळेस व कब्‍जाचेवेळेस देण्‍याचे ठरले होते व विक्रीपत्र करुन देण्‍याची मुदत 20.10.2008 ते 15.12.2008 ठरली होती. तक्रारकर्त्‍याने डिसेंबर 2009 व त्‍यानंतर सप्‍टेंबर 2010 पर्यंत विरुध्‍द पक्ष बांधकाम पूर्ण करणार म्‍हणून वाट पाहिली, परंतू आजपर्यंत बांधकाम पूर्ण न केल्‍याने शेवटी 28.10.2010 ला विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठवून सदर खोलीचे बांधकाम पूर्ण करुन विक्रीपत्र करुन द्यावे व ताबा द्यावा अशी मागणी केली. परंतू नोटीस प्राप्‍त होऊनही वि.प.ने नियोजित कालावधीत बांधकाम पूर्ण केले नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या मते वि.प. बांधकाम पूर्ण न करुन हलगर्जीपणा करीत असून दिलेल्‍या रकमेचा वापर स्‍वतःकरीता करीत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केलेली असून सोबत आपले म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ एकूण सहा दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत, ज्‍यामध्‍ये विक्रीचा करारनामा, कायदेशीर नोटीस, पोस्‍टाची पोचपावती व इतर तक्रारीमध्‍ये झालेल्‍या आदेशाची प्रत जोडली आहे.
2.                सदर तक्रार मंचात दाखल झाल्‍यावर मंचाने वि.प.ला नोटीस पाठविली असता, ती ‘घेण्‍यास नकार’ या पोस्‍टाच्‍या शे-यासह परत आली. तसेच वि.प. मंचासमोर हजर झाले नाही किंवा लेखी उत्‍तर दाखल केले नाही, म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश दि.15.07.2011 रोजी पारित केला.
 
3.                सदर तक्रार युक्‍तीवादाकरीता दि.19.09.2011 रोजी आली असता उभय पक्ष युक्‍तीवादाकरीता अंतिम संधी देऊनही गैरहजर. मंचाने सदर प्रकरण गुणवत्‍तेवर निकाली काढण्‍याचे ठरविले. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
4.                वि.प.ला तकारकर्त्‍याने कायदेशीर नोटीस पाठविली आहे व ती त्‍याला प्राप्‍त झालेली आहे. तसेच मंचातर्फे नोटीस पाठविण्‍यात आली. ती वि.प.ने घेण्‍यास नकार म्‍हणून परत केलेली आहे. त्‍यामुळे नोटीस ही योग्‍य स्‍वरुपात बजावली आहे हे गृहित धरुन तक्रार एकतर्फी चालविण्‍यात आली. त्‍यावरुन हा निष्‍कर्ष निघतो की, वि.प.ला तक्रारकर्त्‍याचे नोटीसमधील म्‍हणणे, तसेच तक्रारीत नमूद केलेले म्‍हणणे मान्‍य आहे असे या मंचाचे मत आहे.
5.                दि.20.10.2008 च्‍या करारनाम्‍यानुसार तक्रारकर्त्‍याकडून रु.2,00,000/- प्राप्‍त करुनसुध्‍दा वि.प.ने करारनाम्‍यातील अटीनुसार निर्धारित अवधीत प्‍लॉट क्र. 43 वरील दुकान क्र. 1 चा ताबा देण्‍याकरीता बांधकामास कुठलीही सुरुवात केली नाही, तसेच तक्रार दाखल करेपर्यंत बांधकामास सुरुवात केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने पुढील रक्‍कम देणे थांबविल्‍याचे मान्‍य केले आहे. वि.प.ने सुध्‍दा करारभंग करुन तक्रारकर्त्‍याने जमा केलेल्‍या रकमेचा गैरवापर केलेला आहे व सेवेत निष्‍काळजीपणा व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता त्‍यांच्‍या मागणीनुसार दुकान क्र.43/1 चे बांधकाम करुन विक्रीपत्र व ताबा मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासाकरीता नैसर्गिक न्‍याय तत्‍वानुसार रु.10,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रु.2,000/- देणे संयुक्‍तीक राहील असे मंचाचे मत आहे. वि.प.ने सदर आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी, अन्‍यथा वि.प. तक्रारकर्त्‍याकडून स्विकारलेली रक्‍कम रु.2,00,000/- ही दि.20.10.2008 पासून प्रत्‍यक्ष संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याजाने द्यावी. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    वि.प.ला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला सदर आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत दुकान क्र. 43/1 चे बांधकाम पूर्ण करावे व उर्वरित रक्‍कम रु.7,00,000/- घेऊन विक्रीपत्र व ताबा द्यावा. सदर आदेशाचे पालन 30 दिवसाचे आत न केल्‍यास रु.2,00,000/- ही रक्‍कम दि.20.10.2008 पासून प्रत्‍यक्ष संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजाने द्यावी
3)    वि.प.ने तक्रारकर्त्‍याला शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.10,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रु.2,000/- द्यावा.
4)    सदर आदेशाचे पालन वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.