नि.48
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 697/2008
तक्रार नोंद तारीख : 20/06/2008
तक्रार दाखल तारीख : 05/07/2008
निकाल तारीख : 22/07/2013
----------------------------------------------
श्री विठ्ठल काशिनाथ कुलकर्णी
रा.इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. श्री भिमराव जाधव (तात्या) नागरी सहकारी पतसंस्था
मर्यादित उरुण-इस्लामपूर तर्फे सेक्रेटरी
2. श्री भिमराव भाऊ जाधव, संचालक
रा.महादेवनगर, विजया सांस्कृतीकच्या मागे,
इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
3. श्री नामदेव कृष्णा बोंगाणे, संचालक
रा.इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली (वगळले आहे)
4. श्री भिमराव शामराव झेंडे, संचालक
रा.कर्मवीर नगर, डवरी गल्ली, इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
5. श्री संपतराव विठ्ठल गायकवाड, संचालक
रा.गायकवाडवाडा, सावकार मशिदीजवळ,
इस्लामपूर, ता. वाळवा जि.सांगली
6. श्री सुधाकर भाऊसो ढेरे, संचालक
रा.जाधव गल्ली, ऊरण-इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
7. श्री चंद्रकांत तुकाराम पाटील, संचालक
मु.पो.इस्लामपूर ता.वाळवा जि. सांगली (वगळले आहे)
8. श्री हणमंत रंगराव शिंदे, संचालक
रा. इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली (वगळले आहे)
9. श्री संजय शामराव शिंगाडे, संचालक
रा. माकडवाली गल्ली शेजारी, इस्लामपूर,
ता. वाळवा जि.सांगली
10. श्री अजित विश्वनाथ कुलकर्णी, संचालक
रा.दुर्गा अपार्टमेंट, मंत्री कॉलनी, इस्लामपूर,
ता. वाळवा जि.सांगली
11. श्री शरद शामराव मस्के, संचालक
रा.हनुमाननगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
12. श्री अरुण लक्ष्मण पवार, संचालक
मु.पो.पेठ, ता.वाळवा जि.सांगली
13. श्री शंकर ज्ञानू पाटील, संचालक
रा.ताकारी, ता. वाळवा जि.सांगली
14. कु.शारदा पोपट जाधव, संचालक
रा.जाधव गल्ली, उरुण-इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
15. श्री महेशकुमार विष्णू हर्षे, संचालक
रा.दत्तनगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
(वगळले आहे) ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री डी.एच.पाटील
जाबदारक्र.1, 2, 4 ते 6, 9 ते 14 : एकतर्फा
जाबदारक्र.3, 7, 8 व 15 : वगळले
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांनी मागणी करुनही ठेव रक्कम अदा न केलेने दाखल केली आहे. तक्रार स्वीकृत करुन सामनेवालांना नोटीस आदेश झाला. नि.29 वरील दि.9/9/10 च्या आदेशाप्रमाणे सामनेवाला क्र. 3,7,8 व 15 यांना कमी केलेले आहे. सदर ठिकाणी सामनेवाला क्र.3 च्या ठिकाणी नामदेव कृष्णा बोंगाणे, नं.7 च्या ठिकाणी चंद्रकांत तुकाराम पाटील, नं.8 च्या ठिकाणी हणमंत रंगराव शिंदे यांना पक्षकार म्हणून सामील करणेत आले आहे. मात्र नि.41 वरील दि.6/2/12 वरील आदेशाप्रमाणे सामनेवाला क्र.3, 7 व 8 यांना वगळणेत आले आहे. सामनेवालांनी नोटीस स्वीकारणेस नकार दिलेने तशा शे-यानिशी लखोटे परत आले आहेत. सदर सामनेवालाविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत केला आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी –
तक्रारदाराने सदरची तक्रार सामनेवाला पतसंस्थेत सेव्हिंग्ज खातेवरील रक्कम व्याजासहीत अदा न केलेने दाखल केली आहे. सामनेवाला क्र.1 ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यान्वये नोंदणीकृत संस्था असून सामनेवाला क्र.2 व 3 हे अनुक्रमे चेअरमन व व्हा.चेअरमन असून सामनेवाला क्र.4 ते 13 हे संचालक व सामनेवाला क्र.14 हे सचिव आहेत. तक्रारदाराचे सदर संस्थेत सेव्हिंग्ज खाते होते. सदर खाते पान नं.2306/26887 असून सदर खातेवर दि.20/5/2008 अखेर रु.68,834/- रक्कम शिल्लक आहे. सदर रकमेची वारंवार तोंडी मागणी करुनही सदर रक्कम सामनेवालांनी देणेस टाळाटाळ केली. दि.14/5/2008 रोजी यू.पी.सी. ने मागणी करुनही रक्कम न देवून सेवात्रुटी केली. त्यामुळे तक्रारदारास सदर तक्रार मंचासमोर दाखल करणे भाग पडले. त्यामुळे तक्रार खर्चासह मंजूर करुन सामनेवालांना सदर ठेव रक्कम व्याजासह देणेचा आदेश व्हावा, तसेच मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,500/- देणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे.
3. तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि. 3 ला शपथपत्र व नि.5 ला पासबुकाची सत्यप्रत व नि.44 ला पासबुकाची साक्षांकीत प्रत दाखल केली आहे.
4. तक्रारदाराची तक्रार व पुराव्यादाखल कागदपत्रे यांचा विचार करता सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे सामनेवालांचे ग्राहक होतात काय ? होय.
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी
केली आहे काय ? होय.
3. तक्रारदार मागणी केलेली रक्कम मिळण्यास तो पात्र
आहे काय ? होय.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
कारणे
मुद्दा क्र.1 ते 4
5. तक्रारदाराचे सामनेवाला क्र.1 संस्थेत सेव्हिंग्ज खाते आहे. त्याचा खाते पान नंबर 2306/268/7 असा आहे. सदर खातेवर त्याची रक्कम शिल्लक आहे. सबब तो सेव्हिंग्ज खातेदार असल्याने सामनेवालांचा ग्राहक आहे.
6. सामनेवाला क्र.3, 7, 8 व 15 यांना नि.29 व नि.41 चे आदेशान्वये वगळणेत आले आहे. उर्वरीत सामनेवाला क्र.1,2, 4 ते 6, 9 ते 14 यांनी नोटीस स्वीकारणेस नकार दिल्याने नोटीस परत आली आहे. सदर सामनेवाला विरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत करणेत आला आहे. त्यामुळे त्यांना तक्रार मान्यच आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे होणार नाही. तक्रारदाराने सामनेवालाकडे ठेवरकमेची व्याजासहीत मागणी करुनही रक्कम अदा न करुन सेवात्रुटी केली आहे.
Lifting of Corporate veil चा विचार करता सामनेवाला क्र. 1, 2, 4 ते 6, 9 ते 13 वैयक्तिक व संयुक्तरित्या तर सामनेवाला क्र.14 हे सचिव असलेने संयुक्तरित्या नमूद रक्कम देणेस जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे. (यासाठी मा.उच्च न्यायालय, मुंबई यांचेसमोरील रिट पिटीशन क्र.117/11, मंदाताई संभाजी पवार व इतर विरुध्द स्टेट ऑफ महाराष्ट्र यामधील आदेशाचा आधार घेतला आहे.)
7. तक्रारदार सेव्हिंग्ज खातेवरील ठेव रक्कम रु. 68,834/- दि.20/5/2008 पासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 4 टक्केप्रमाणे व्याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सामनेवाला यांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे, त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रकमा मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1, 2, 4 ते 6, 9 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तर
सामनेवाला क्र.14 यांनी संयुक्तरित्या सेव्हिंग्ज खातेवरील ठेव रक्कम रु.68,834/-
दि.20/5/2008 पासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 4 टक्केप्रमाणे व्याजासह अदा
करावी.
3. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1, 2, 4 ते 6, 9 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तर
सामनेवाला क्र.14 यांनी संयुक्तरित्या मानसिक ञासापोटी रुपये 5,000/- अदा करावेत.
4. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1, 2, 4 ते 6, 9 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तर
सामनेवाला क्र.14 यांनी संयुक्तरित्या तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन
हजार माञ) अदा करावेत.
5. जर सामनेवाला यांनी या आदेशाचे तारखेपूर्वी तक्रारदार यांना वर नमूद खात्यातील काही
रक्कम अदा केली असेल तर सदरची रक्कम वळती करुन घेण्याचा सामनेवाला यांचा हक्क
सुरक्षित ठेवण्यात येत आहे.
6. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत
करणेची आहे.
7. सामनेवाला यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 22/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष