नि.36
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल – रजेवर
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 578/2010
तक्रार नोंद तारीख : 06/12/2010
तक्रार दाखल तारीख : 04/02/2011
निकाल तारीख : 03/07/2013
----------------------------------------------
श्री हणमंत विठ्ठल कळसकर,
रा.इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. भिमराव जाधव (तात्या) नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
इस्लामपूर, मुख्य शाखा इस्लामपूर, ता.वाळवा
जि.सांगली
2. भिमराव जाधव (तात्या) नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
उपशाखा इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली
3. श्री भिमराव भाऊ जाधव, चेअरमन
भिमराव जाधव व्यायामशाळा, महादेव नगर,
राम अपार्टमेंट समोर, इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
4. अजित विश्वनाथ कुलकर्णी, व्हा.चेअरमन
मंत्री कॉलनी, दुर्गा अपार्टमेंट समोर, इस्लामपूर
ता.वाळवा जि. सांगली
5. श्री अरुण लक्ष्मण पवार, संचालक
कदम गल्ली, मु.पो.पेट ता.वाळवा जि. सांगली
6. शंकर ज्ञानू पाटील, संचालक
मेन रोड ताकारी, ता.वाळवा जि. सांगली
7. श्री सुधाकर भाऊसो ढेरे, संचालक
जाधव गल्ली, उरुण इस्लामपूर
8. श्री भिमराव शामराव झेंडे, संचालक
कर्मवीरनगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
9. श्री संपतराव विठ्ठलराव गायकवाड
रा.गायकवाड वाडा, इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
10. श्री शरद शामराव मस्के, संचालक
रा.हनुमान नगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
11. श्री संजय शामराव शिंगाडे, संचालक
माळ गल्ली, इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
12. श्री नामदेव कृष्णा बोंगाणे, संचालक
रा.कचेरी रोड, बालाजी सायकल मार्ट,
इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
13. श्री चंद्रकांत तुकाराम पाटील, संचालक
रा.शाहूनगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
14. श्री हणमंत रंगराव शिंदे, संचालक
रा.शाहूनगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
15. कु.शारदा पोपट जाधव, संचालक
रा. जाधव गल्ली, इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड सौ भारती एस. सोळवंडे
जाबदारक्र.1 ते 11 व 13 ते 15 : एकतर्फा
जाबदारक्र.12 : म्हणणे नाही
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार, तक्रारदाराने जाबदार क्र.1 या संस्थेत Annexure A मध्ये नमूद केलेल्या ठेव पावत्यांमध्ये गुंतविलेली एकूण रक्कम रु.88,500/- ही मुदत संपलेनंतर मागणी करुनदेखील जाबदारांनी दिलेली नसल्याने, दूषित सेवा दिल्याची तक्रार करुन, सदरच्या रकमा व्याजासह व त्यास दिलेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- अधिक नुकसान भरपाई रु.10,000/- व त्यावर तक्रार दाखल केले तारखेपासून सदर रकमा मिळेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज या मागणीकरिता दाखल केली आहे. जाबदार क्र.3 आणि 4 हे संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन अनुक्रमे असून इतर जाबदार हे संचालक आहेत म्हणून ते सर्व संयुक्तिक व वैयक्तिकरित्या त्यास रक्कम देण्यास जबाबदार आहेत असेही तक्रारदाराचे कथन आहे.
2. जाबदार क्र.1 ते 11 आणि 13 ते 15 नोटीसा लागून देखील हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. जाबदार क्र.12 हे जरी हजर झाले तरी या प्रकरणात त्यांनी आपली लेखी कैफियत दाखल केलेली नसल्याने त्यांचेविरुध्द नो से हुकूम झाला.
3. जाबदारांपैकी कोणीही हजर होवून तक्रारीत तक्रारदाराने केलेली कथने नाकबूल केलेली नाहीत. तक्रारदाराने आपल्या कैफियतीच्या पुष्ठयर्थ आपले शपथपत्र दाखल केले असून नि.4 या फेरिस्तसोबत एकूण 8 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात Annexure A मध्ये नमूद केलेल्या पाचही ठेव पावत्यांच्या प्रती, त्यांचा दिनांक 16/10/10, ठेव पावत्यांची रक्कम परत मिळण्याबद्दल जाबदार क्र.3 चेअरमन यास दिलेले पत्राची प्रत, सहायक निबंधक सहकारी संस्था, इस्लामपूर यांनी दिलेले जाबदार संस्थेच्या संचालक मंडळाच्या यादीबद्दलचे पत्र व संचालक मंडळाची यादी इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. तक्रारीतील एकूणएक कथन जाबदारांनी अमान्य न केल्याने व त्यास तक्रारदाराने आपले शपथपत्र दाखल करुन त्याचे पुष्टीकरण केल्याने त्यातील सर्व कथने ही आपोआप सिध्द होतात. यावरुन हे निर्विवादपणे सिध्द होते की, तक्रारदारास त्याने मुदत ठेव पावतीमध्ये गुंतविलेल्या रकमा मुदतीनंतर व्याजासह परत न केल्याने जाबदार क्र.1 ते 15 यांनी दूषित सेवा दिलेली आहे. तक्रारदार हा जाबदार क्र.1 ते 15 यांचा ग्राहक आहे. तक्रारदाराने देय रकमांची मुदतीनंतर मागणी करुनसुध्दा जाबदारांनी त्यास त्या रकमा दिलेल्या नाहीत ही बाब देखील शाबीत झालेली आहे. त्यामुळे तक्रारदारास जाबदार क्र.1 ते 15 यांनी दूषित सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे असे या मंचाचे मत आहे. सबब तक्रारदार जाबदार क्र. 1 ते 15 कडून वैयक्तिक व संयुक्तरित्या Annexure A मध्ये नमूद केलेल्या रकमा वसूल करुन मिळण्यास पात्र आहे. तसेच त्यास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व दाव्याचा खर्च म्हणून रु.5,000/- मिळण्यास तो पात्र आहे हे शाबीत झाले आहे असे या मंचाचे मत आहे. करिता हे मंच खालील आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श -
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारदारास Annexure A मध्ये नमूद केलेल्या रकमा त्यावर ठेवपावतीत नमूद केलेल्या व्याजदराने ठेव पावती देय होणा-या दिनांकापर्यंत व्याजासह तक्रारदारास द्याव्यात.
3. जाबदार क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.10,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत.
4. सदर रकमांवर दावा दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष देईपर्यंत द.सा.द.शे. 8.5 टक्के दराने पुढील व्याज द्यावे.
5. जाबदार क्र.1 ते 15 यांनी सदर रकमा या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत तक्रारदारास द्याव्यात अन्यथा तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 किंवा 27 खाली प्रकरण दाखल करता येईल.
सांगली
दि. 03/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष