निशाणी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1470/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः- 24/10/2008
सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 20.11.2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 05/10/2009
श्री.पुरुषोत्तम गारसु पाटील,
वय- सज्ञान,धंदा-शेती व पेन्शनर,
रा.घर नंबर 179, भवानी पेठ,
जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. मा.श्री.भाऊसाहेब हरनारायण राठी अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.जळगांव.
35, नवी पेठ, बँक स्ट्रिट, जळगांव.
(समन्स म.मॅनेजर यांचेवर बजवावेत.)
2. श्री.कमलकुमार बाजीराव जैन, (चेअरमन)
रा.25, मार्केट यार्ड, जळगांव.
3. श्री.राधेश्याम जगन्नाथ पांडे, (व्हा.चेअरमन)
रा.100, पोलन पेठ, जळगांव.
4. श्री.प्रेमराज छोगालाल पुरोहीत ( संचालक)
रा.112, शनीपेठ, जळगांव.
5. श्री.शिववल्लभ रामकिसन राठी (संचालक )
रा.मार्केट यार्ड, जळगांव, ता.जि.जळगांव.
6. श्री.रोहीत सज्जनकुमार अग्रवाल (संचालक)
रा.मित्तल निवास, जिल्हापेठ, ता.जि.जळगांव.
7. श्री.विनोद बाबुराजा सारडा (संचालक )
रा.मार्केट यार्ड, जळगांव, ता.जि.जळगांव.
8. श्री.जयंतीलाल मोतीलाल झंवर ( संचालक )
रा.मार्केट यार्ड, जळगांव, ता.जि.जळगांव.
9. श्री.अविनाश चंपालाल जाखेटे (संचालक )
रा.मार्केट यार्ड, जळगांव, ता.जि.जळगांव.
10. श्री.योगेश विलास चौधरी ( संचालक )
रा.मार्केट यार्ड, जळगांव, ता.जि.जळगांव.
11. श्री.देविदास चिंतामण वाणी (संचालक )
रा.मार्केट यार्ड, जळगांव, ता.जि.जळगांव.
12. श्री.नंदलाल नारायण पुरोहीत ( संचालक )
सदरची नोटीस सामनेवाला क्र. 1 यांचेवर बजवावी.
13. श्री.राजेंद्र राधाकिसन जोशी ( संचालक )
सदरची नोटीस सामनेवाला क्र. 1 यांचेवर बजवावी.
14. श्री.ओमप्रकाश रामनारायण बिर्ला (संचालक )
सदरची नोटीस सामनेवाला क्र. 1 यांचेवर बजवावी.
15. श्री.अविनाश वसंत भालेराव ( संचालक )
सदरची नोटीस सामनेवाला क्र. 1 यांचेवर बजवावी.
16. सौ.किरण संदीपकुमार झंवर (संचालीका )
रा.125, बालाजी पेठ, जळगांव.
17. सौ.शारदा चंद्रप्रकाश सारडा (संचालीका )
रा.126, नवी पेठ, जळगांव. .......... सामनेवाला
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः05/10/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.हेमंत अ.भंगाळे वकील हजर
सामनेवाला क्रं. 1 ते 5,7,8,10,11,13,15 ते 17 तर्फे
श्री.दिलीप बी.मंडोरे वकील हजर.
सामनेवाला क्र.9 व 14 तर्फे श्री.नजीर शेख फरीद पिंजारी
वकील हजर.
सामनेवाला क्र. 6 तर्फे एस.बी.अग्रवाल वकील हजर.
सामनेवाला क्र. 12 एकतर्फा.
सामनेवाला क्र. 13 (नो-से)
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. वेगवेगळया प्रकारच्या ठेवी स्विकारणे, त्यावर व्याजदेणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, मुदत ठेवी तपासल्या असता त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | पावती क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | 12354 | 11/6/2007 | 15,000/- | 11/9/2008 |
2 | 12353 | 11/6/2007 | 9,500/- | 11/9/2008 |
3 | 12365 | 17/6/2007 | 11,985/- | 17/9/2008 |
4 | 12366 | 17/6/2007 | 11,004/- | 17/9/2008 |
5 | 12439 | 24/7/2007 | 11,200/- | 24/10/2008 |
6 | 12440 | 24/7/2007 | 11,000/- | 24/10/2008 |
7 | 12441 | 24/7/2007 | 9,500/- | 24/10/2008 |
8 | 12442 | 24/7/2007 | 9,000/- | 24/10/2008 |
9 | 12443 | 24/7/2007 | 9,500/- | 24/10/2008 |
10 | 12444 | 24/7/2007 | 9,000/- | 24/10/2008 |
11 | 12445 | 24/7/2007 | 8,500/- | 24/10/2008 |
12 | 12446 | 24/7/2007 | 15,000/- | 24/10/2008 |
13 | 12510 | 19/8/2007 | 9,000/- | 19/11/2008 |
14 | 12511 | 19/8/2007 | 16,000/- | 19/11/2008 |
15 | 12512 | 19/8/2007 | 11,000/- | 19/11/2008 |
16 | 12628 | 21/9/2007 | 17,000/- | 21/11/2008 |
17 | 12629 | 21/9/2007 | 16,000/- | 21/11/2008 |
18 | 12630 | 21/9/2007 | 17,000/- | 21/11/2008 |
19 | 12640 | 23/9/2007 | 17,000/- | 23/12/2008 |
20 | 12641 | 23/9/2007 | 16,500/- | 23/12/2008 |
21 | 12642 | 23/9/2007 | 16,500/- | 23/12/2008 |
22 | 12643 | 23/9/2007 | 17,000/- | 23/12/2008 |
23 | 12644 | 23/9/2007 | 17,000/- | 23/12/2008 |
24 | 12645 | 23/9/2007 | 16,000/- | 23/12/2008 |
25 | 12646 | 23/9/2007 | 16,000/- | 23/12/2008 |
26 | 12649 | 23/9/2007 | 17,000/- | 23/11/2008 |
27 | 12650 | 23/9/2007 | 16,500/- | 23/11/2008 |
28 | 12651 | 23/9/2007 | 16,500/- | 23/11/2008 |
29 | 12652 | 23/9/2007 | 17,000/- | 23/12/2008 |
30 | 12659 | 23/9/2007 | 16,000/- | 23/12/2008 |
31 | 12660 | 23/9/2007 | 17,000/- | 23/12/2008 |
32 | 12661 | 23/9/2007 | 16,000/- | 23/12/2008 |
33 | 12667 | 23/9/2007 | 15,000/- | 23/12/2008 |
34 | 11705 | 6/1/2007 | 15,000/- | 6/1/2009 |
35 | 12631 | 21/9/2007 | 15,000/- | 21/1/2009 |
36 | 12632 | 21/9/2007 | 16,000/- | 21/1/2009 |
37 | 12633 | 21/9/2007 | 15,000/- | 21/1/2009 |
38 | 12664 | 23/9/2007 | 16,000/- | 23/1/2009 |
39 | 12647 | 23/9/2007 | 16,000/- | 23/1/2009 |
40 | 12653 | 23/9/2007 | 16,000/- | 23/1/2009 |
41 | 12655 | 23/9/2007 | 17,000/- | 23/1/2009 |
42 | 12656 | 23/9/2007 | 17,000/- | 23/1/2009 |
43 | 12657 | 23/9/2007 | 16,000/- | 23/1/2009 |
44 | 12662 | 23/9/2007 | 17,000/- | 23/1/2009 |
45 | 12668 | 23/9/2007 | 17,000/- | 23/1/2009 |
46 | 12719 | 4/10/2007 | 15,000/- | 19/2/2009 |
47 | 12720 | 4/10/2007 | 15,000/- | 19/2/2009 |
48 | 12654 | 23/9/2007 | 17,000/- | 23/2/2009 |
49 | 12658 | 23/9/2007 | 17,000/- | 23/2/2009 |
50 | 12665 | 23/9/2007 | 17,000/- | 23/2/2009 |
51 | 11789 | 30/1/2007 | 18,000/- | 28/2/2009 |
52 | 11790 | 30/1/2007 | 18,000/- | 28/2/2009 |
53 | 11793 | 30/1/2007 | 16,000/- | 28/2/2009 |
54 | 11794 | 30/1/2007 | 16,000/- | 28/2/2009 |
55 | 12648 | 23/9/2007 | 18,000/- | 23/3/2009 |
56 | 12663 | 23/9/2007 | 17,000/- | 23/3/2009 |
57 | 12666 | 23/9/2007 | 17,000/- | 23/3/2009 |
58 | 12669 | 23/9/2007 | 18,000/- | 23/3/2009 |
59 | 13136 | 3/3/2008 | 11,000/- | 3/5/2009 |
60 | 13137 | 3/3/2008 | 10,000/- | 3/5/2009 |
61 | 12300 | 3/6/2007 | 12,000/- | 3/6/2009 |
62 | 12301 | 3/6/2007 | 11,000/- | 3/6/2009 |
63 | 12302 | 3/6/2007 | 11,000/- | 3/6/2009 |
64 | 12303 | 3/6/2007 | 11,000/- | 3/6/2009 |
65 | 13244 | 30/4/2008 | 16,000/- | 30/6/2009 |
66 | 13245 | 30/4/2008 | 17,000/- | 30/6/2009 |
67 | 13246 | 30/4/2008 | 17,000/- | 30/6/2009 |
68 | 13247 | 30/4/2008 | 17,000/- | 30/6/2009 |
69 | 13248 | 30/4/2008 | 16,000/- | 30/6/2009 |
70 | 12717 | 04/10/2007 | 17,000/- | 4/10/2009 |
71 | 12718 | 04/10/2007 | 12,000/- | 4/10/2009 |
तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्या मुदत ठेव पावत्यांची मुदत संपलेली असल्याने तसेच मुदत ठेव पावती क्रमांक 12717 व 12718 या मुदत ठेव पावत्यांची मुदत पुर्व तसेच तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने, तक्रारदार हे त्यांची मुदत ठेवीची रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. तक्रारदार यांना सामनेवाला क्रं. 1 व 2 यांचे खालीलप्रमाणे मिळकतीचे उतारे प्राप्त झालेले आहेत.
I) शहर जळगांव येथील जळगांव शहर महानगरपालीका व सिटी सर्व्हे क्र.2077/6 याचे क्षेत्र 121.2 चौ.मी.सत्ता प्रकार क धारक चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब हरनारायण राठी अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.जळगांव चेअरमन श्री.कमलकुमार बाजीराव जैन.
येणेप्रमाणे तक्रारदार यांना सदर मिळकतीचे उतारे प्राप्त झालेले आहेत. तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून वरील मुदत ठेवीची रक्कम घेणे असल्याने सामनेवाला हे आपल्या मिळकती त्वरीत विल्हेवाट लावण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती तक्रारदार यांना मिळालेली आहे. सामनेवाला हे तक्रारदार यांना रक्कम मिळू नये व त्यात अडचणी याव्यात म्हणून सामनेवाला सदरील कृत्य करीत आहेत. सामनेवाला यांनी वरील मिळकतीची विक्री केल्यास तक्रारदार यांना मे. न्यायमंचाचे हुकूमाप्रमाणे मुदत ठेवीची रक्कम वसूल करणे असंभव होईल म्हणून तक्रारदार यांनी सदरील तक्रारीअर्जासोबत तुर्तातुर्त मनाई हुकूमाचाही अर्ज दाखल केलेला आहे. म्हणून तक्रारदार यांनी मे. न्यायमंचास विनंती केली आहे की, तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून वरील वर्णन केलेल्या मुदत ठेवीच्या रक्कमा व्याजासह परत मिळाव्यात तसेच सामनेवाला क्रं.1 व 2 यांनी अथवा त्यांचे तर्फे अन्य कोणीही वरील मिळकती विकू नये अथवा त्या अन्य त-हेने तबदील करु नये असा त्यांचेविरुध्द निरंतर मनाई हुकूम देण्यात यावा व ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकामी तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करण्यात आल्यानंतर , सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. त्याप्रमाणे सामनेवाला क्रं. 1 ते 5,7,8,10,11,13,15 ते 17 तसेच सामनेवाला क्र. 9,14 व 6 हे तक्रारीत हजर झाले व लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र. 12 हे मंचाची नोटीस प्राप्त होऊन देखील गैरहजर राहील्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले. सामनेवाला क्र. 13 हे वकीलामार्फत हजर झाले तथापी त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे सादर न केल्याने सामनेवाला क्र. 13 विरुध्द नो-से आदेश पारीत करण्यात आले.
3. सामनेवाला क्र. 6 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सामनेवाला क्रमांक 1 पतसंस्थेची दि.8/8/2006 रोजी झालेल्या सभेत विषय क्रमांक 6 नुसार संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करण्यात येऊन 13 इतके मर्यादीत संचालक मंडळ ठेवलेले आहे व त्याकारणासाठी सामनेवाला क्र. 6 ने दि.13/8/2008 रोजी संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. सबब सामनेवाला क्र. 6 यांचा तक्रारदाराचे तक्रार अर्जाशी काहीएक संबंध नसल्याने तक्रारदाराची तक्रार सामनेवाला क्र. 6 विरुध्द फेटाळण्यात यावी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मिळावेत अशी विनंती सामनेवाला क्र. 6 यांनी केली आहे.
4. सामनेवाला क्र. 9 व 14 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराने सामनेवाला पतसंस्थेकडे रक्कमेची मागणी केली आहे याबाबत सामनेवाला यांना काहीएक कल्पना नाही. सामनेवाला क्र. 9 व 14 यांचा राजीनामा सामनेवाला क्र. 1 पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या दि.25/11/2008 रोजीचे सभेत ठराव क्रमांक 3 नुसार मंजुर केलेला असुन अशा स्थितीत तक्रारदाराचे तक्रार अर्जाशी सामनेवाला क्र.9 व 14 यांचा काहीएक संबंध राहीला नसल्याने सामनेवाला क्र. 9 व 14 विरुध्दची तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र. 9 व 14 यांनी केली आहे.
5. सामनेवाला क्र. 1 ते 5,7,8,10,11,15 ते 17 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराचे तक्रार अर्जातील मजकुर काही अंशी खरा व बरोबर असुन तक्रारदारास त्याचे नातीचे लग्न व नातवाचे उच्च शिक्षणाकरिता पैशाची गरज होती हा मजकुर खोटा व बनावट आहे. तक्रारदार यांनी स्वइच्छेने सामनेवाला पतसंस्थेत गुंतवणूक केलेली होती. सामनेवाला यांनी तक्रारदारास कुठल्याही प्रकारची सदोष व त्रृटीयुक्त सेवा दिलेली नाही. सामनेवाला क्र. 1 व 2 हे तक्रारदाराने तक्रार अर्जात कथन केलेप्रमाणे जळगांव शहर महानगरपालीका हद्यीतील सि.टी.एस.क्र.2077/6 याचे क्षेत्र 121.2 चौ.मी ही मिळकत कोणत्याही प्रकारे तबदील करणार नाहीत अगर कोणताही बोजा मिळकतीवर निर्माण करणार नाहीत. सबब तक्रारदाराची मनाई आदेशाची मागणी खोटी व दिखाऊ आहे. तक्रारदाराचे तक्रार अर्जास नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते. सामनेवाला ही एक अग्रगण्य पतसंस्था असुन सभासदांनी ठेवलेल्या ठेवी घेणे व त्या परत करणे तसेच कर्ज देणे इत्यादी विविध कार्य संस्थेतर्फे पाहीली जातात. सध्या सहकारी बँका व सोसायटी यांचेमधील ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी काढुन घेण्याचे प्रमाण खुप वाढलेले असुन त्याची झळ सामनेवाला सोसायटीस लागलेली आहे. सामनेवाला सोसायटीमध्ये ठेवलेल्या ठेवी काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्यामुळे सोसायटीमधील रोख रक्कमेवर विपरित परिणाम झालेला आहे. तसेच कर्ज वसुली अत्यल्प होत असुन ठेवीदारांना ठेवी परत करणे सोसायटीला कठीण झाले आहे. तरी देखील सोसायटी ठेवीदाराच्या रक्कम परत करण्यास वचनबध्द आहे. तक्रारदाराची रक्कम परत न देण्याचा सामनेवाला सोसायटीचा कधीही उद्येश नव्हता. सबब सामनेवाला क्रमांक 1 ते 5,7,8,10,11,15 ते 17 विरुध्द तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्य करण्यात यावी अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
6. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1)
प्रमाणे ग्राहक आहे काय ? .......होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
7. मुद्या क्रमांक 1 तक्रारदार यांनी तक्रारीत निशाणी 3 अंतर्गत दाखल केलेल्या पावतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी काही रक्कम सामनेवाला यांचे पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवलेली आहेत. सबब सदरील कागदपत्रावरुन दिसून येते की, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1) ड नुसार ग्राहक आहे.
8. मुद्या क्रमांक 2 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याआधी ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे हा ग्राहकाचा वाद आहे. सदरील मुदत ठेवीची रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे तसेच सदरील तक्रार दाखल केल्यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्यांचे शपथपत्रा दाखल केल्यानंतरही सदरील रक्कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्या सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्यांची ठेव रक्कम व्याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्कम मागणेस हक्कदार आहे.
तक्रारदार यांची ठेवीची रक्कम परतफेड करण्याची हमी दिल्यानंतर व त्याची मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम देण्याची वसुली अभावी सामनेवाला यांनी टाळाटाळ केलेली आहे, जेणेकरुन तक्रारदार संस्थेने नाईलाजाने सदरहू तक्रार दाखल करुन सामनेवाला यांचेकडून ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकरीता विनंती केलेली आहे. कारण त्यांची रक्कम मिळणेस धोका निर्माण झाला आहे. म्हणून सदरहू तक्रारीत तक्रारदार यांना निशाणी 6 प्रमाणे दरम्यानचे हुकूमासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर विद्यमान मंचाने दिनांक 24.10.2008 रोजी अंतरीम आदेश पारीत करुन सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी त्यांची मालमत्ता जप्त करु नये म्हणुन Status-quo आदेश पारीत केले होते तसेच सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये त्यांची नमुद मालमत्ता कोणत्याही प्रकारे तबदील करणार नाही अगर मिळकतीवर कोणताही बोजा चढवणार नाही असे प्रतिपादन केलेले आहे. व त्याबाबतची जाणीव सामनेवाला यांना आहे. तसेच तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून बरीच रक्कम परत घ्यावयाची आहे ही बाब सामनेवाला यांना ज्ञात आहे. आणि अशी रक्कम जर सामनेवाला क्रं. 1 संस्था त्यांचे संचालक मंडळ/ चेअरमन यांचे कृतीमुळे परत करण्यास असमर्थ आहे तर संस्थेचे सर्व संचालक मंडळ/ चेअरमन स्वतंत्ररित्या व एकत्रितरित्या सदरील रक्कम परतफेड करण्यास जबाबदार आहेत आणि त्यामुळे त्यांची मालमत्ता ही जप्त होऊन कायद्याने विक्रीचा आदेश होऊन प्राप्त झालेल्या रक्कमेच्या धनादेशातून सबंधीत तक्रारदार यांची रक्कम परतफेड होऊ शकते. म्हणून मंचाने सदरहू तक्रारीत सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे मालमत्ता जशीच्या तशी ठेवण्याबाबत अंतरीम आदेश पारीत केले होते ते आता या आदेशाप्रमाणे सामनेवाला क्रं. 1 व 2 ची सदरहू तक्रारीत दर्शविल्याप्रमाणे त्याचे किंवा त्याचे हिश्याची मालमत्ता '' जशीची तशी '' ठेवण्यात येत आहे.
सामनेवाला क्रमांक 9 व 14 यांनी सामनेवाला सोसायटीचे संचालक पदाचा राजीनामा दिलेबाबत सोसायटीचे सभा दि.25/11/2008 रोजीचे ठराव क्र. 3ची नक्कल व सामनेवाला क्रमांक 9 व 14 यांचा राजीनामा मंजुर करण्यात आलेबाबतचे सामनेवाला सोसायटीचे चेअरमन यांनी दि.26/11/2008 रोजी दिलेल्या पत्राच्या प्रती सादर केलेल्या असल्याने सामनेवाला क्र. 9 व 14 यांचे नांव प्रस्तुत तक्रारीतुन वगळण्यात येते. तसेच सामनेवाला क्र. 6 यांनी सामनेवाला सोसायटीचे संचालक पदाचा राजीनामा दिलेबाबतचे कथन केले आहे तथापी सदरचा राजीनामा मंजुर झालेबाबतचे सोसायटीचे सभेतील ठरावाची प्रत अगर तद्अनुषंगीक कागदोपत्री पुरावा सादर केलेला नसल्याने सामनेवाला क्र. 6 यांचे नांव प्रस्तुत तक्रारीतुन वगळण्याची विनंती मान्य करता येणार नाही या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं. 1 ते 8 तसेच 10,11,12,13,15 ते 17 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांचे वरील आदेश कलम 1 मध्ये नमुद मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमा त्या त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे . 5 टक्के व्याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
तसेच मुदत ठेव पावती क्रमांक 12717 व 12718 या ठेव पावत्यांची मुदत पुर्व मागणी तक्रारदाराने केलेली असल्याने सदर ठेव पावत्यांत नमुद ठेव रक्कम ठेव ठेवलेल्या तारखेपासुन सदर ठेव पावतीत नमुद व्याजदरासह तक्रारदारास देण्यात यावी.
( क ) सामनेवाला क्रं. क्रं. 1 ते 8 तसेच 10,11,12,13,15 ते 17 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 2000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं. क्रं. 1 ते 8 तसेच 10,11,12,13,15 ते 17 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं. क्रं. 1 ते 8 तसेच 10,11,12,13,15 ते 17 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) सामनेवाला क्रं. 1 व 2 च्या तक्रारीत व निशाणी 6 मध्ये आणि तक्रारीत म्हटल्याप्रमाणे मालमत्ता मंचाचे आदेशाप्रमाणे जप्त करण्यात येते म्हणून सामनेवाला यांनी वरील मालमत्ता किंवा त्याचे कोणत्याही हिश्याचा व्यवहार करु नये आणि वरील मालमत्तेचा कोणालाही कोणत्याही प्रकारे विक्री,गहाण,दान, बक्षीस,ताबा व अन्य मार्गाने तबदील करु नये. सदर आदेश सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या इतर तक्रारीतील आदेशाप्रमाणे पूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपर्यंत सामनेवाला यांचेवर बंधनकारक राहील.
( फ ) सदरील तक्रारीच्या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्यास सामनेवाला क्रं. क्रं. 1 ते 8 तसेच 10,11,12,13,15 ते 17 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.
( ग ) सामनेवाला क्र. 9 व 14 यांनी सामनेवाला सोसायटीचे संचालक पदाचा राजीनामा दिलेला असल्याने व तो सामनेवाला सोसायटीने मंजुर केलेला असल्याने तसेच तसा योग्य तो कागदोपत्री पुरावा सामनेवाला यांनी सादर केलेला असल्याने सामनेवाला क्र. 9 व 14 विरुध्दची तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
( ग ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 05/10/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव