तक्रार क्रमांक – 364/2009 तक्रार दाखल दिनांक – 06/06/2009 निकालपञ दिनांक – 06/03/2010 कालावधी - 00 वर्ष 09महिने 00दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. सागर वसंत गायकवाड 3क/301,देवरत्न नगर, एस.एम.रोड, चुनाभट्टी, मुंबई 400 022. .. तक्रारदार विरूध्द श्री. भाऊसाहेब धनघाव रुम. नं.196, गायकर चाळ, गांधीनगर बसस्टॅंड बदलापुर(पू), जि - ठाणे. .. विरुध्दपक्ष समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र. अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क स्वतः वि.प एकतर्फा एकतर्फा आदेश (पारित दिः 06/03/2010) मा. प्र. अध्यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्री. सागर गायकवाड यांनी श्री.भाऊसाहेब धनघाव यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी अंबिका एंटाप्रायजेसचे प्रापराईटर म्हणुन ग्रिल करुन देण्याचे कॉनट्रक्ट घेऊन ते पुर्ण न केल्यामुळे स्विकारलेले रु.15,000/- तक्रारदार यांनी परत मागितले आहे. 2. तक्रारदार यांनी त्यांची सदनिका ए-403 चौथा मजला, सुभविहार संकुल, कातरप रोड, कुळगाव, बदलापुर येथे ग्रिल सेफ्टी डोअर लावुन देण्यासंबंधी विरुध्द पक्षकार व तक्रारदार यांनी रक्कम रु.22,000/- रकमेचे बील ठरविले होते. त्यापैकी विरुध्द पक्षकार यांनी रक्कम रू.15,000/- मिळाल्याचे पत्राद्वारे कबुल केले आहे. परंतु अद्यापी मोबदला घेऊनही तत्सम सेवा देण्यात विरुध्द पक्षकार असमर्थ व निष्काळजी ठरले व अद्यापी ठरल्याप्रमाणे तक्रारदारांच्या सदनिकेला ग्रिल बसविण्याचे काम पुर्ण केले नाही, म्हणुन तक्रारदार यांनी विरुध्द पक्षकार यांचे कडे भरलेली रक्कम रु.15,000/- व्याजासकट परत मागितलेली आहे. 3. विरुध्द पक्षकार यांना मंचाने नोटिस बजावुनही ते हजर राहिले नाहीत व त्यांची लेखी कैफीयत त्यांनी दाखल केली नाही म्हणुन मंचाने विरुध्द पक्षकार यांचे विरुध्द दि.25/01/2010 रोजी एकतर्फा आदेश पारित केला. हे मंच पुढील प्रमाणे एकतर्फा अंतीम आदेश देत आहे.
.. 2 .. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 364/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. विरुध्द पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च रु.500/-(रु. पाचशे फक्त) तक्रारदार यांस द्यावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदाराकडुन ग्रिल बसविण्यास स्विकारलेली रक्कम रु.15,000/- (रु. पंधरा हजार फक्त) सेवा न दिल्यामुळे परत करावे. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 2 महिन्यात करावे अन्यथा तदनंतर वरिल रक्कमेवर द.सा.द.शे 6 % व्याज द्यावे लागेल. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी रु. 700/-(रु. सातशे फक्त) द्यावे. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 06/03/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट )(सौ.भावना पिसाळ ) सदस्य प्र.अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे D:\judg.aft.02-06-08\Pisal Madam
|