Maharashtra

Kolhapur

CC/10/500

Vinod Neminatha Aurwade - Complainant(s)

Versus

Bhaubali Zilla Nagari Sah Pat Sanstha - Opp.Party(s)

R.B.Chougule ( Harolikar)

20 Nov 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/500
1. Vinod Neminatha AurwadeAt Post Alas,Tal-Shirol, Kolhapur.2. Shubhangi Neminath AurwadeR/o. As above3. Shaila Neminath AurwadeR/o. As above4. Pooja Neminath AurwadeR/o. As above5. Neminath Parisa AurwadeR/o. As above6. Shiramabai Alias Shimanti Parisa AurwadeR/o. As above ...........Appellant(s)

Versus.
1. Bhaubali Zilla Nagari Sah Pat Sanstha Jaysingpur,Tal- Shirol, Kolhapur.2. Ajit Annaso DemapureG.No-9,Jaysingpur.Tal-Shirol.Kolhaur3. Shikandar Ismail GaibanGalli no 9, Jaysingpur Tal-Shirol.Kolhaur4. Mahavir Balisha SakappaDanoli.Tal-Shirol.Kolhaur5. Sharad Shripal Magadum.Galli no 6,Jaysingpur Tal-Shirol.Kolhaur6. Anna Babu parit.Nandani. Tal-Shirol.Kolhaur7. Bapu Appa Pujari.Nimshirgaon Tal-Shirol.Kolhaur8. Vidhyadhar Shamrao MincheJyaingpur Tal-Shirol.Kolhaur9. Ashok Bhupal PatilAlate.Tal-Shirol.Kolhaur10. Paygonda Narsgonda PatilNimshirgaon Tal-Shirol.Kolhaur11. Sawakar Dattu KambaleNimshirgaon. Tal-Shirol.Kolhaur12. Shuhas Bhauso MirgundeJaysingpur Tal-Shirol.Kolhaur13. Sou,Rajmati Mahavir MagdumNimshirgaon Tal-Shirol.Kolhaur14. Shantinatha Bapu Chougule.Abdullat.Tal-Shirol.Kolhaur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.R.B.Chougule (Harolikar) for all the complainants

Dated : 20 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.20.11.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीसेस लागू झाल्‍या आहे. परंतु, सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद व दामदुप्‍पट ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्‍कम
1.
14290
15592/-
27.09.2007
17.02.2008
8%
2.
12992
3739/-
16.04.2007
23.04.2008
9%
3.
16924
10267/-
18.11.2007
18.05.2008
8%
4.
12993
10304/-
16.04.2007
16.05.2008
9%
5.
16925
10267/-
18.11.2007
18.05.2008
8%
6.
16923
10267/-
18.11.2007
18.05.2008
8%
7.
14289
15592/-
17.02.2007
17.02.2008
8%
8.
16826
10267/-
18.11.2007
18.05.2008
8%
9.
16845
3445/-
18.11.2004
18.11.2008
9.5%
10.
20185
10000/-
20.07.2004
20.07.2011
20000/-

 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.05.04.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. तक्रारदार क्र.6 शिरमाबाई यांच्‍याच नांवे सामनेवाला संस्‍थेने श्रीमंती असे म्‍हणून ठेव पावती केले असलेने तक्रार कलम 2 मध्‍ये अ.नं.6 व 7 या ठेवी तक्रारदार क्र.6 यांच्‍याच आहेत. शिरमाबाई पारीसा औरवाडे व श्रीमंती पारीसा औरवाडे या एकच व्‍यक्‍ती असून त्‍या श्री.पारीसा द-याप्‍पा औरवाडे यांच्‍या पत्‍नी आहेत.  त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.1 ते 14 यांना या मंचाने संधी देवूनही त्‍यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या व्‍याजासह रक्‍कमा परत करण्‍याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्‍हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्‍य असल्‍याचे दाखवून दिले आहे. सबब, सामनेवाला क्र.1 ते 13 यांना वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 हे सामनेवाला संस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांना केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(6)        तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता ठेव पावती क्र. 20185 ही ठेव पावती वगळता उर्वरित सर्व ठेव पावत्‍या या मुदत बंद ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(7)        तसेच, ठेव पावती क्र.20185 ही पावती दामदुप्‍पट ठेवींची असून तिची मुदत अ़द्याप पूर्ण झालेली नाही असे दिसून येते. म्‍हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्‍कमेची मुदतपूर्व मागणी केलेचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर ठेव पावतीची रक्‍कम हि भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार सदर ठेव पावतीची तक्रार दाखल दि.23.08.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का वजाजाता होणा-या व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत.
 
 
(9)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत शिरमाबाई पारीसा औरवाडे व श्रीमंती पारीसा औरवाडे या एकच व्‍यक्‍ती असून त्‍या पारीसा द-याप्‍पा औरवाडे यांच्‍या पत्‍नी असल्‍याचे कथन केले आहे. सदरचे कथन शपथेवर केले आहे. प्रस्‍तुत तक्रारीतील पावती क्र.16845 व 20185 या पावत्‍या अनुक्रमे शिरमाबाई पारीसा औरवाडे व श्रीमंती पारीसा औरवाडे यांचे नांवे असल्‍याचे दिसून येते. इत्‍यादी वस्‍तुस्थिती विचारात घेता सदर ठेव पावत्‍यांच्‍या रक्‍कमा तक्रारदार क्र.6, शिरमाबाई उर्फ श्रीमंती पारिसा औरवाडे यांना अदा करणेत याव्‍यात या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 
 
(10)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदत बंद रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
तक्रारदाराचे नांव
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
विनोद नेमिनाथ औरवाडे
14290
15592/-
2.
विनोद नेमिनाथ औरवाडे
12992
3739/-
3.
शुभांगी नेमिनाथ औरवाडे
16924
10267/-
4.
शुभांगी नेमिनाथ औरवाडे
12993
10304/-
5.
शैला नेमिनाथ औरवाडे
16925
10267/-
6.
पुजा नेमिनाथ औरवाडे
16923
10267/-
7.
नेमिनाथ पारीसा औरवाडे
14289
15592/-
8.
नेमिनाथ पारीसा औरवाडे
16826
10267/-
9.
शिरमाबाई उर्फ श्रीमंती पारीसा औरवाडे
16845
3445/-

 
 
 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदार क्र.6,शिरमाबाई उर्फ श्रीमंती पारीसा औरवाडे यांना ठेव पावती क्र.20185 वरील रक्‍कम रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार ठेव तारखेपासून सदर ठेव पावत्‍यांची तक्रार दाखल दि. 23.08.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का व्‍याज वजाजाता होणारे व्‍याज द्यावे व दि.24.08.2010 रोजीपासून सदर रक्‍कमांवर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER