Maharashtra

Wardha

CC/18/2013

PRASHANT VASANTRAO AAGASKANDE - Complainant(s)

Versus

BHARTIYA STATE BANK THROUGH MANAGER - Opp.Party(s)

WANJARI

24 Nov 2014

ORDER

DIST. CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
SEWAGRAM ROAD
NEAR YASHWANT COLLEGE
WARDHA-442001
MAHARASHTRA (PH.NO.07152-243550 )
 
Complaint Case No. CC/18/2013
 
1. PRASHANT VASANTRAO AAGASKANDE
BODKHA,SAMUDRAPUR
WARDHA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BHARTIYA STATE BANK THROUGH MANAGER
SAMUDRAPUR
WARDHA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Prakash L. Jadhav PRESIDENT
 HON'BLE MR. Milind R. Kedar MEMBER
 HON'BLE MS. Smita N. Chandekar MEMBER
 
For the Complainant:WANJARI, Advocate
For the Opp. Party: A.R.Bhandakkar, Advocate
ORDER

   निकालपत्र

( पारित दिनांक :24/11/2014)

               (  मा. अध्‍यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्‍या आदेशान्‍वये) 

         

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍द पक्षा विरुध्‍द दाखल केली आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय असा की, त्‍याचे वि.प.च्‍या शाखेत खाते क्रं.11708615353 असून, सदर खात्‍याचा व्यवहार सुलभ होण्‍यासाठी चेक सुविधा त.क.ला दिलेली आहे. त.क.ला  बॅंकेने दिलेल्‍या चेकबुक मधील चेक क्रं.403404 पासून पुढील सर्व चेक अंदाजे सप्‍टेंबर 2010 पासून कुठेतरी गहाळ झाले. सदर चेक पैकी चेक नं. 403404, 403405, 403406 या चेकवर त.क. ची स्‍वाक्षरी असून ते चेक कोरे आहे. सदर चेकबुक तक्रारकर्त्‍यास दोन महिन्‍यापासून शोधून ही मिळाले नसल्‍यामुळे शेवटी त्‍याचा कुणीही चुकिचा वापर करु नये व त.क. चे आर्थिक नुकसान होऊ नये म्‍हणून त्‍यांनी दि.20.11.2010 रोजी पोलिस स्‍टेशन समुद्रपुर येथे तक्रार दिली. तसेच सदर चेक कोणी वटविण्‍यास टाकल्‍यास वटविल्‍या जाऊ नये म्‍हणून वि.प. बॅंकेत दि.25.11.2010 रोजी अर्ज सादर केला. सदर अर्ज वि.प. यांनी दि.26.11.2010 रोजी स्विकारला आहे.
  2.      त.क.चे पुढे असे कथन की, वि.प.बॅंकेने त.क.ने दिलेला अर्ज विचारात घेऊन गहाळ झालेल्‍या चेकचा पेमेंट होऊ नये, स्‍टॉप पेमेंट सर्व्‍हीस देण्‍याकरिता दि.26.11.2010 रोजी सदर स्‍टॉप पेमेंटचे चार्ज म्‍हणून रु.25/- कापून घेतले. त्‍यामुळे वि.प.बॅंकेत वरील चेक जरी कोणी वटविण्‍यास टाकला तरी सदर चेक स्‍टॉप पेमेंट हे कारण देऊन वटविणे थांबवायचे होते. ईश्‍वर श्रावण ठाकरे यांनी माहे एप्रिल 2011 ला गहाळ झालेला चेक क्रं.403404 वटविण्‍यास वि.प. बॅंकेत टाकला. वि.प. बॅंकेत सदर धनादेश स्‍टॉप पेमेंट हे कारण न दाखविता, खात्‍यात अपुरा निधी हे कारण देऊन अनादरित केला. वि.प.ने त.क.च्‍या खात्‍यातून रु.25/- जी सुविधा देण्‍याकरिता कापून घेतले होते, ती सर्व्‍हीस देण्‍याकरिता वि.प.ने टाळाटाळ केली व वि.प.च्‍या चुकिमुळे त.क.ला फौजदारी प्रकरणाला समोर जावे लागले. त.क. ची समाजात मानहानी झाली व त.क.ला मनस्‍ताप सहन करावा लागला. सदर फौजदारी प्रकरण आज ही त.क.च्‍या विरुध्‍द चालू असल्‍यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. वि.प. ने जाणीवपूर्वक दोषपूर्ण सेवा दिली आहे  व त.क. ला मानसिक त्रास दिला आहे. म्‍हणून वि.प. त.क. ला मानसिक त्रासासाठी रु.50,000/- देण्‍यास बांधील आहे. त.क. ने दि.04.06.2012 रोजी वि.प.ला नोटीस पाठविली व ती नोटीस दि. 08.06.2012 रोजी वि.प. ला मिळाली. परंतु वि.प. ने त्‍याचे उत्‍तर दिले नाही  व नुकसान भरपाई दिली नाही. म्‍हणून त.क. ने प्रस्‍तुत  तक्रार दाखल केली असून त्‍यात मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई म्‍हणून रु.50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.1,000/- मिळावा अशी मागणी केली आहे.  
  3.      वि.प. यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 14 वर दाखल केला असून तक्रार अर्जास सक्‍त विरोध केला आहे. त.क.चे वि.प.च्‍या बॅंकेत बचत खाते होते व त्‍याला धनादेश सुविधा पुरविण्‍यात आली होती. तसेच त.क.नी सदरील चेकबुक गहाळ झाल्‍याचे दि.26.11.2010 रोजी वि.प.ला कळविले होते हे मान्‍य केलेले असून इतर सर्व आक्षेप अमान्‍य केलेले आहे.
  4.      वि.प. चे म्‍हणणे असे की,  वि.प. बॅंकेला फक्‍त बॅकिंग कायदा लागू होतो सामान्‍य कायदा नाही. वि.प. ही संगणीकृत बॅंक असून जेव्‍हा केव्‍हा चेक बॅंकेत जमा होतो तेव्‍हा चेक देणा-याच्‍या खात्‍यात पैसे आहे किंवा नाही हे बघून तो परत करण्‍याची यादी संगणकामध्‍ये अगोदरच स्थित राहते. त्‍याप्रमाणे पहिले कारण अपुरा निधी हे असते व नंतर स्‍टॉप पेमेंट असते. वि.प.चे सर्व ग्राहकांशी चांगले संबंध आहे. दि.25.11.2010 व 26.11.2010 ची सूचना ही निव्‍वळ बॅंकेला फसविण्‍यासाठी दिलेली आहे. कारण चेकबुक हरविले असते तर चेकबुक संपूर्ण दिसले नसते, परंतु 1-2 चेक त्‍याच नंबरचे हरविणे म्‍हणजे ही त.क.ची खेळी आहे.  वि.प. ने पुढे असे कथन केले की, त.क. हे ईश्‍वर श्रावण ठाकरे यांचे कायदेशीर देणे टाळण्‍यासाठी त्‍यानी सदर खोटी तक्रार दाखल केलेली आहे. वि.प. ने त.क.ला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. म्‍हणून त.क.ची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी विनंती केलेली आहे.
  5.      त.क.ने त्‍याच्‍या कथनाच्‍या पृष्‍ठयर्थ स्‍वतःचे शपथपत्र नि.क्रं. 15 वर दाखल केलेले आहे व वर्णन यादी नि.क्रं. 3 व 11 सोबत कागदपत्रे दाखल केलेली आहे. वि.प.ने नि.क्रं. 18 वर कृष्‍णा फकोराजी धनवीज या कर्मचा-याचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
  6.      त.क.ने त्‍याचा लेखी युक्तिवाद नि.क्रं.16 वर दाखल केला असून वि.प.ने त्‍याचा लेखी युक्तिवाद नि.क्रं.19 वर दाखल केलेला आहे. त.क.चे अधिवक्‍ता व वि.प. यांचे अधिवक्‍ता यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतला.
  7.      वरीलप्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्‍पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्‍यावरील कारणमिमांसा पुढीलप्रमाणे आहे.

 

अ.क्रं.

            मुद्दे

उत्‍तर

1

विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा गहाळ झालेल्‍या धनादेशावर चुकिचा शेरा मारुन  दोषपूर्ण सेवा व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा  अवलंब केला आहे काय ?

नाही.

2

तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्‍यास पात्र आहे काय ?

 नाही.

3

अंतिम आदेश काय ?

नामंजूर

                                                : कारणमिमांसा :-

  1. मुद्दा क्रं.1, व 2 बाबत ः- तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष बँकेचा खातेदार आहे व त्‍याचा बचत खाता क्रं. 11708615353 असा असून त्‍याला चेक सुविधा पुरविण्‍यात आलेली होती. तसेच त.क.ने दि.20.11.2010 रोजी पोलिस स्‍टेशन समुद्रपुर येथे तक्रार देऊन त्‍याला पुरविण्‍यात आलेले चेक पैकी 403404 पुढील चेक गहाळ झाल्‍याचे कळविले आहे. तसेच दि. 26.11.2010 रोजी सुध्‍दा ही बाब वि.प. बँकेला कळविली हे वादातीत नाही. त.क.ने नि.क्रं. 3(1) वर पोलिस स्‍टेशन समुद्रपूर येथे दिलेल्‍या तक्रारीची झेरॉक्‍स प्रत दाखल केलेली आहे. त्‍या तक्रारीवरुन असे निदर्शनास येते की, त.क.ने दि.20.11.2010 रोजी पोलिस स्‍टेशन समुद्रपूर येथे तक्रार देऊन त्‍याचे बचत खात्‍यातील चेक मधील चेक नं. 403404 पासून पुढे समोर असलेले चेक बुक 2 महिन्‍यापासून सापडत नाही. सदरील चेक बुक मधील सुरुवातीच्‍या काही चेकवर त्‍यानी स्‍वाक्षरी केलेली आहे. त्‍या  चेकचा गैरवापर होऊ नये म्‍हणून त्‍यानी तक्रार दाखल केली आहे. त्‍या तक्रारीप्रमाणे पोलिस स्‍टेशन समुद्रपूर यांनी केस टायरीला दि.28.11.2010 रोजी नोंद केली आहे. तसेच दि.26.11.2010 रोजी त.क.ने सदरील बाब वि.प. बँकेला सुध्‍दा कळविली आहे व त्‍या सोबत त्‍यांनी स्‍वतःचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
  2.      वि.प.बँकेला दिलेले पत्र नि.क्रं. 3(2) वर दाखल करण्‍यात आलेले आहे. त्‍यावर संबंधित बँकेचे मॅनेजरने चेक क्रं. 403404 पासून 404315 पर्यंतचे स्‍टॉप पेमेंट करण्‍यासंबंधी शेरा मारलेला आहे. त.क.ने त्‍याचा खाते उतारा नि.क्रं. 3(3) वर दाखल केलेला आहे. त्‍याचे अवलोकन केले असता दि.26.11.2010 रोजी धनादेश स्‍टॉप करण्‍यासाठी रु.25/- चार्जेस लावून  त्‍याच्‍या खात्‍यातून वळती केलेले आहे.  ईश्‍वर श्रावण ठाकरे यांनी त.क.च्‍या गहाळ झालेल्‍या चेक पैकी 403404 क्रमांकाचाच चेक रु.90,000/-चा दि.31.03.2011 चा वि.प. बँकेकडे वटविण्‍यासाठी दाखल केला. त्‍यावर वि.प. बँकेने (Insufficient Fund ) अपुरा निधी हा शेरा मारुन तसा मेमोसह चेक ईश्‍वर श्रावण ठाकरे यांना परत केला.
  3.      वरीलप्रमाणे दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजाचे व त.क.च्‍या शपथपत्राचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, त.क.ने वादीत चेक गहाळ झाल्‍याचे वि.प.बँकेला कळवून पेमेंट स्‍टॉप करण्‍यासाठी विनंती केलेली आहे व सदरील चेक रद्द करण्‍यासाठी वि.प. बँकेने रु.25/- त.क.च्‍या खात्‍यातून वजा केलेले आहे. अशा परिस्थिती वि.प. बँकेकडे त.क. च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे गहाळ झालेला चेक जर वटविण्‍यासाठी वि.प. बँकेकडे दाखल केल्‍यास स्‍टॉप पेमेंट चा शेरा मारुन तो चेक परत करावयास पाहिजे होता, परंतु तसे न करता (Insufficient Fund ) अपुरा निधी हा शेरा मारुन तसा मेमो देण्‍यात आला. वि.प. च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे वि.प. बँक ही संगणकीयकृत असून जेव्‍हा केव्‍हा बँकेत चेक जमा करण्‍यात येतो तेव्‍हा खुद तो चेक परत करण्‍याचे कारण यादीत संगणकात अगोदरच स्थित राहतो. त्‍याप्रमाणे पहिले कारण अपुरा निधी (Insufficient Fund ) असा असतो व नंतर स्‍टॉप पेमेंट असा असतो.
  4.      वि.प. ने पुढे असे कथन केले आहे की, दोन्‍ही कारणावरुन चेक परत दिल्‍यास Negotiable instrument Act चे कलम  138 त्‍याला लागू होतो. वि.प.कडून झालेली चूक ही संगणकीय चूक असून हेतुपुरस्‍सर किंवा त.क.ला त्रास देण्‍याच्‍या कारणाने झालेली नाही. त्‍यामुळे हे पाहणे जरुरीचे आहे की, वि.प.च्‍या या कृत्‍यामुळे त.क.ला खरोखरच मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे काय? व त्‍याच्‍या विरुध्‍द कलम 138 Negotiable Act प्रमाणे फौजदारी प्रकरण वि.प.च्‍या चुकिमुळे दाखल झाले आहे काय ?
  5.      त.क.ने त्‍याच्‍या शपथपत्रात ईश्‍वर श्रावण ठाकरे या इसमाने त्‍याच्‍या विरुध्‍द Negotiable Act 138 प्रमाणे फौजदारी प्रकरण कोर्टात दाखल केलेले आहे. परंतु त्‍यासंबंधी कुठलाही पुरावा त्‍याने मंचासमोर दाखल केलेला नाही व त्‍याच्‍या विरुध्‍द तक्रार न्‍यायालयात चालू आहे हे दाखविण्‍यासाठी कुठलाही पुरावा मंचासमोर आलेला नाही. जरी असे ग्राहय धरले की, ईश्‍वर श्रावण ठाकरे यांनी चेक वटविण्‍यासाठी टाकला व तो Insufficient Fund या कारणावरुन अनादरित झाला म्‍हणून फौजदारी प्रकरण त.क.च्‍या  विरुध्‍द दाखल केले असले तरी सुध्‍दा त.क.ला बचावाकरिता त्‍यानी बँकेकडे दाखल केलेले व पोलिस स्‍टेशनला दाखल केलेल्‍या तक्रार अर्जाचा फायदा मिळू शकतो. तसेच जरी स्‍टॉप पेमेंट असा शेरा मारुन वि.प. बँकेने चेक अनादरित केला असला तरी सुध्‍दा Negotiable Act 138 प्रमाणे फिर्याद दाखल होऊ शकते. त्‍यामुळे वि.प.च्‍या कृत्‍यामुळे त.क.वर फौजदारी प्रकरण दाखल झाले असे म्‍हणता येत नाही किंवा वि.प.ने हेतुपुरस्‍सर त्रास देण्‍याच्‍या उद्देशाने तसा शेरा मारुन चेक परत केला असे म्‍हणता येणार नाही.
  6.      त.क.च्‍या खाते उता-याचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, दि. 23.09.2010 पासून पुढे त.क.च्‍या खात्‍यावर फक्‍त रु.459/- जमा होते व वादातील चेक हे एप्रिल 2011 मध्‍ये वि.प. बँकेकडे वटविण्‍यासाठी आला होता. त्‍यामुळे वि.प.च्‍या खात्‍यात त्‍यावेळेस चेक प्रमाणे रक्‍कम जमा  नव्‍हती हे तितकेच सत्‍य आहे. अशा परिस्थितीत त.क.च्‍या विरुध्‍द Negotiable Act 138 प्रमाणे तक्रार दाखल झाली. म्‍हणून  त्‍याला आर्थिक नुकसान, शारीरिक व मानसिक त्रास झाला असे म्‍हणता येणार नाही. वि.प. बँकेने हेतुपुरस्‍सर कुठलेही कृत्‍य केलेले नाही. जे कृत्‍य झालेले आहे ते अनवधानाने व संगणकीय पध्‍दतीमुळे झाल्‍याचे दिसून येते. म्‍हणून वि.प. बँकेने त.क.ला दोषपूर्ण सेवा दिली असे म्‍हणता येणार नाही. तसेच त.क. विरुध्‍द फौजदारी प्रकरण दाखल झाल्‍याचे कोणतेही दस्‍ताऐवज मंचासमोर दाखल केलेले नाही. त्‍यामुळे त्‍याची मानहानी झाली असे म्‍हणता येणार नाही. त्‍यामुळे मंच या निष्‍कर्षा प्रत येते की, वि.प. बँकेने त.क.ला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍यामुळे त.क. हा मागणीप्रमाणे कोणताही लाभ मिळण्‍यास पात्र नाही. म्‍हणून वरील 1, 2 व 3  मुद्दयाचे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

   सबब खालील प्रमाणे आदेश   पारित करण्‍यात येते.

आदेश

1      तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.  

2        उभय पक्षाने खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.

3        मा.सदस्‍यांसाठीच्‍या ‘ब’ व ‘क’ फाईल्‍स संबंधितांनी परत घेवून   जाव्‍यात.

4    निकालपत्राच्‍या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्‍तव व उचित 

     कार्यवाही करिता पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. Prakash L. Jadhav]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Milind R. Kedar]
MEMBER
 
[HON'BLE MS. Smita N. Chandekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.