Maharashtra

Sangli

CC/10/446

SONABAI DADU MANE , DHANGAR GAALLI, ASHTA, TAL WALWA, DIST SANGLI - Complainant(s)

Versus

BHARTIYA NAGARI SAHAKLARI PATSANSHTA MARYADIT, ISLAMPUR BR. ASHTA AND OTHERS - Opp.Party(s)

ADV. BASUGUDE, ASHTA

17 Nov 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/446
 
1. SONABAI DADU MANE , DHANGAR GAALLI, ASHTA, TAL WALWA, DIST SANGLI
Dhangar Mane, Ashtha, Tal.Walva
Sangli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. BHARTIYA NAGARI SAHAKLARI PATSANSHTA MARYADIT, ISLAMPUR BR. ASHTA AND OTHERS
Br.Ashtha, Tal.Walva
Sangli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:ADV. BASUGUDE, ASHTA, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

                                                      नि. २९
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
                                                   
                                           मा.अध्‍यक्ष : श्री.अनिल य.गोडसे    
                                         मा.सदस्‍या :  श्रीमती गीता घाटगे
                              मा.सदस्‍या :  श्रीमती सुरेखा बिचकर 
                            
ग्राहक तक्रार अर्ज क्र.४४६/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख   :  २७/८/२०१०
तक्रार दाखल तारीख  :  ३०/८/२०१०
निकाल तारीख       १७/११/२०११
-------------------------------------------
 
१. सोनाबाई दादू माने
    वय वर्षे   ७१, धंदा घरकाम
    रा.धनगर गल्‍ली, आष्‍टा, ता.वाळवा जि.सांगली               ..... तक्रारदारú
  
 विरुध्‍द
 
१. भारतीय नागरी सह.पतसंस्‍था मर्या. इस्‍लामपूर
    शाखा आष्‍टा तर्फे सेक्रेटरी
 
२. उषादेवी संभाजी पाटील,
    वय वर्षे ३६, धंदा नोकरी,
    रा.कापुसखेड नाका, इस्‍लामपूर,
    ता.वाळवा जि.सांगली
 
३.  श्री संजय पांडुरंग पाटील,
    वय वर्षे ४४, धंदा नोकरी,
    रा.इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी, रा.इस्‍लामपूर,
    ता.वाळवा जि.सांगली
 
४. श्री संभाजी आनंदराव पाटील,
    वय वर्षे ४४, धंदा नोकरी,
    रा.कापुसखेड नाका, इस्‍लामपूर,
    ता.वाळवा जि.सांगली
५. सौ. विजया गणपती पाटील,
    वय वर्षे सज्ञान, धंदा घरकाम,
    रा.प्राध्‍यापक कॉलनी, शिराळा ता.शिराळा जि.सांगली
 
६. सौ रेखा जयकर पाटील,
    वय वर्षे सज्ञान, धंदा घरकाम,
    रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
 
७. सुरेखा चंद्रकांत मगदूम,
    वय वर्षे सज्ञान, धंदा घरकाम,
    रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्‍हापूर
 
८. श्री शिवाजी रंगराव पाटील,
    वय वर्षे ४७, धंदा शेती,
    रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
 
९. आनंदा नारायण जाधव,
    वय वर्षे ४२, धंदा शेती,
    रा. शिवाजी चौक, ऊरण-इस्‍लामपूर,
    इस्‍लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
 
१०. सौ मंगल नागनाथ पाटील,
    वय वर्षे सज्ञान, धंदा घरकाम,
    रा.एम.एस.ई.बी.जवळ, इस्‍लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
 
११. सचिन आनंदा हांडे
    वय वर्षे ३२, धंदा शेती,
    रा. शिवनगर, इस्‍लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
 
१२. संतोष बजरंग पवार,
    वय वर्षे ४४, धंदा शेती,
    रा.अनंतगंगा, महादेवनगर, इस्‍लामपूर,
    ता.वाळवा, जि. सांगली.
 
१३. विनायक बाळकृष्‍ण लोले,
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती,
    रा. यादवनगर, पेठवडगांव, ता.हातकणंगले
    जि.कोल्‍हापूर
 
१४. माधवी गोरक्ष पवार, 
    व.व. सज्ञान, धंदा घरकाम,
    रा.शिवाजी चौक, इस्‍लामपूर,
    ता.वाळवा जि.सांगली
 
१५. प्रशासक, श्री बी.जी.शेळके
     भारतीय नागरी सह.पतसंस्‍था मर्या. इस्‍लामपूर
     शाखा स्‍टॅंडजवळ, इस्‍लामपूर,
     वय सज्ञान, धंदा नोकरी
     इस्‍लामपूर, ता.वाळवा जि. सांगली                         ..... जाबदार
 
                      तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री आर.व्‍ही.बसुगडे
                      जाबदार क्र.१ ते १५ एकतर्फा
 
 
 नि का ल प त्र
 
द्वारा- मा.सदस्‍या - श्रीमती सुरेखा बिचकर 
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने दामदुप्‍पट ठेवीअन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार भारतीय नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. इस्‍लामपूर (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या. यातील एका ठेवीची मुदत पूर्ण झाली आहे.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची पतसंस्‍थेकडे मागणी केली असता पतसंस्‍थेने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण ३ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. १ ते १५ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होऊनसुध्‍दा ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्‍यांचेविरुध्‍द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्‍यात आले. 
 
३.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. २ ते १४ यांना पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो. तसेच जाबदार क्र.१५ हे संस्‍‍थेचे प्रशासक असून ते शासकीय अधिकारी असल्‍यामुळे त्‍यांना तक्रारदार यांचे ठेवीची रक्‍कम देणेस संयुक्तिक अगर वैयक्तिक जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने ज्‍या पतसंस्‍थेमध्‍ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो.
 
४.    प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या नि. २८ वरील व्‍याजनिवेदनामध्‍ये तक्रारदार यांना त्‍यांचे ठेवपावत्‍यांवर व्‍याजाची रक्‍कम मिळाली नसल्‍याचे नमूद केले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या नि.२७ सोबतच्‍या ठेवपावत्‍यांचे अवलोकन केले असता मुदत ठेव पावती क्र.००१८६० ची मुदत पूर्ण झालेली आहे. सबब सदरचे ठेवपावतीवरील मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम ठेवीची मुदत संपल्‍याच्‍या दुसरे दिवशीपासून द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहे. ठेवपावती क्र.००२७५३ ची मुदत अद्याप संपलेली नाही. सबब सदरच्‍या ठेवीवरील मूळ रक्‍कम ठेव ठेवल्‍याचे तारखेपासून द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहे.
 
सबब, मंचाचा आदेश की,
 
दे
 
१. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना ठेवपावती क्र.००१८६० वरील मुदती नंतर मिळणारी रक्‍कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्‍त) दि.११/०९/२०११ पासून संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना ठेवपावती क्र.००२७५३ वरील मूळ ठेव रक्‍कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्‍त) दि.१८/०९/२००७ पासून संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
३. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
४. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.२/१२/२०११ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांक:१७/११/२०११
 
 
 
 (सुरेखा बिचकर)                (गीता सु.घाटगे)                        (अनिल य.गोडसे÷)
       सदस्‍या                       सदस्‍या                                 अध्‍यक्ष           
जिल्‍हा मंच, सांगली.             जिल्‍हा मंच, सांगली                 जिल्‍हा मंच, सांगली.  
 
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.