नि. 27
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 2344/2009
-----------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 29/12/2009
तक्रार दाखल तारीख : 01/01/2010
निकाल तारीख : 05/04/2013
-----------------------------------------------------------------
1. श्री दिगंबर शंकरराव वडगांवकर
वय वर्षे – 48, धंदा– वैद्यकीय व शेती
2. सौ माया दिगंबर वडगांवकर
वय वर्षे – 42, धंदा–घरकाम
दोघे रा.477, उरुण चावडीनजीक, इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. प्रशासक, श्री बी.जी.शेळके
भारतीय नागरी सह.पतसंस्था मर्या. इस्लामपूर
ता.वाळवा जि. सांगली
2. सौ उषादेवी संभाजीराव पाटील, चेअरमन
रा.कापुसखेड नाका, ता.वाळवा जि.सांगली
3. श्री संजय पांडुरंग पाटील, व्हा.चेअरमन
मु.पो. कोरेगांव, ता.वाळवा जि. सांगली
रा.इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
4. श्री संभाजीराव आनंदराव पाटील, संस्थापक
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
5. सौ. विजया गणपतराव पाटील, संचालीका
मु.पो.प्रा.कॉलनी, शिराळा ता.शिराळा जि.सांगली
6. सौ रेखा जयकर पाटील, संचालीका
रा. मु.पो.ओझरडे, ता.वाळवा, जि. सांगली.
7. सौ सुरेखा चंद्रकांत मगदूम, संचालीका
रा.मु.पो.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
8. श्री शिवाजी रंगराव पाटील, संचालक
रा.मु.पो.ओझरडे, ता.वाळवा, जि. सांगली.
9. श्री आनंदा नारायण जाधव, संचालक
मु.पो. ऊरण-इस्लामपूर, शिवाजी चौक,
ता.वाळवा जि.सांगली
10. सौ मंगल नागनाथ पाटील, संचालीका
रा.कापूसखेड ता.वाळवा जि.सांगली
11. सचिन आनंदा हांडे, संचालक
रा. इस्लामपूर, शिवनगर, ता.वाळवा जि.सांगली
12. श्री संतोष बजरंग पवार, संचालक
रा.महादेवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
13. श्री विनायक बाळकृष्ण लोले, संचालक
मु.पो.पेठवडगांव, ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
14. सौ दीपा बळवंत फाळके,
रा.विठ्ठलवाडी, पो.कामेरी
ता.वाळवा जि.सांगली
15. डॉ संभाजी बाळकृष्ण पडवळ
रा.इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
16. सौ अलका जगन्नाथ पोटे,
रा.इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली
17. सौ माधवी गोरक्ष पवार, सचिव
मु.पो.ऊरुण इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एस.एस.पाटील
जाबदार क्र.2 व 4 तर्फे : अॅड आर.बी.साळुंखे
जाबदार क्र.14 : म्हणणे नाही
जाबदार क्र.1, 3, 7, 9, 11, 12, 14 ते 17 : एकतर्फा
जाबदार क्र.6, 8, 10 व 13 : वगळण्यात आले
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुत प्रकरणात जाबदार यांचेविरुध्द अशी तक्रार आहे की, जाबदार यांनी गुंतवणूकदारांना जाहीर केलेल्या गुंतवणूकीसंदर्भातील माहितीच्या आधारे तक्रारदाराने सदर पतसंस्थेमध्ये गुंतवणूक केलेली होती. सदर मुदत ठेव विहीत मुदतीत न मिळाल्याने या मंचासमोर तक्रारअर्ज दाखल केला आहे.
मुदत ठेवींचा तपशील खालीलप्रमाणे -
अ.क्र. | ठेवीदाराचे नाव | ठेवपावती क्र. | रक्कम रु. | मुदत ठेवीची तारीख | कालावधी | व्याज-दर % | मॅच्युरिटी तारीख | मॅच्युरिटी रक्कम |
1 | दिगंबर शंकरराव वडगांवकर | 008091 | 1972 | 12/4/05 | 1 वर्षे | 10.5 | 13/4/06 | 2180 |
2 | दिगंबर शंकरराव वडगांवकर | 001636 | 1700 | 20/8/02 | 54 महिने | - | 20/2/07 | 3400 |
3 | दिगंबर शंकरराव वडगांवकर | 003565 | 30000 | 9/5/03 | 66 महिने | 13 | 9/11/08 | 60000 |
4 | दिगंबर शंकरराव वडगांवकर | 003209 | 10000 | 10/4/03 | 66 महिने | 13 | 10/10/08 | 20000 |
5 | दिगंबर शंकरराव वडगांवकर | 00174 | 50000 | 30/5/06 | 2 महिने | 11 | 15/7/06 | 50693 |
6 | दिगंबर शंकरराव वडगांवकर | 002050 | 1129 | 14/10/06 | 12 महिने | 12 | 15/10/07 | 1265 |
7 | दिगंबर शंकरराव वडगांवकर | 002049 | 25103 | 12/2/07 | 12 महिने | 12 | 13/2/08 | 28124 |
8 | दिगंबर शंकरराव वडगांवकर | बचत खाते क्र.793 | 1000 | - | - | - | - | 1000 |
9 | दिगंबर शंकरराव वडगांवकर | बचत खाते क्र.352 | 326 | - | - | - | - | 326 |
10 | माया दिगंबर वडगांवकर | 002048 | 70000 | 29/3/07 | 12 महिने | 12 | 29/3/08 | 78423 |
11 | माया दिगंबर वडगांवकर | 003234 | 10000 | 12/4/03 | 66 महिने | 13 | 12/10/08 | 20000 |
वरीलप्रमाणे तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेकडे मुदत ठेवीमध्ये रक्कम गुंतविली असून सदर रक्कम व्याजासह देण्याची जाबदार यांची जबाबदारी आहे असे त्यांचे म्हणणे आहे. सदर मॅच्युअर्ड रकमा व्याजासह त्यांना मिळाव्यात अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
2. आपल्या तक्रारीसोबत स्वतःचे शपथपत्र, मुदतबंद ठेवीच्या पावत्या, जाबदार संस्थेच्या संचालक मंडळाची यादी, संस्थेला दिलेली नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. जाबदार क्र. 1 ते 14 यांनी तक्रार नोटीस मिळून तसेच वृत्तपत्रामध्ये जाहीर नोटीस (नि.26) देवूनही जाबदार क्र. 1, 3, 7, 9, 11, 12, 14 ते 17 यांनी सदर मंचासमोर उपस्थिती दर्शविलेली नाही अथवा तक्रारीसंदर्भात कोणतेही कागदपत्रे मंचासमोर दाखल केलेली नाहीत तसेच लेखी म्हणणे मांडलेले नाही. त्यामुळे नि.1 वरील आदेशानुसार त्यांचेविरुध्द एकतर्फा प्रकरण चालविणेत आले. तसेच जाबदार क्र. 14 हे हजर झाले परंतु त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल न केलेने त्यांचेविरुध्द म्हणणे नाही असा आदेश करणेत आला. जाबदार क्र.6, 8, 10 व 13 यांचेविरुध्द नोटीस बजावणीकामी तक्रारदार यांनी तजवीज न केलेने त्यांना प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात आले.
4. जाबदार क्र.2 व 4 यांनी प्रस्तुत प्रकरणी नि.16 ला लेखी कैफियत दाखल करुन तक्रारअर्जातील कथने नाकारली आहेत. तक्रारदारांनी रकमेची मागणी जाबदार संस्थेकडे केलेली नाही आणि तसा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. फेब्रुवारी 2008 नंतर सदर जाबदारांचा जाबदार पतसंस्थेशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही. सदर संस्थेचा कारभार 2008 पासून प्रशासक पहात आहेत. त्यामुळे तक्रारदाराने प्रशासकाकडे ठेवीची मागणी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र को.ऑप. सोसायटीज अॅक्ट 1960 मधील कलम 88 प्रमाणे जाबदारविरुध्द चौकशी चालू असून यातील जाबदारांना सदर कलमाखाली जबाबदार धरलेले नाही. त्याचा निर्णय झाल्याखेरिज प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर चालणेस पात्र नाही, सबब तक्रारअर्ज नामंजूर करावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये नमूद केले आहे.
5. तक्रारदारांची तक्रार व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन करता व तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायमंचापुढे खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत का ? | होय |
2 | जाबदार पतसंस्थेने तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? | होय |
3 | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
6. तक्रारदार यांनी स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नांवे जाबदार यांच्या पतसंस्थेमध्ये तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे मुदत ठेव योजनेमध्ये पैसे गुंतविलेले आहेत ही वस्तुस्थिती दाखल ठेवपावत्यांवरुन (नि.5/3 ते 5/13) सिध्द होते. या संदर्भात तक्रारदाराने मंचासमोर दाखल केलेल्या तक्रारीबाबत जाबदार क्र.2 व 4 वगळता जाबदार संस्थेने अथवा संबंधीत संचालक मंडळाने आपले कोणतेही लेखी म्हणणे न्यायमंचासमोर सादर केलेले नाही. किंबहुना वृत्तपत्रातील जाहीर नोटीसीलासुध्दा त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. म्हणजेच अप्रत्यक्षपणे त्यांनी तक्रारदाराची तक्रार आणि वस्तुस्थिती मान्य केल्यासारखे आहे असे मंचाचे ठाम मत झालेले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेली रक्कम जाबदार पतसंस्थेकडून त्यांना देय आहे व जाबदार पतसंस्था ही तक्रारदाराची रक्कम देण्यास बांधील आहे तसेच तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेकडे रक्कम गुंतवणूक करुन पतसंस्थेकडून आर्थिक सेवा घेतलेली असल्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक ठरतात ही बाब निश्चित आहे. मात्र जाबदार यांनी तक्रारदार यांची गुंतवणूक केलेली रक्कम मुदतीअंती देणे क्रमप्राप्त असतानाही दिलेली नाही. त्यामुळे जाबदार संस्थेने यांनी सेवेत निश्चितच त्रुटी केल्याचे दिसून येते. प्रस्तुत प्रकरणी जाबदार यांना लेखी नोटीस पाठवून व जाहीर नोटीस काढूनही जाबदार क्र.2 व 4 वगळता इतर जाबदारांनी त्यांचे म्हणणे मंचासमोर मांडले नाही. म्हणून त्यांचे विरोधात नि.1 वर एकतर्फा आदेश व म्हणणे नाही असे आदेश पारीत करण्यात आले आहेत.
7. सहा.निबंधक, सहकारी संस्था इस्लामपूर यांनी जाबदार भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर या पतसंस्थेची सहकार कायदा कलम 88 नुसार चौकशी केलेली आहे व त्याप्रमाणे तक्रारअर्जातील खालील संचालकांवर दोषारोपन करण्यात आले आहे तथा त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
जाबदार क्र.4 - संस्था संचालक श्री संभाजी आनंदराव पाटील
जाबदार क्र.2 - संस्था अध्यक्षा सौ उषादेवी संभाजी पाटील
उपरोक्त संचालकांवर रु.10,16,91,961/- इतक्या रकमेची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन क्र.5223/09 सौ वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी याकामी दि.12 डिसेंबर 2010 प्रमाणे ज्याचेवर महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार दायीत्व निश्चित करण्यात आले आहे, त्यांना ठेव रक्कम परत करण्यास जबाबदार धरण्यात आलेले आहे. सबब जाबदार क्र.2 व 4 यांना तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देण्यास जबाबदार धरण्यात येत आहे. उर्वरीत जाबदारांना तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देण्यास वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असे या मंचाचे मत आहे.
8. जाबदार क्र. 1 ते 14 मधील उपरोक्त संचालकांवर महाराष्ट्र सहकारी कायद्यातील कलम 88 अन्वये चौकशी होवून जाबदार क्र.2 व 4 यांना जबाबदार धरुन त्यांचेवर दायित्व निश्चित केलेबाबत पुरावा तक्रारदार यांनी नि.25 वर दाखल केलेला आहे. त्यानुसार जाबदार पतसंस्थेबरोबर दायित्व निश्चित केलेले सदर संचालक तक्रारदाराची रक्कम देणेस जबाबदार ठरतात असे मंचास वाटते. त्यामुळे जाबदार क्र.2 व 4 यांनी दाखल केलेल्या कैफियतीतील बचावाचे मुद्दे तथ्यहीन ठरतात.
9. जाबदार संस्था व जाबदार क्र. 2 व 4 यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत निश्चितच त्रुटी केल्याचे दिसून येते. या प्रकरणात आम्ही श्रीमती कलावती व इतर विरुध्द मे. युनायटेड वैश्य को-ऑप. थ्रीफट अॅण्ड क्रेडीट सोसायटी लि. या प्रकरणात मा.राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या 2001 (3) सी.पी.आर. 194 राष्ट्रीय आयोग या निवाडयाचा आधार घेत असून तो निवाडा प्रस्तुत प्रकरणास लागू होतो असे आम्हांस वाटते. सदर निवाडयास मा. राष्ट्रीय आयोगाने असे मत मांडले आहे की,
Para 9 – Society provides facilities in connection with financing and is certainly rendering services to its members and here is a member who avails of such services. When there is a fault on the part of society and itself is not paying the amount of fixed deposit receipts on maturity there is certainly deficiency in service by the society and a complaint lies against society by the member as a complainant.
मा. राष्ट्रीय आयोगानेही ठेवीधारकांना सोसायटीने ठेवीची रक्कम परत न केल्यास ते कृत्य त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते हे स्पष्ट निर्देशित केले आहे. अशा परिस्थितीत जाबदार संस्थेचे संचालक हे तक्रारदार यांच्या ठेवीची रक्कम व्याजासह देण्यास बांधील आहे असे आम्हांस वाटते.
वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.2 व जाबदार क्र.4 यांनी संयुक्तपणे अथवा वैयक्तिकरित्या पावती क्र.008091 वरील मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम रु.2,180/-, पावती क्र.001636 वरील मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम रु.3,400/-, पावती क्र.003565 वरील मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम रु.60,000/-, पावती क्र.003209 वरील मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम रु.20,000/-, पावती क्र.00174 वरील मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम रु.50,693/-, पावती क्र.002050 वरील मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम रु.1,265/-, पावती क्र.002049 वरील मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम रु.28,124/-, खाते क्र.793 वरील रक्कम रु.1,000/, सेव्हिंग्ज खाते क्र.352 वरील रक्कम रु.326/-, पावती क्र.002048 वरील मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम रु.78,423/-, पावती क्र.003234 वरील मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम रु.20,000/-, ठेवींची मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे. 8.5 टक्के व्याजदराने तक्रारदारांना परत करण्याचे आदेश देण्यात येत आहे.
3. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार यांनी 45 दिवसांत करावी. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
4. जाबदार क्र.1, 3, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 यांचेविरोधात कोणतेही आदेश पारीत करण्यात येत नाहीत.
सांगली
दि. 05/04/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.