नि.नं. ३६
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ७७२/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – २६/०६/२००८
तक्रार दाखल तारीखः – २१/०७/२००८
निकाल तारीखः - २३/०९/२०११
----------------------------------------------
सौ सुवर्णा नामदेव जाधव (अज्ञान पालन कर्ती)
कु.प्रमिला नामदेव जाधव
रा.येलूर, ता.वाळवा जि.सांगली .... तक्रारदार
विरुध्द
१. भारतीय नागरी सह.पतसंस्था मर्या. इस्लामपूर भारतीय उद्योग समूह
रजी.नं.SAN/MVA/RSR/CR/1253 भारतीय +ìग्री इंडस्ट्रीज प्रा.लि.
ता.वाळवा जि. सांगली
२. भारतीय नागरी सह.पतसंस्था मर्या. इस्लामपूर
उपशाखा
३. सौ उषादेवी संभाजीराव पाटील, चेअरमन, संचालक
रा.कापुसखेड नाका, ता.वाळवा जि.सांगली
४. श्री संजय पांडुरंग पाटील, संचालक
रा.इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
५. श्री संभाजीराव आनंदराव पाटील, संचालक
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
६. सौ सुरेखा चंद्रकांत मगदूम, संचालक
रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
७. सौ. विजया गणपतराव पाटील, संचालक
रा.मु.पो. शिराळा ता.शिराळा जि.सांगली
८. सौ रेखा जयकर पाटील, संचालक
रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
९. सौ मंगल नागनाथ पाटील, संचालक
रा.एम.एस.सी.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
१०. श्री शिवाजी रंगराव पाटील, संचालक
रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
११. सचिन आनंदराव हांडे, संचालक
रा. इस्लामपूर, सिंहनगर, ता.वाळवा जि.सांगली
१२. श्री संतोष बजरंग पवार, संचालक
रा.माधवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
(मंचाचे दि.२२/९/११ चे आदेशानुसार वगळले.)
१३. विनायक बाळकृष्ण लोले, संचालक
रा. पेठवडगांव, ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
१४. आनंदा नारायण जाधव,
रा. ऊरण-इस्लामपूर, शिवाजी चौक,
ता.वाळवा जि.सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री पी.एम.मैंदर्गी
जाबदार क्र.१, २, ४, ६ ते ११, १३ – एकतर्फा
जाबदार क्र. ३ व ५ –+ìb÷. श्री आर.बी.साळुंखे
जाबदार क्र.१४ तर्फेः +ìb÷. श्री एस.पी.पाटील
जाबदार क्र. १२ – वगळले.
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष – अनिल य. गोडसे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी अन्वये गुंतविलेल्या रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे मुदत ठेवी अन्वये रक्कम गुंतविलेली होती. सदरचे ठेवीची मुदत पूर्ण झाली आहे. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमेची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण २ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. १, २, ४, ६ ते ११, १३ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आले.
३. जाबदार क्र. १४ तर्फे नि.१५ वर म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी सदर म्हणण्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदार हे ग्राहक नाहीत, तक्रारअर्ज मुदतीत नाही, तसेच तक्रारदार यांनी भारतीय उद्योग समूह व भारतीय पतसंस्था यांचेविरुध्द एकत्र दाद मागितली आहे, ती कायद्याने चालणारी नाही. पतसंस्थेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासकांना याकामी सामील पक्षकार केले नाही. जाबदार नं.१४ यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. या कारणास्तव तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे नमूद केले आहे.
४. जाबदार क्र.३ व ५ यांनी मंचाच्या नोटीसीची बजावणी त्यांचेवर झालेवर विधिज्ञांमार्फत हजर होवून त्यांचे म्हणणे प्रस्तुत प्रकरणी नि.१९ वर दाखल केले आहे. त्यांचे म्हणण्यात त्यांनी तक्रारदारांच्या सर्व तक्रारी अमान्य केल्या आहेत. संस्थेवर प्रशासकाची नेमणूक झाल्याने ठेवीसाठी हे जाबदार जबाबदार ठरत नसल्याचे त्यांनी त्यांचे म्हणण्यात नमुद केले आहे, त्याच बरोबर संस्थेवर प्रशासक असूनही त्यांना या कामी जाबदार म्हणून सामिल केले नाही, म्हणून प्रस्तुत प्रकरणी नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाचा बाधा येते असेही नमूद केले आहे. जाबदार पुढे असेही नमुद करतात की, मुळातच तक्रारदारांनी ठेवीतील रकमेबाबत पतसंस्था किंवा प्रशासकाकडे मागणी केल्याचे आढळून येत नसल्याने ती रक्कम नाकारुन त्यांना जाबदारांनी सदोष सेवा दिल्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्याचप्रमाणे सदरहू पतसंस्था ही महाराष्ट्र सहकारी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत संस्था असल्याने, या कायद्याअंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार, तक्रारदारांनी जाबदारांना दावा दाखल करणेपूर्वी नोटीस देणे कायदयाने आवश्यक आहे. तथापि, तशी नोटीस जाबदारांना देणेत आलेली नाही. जाबदारांचे पुढे असेही म्हणणे आहे की, या पतसंस्थेच्या संचालकांविरुध्द फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे. तसेच सहकार कायदा कलम ८८ नुसार अद्यापी त्यांची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अशी वस्तुस्थिती असताना तक्रारदारांना तक्रार अर्ज दाखल करता येत नाही. या सर्व कारणांचा विचार करता जाबदारांनी तक्रारदारांना कोणत्याही प्रकारची सदोष सेवा दिलेली नाही आणि म्हणून तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी जाबदारांनी त्यांचे म्हणण्यात विनंती केली आहे. जाबदारांनी त्यांचे म्हणण्याचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
५. तक्रारअर्ज व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी ठेवपावतीची मूळ प्रत याकामी दाखल केलेली नाही. परंतु ठेवपावतीची विधिज्ञांनी प्रमाणीत केलेली प्रत नि.५/२ वर दाखल आहे. सदर पावतीचा क्र.१२०९३ असा असून सदर पावतीने तक्रारदार यांनी भारतीय नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडे ठेव ठेवलेली दिसते. तक्रारअर्जामध्ये मात्र भारतीय उद्योग समूह, भारतीय +ìग्री इंडस्ट्रीज यांनाही जाबदार म्हणून सामील केले आहे. सदर भारतीय उद्योग समूह यांना याकामी का सामील केले ? याचा कोणताही खुलासा तक्रारदार यांनी तक्रारअर्जात केला नाही. तसेच ठेवपावतीचे अवलोकन केले असता प्रमिला नामदेव जाधव व नामदेव शामराव जाधव यांच्या संयुक्त नावे ठेव ठेवल्याचे दिसून येते. तक्रारअर्ज मात्र सुवर्णा नामदेव जाधव अज्ञान पालनकर्ती व प्रमिला नामदेव जाधव यांचे नावे दाखल केला आहे. तक्रारदार कु.प्रमिला ही अज्ञान आहे हे दर्शविण्यासाठी तक्रारअर्जामध्ये तक्रारदार यांचे वय नमूद नाही. ठेवपावती संयुक्त नावे असताना नामदेव जाधव यांना याकामी सामील केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारअर्जामध्ये तांत्रिक दोष दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये तांत्रिक दोष असलेला तक्रारअर्ज मंजूर करणे योग्य व संयुक्तिक होणार नाही. सबब, तक्रारदार यांना योग्य त्या कायदेशीर मुदतीत व योग्य त्या आवश्यक पक्षकारांना सामील करण्याची मुभा ठेवून सदरचा तक्रारअर्ज काढून टाकण्यात येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: २३/०९/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११