::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, किर्तीळ (वैद्य)गाडगी( मा.सदस्या )
(पारीत दिनांक :- 04.08.2016)
- अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. अर्जदार ही चंद्रपूर येथील रहीवासी असुन अर्जदाराचे पती श्री ईश्वर ठेगणे हे जिल्हा परीषद चंद्रपूर येथील उच्च प्राथमीक शाळा मुरपार येथे मुख्याध्यापक होते. अर्जदाराचे पतीने त्यांच्या हयातीत गैरअर्जदाराकडुन आठ विमा पॉलीसी घेतलेल्या होत्या त्या विमा पॉलीसीचा भरणा त्यांच्या वेतनामधुन होत होता. विमा पॉलीसीतील दोन विमा पॉलीसीची रक्कम अर्जदाराला सुनावणीची संधी न देता अर्जदाराच्या खत्यात जमा केली व उर्वरीत सहा विमा पॉलीसी पैकी एक पॉलीसी कालातीत असुन एका विमा पॉलीसीची रक्कम दिंनाक 22/02/2026 ला देय आहे. असे गैरअर्जदराने अर्जदाराला कळविले. माञ दिंनाक 15/04/2013 च्या पञान्वये अर्जदाराला विमा पॉलीसीचा दावा नाकारला. अर्जदाराच्या पतीच्या खालील प्रमाणे पॉलीसी आहे.
- पॉलीसी कमाक 973564345 रक्कम 50,000/ दिंनाक 28/03/2007
- पॉलीसी क्रंमाक 973783619 रक्कम 50.000/ दिंनाक 28/03/2010
- पॉलीसी क्रंमाक 973795004 रक्कम 1.00.000/ दिंनाक 11/01/2011
- पॉलीसी क्रंमाक 973861697 रक्कम 1.87.500/ दिंनाक 28/03/2011
- पॉलीसी क्रंमाक 973554427 रक्कम 50.000/ दिंनाक 22/02/2008
२.उपरोक्त पॉलीसी मधुन अर्जदार ही नॉमिनी असुन फक्त पॉलसी क्रंमाक 1 ही
कन्याका नागरी सहकारी बॅक शाखा भद्रावती येथे नजरगहान आहे. अर्जदाराच्या पतीचा म़त्यु आजारपणामुळे झाल्यामुळे अर्जदाराने दस्ताऐवजाची पूर्तता करून दिंनाक 01/12/2012 रोजी उपरोक्त विमा पॉलीसी पैकी तिन विमा पॉलीसी मिळण्याचा अर्ज केला. तेव्हा गैरअर्जदाराने बॅकेकडे गहान असलेल्या विमा पॉलीसी चा क्लेम करता येणार नाही. असे कळवीले. गैरअर्जदाराकडे पॉलीसीचा क्लेम अर्जदाराने मागीतल्यावर गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणतीही संधी न देता अर्जदारच्या पतीला सन 2005 पासुन लिव्हर सिरॉसीस चा रोग होता. असे ठरवून विमादावा नाकारला. व तसे पाच पञ अर्जदाराला पाठविले म्हणुन अर्जदाराने त्यांच्या वकीला मार्फत दिंनाक 08/06/2013 रोजी अर्जदाराला नोटीस पाठवीला परंतु नोटीस प्राप्त होवून सुध्दा त्यांनी त्याची दखल घेतली नाही. अर्जदाराची मागणी असी आहे कि, अर्जदाराला गैरअर्जदाराने उपरोक्त विमा पॉलीसी ची रक्कम दयावी तसेच त्यावर द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने रक्कम दयावी तसेच शारीरीक मानसीक ञासापोटीचा खर्च व तकारीचा खर्च गैरअर्जदाराने अर्जदाराला दयावा.
३. गैरअर्जदाला नोटीस प्राप्त होउन गैरअर्जदाराने निशानी क्रंमाक 9 वर त्यांचे उत्तर दाखल करून अर्जदाराने तक्रारीत कथन केलेल्या सर्व बाबी नाकबुल करून पूढे असे नमुद केलेले कि, अर्जदाराने गैरर्जदाराकडुन तक्रारीत नमुद केलेल्या सर्व पॉलीस काढलेल्या होत्या परंतु जेव्हा अर्जदाराच्या पतीचे निधन झाल्यावर अर्जदाराने क्लेम केला तेव्हाप्रपोजल फॉर्म मधील गैरअर्जदाराने चौकशी केली असता अर्जदाराचा पती मिडॉस हॉस्पीटल नागपूर येथे डॉ मुकेवार यांच्या कडे दिंनाक 06/06/2005 पासुन लिव्हर सिरॉसिस या रोगाने आजारी होते आणि याच रोगाने त्यांचा म़त्यु झाला ही बाब अर्जदाराच्या पतीने जेव्हा विमा काढला तेव्हा प्रपोजल फॉर्म मधील प्रश्न विचारले असता प्रश्नावली मध्ये “नाही” असे उत्तर देवून गैरअर्जदाराशी खोटे बोलुन पॉलीसी घेतली त्यामुळे अर्जदाराचा विमा क्लेम नाकारण्यात आला.
४.अर्जदाराच्या पतीने त्यांच्या हयातीत असताना गैरअर्जदाराने प्रपोजल फॉर्म दिले होते त्यांत कॉलम क्रंमाक 11 मध्ये नमुद पाच विशेष बाबी लपविलेल्या आहेत व त्याबदल खोटी माहीती दिली. गैरअर्जदार पूढे नमुद करतो कि, विमा काढलेल्या व्यक्तीची खरी माहिती देण्याची जबावदारी असते, पूर्वीच्या आजाराबाबत फक्त विमा धारकच सांगु शकतो व पॉलीसी काढताना त्यापूर्वी दिलेल्या माहितीच्या आधारावर वैदयकीय रिपोर्ट तयार होते प्रपोजल फॉर्म सादर करताना पूर्वीच्या रोगाबदल विमा धारकाने सागीतलेल्या कथना वर विश्वास ठेवून
गैरअर्जदार कंपनी पॉलीसी मंजूर करते, तसेच विमा करार हा Doctrine of uberrima fide म्हणजे परस्पर विश्वासावर आधारीत असल्याने विमीत व्यक्तीने विमा प्रस्तावाच्या वेळेस त्याच्या स्वास्थाबदल व इतर माहिती खरी देणे आवश्यक आहे. परंतु अर्जदाराच्या मयत पतीने विमा काढाताना खोटी माहीती दिल्यामुळे व नतंर चौकशी दरम्यान अर्जदाराच्या पतीला उपरोक्त रोग आहे ही बाब समोर आल्याने अर्जदाराचा क्लेम नाकारण्यात आला. त्यामुळे अर्जदाराचे तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
मुद्दे निष्कर्ष
1)अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
2)गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय
- अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? होय
- अंतीम आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
५.सदर प्रकरणात अर्जदाराने गैरअर्जदाराकडून तकारीत नमुद असलेल्या विमा पॉलीसी घेतल्या ही बाब गैरअर्जदाराला मान्य असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. सबब मुद्रदा क्रंमाक 1 चे उत्तर होकारार्थी नमुद करण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
६.अर्जदाराच्या पतीचा म़ृत्यु झाल्यानंतर अर्जदार बाईने गैरअर्जदाराकडे पॉलीसी च्या रक्कमेची मागणी केली परंतु अर्जदार बाईचा पती हा लिव्हर सिरॉसिस या रोगाने दिंनाक 06/06/2005 पासुन आजारी होता व त्या आजारासाठी तो 2005 मध्ये डॉ मुक्केवार यांचे मिडास हॉस्पीटल नागपूर येथे उपचार घेत होता ही बाब अर्जदाराच्या पतीने पॉलीसी काढताना लपवुन ठेवल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचे विमा दाव्याची मागणी ना मंजुर केलेली होती. अर्जदाराने सदर प्रकरणात गैरअर्जदाराकडुन घेतलेल्या विमा पॉलीसी तसेच इतर दस्ताऐवज दाखल केलेले आहेत. गैरअर्जदाराने मिडास हॉस्पीटल नागपूर येथे डॉ मुकेवार जे अर्जदाराच्या पतीचा उपचार करीत होते त्यांची मंचातर्फे कमिश्नरची नेमणुक करून शपथपञावर पूरावा घेतला सदर पुरावा व उलटतापसणी व दाखल दस्ताऐवजाचे निरीक्षण केले असता डॉ मुकेवार यांची सरतपासणी घेताना चार दस्ताऐवज विचारात घेण्यात आलेले होते. त्यांतील दोन दस्ताऐवजाना वस्तु क्रंमाक देण्यात आले तर इतर दोन दस्ताऐवजाना निशानी क्रमाक सी 1 व सी 2 देण्यात आले. निशानी क्रंमाक सी 1 व सी 2 या दोन्ही दस्तऐवजावर डॉ मुकेवार, यांची सही आहे. व त्यांतील मजकुर बरोबर आहे असे त्यांनी सागीतले. निशानी क्रंमाक सी 1 यावरून असे सिघ्द होते कि, अर्जादराचे पती लिव्हर सिरॉसिस या रोगासाठी डॉ मुकेवार यांच्या कडे दिनाक 21/07/2012 रोजी उपचाराकरीता दाखल झालेले होते व दिंनाक 26/7/2012 रोजी त्यांचा मृत्यु झाला. निशानी क्रंमाक सी 1 वरील मेडीकल अटेडंन सिर्टीफीकेट नुसार मृत्युच्या फक्त एक महिण्याआधि पासुन अर्जदाराचे पतीला हा रोग होता तसेच डॉ मुकेवार यांनी जुलै 2012 मध्ये पहिल्यादां त्यांना तपासलेले होते. तक्रारीत दाखल दस्ताऐवज निशानी क्रमाक सी 2 सर्टीटिकेट ऑफ हॉस्पीटल टि्टमेन्ट त्यावर डॉ मुकेवार यांची स्वाक्षरी असुन ते त्यांनी पूरव्या दरम्यान ओळखुन त्यातील मजकुर बरोबर आहे. हे सांगीतलेले आहे. या दस्ताऐवजात परिच्छेद नंबर 7 हे रुग्णाला या आधि असणा-या रोगाच्या इतीहासाबदल आहे. परतु त्या परिच्छेद समोर निरंक असे दर्शविण्यात आलेले आहे. तसे परिच्छेद नंबर 10 मध्ये सदर रूग्ण या हॉस्पीटल ला पूर्वी अॅडमीट होता काय ? त्या परिच्छेदाच्या समोर ही निंरक असे दर्शविण्यात आलेले आहे. वरील दोन्ही दस्ताऐवजावरून असे सिध्द होत आहे कि, अर्जदाराच्या पतीला लिव्हर सिरॉसिस हा मृत्युच्या फक्त एक महिण्यापासुन म्हणजेच सन 2012 पासुन होता.
७.गैरअर्जदाराने प्रकरणात दाखल केलेले वस्तु क्रंमाक A व B दस्ताऐवज यात जरी अर्जदाराचे पतीचे नाव सारखे असले किंवा रोग जरी सारखा नमुद केलेला असला तरी रोगी हाच अर्जदाराचा पती होता हे ग्राहय धरण्या सारखे नाही.
८.सदर प्रकरणातील दस्ताऐवज व दोन्ही पक्षाचा युक्तीवाद लक्षात घेता अर्जदारच्या मयत पतीला विमापॉलीसी काढण्याच्या आधीपासुन कोणताही रोग नव्हता किंवा अशी कोणतीही बाब त्यांने गैरअर्जदारापासुन लपवुन ठेवलेली नाही. असे सिध्द होत आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा प्रस्तावामध्ये खोटी माहिती दिली किंवा लपवुन ठेवली या कारणावरून नाकारुन अर्जदाराच्या प्रती सेवेत न्युनता पूर्ण व्यवहार केला तसेच अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे. म्हणुन मुद़्दा क्रंमाक 2 व 3 चे उत्तर होकारार्थी दर्शीविण्यात आहे.
९.मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्ण्यात येत आहे.
अंतीम आदेश
1)अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2)गैरअर्जदाराने अर्जदाराला विमा पॉलीसी क्रंमाक 973564345 ची रक्कम रूपये 50,000/ विमा पॉलीसी 973783619 ची रक्कम 50,000/ ,विमा पॉलीसी
973795004 ची रक्कम 1,00,000/ विमा पॉलीसी क्रंमाक 973861697 ची रक्क्म 1,87,500/ व विमा पॉलीसी 973554427 ची विमा दावा रक्कम 50.000/. व त्यावरील लाभ सदर आदेशाची प्रत प्राप्त झाल्या तारखेपासुन गैरअर्जदाराने अर्जदाराला 45 दिवसाचे आत दयावी.
3)गैरअर्जदाराने अर्जदाराला झालेल्या शारिरीक मानसीक ञासाबदल रक्कम रूपये 5,000/ व तक्रारीचा खर्च 2,500/ आदेशाची प्रत प्राप्त झाल्या तारखेपासुन गैरअर्जदाराने अर्जदाराला 45 दिवसाचे आत दयावी.
4) आदेशची प्रत विनामुल्य उभय पक्षाला विनामुल्य देण्यात यावी.
5) सदर आदेश संकेतस्थळावर टाकण्यात यावे.
चंद्रपूर
दिनांक - 04/08/2016