(मंचाचे निर्णयान्वये, अधि. किर्ती प्रकाश गाडगीळ (वैद्य), सदस्य)
(पारीत दिनांक : 28 फेब्रूवारी 2014)
1. अर्जदारानी, सदर अर्ज, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 24(A) अन्वये दाखल केला आहे.
2. अर्जदारानी मामला दाखल करण्यासाठी विलंबमाफीचा अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. गैरअर्जदाराला नोटीस मिळाल्यानंतर दि.26 फेब्रवरी 2014 ला वकीलामार्फत हजर झाले. गैरअर्जदारानी अर्जदाराच्या विलंबमाफीचे अर्जावर कोणतेही उत्तर दाखल केलेले नाही. आज दि.28.2.2014 ला 12-40 वाजता सुध्दा गैरअर्जदार व त्याचे वकील यांचा वारंवार पुकाराचेवेळी गैरहजर असल्यामुळे, या मंचाने अर्जदाराचा विलंबमाफीचा अर्ज एकतर्फा ऐकूण घेतला.
3. मंचाने अर्जदाराचा अर्ज व त्यासोबत जोडलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता, असे दिसून आले की, अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदारांकडे क्लेमच्या विमा रकमेची मागणी केलेली आहे व त्यानंतर वकीलामार्फत नोटीस सुध्दा पाठविले आहे. ते मिळूनसुध्दा गैरअर्जदाराने त्याचेवर कोणतेही उत्तर किंवा दखल घेतली नाही. अर्जदाराने दि.17.9.2011 ला गैरअर्जदाराच्या सांगण्याप्रमाणे त्याचे मुंबई येथील कार्यालयाला, त्याच्या विमा क्लेम रकमे संदर्भात निवेदन पाठविले आणि निवेदनावर गैरअर्जदार व त्याचे झोनल कार्यालय, मुंबई यांनी दखल आजपर्यंत घेतली नाही असे दिसून येते, म्हणून प्रकरण दाखल करण्याचे कारण सतत चालू आहे. या मंचाच्या मताप्रमाणे विलंबमाफीच्या अर्जाची आवश्यकता नाही म्हणून खालील आदेशाप्रमाणे अर्जदाराने दाखल केलेला अर्ज निकालीकाढून मुख्य तक्रार नोंदवून घेण्यात येत आहे.
- आ दे श -
(1) अर्जदाराचा विलंबमाफीचा अर्ज निकाली काढण्यात येते.
(2) अर्जदाराची विलंबमाफीच्या अर्जासोबत जोडण्यात आलेली तक्रार नोंदवून घेण्यात येत आहे.
गडचिरोली.
दिनांक :-28/2/2014