(मंचाचा निर्णय: श्री. रामलाल सोमाणी- प्रभारी अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 12/08/2010) तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात खालिल प्रमाणे... 1. तक्रारकर्तीचे मयत पती शिक्षक होते व त्यांना दोन अपत्य आहेत. तक्रारकर्तीचे पतीने गैरअर्जदारांकडे विमा पॉलिसी काढली होती आणि नियमीतपणे हप्ते भरीत होते. परंतु तिचे पतीचा खुण झाल्या कारणाने तिने गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केला असता तो त्यांनी वेगवेगळी कागदपत्रे मागून अप्रत्यक्षपणे ना-मंजूर केलेला आहे आणि म्हणून गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 2. गैरअर्जदाराला नोटीस मिळाला असता ते मंचात हजर झाले व त्यांनी निशाणी 10 वर आपला लेखी जबाब दाखल केला. गैरअर्जदाराने मयत प्रदिप नामदेवराव मेश्राम यांचे पॉलिसीत त्याने भरलेली पॉलिसीचे हप्त्यांची रक्कम मयतीनंतर वारस असलेले तक्रारकर्त्याचे नातेसंबंध, खुणामुळे झालेला प्रदिम मेश्रामचा मृत्यू, पोलिस रिपोट, पंचनामा मान्य करुन दाखल केलेली आहे. परंतु त्यांनी स्पष्टपणे नमुद केले आहे की, प्रकरणात अंतिम अहवाल (Final Summary Report), चार्ज शिट, हे अद्याप प्राप्त झाले नाही आणि म्हणून सदर मयताचे खुणाचा उलगडा झालेला नाही आणि मयताचे पत्नीवर पोलिसांचे लक्ष केंद्रीत असल्याची बातमी प्रसिध्द झाल्याबद्दल कागदपत्रे दाखल केलेली आहे. गैरअर्जदाराकडे वेळोवेळी तक्रारकर्तीला कागदपत्रांची पुर्तता करण्यांस कळविले आहे . 3. उभय पक्षांचे लेखी कथन व दाखल कागदोपत्री पुरावे यांचे सुक्ष्म वाचन केल्यानंतर आणि उभय पक्षांतर्फे युक्तिवाद ऐकल्यानंतर मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचलो. -// नि ष्क र्ष //- 1. उभय पक्षांमधील विवादीत मद्दा एवढाच की, गैरअर्जदारांना मागणी केल्यानुसार तक्रारकर्तीने कागदपत्रे पुरविली नसल्या कारणाने गैरअर्जदारांनी तिला पॉलिसी अंतर्गत रक्कम देण्याचे प्रलंबीत ठेवलेले आहे. विमा कंपनीचे वतीने युक्तिवाद करतांना नमुद केले आहे की, मयत प्रदिप मेश्राम यांनी पॉलिसीची रक्कम प्रलंबीत आहे. परंतु गैरअर्जदारांनी प्रकरणातील अंतिम अहवाल/ चार्ज शिटची मागणी तक्रारकर्तीकडे केलेली आहे आणि सदर कागदपत्रे वेळोवेळी मागणी करुनही तक्रारकर्तीने उपलब्ध करुन दिलेली नाही. म्हणून तक्रारकर्तीचा विमा दावा दिल्या गेला नसल्याचे गैरअर्जदाराने नमुद केले आहे. 2. तक्रारकर्तीचे वतीने वकीलांनी युक्तिवाद केला की, पोलिसांनी अद्याप कोणतीही चार्ज शिट दाखल केली नाही आणि ती त्वरीत दाखल करावी असे निर्देश देण्यासाठी रिट याचीका मा. उच्च न्यायालयासमोर दाखल केलेली आहे आणि अद्यापही ती कागदपत्रे तक्रारकर्तीला मिळालेली नसल्यामुळे ती सदर कागदपत्रे विमा कंपनीला देऊ शकत नाही. आणि म्हणून गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचा रास्त विमा दावा प्रलंबीत ठेवून व अप्रत्यक्ष नाकारुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 3. मयताचे शरीरावार झालेल्या जखमा असल्याचे कागदपत्रांवरुन निदर्शीत करुन मंचासमक्ष आपली बाजू मांडून युक्तिवाद केला की, संशयास्पद झालेला मयताचा खुन व त्या संबंधाने पोलिस तपास सुरु असल्याने गैरअर्जदारांनी केलेली कारवाई योग्य व उचित आहे. 4. मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, मयताचे वारस म्हणून तक्रारकर्तीला सदर पॉलिसी अंतर्गत दावा मिळणे आवश्यक आहे. चार्ज शिट तक्रारकर्तीला उपलब्ध होऊ शकली नाही आणि प्रकरण उच्च न्यायालयासमोर नव्याने लागली तरी अद्याप देखिल सदर चार्ज शिट दाखल झालेली नाही. दि.22.10.2009 ला खुन झाल्याचे दिसुन येते, प्रकरणाला पूर्ण एक वर्ष झालेला नाही. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा विमा दावा वेळेवरच निकाली काढणे आवश्यक होते, परंतु त्यांनी तसे न करुन तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 5. मयता नंतर विमा कंपनीने देय दावा देण्याचे मान्य केले आहे म्हणून तो तक्रारकर्तीला व वारसांना द्यावा असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्तीने दोन्ही तक्रारींमधील परिच्छेद क्र.1 मध्ये मयतानंतर मुलगा कार्तीक प्रदिप मेश्राम व मुलगी स्नेहल प्रदिप मेश्राम आणि स्वतः तक्रारकर्ती असे वारस असल्याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्ती स्वतः जरी नामनिर्देशित व्यक्ति असली तरी वारसांना रक्कम मिळावी आणि तसे आदेशीत करणे कायदेशिर व न्यायोचित राहील. तक्रारकर्तीला मंचासमक्ष तक्रार दाखल करावी लागली म्हणून तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम देण्याचे गैरअर्जदाराला आदेशीत करणे न्यायोचित राहील. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येते. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. पॉलिसी क्र.97277733 आणि पॉलिसी क्र.972777332 अंतर्गत संपूर्ण दावा रक्कम तक्रारकर्तीला न देऊन विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 3. गैरअर्जदार विमा कंपनीने उपरोक्त दोन्ही पॉलिसींची संपूर्ण लाभासह देय रक्कम तक्रारकर्तीला व वारसांना देण्यासाठी मंचात जमा करावी. 4. उपरोक्त पॉलिसीच्या रकमेवर दि.11.01.2010 पासुन संपूर्ण रक्कम चुकती होई पर्यंत द.सा.द.शे. 7% प्रमाणे व्याज देय राहील. 5. मानसिक व शारीरिक त्रासापोटी गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला रु.3,000/- द्यावे तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे. 6. उपरोक्त आदेशाचे पालन गैरअर्जदार विमा कंपनीने आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी अन्यथा संपूर्ण आदेशीत रकमेवरील देय व्याज द.सा.द.शे. 7% ऐवजी द.सा.द.शे. 9% देय राहील. 7. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, नागपूर यांना आदेशीत करण्यांत येते की, वरील प्रमाणे गैरअर्जदारांनी मंचात रक्कम जमा केल्यास उपरोक्त रकमेपैकी 1/3 (एकत्रितीअंश) रक्कम तक्रारकर्तीला A/c payee धनादेशाव्दारे देय करावी. उर्वरित रक्कम समान विभागुन मयताचे वारस मुलगा कार्तीक प्रदिप मेश्राम व मुलगी स्नेहल प्रदिप मेश्राम यांचे नावाने तक्रारकर्तीच्या पसंतीच्या राष्ट्रीयकृत बँकेत 8 वर्षांकरता किंवा दोन्ही अपत्या सज्ञान होईपर्यंत (जे आधी घडेल) मुदत ठेवीमध्ये तक्रारकर्तीचे पालकत्वात ठेवावी. 8. संबंधीत बँकेला निर्देश देण्यांत यावे की, त्याने सदर मुदत ठेवीला परिपक्त होई पर्यंत कोणतेही कर्ज, चार्ज किंवा बोजा देऊ निर्माण करु नये. तसेच मुदत पूर्व रक्कम मंचाचे परवानगी शिवाय देण्यांत येऊ नये. 9. तक्रारकर्तीला सदर मुदत ठेवींवरील येणारे त्रैमासिक व्याज मुलाचे शिक्षणासाठी व भरण पोषणासाठी घेण्याची मुभा राहावी. 10. तक्रारकर्तीला तक्रारीच्या मा. सदस्यांकरीता दाखल केलेल्या (ब,क) प्रती परत कराव्यात. (मिलींद केदार) (रामलाल सोमाणी) सदस्य प्रभारी अध्यक्ष
| [HONABLE MR. Mr. Milind R. Kedar] Member[HONABLE MR. Ramlal Somani] PRESIDENT | |