तक्रारदारातर्फे – वकील – प्रबोध आपेगांवकर,
सामनेवालेतर्फे – वकील – ए.पी.कुलकर्णी,
।। निकालपत्र ।।
( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराचे पती श्री.सहदेव सुदाम ढाकणे यांना ता. 28.1.2005 रोजी सामनेवाले यांचे मॅरेज इंडोमेंट अँण्ड ऐज्यूकेशन अँन्यूटी प्लॅन या नावाची विमा पॉलीसी क्रं.984291596 रु.50,000/- ची घेतली होती. सदर पॉलीसी प्रमाणे रक्कम रु.50,000/- मॅच्यूरीटीचे तारखेला म्हणजेच ता. 28.1.2021 रोजी दुपट्ट म्हणजेच रक्क्म रु.1,00,000/- मिळणे आवश्यक आहे. दुर्दैवाने तक्रारदारांचे पतीचा ता.3.6.2008 रोजी खुन झाला. या संदर्भात तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे ता.21.6.2008 रोजी माहिती दिली. सामनेवाले यांना ता.17.7.2008 रोजी पत्र पाठवून तक्रारदारांना पॉलीसीच्या मॅच्यूरिटीच्या दिवशी म्हणजेच ता.28.1.2021 रोजी पॉलीसी रक्कम रु.50,000/- देण्यात येईल व त्यातून रक्कम रु.3,226/- वजा करण्यात येतील. त्यानंतर तक्रारदारांने सामनेवाले यांचेकडे ता.3.6.2008 रोजीचे अर्जाद्वारे पॉलीसीचे सर्व फायदे देण्याची विनंती केली. परंतु सामनेवाले यांनी ता.25.8.2009 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून न्यायालयीन निकालाची प्रत मागविली आहे. सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून तक्रारदारांना सामनेवाले यांचेकडे एफ.आय.आर ची प्रत दिली आहे. अशा प्रकारे सामनेवाले यांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित करुन तक्रारदाराला विमा पॉलीसी रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. तरी तक्रारदारांची विनंती की, तक्रारदारांना विमा पॉलीसीची रक्कम रु.1,00,000/- व मानसिक त्रासाची रक्कम रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- देण्यात यावे.
सदर प्रकरणात सामनेवाले विमा कंपनी हजर झाली असुन त्यांनी त्यांचा लेखी खुलासा न्यायमंचात ता.3.9.2010 रोजी दाखल केला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांची विमा पॉलीसी मान्य असुन रक्कम रु.1,00,000/- विमा लाभ रक्कम असल्याचे बाब मान्य नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांना अपघाता बाबतचा रक्कम रु.50,000/- पॉलीसीतील अटी व शर्तीनुसार देण्यास तयार आहे. परंतु सदरची पॉलीसीचा विमा लाभ रक्कम ता.28.1.2021 पर्यन्त म्हणजेच मॅच्यूरिटी तारखेपर्यंन्त देता येणार नाही. त्याच प्रमाणे सामनेवाले यांनी ता. 25.10.2009 रोजी तक्रारदारांना पत्रानुसार कांही कागदपत्राची मागणी केली आहे. तक्रारदारांनी सदर कोर्टा संबंधी कागदपत्रे दाख्ंल केल्यानंतर विमा पॉलीसीच्या नियमानुसार तक्रारदारांचा प्रस्तावा बाबत कार्यवाही ( सेटलमेंट ) करण्यात येईल. तक्रारदारांना ता.17.7.2008 रोजीचे पत्रानुसार वादीत वेगळा प्रकार घेतला असुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना लगेचच रक्कम रु.50,000/- अपघाताच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यास तयार असुन विम्याची रक्कम रु.50,000/- बोन्ससहीत मॅच्यूरिटी तारखेला देण्यात येईल असे वाटले. तक्रारदारांचा विमा प्रस्ताव सामनेवाले यांना रद्द केलेला असल्याने तक्रारदारांनी सदरीचा अपरिपक्कव दावा कोणत्याही कारणा शिवाय दाखल केला आहे. सतरी सामनेवाले यांचे विरोध्दातील तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, सामनेवाले यांचा खुलासा, दाखल कागदपत्र, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकिल प्रबोध आपेगांवकर व सामनेवाले यांचे विद्वान वकिल ए.पी.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदाराचे पती श्री.सहदेव सुदाम ढाकणे यांचा मॅरेज इंडोमेंट अँण्ड ऐज्यूकेशन अँन्यूटी प्लॅन या नावाची विमा पॉलीसी टेबल क्रंमाक 90 प्रमाणे रक्कम रु.50,000/- ची त्यांचे मुलाचे शिक्षणासाठी व विवाह खर्चासाठी ता.28.1.2005 रोजी घेतली होती. सदर पॉलीसी प्रमाणे मॅच्यरिटीच्या दिवशीच म्हणजे ता.21.1.2021 रोजी दूप्पट रक्कम तक्रारदारांना देण्याचे आश्वासन सामनेवाले यांचे एजन्टने तक्रारदाराना दिले होते. दुर्दैवाने तक्रारदाराचे पतीचा ता.3.6.2008 रोजी खुन झाला. यासंदर्भात तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे ता.21.6.2008 रोजी माहिती दिली. परंतु अद्यापपर्यन्त तक्रारदारांना विमा लाभ रक्कम मिळाली नाही, अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सामनेवाले यांचे खूलाशानूसार त्यांना तक्रारदारांची विमा पॉलीसी मान्य आहे. ‘‘ मॅरेज इंडोमेंट अँण्ड ऐज्यूकेशन अँन्यूटी प्लॅन ’’ या विमा पॉलीसीतील अटी व शर्तीनुसार नियमाप्रमाणे तक्रारदारांच्या पतीच्या अपघाता बाबतच्या रक्कमेचा धनादेश रु.50,000/- तक्रारदारांना ता.2.2.2011 रोजी दिलेला आहे. तक्रारदारांनी सदरचा धनादेश स्विकारलेला आहे. सदर विमा पॉलीसीप्रमाणे तक्रारदारांना दूप्पट अपघाताची रक्कम देय असल्याचे सामनेवाले यांची तक्रारदारांना ता.25.8.2009 रोजी पाठविलेलया पत्रानूसार दिसून येते.
तक्रारीत आलेल्या पुराव्यानुसार तसेच सामनेवाले यांचे खूलाशानूसार तक्रारदारांना विम्याची रक्कम रु.50,000/- बानेससहीत पालीसीतील अटी व शर्तीनुसार नियमाप्रमाणे दये असलेल्या रक्क्मेसहत मॅच्यूरिटी तारेख्ंला म्हणजेच ता.28.1.2021 रोजी मिळेल ही बाब स्पष्ट होते. सामनेवाले तक्रारदारांना सदर पॉलसी अंतर्गत ठरवून दिलेल्या शर्ती व अटीनुसार नियमाप्रमाणे विमा लाभ रक्कम देण्यास तयार आहेत. तक्रारदारांना सदर विमा पॉलीसी संदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रिमियम भविष्यकाळात भरावा लागणार नाही, असे सामनेवाले यांनी तक्रारदारांना ता.17.7.2008 रोजी दिलेल्या पत्रान्वये कळविले आहे.
वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता सामनेवाले तक्रारदारांना सदर पॉलीसी अंतर्गत भविष्यात देय असलेल्या रकम देण्यास तयार असल्यामूळे, तसेच सदर पॉलसी प्रमाणे देय असलेली कांही रक्कम म्हणजेच रक्क्म रु.50,000/- चेक तक्रारदांराना दिलेला असल्यामूळै सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत कसूरी केल्याची बाब स्पष्ट होत नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवे कसूरीची बाब स्पष्ट न झाल्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे मानसिक त्रासाची व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.5,000/- देणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. सामनेवाले यांना आदेश देण्यात येते की, तक्रारदारांना विमा पॉलीसीतील देय असलेली विमा लाभ रक्कम रु.50,000/- (अक्षरी रुपये पन्नास हाजर) सदर विमा पॉलीसीतील अटी व शर्तीनुसार नियमाप्रमाणे बोनससहीत मॅच्यूरिटी तारखेस ता. 28.1.2021 रोजी देण्यात यावी.
2. सामनेवाले खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
( सौ.एम.एस.विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि. बीड