श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 08 सप्टेंबर, 2016)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे...
1. तक्रारकर्तीचे पती बाजीराव कळंबे यांनी वि.प. भारतीय जिवन विमा निगम यांचेकडून खालील विमा पॉलिसी काढल्या होत्या.
अ.क्र. | पॉलिसी क्र. | पॉलिसी सुरु होण्याचा दिनांक | पॉलिसी परिपक्वता रक्कम | प्रीमीयम रक्कम | प्रीमीयम कालावधी | | |
1. | 976242377 | 12.04.2008 | रु.2,00,000/- | रु.7,553/- | सहामाही | | |
2. | 976242560 | 15.04.2008 | रु.2,05,000/- | रु.3,062/- | तिमाही | | |
3. | 970876373 | 26.03.1999 | रु.50,000/- | रु.1,656/- | सहामाही | | |
तक्रारकर्तीचे पती जयदेव बाजीराव कळंबे दि.22.05.2008 रोजी मरण पावले. तक्रारकर्ती वरील पॉलिसी संबंधाने मयताची वारस म्हणून विमा लाभ मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्तीने वरील पॉलिसीप्रमाणे विमा लाभ मिळण्यासाठी वि.प.कडे मागणी केली असता त्यांनी अ.क्र.3 च्या पॉलिसीची देय रक्कम रु.75,000/- तक्रारकर्तीस दिली. मात्र दि.05.01.2013 रोजी पत्र पाठवून अ.क्र. 1 व 2 च्या पॉलिसीचा विमा दावा नामंजूर केल्याचे कळविले. त्यासाठी वि.प.ने असे कारण दिले की, तक्रारकर्तीचे पती पॉलिसी काढण्याच्या आधीपासून Alcoholic Liver Disease या रोगाने ग्रस्त होते परंतू पॉलिसी प्रस्तावामध्ये सदरची माहिती लपवून ठेवली. तक्रारकर्तीने सदरचा आरोप नामंजूर केला आणि दि.12.04.2013 रोजी नोटीस पाठवून विमा दाव्याचा पुनर्विचार करण्याबाबत विनंती केली. परंतू वि.प.ने त्यावर आजपर्यंत कार्यवाही केली नाही. वि.प.ने पॉलिसीची रक्कम हडप करण्यासाठी खोटे आरोप लावलेले आहेत. वि.प.ची कृती ही सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब असल्याने तक्रारकर्तीने खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
- पॉलिसी क्र. 976242377 ची रक्कम रु.2,00,000/- आणि पॉलिसी क्र. 976242560 ची रक्कम रु.2,50,000/- त्यावरील देय बोनससह द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचा वि.प.विरुध्द आदेश व्हावा.
- शारिरीक व मानसिक त्रासाबाबत रु.10,000/- आणि नुकसान भरपाई रु.30,000/- देण्याचा वि.प.विरुध्द आदेश व्हावा.
- तक्रारखर्च रु.10,000/- मिळावा.
तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत विमा पॉलिसीच्या प्रती, पॉलिसीधारकाचे मृत्यु प्रमाणपत्र, वि.प.क्र. 2 यांनी तक्रारकर्तीस पाठविलेली पत्रे, कायदेशीर नोटीस व पोचपावती असे दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
2. वि.प.क्र. 1 ते 3 यांनी लेखी जवाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्तीने नमूद केल्याप्रमाणे तिचे पती मयत जयदेव कळंबे यांनी वि.प.क्र. 3 कडे विमा पॉलिसी काढल्याचे मान्य केले आहे. मात्र वि.प.क्र. 1 चा पॉलिसी नाकारण्याशी काहीच संबंध नसल्याने त्यांचे नाव तक्रारीतून वगळण्याची विनंती केली आहे.
वि.प.चा प्राथममिक आक्षेप असा कि, पॉलिसी धारकाचा मृत्यु दि.22.05.2008 रोजी झाला असून विमा दावा वि.प.कडे 24.12.2011 रोजी म्हणजे 3 वर्षानंतर सादर केला असल्याने लिमिटेशन अॅक्टचे शेड्युल पार्ट-II आर्टिकल 44 (a) प्रमाणे दावा कालबाह्य असल्याने विमा लाभ देय नाही.
तक्रारीतील अ.क्र. 3 च्या पॉलिसीची देय रक्कम तक्रारकर्तीस देण्यांत आली असून अ.क्र. 1 व 2 च्या पॉलिसीबाबतचा दावा योग्य कारणामुळेच नामंजूर केल्याचे म्हटले आहे.
वि.प.चे म्हणणे असे की, अनुक्रमांक 1 व 2 ची पॉलिसी घेतल्यानंतर अत्यंत अल्पावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यु झाल्याने वि.प.ने सखोल चौकशी केली असता तक्रारकर्तीने चौकशीत सहकार्य केले नाही. उलट मरणापूर्वी तिचे पतीस कोणताही आजार नव्हता असे खोटे प्रतिज्ञापत्र दि.05.01.2012 चे सादर केले आहे. वि.प.ने केलेल्या चौकशीत असे आढळून आले की, अ.क्र. 1 व 2 च्या पॉलिसी घेण्यापूर्वी दि.26.03.2008 पासून 01.04.2008 पर्यंत तक्रारकर्तीचे पती जनरल हॉस्पिटल, भंडारा येथे उपचारासाठी भरती होते. दि.28.03.2008 रोजी नागपूर येथील गव्हर्नर्मेंट हॉस्पिटलमध्ये योग्य उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगूनही तक्रारकर्तीने तयारी दाखविली नाही म्हणून दि.01.04.2008 पर्यंत तेथेच उपचार करण्यांत आले. सदरची अत्यंत महत्वाची आरोग्य विषयक माहिती विमा धारकाने प्रस्ताव अर्ज सादर करतांना लपवून ठेवली. त्यामुळे प्रस्तावातील घोषणेनुसार व पॉलिसीतील अट क्र. 5 च्या तरतुदीनुसार प्रस्तुत दोन्ही पॉलिसीतील मृत्यु दावा देय नसल्याचे तक्रारकर्तीस कळविण्यांत आले आहे. वि.प.ने दि.05.01.2013 च्या पत्रामध्ये पॉलिसीधारकास पॉलिसी घेण्यापूर्वी Alcoholic Liver Disease व इतर व्याधी असल्याचे पुराव्यानिशी सिध्द झाल्याने अ.क्र. 1 व 2 च्या पॉलिसीसंबंधाने मृत्यु दावा नाकारला आहे. सदर बाब पॉलिसीच्या अटी व शर्तीस अनुसरुन असल्याने त्याद्वारे वि.प.कडून कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार घडला नाही. सदर पॉलिसी नामंजूरीचे कारण आधीच कळविले असल्याने दि.12.04.2013 च्या नोटीसप्रमाणे पुनर्विचार करण्याचा किंवा उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. नोटीसमधील मजकूर पूर्णतः खोटा असल्याने नाकबूल असल्याचे वि.प.ने म्हटले आहे.
आपल्या विशेष कथनात वि.प.ने म्हटले आहे की, अ.क्र. 3 ची पॉलिसी 26.03.1999 रोजी घेतली होती म्हणून सदर पॉलिसीचे नियमानुसार देय लाभ तक्रारकर्तीस देण्यांत आले आहेत.
अ.क्र. 1 ची पॉलिसी क्र. 976242377 दि.12.04.2008 पासून सुरु होणारी असून तिचा प्रस्ताव जरी दि.08.04.2008 चा असला तरी तो वि.प.क्र. 3 च्या शाखेत 12.04.2008 रोजी रजिस्टर झाला आणि त्यादिवशी स्विकृत करुन पॉलिसी त्या दिवसापासून सुरु करण्यांत आली. अ.क्र. 2 ची पॉलिसी क्र. 976242560 दि.15.04.2008 ला सुरु होणारी असून तिचा प्रस्ताव 01.04.2008 चा असला तरी प्रत्यक्षात वि.प.क्र. 3 च्या शाखेत दि.21.04.2008 रोजी स्विकृत झाली असून दि.15.04.2008 पासून सुरु होणारी पॉलिसी देण्यांत आली. वरील दस्तऐवज वि.प.ने लेखी जवाबासोबत दाखल केले आहेत. दोन्ही प्रस्तावात प्रश्न क्र. 11 अन्वये पॉलिसी धारकाच्या आरोग्यविषयक माहिती विचारण्यांत आली होती. परंतू पॉलिसी धारकाने सदर प्रश्नांना हेतूपूर्वक खोटी उत्तरे दिली असून डिक्लेरेशन दिले की, कोणतीही माहिती त्याने लपवून ठेवलेली नाही. सदर माहिती त्याच्या जिवन विम्याच्या कराराचा आधार मानला जाईल व दिलेली माहिती असत्य व चुकीची आढळल्यास विमा करार रद्द व अवैध मानला जाईल आणि भरलेली प्रीमीयमची रक्कम जप्त करण्यांत येईल. विमा धारकाने प्रस्ताव अर्जात आरोग्य विषयक दिलेली माहिती व उत्तरांच्या सत्यतेवर विश्वासून प्रस्ताव स्विकृत करुन विमा पॉलिसी निर्गमित केल्या आहेत. विमा पॉलिसीतील अट क्र. 5 प्रमाणे जर पॉलिसी प्रस्तावातील स्वास्थ्यविषयक वैयक्तिक कथन, माहिती व घोषणापत्र चुकीचे आढळले तर पॉलिसी करार अवैध व रद्द होईल.
पॉलिसी धारकास पॉलिसी विकत घेण्यापूर्वीच Alcoholic Liver Disease with Ascitis चा आजार होता आणि त्यावर उपचारासाठी तो दि.26.03.2008 ते 01.04.2008 पर्यंत जनरल हॉस्पिटल, भंडारा येथे भरती होता. त्यास योग्य उपचारासाठी गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पीटल, नागपूर येथे नेण्याचा दि.28.03.2008 रोजी सल्ला देण्यांत आला होता परंतू तशी तयारी नसल्याचे तक्रारकर्तीने लिहून दिल्यानेच 01.04.2008 पर्यंत भंडारा येथे व उपचार करण्यात आले. सदरची बाब विमा धारकाने प्रस्ताव अर्जात जाणूनबुजून लपवून ठेवली व चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन पॉलिसी मिळविल्यामुळे पॉलिसीच्या अट क्र. 5 प्रमाणे पॉलिसी करार रद्द व अवैध ठरला असल्याने सदर पॉलिसीचा कोणताही लाभ मिळण्यास पॉलिसी धारकाची वारस म्हणून तक्रारकर्ती पात्र नाही म्हणून तक्रार खारीज करण्याची वि.प.नी विनंती केली आहे.
आपल्या कथनाचे पुष्टयर्थ वि.प.ने पॉलिसी प्रस्ताव, प्रस्ताव रजिस्ट्रेशन व त्यावरील निर्णय, पॉलिसीच्या प्रती व प्रस्ताव, पॉलिसीचे क्लेम फॉर्मस, तक्रारकर्तीचे प्रतिज्ञापत्र, जनरल हॉस्पिटल भंडारा रेफरल कार्ड, मृतकाचे जनरल हॉस्पिटल भंडारा यांचे उपचाराचे कागदपत्रे इ. दस्तऐवज दाखल केले आहेत.
3. उभय पक्षांच्या परस्पर विरोधी कथनावरुन मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? नाही.
2) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
3) अंतिम आदेश ? तक्रार खारिज.
4. मुद्दा क्र. 1 बाबत – सदरच्या प्रकरणात तक्रारकर्तीचे पती मृतक जयदेव कळंबे यांनी तक्रारीत नमूद पॉलिसी क्र. 976242377 रु.2,00,000/- आणि 976242560 रु.2,50,000/- अनुक्रमे दि.12.04.2008 आणि 15.04.2008 पासून सुरु होणा-या वि.प.क्र. 3 कडून खरेदी केल्याबद्दल उभय पक्षात वाद नाही. सदर पॉलिसीचे दस्त वि.प.ने दस्तऐवज यादी दि.15.11.2014 सोबत अनुक्रमे दस्त क्र. 3 आणि 5 वर दाखल केले आहेत. तक्रारकर्तीचे पती जयदेव कळंबे हे दि.22.05.2008 रोजी मरण पावल्याबाबत मृत्यु प्रमाणपत्र तक्रारकर्तीने दस्तऐवज यादीसोबत दस्त क्र. 3 वर दाखल केले आहे. पॉलिसीधारकाची वारस म्हणून तक्रारकर्तीने वि.प.क्र. 3 कडे वरील दोन्ही पॉलिसीप्रमाणे विमा लाभ मिळावे म्हणून दि.24.12.2011 रोजी विमा दावे दाखल केले होते. त्याच्या प्रती वि.प.ने दस्तऐवज यादीसोबत अनुक्रमे दस्तऐवज क्र. 8 व 9 वर दाखल केल्या आहेत. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्तीचे सदर विमा दावे नामंजूर केल्याबाबत दि.05.01.2013 रोजी पाठविलेल्या पत्राच्या प्रती तक्रारकर्तीने अनुक्रमे दस्तऐवज क्र. 4 व 5 वर दाखल केल्या आहेत. त्यांत म्हटले आहे की, विमाधारक पॉलिसी काढण्याच्या आधीपासून Alcoholic Liver Disease ने ग्रस्त होता व विमा प्रस्तावाच्या दिनांकापूर्वीपासून त्यासाठी उपचार घेत होता, परंतू विमा प्रस्तावात विमा धारकाने आरोग्य विषयक प्रश्नांना खोटी उत्तरे दिली आणि त्याच्या आजारपणाची बाब हेतूपुरस्सर लपवून ठेवली. त्यामुळे पॉलिसीधारकाने प्रस्ताव अर्जात दिलेले घोषणापत्र तसेच पॉलिसी कराराप्रमाणे विमा कंपनी पॉलिसी अंतर्गत कोणतेही विमा लाभ देण्यास जबाबदार नाही, म्हणून पॉलिसीपोटी दिलेली प्रीमीयम राशी जप्त करण्यात आली आहे. वि.प.ने विमा दावे नामंजूरीची दिलेली कारणे कोणत्याही कायदेशीर पुराव्याद्वारे सिध्द केले नसून ते पूर्णतः खोटे असल्याने सदर निर्णयाचा पुनःविचार करावा म्हणून तक्रारकर्तीने वि.प.क्र. 1 ला दि.12.04.2013 रोजी अधिवक्ता शशीर वंजारी यांचेमार्फत पाठविलेल्या नोटीसची प्रत दस्त क्र. 6 वर आणि वि.प.ला नोटीस मिळाल्याबाबतची पोच दस्त क्र. 7 वर दाखल केली आहे.
तक्रारकर्तीचे अधिवक्त्यांनी आपल्या युक्तीवादात सांगितले की, विमा धारकाकडून विमा हप्ते घेऊन त्याच्या मृत्युनंतर खोटी कारणे देऊन वारस असलेल्या तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम न देण्याची वि.प.ची कृती सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब असल्याने तक्रारकर्तीची मागणी मंजूर करावी.
याऊलट, वि.प.च्या अधिवक्त्यांनी आपल्या युक्तीवादात सांगितले की, विमा करार हा परस्पर विश्वासावर अवलंबून असून विमाधारकाने विमा प्रस्तावात त्याच्या आरोग्याबद्दल विचारलेल्या व इतर सर्व प्रश्नांची खरी उत्तरे देणे व कोणतीही असत्य व चुकीची माहिती न देण्याचे पॉलिसीच्या अटीप्रमाणे बंधन आहे. पॉलिसी प्रस्तावात पॉलिसी धारकाने घोषणापत्र लिहून दिले आहे की, त्याने प्रस्तावातील त्याच्या आरोग्य विषयक व इतर प्रश्नांना दिलेली उत्तरे त्याच्या माहितीप्रमाणे खरी व अचुक असून कोणतीही माहिती लपवून ठेवलेली नाही. प्रस्ताव अर्जात दिलेली माहिती विमा कराराचा पाया आहे आणि सदर माहिती खोटी व चुकीची आढळल्यास विमा पॉलिसी रद्द होऊन त्याने दिलेली विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीला जप्त होईल.
विमा प्रस्तावात प्रश्न क्र. 11 प्रमाणे आरोग्याबाबत व्यक्तिगत इतिहास जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न विचारले होते व त्याची उत्तरे पॉलिसी धारकाने पुढीलप्रमाणे दिली होती.
- During the last five years did you consult a Medical Practitioner for any ailment requiring treatment for more than a week ?
| No |
- Have you ever been admitted to any hospital or nursing home for general check-up, observation, treatment or operation ?
| No |
- Have you remained absent from place of work on rounds of health during the last 5 years ?
| No |
- Are you suffering from or have you ever suffered from ailment pertaining to Liver, Stomach, Heart, Lungs, Kidney, Brain or Nervous System ?
| No |
- Are you suffering from or have you ever suffered from Diabetes, Tuberculosis, High Blood Pressure, Low Blood Pressure, Cancer, Epilepsy, Hernia, Hydrocele, Leprosy or any other disease ?
| No |
- Do you have any bodily defect or deformity ?
| No |
- Did you ever have any accident or injury ?
| No |
- Do you use or have you ever used ?
Alcoholic drinks. Any other drugs. Tobacco in any forms. | No |
- What has been your usual state of health ?
| Good |
- Have you ever received or at present availing/undergoing medical advice treatment or test in connection with Hepatitis B or AIDS related condition.
| No |
तसेच खालीलप्रमाणे घोषणापत्र लिहून दिले होते.
“I, J.B.Kalambe the person whose life is hereinbefore proposed to be assured, do hereby declare that the foregoing statements and answers have been given by me after fully understanding the questions and the same are true and complete in every particular and that I have not withheld any information and I do hereby agree and declare that these statements and this declaration shall be the basis of the contract of assurance between me and the Life Insurance Corporation of India and that if any untrue averment ne contained therein the said contract shall be absolutely null and void and all money which shall have been paid in respect thereof shall stand forfeited to the Corporation.”
वरील प्रस्ताव अर्जाच्या प्रती वि.प.ने अनुक्रमे दस्त क्र. 1 व 4 वर दाखल केलेल्या आहेत.
विमाधारक जयदेव कळंबे यांचा मृत्यु दि.22.05.2008 ला झाल्यावर तक्रारकर्तीने दोन्ही पॉलिसीसंबंधाने विमा दावे दि.24.12.2011 रोजी म्हणजे 3 वर्षांनी सादर केले. विमा पॉलिसी काढल्यानंतर अत्यंत अल्पावधीत विमा धारकाचा मृत्यु झाल्यामुळे वि.प.ने त्याबाबत सखोल चौकशी केली असता असे आढळून आले की, पॉलिसीधारक जयदेव कळंबे हा विमा प्रस्ताव सादर करण्यापूर्वीपासून Alcoholic Liver Disease व इतर व्याधींनी ग्रस्त होता व त्यांसाठीच्या उपचाराकरीता दि.26.03.2008 ते 01.04.2008 पर्यंत जनरल हॉस्पीटल भंडारा येथे वार्ड क्र. 8 मध्ये नोंदणी क्र. 6305 प्रमाणे भरती झाला होता. त्याच्या रोगाचे निदान Alcoholic Liver Disease with Ascitis असे करण्यात आले व पुढील उपचारासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे नेण्यास दि.28.03.2008 रोजी सुचविले होते. परंतू तक्रारकर्तीने तयारी नसल्याचे सांगितल्याने तेथेच 01.04.2008 पर्यंत उपचार करण्यांत आले. जनरल हॉस्पिटल, भंडारा येथे जयदेव कळंबे उपचारासाठी दि.26.03.2008 रोजी भरती झाल्याबाबत नोंदणी कार्डची प्रत वि.प.ने दस्त क्र. 12 वर दाखल केली असून सोबत मेडिकल केस रेकॉर्डची प्रत दाखल आहे. त्यांत रोग निदान Ascitis असे आहे.
(Ascitis is a condition where fluid builds up in the abdomen and it is considered a serious disease.) सदर मेडीकल केस पेपर्समध्ये दि.29.03.2008 रोजी पॉलिसीधारकास पुढील उपचारासाठी गव्हर्नमेंट मेडीकल कॉलेज नागपूर येथे न्यावे म्हणून जनरल हॉस्पिटल भंडारा यांनी संदर्भ चिठ्ठी तयार केली. त्यात Provisional Disgnosis “Alcoholic Liver Disease with Ascitis” असे नमूद आहे. परंतू तक्रारकर्तीने नागपूर येथे उपचारासाठी नेण्यास तयार नसल्याचे सांगितले व खालीलप्रमाणे तक्रारकर्तीने सही केलेली नोंद आहे.
‘’माझ्या पतीची प्रकृती चिंताजनक असल्याची जाणिव डॉक्टर साहेबांनी मला दिली आहे. मला नागपूर मेडीकल कॉलेजला जाण्यास सांगितले. पण मी नेण्यास तयार नाही. पेशंटच्या जिवाला कोणत्याही प्रकारचा धोका झाल्यास मी स्वतः जबाबदार राहीन’’
अशा परिस्थितीत 01.04.2008 रोजी रुग्णालयातून सुट्टी घेतल्यानंतर पॉलिसी धारकास त्याच्या बिघडलेल्या स्वास्थ्याची पूर्ण माहिती असतांना दि.01.04.2008 व 08.04.2008 रोजी सादर केलेल्या प्रस्ताव अर्जात आरोग्य चांगले असल्याची खोटी माहिती व खोटे घोषणापत्र देऊन वि.प. विमा कंपनीची दिशाभूल करुन विमा पॉलिसी मिळविल्या असून पॉलिसी निर्गमित केल्यानंतर केवळ सव्वा ते दीड महिन्यात विमा धारकाचा प्रस्ताव अर्जातील घोषणापत्र तसेच मृत्यु झाल्याचे विमा पॉलिसीच्या अट क्र. 5 प्रमाणे सदर दोन्ही पॉलिसी रद्द ठरल्या असल्याने तक्रारकर्ती सदर पॉलिसी अंतर्गत विमा लाभ मिळण्यास पात्र नाही. सदरची अट खालीलप्रमाणे आहे.
Forfeiture in certain events : In case any condition herein contained or endorsed hereon shall be contravened or in case it is found that any untrue or incorrect statement is contained in the proposal/personal statement, declaration and connected documents or any material information is withheld, then and in the every such case but subject to the provisions of Section 45 of the Insurance Act, 1938, wherever applicable, this policy shall be void and all claims to any benefit in virtue hereof shall cease and determine and all moneys that have been paid in consequence hereof shall belong to the Corporation, excepting always in so far as relief is provided in terms of the Privileges herein contained or may be lawfully granted by the corporation.
म्हणून दि.15.01.2013 च्या पत्राप्रमाणे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूरीची वि.प.क्र. 2 ची कृती प्रस्ताव अर्ज व पॉलिसीतील अटी व शर्तीप्रमाणे असल्याने त्याद्वारे वि.प.कडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब घडलेला नाही. आपल्या युक्तीवादाच्या पुष्टयर्थ वि.प.च्या अधिवक्त्यांनी मा. राष्ट्रीय आयोगाच्या खालील न्यायनिर्णयाचा दाखला दिला आहे.
- Divisional Manager, Life Insurance Corporation of India and Others Vs. Anupama & Ors. [2007] Insc 1160 (17 April, 2012) (Arising out of Revision Petition No.s 3794-3796 of 2007)
उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज व त्यांच्या अधिवक्त्यांनी केलेल्या युक्तीवादावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्तीचे पती पॉलिसीधारक जयदेव कळंबे हे Ascitis च्या गंभीर आजाराने ग्रस्त होते व त्यावर उपचारासाठी जनरल हॉस्पिटल भंडारा येथे दि.26.03.2008 ते 01.04.2008 पर्यंत होते. सदरच्या गंभीर आजारावर भंडारा येथे योग्य उपचार होऊ शकत नाही म्हणून त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पीटलमध्ये विशेष उपचारासाठी नेण्याचा सल्ला तक्रारकर्तीस दि.28.03.2008 रोजी देण्यांत आला. परंतू ती नागपूर येथे पतीला उपचारासाठी नेऊ शकत नसल्याचे व होणा-या परिणामांची जबाबदारी स्वतः स्विकारत असल्याचे दि.29.03.2008 रोजी लेखी लिहून दिल्याचे व दि.01.04.2008 रोजी हॉस्पीटलमधून सुट्टी झाल्यावर पतीला घरी नेल्याचे वि.प.ने दाखल दस्तऐवजांवरुन सिध्द होते. त्यानंतर विमा धारकाने दि.01.04.2008 आणि 08.04.2008 रोजी वि.प.कडे विमा प्रस्ताव सादर केले आणि त्यांत आरोग्य विषयक प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे दिली.
- During the last five years did you consult a Medical Practitioner for any ailment requiring treatment for more than a week ?
| No |
- Have you ever been admitted to any hospital or nursing home for general check-up, observation, treatment or operation ?
| No |
- Have you remained absent from place of work on rounds of health during the last 5 years ?
| No |
- Are you suffering from or have you ever suffered from ailment pertaining to Liver, Stomach, Heart, Lungs, Kidney, Brain or Nervous System ?
| No |
- Are you suffering from or have you ever suffered from Diabetes, Tuberculosis, High Blood Pressure, Low Blood Pressure, Cancer, Epilepsy, Hernia, Hydrocele, Leprosy or any other disease ?
| No |
- Do you have any bodily defect or deformity ?
| No |
- Did you ever have any accident or injury ?
| No |
- Do you use or have you ever used ?
Alcoholic drinks. Any other drugs. Tobacco in any forms. | No |
- What has been your usual state of health ?
| Good |
- Have you ever received or at present availing/undergoing medical advice treatment or test in connection with Hepatitis B or AIDS related condition.
| No |
दि.26.03.2008 ते 01.04.2008 या एक आठवडयांच्या कालावधीत Ascitis सारख्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी जनरल हॉस्पिटल भंडारा येथे भरती राहून उपचार घेतले असतांना व सदर आजारासाठी पूर्ण उपचार भंडारा येथे होऊ शकत नसल्याने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पीटल नागपूर येथे योग्य उपचारासाठी नेण्याचा भंडारा येथील डॉक्टरांनी सल्ला दिला असतांना नागपूर येथे उपचारासाठी नेण्यास तक्रारकर्तीने असमर्थता दर्शवून दि.01.04.2008 रोजी भंडारा येथील दवाखान्यातून सुट्टी झाल्यावर त्याचदिवशी आणि त्यानंतर 8 दिवसांनी भरलेल्या विमा प्रस्ताव अर्जात खास विचारणा करुनही सदर आजारांबाबत उल्लेख न करता आजाराबाबतची माहिती लपवून खोटी उत्तरे देणे आणि पॉलिसी मिळविणे ही गंभीर स्वरुपाची बाब असून यासाठी प्रस्ताव अर्जात दिलेल्या घोषणा पत्राप्रमाणे व पॉलिसीच्या अट क्र. 5 प्रमाणे अशा खोटया माहितीवर मिळविलेली पॉलिसी रद्द करुन विमा हप्त्याची राशी जप्त करण्याचा वि.प.विमा कंपनीला अधिकार आहे म्हणून विमा कराराप्रमाणे प्राप्त झालेले अधिकार वापरुन मृतक जयदेव कळंबे यांनी खोटी माहिती देऊन मिळविलेल्या दोन्ही पॉलिसी रद्द करुन विमा हप्त्याची भरलेली रक्कम जप्त करण्याची विमा कंपनीची कृती पॉलिसी कराराप्रमाणे असल्याने त्याद्वारे विमा ग्राहकाच्या किंवा विमा लाभार्थीच्या सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झालेला नाही म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्षाप्रमाणे वि.प.क्र. 1 ते 3 कडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झालेला नसल्याने तक्रारकर्ती मागणी केलेली कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही, म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.
3) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत कराव्यात.
4) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.