Maharashtra

Nagpur

CC/11/277

Smt. Laxmi Rohit Ahuja - Complainant(s)

Versus

Bhartiya Jeevan Bima Nigam Through Principal Officer - Opp.Party(s)

Adv. Jayesh Vora

17 Mar 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/277
 
1. Smt. Laxmi Rohit Ahuja
Asha Towers, 7th Floor, 7 D, 34/1, Bondel Road,
Kotkata 19
...........Complainant(s)
Versus
1. Bhartiya Jeevan Bima Nigam Through Principal Officer
Office - "Yogkshem", Jeevan Bima Marg,
Mumbai 400021
Maharashtra
2. Bhartiya Jeevan Bima Nigam
Office- National Insurance Building, S.V. Patel Marg,
Nagpur 440001
Maharashtra
3. Bhartiya Jeevan Bima Nigam (Branch No. 971) Through Br. Manager
Office - 3rd floor, National Insurance Building, S.V. Patel Marg,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. Jayesh Vora, Advocate for the Complainant 1
 
Adv. Ghagarkar
......for the Opp. Party
ORDER

 

श्री नरेश बनसोड, सदस्‍य यांचे कथनांन्‍वये.
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 17/03/2012)
 
1.           तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदार क्र. 1 ते 3 विरुध्‍द दाखल करुन मागणी केली की,  गैरअर्जदाराने अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केलेला असून दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे घोषीत करावे, पतीच्‍या अपघाती मृत्‍यूच्‍या पॉलिसी अंतर्गत रक्‍कम रु.1,00,000/- डबल एक्‍सीडेंट बेनीफीट, पॉलिसीवरील बोनस रु.46,100/- व्‍याजासह देण्‍याची व झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाकरीता रु.1,00,000/- आणि तक्रारीच्‍या खर्चाची मागणी केली.
 
2.          तक्रारकर्तीनुसार तिचे पती मृतक श्री रोहीत आहूजा यांनी गैरअर्जदाराचे प्रतिनीधी एजेंट कोड क्र. 0103797 तक्रारकर्त्‍याशी संपर्क साधल्‍यानंतर तिच्‍या पतीने प्‍लॅन क्र. 75 (मनीबॅक पॉलिसी क्र.971247724) 20 वर्षाकरीता रु.1,00,000- विमा मूल्‍याकरीता प्रत्‍येक सहा महिन्‍यानंतर रु.3,240/- भरुन पॉलिसी घेतली. पॉलिसी अंतर्गत पॉलिसी रकमे व्‍यतिरिक्‍त अपघाती मृत्‍यू झाल्‍यास रु.1,00,000/- समावेश करण्‍यास आला होता व तक्रारकर्ती नामनिर्देशित व्‍यक्‍ती आहे. पॉलिसी प्रीमीयमचे हप्‍ते मृतकांनी नियमितपणे भरले होते.
            सदर पॉलिसी कालावधीत दि.24.04.2009 रोजी सायंकाळी 5-00 वा. तक्रारकर्तीचे पती मारुती स्‍वीफ्ट एम एच 31 सी एन 4301 स्‍वतः चालवून भंडारा रोडवरुन नागपूरला येत होते, तेव्‍हा मौदा शिवारात नागपूरच्‍या दिशेने वेगाने व निष्‍काळजीपूर्वक चालून येणा-या वाहन क्र. सीजी 04 जे 0515 ने तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या वाहनाला समोरुन जोरदार धडक मारली. त्‍यामध्‍ये पॉलिसीधारकाचा मृत्‍यू झाला. अपघात झाल्‍यानंतर पो.स्‍टे. मौदा यांनी उपरोक्‍त वाहनाचे चालकाविरुध्‍द भांदं.वि.चे 379, 304 (ए) 427 अन्‍वये गुन्‍हा क्र. 0069/09 नोंदविला. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र. 3 सोबत संपर्क साधून पतीच्‍या अपघाती मृत्‍यूची सुचना दिली व विमा दावा सादर केला. विमा संरक्षण व अपघातात मृत्‍यूचा लाभ देण्‍याची मागणी केली. तक्रारकर्तीच्‍या पतीचे अकस्‍मात मृत्‍यू झाल्‍याने तिला धक्‍का बसला. गैरअर्जदार क्र. 3 ने दि.12.05.2009 रोजी तक्रारकर्तीला एक्‍सीस बँकेचा चेक क्र. 623414 रु.1,21,764/- निर्गमित केला. तक्रारकर्तीने सदर आंशिक रक्‍कम प्राप्‍त झाल्‍याने उर्वरित रक्‍कम अदा करण्‍याबाबत विचारणा केली असता अपघाती मृत्‍यु लाभ नंतर अदा करण्‍यात येईल असे सांगितले. त्‍यानुसार तक्रारकर्तीने त्‍यांचे म्‍हणण्‍यावर विश्‍वास ठेवला. तक्रारकर्तीने विमा रक्‍कम मिळाल्‍यावर चार महिन्‍यांनंतर 25,09,2009 च्‍या पत्रात “The competent authority has regretted the DAB (Double Accident Benefit Policy) claim under the policy” परंतू कोणत्‍या कारणाने दावा फेटाळला हे कळविले नाही. अपघाती मृत्‍यु झाल्‍याने रु.1,00,000/- गैरअर्जदाराने देणे बंधनकारक असतांना त्‍यांनी तसे केले नाही. तक्रारकर्तीने गैरअर्जदाराच्‍या कलकत्‍ता शाखेकडून उपरोक्‍त पॉलिसीचा स्‍टेट्स रीपोर्ट घेतला त्‍यावर वेस्‍टेड बोनस म्‍हणून रु.46,100/- नमूद असतांना सुध्‍दा ती रक्‍कम तक्रारकर्तीस न देणे ही ग्रा.सं.का.च्‍या 2 (1) आर नुसार अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब आहे. त्‍यामुळे तिला शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रासही सहन करावा लागला. वादाचे कारण 28.03.2009 पॉलिसी घेतेवेळी, 24.04.2009 अपघाती मृत्‍यू झाला तेव्‍हा, 12.05.2009 अंशतः रक्‍कम अदा केली त्‍यावेळी व 25.09.2009 DAV दावा नाकारल्‍याने घडले. 03.04.2011 ला स्‍टेटस रीपोर्ट प्राप्‍त. या तारखांना घडले. तक्रारकर्तीने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ एकूण तीन दस्‍तऐवज दाखल केले. त्‍यामध्‍ये गैरअर्जदाराने दिलेला धनादेश, Double Accident Benefit नाकरल्‍याचे पत्र व स्‍टेटस रीपोर्ट आहे.
 
3.          गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ने लेखी उत्‍तरात आक्षेप घेतले की, गैरअर्जदार क्र. 1 हे भारतीय जिवन विमा निगम, मुंबईचे प्रींसीपल ऑफिसर आहेत व या तक्रारीत कोणताही संबंध नसल्‍यामुळे त्‍यांचे नाव वगळण्‍यात यावे असे म्‍हटले. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीच्‍या पतीने घेतलेली पॉलिसी, अवधी, प्रीमीयमचे स्‍वरुप, बोनस, त्‍यातील लाभ, नामनिर्देशन इ. बाबी मान्‍य केल्‍या. गैरअर्जदाराने घडलेला अपघात मान्‍य केला. उपरोक्‍त वाहनाने तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या कारला समोरुन जोरदार धडक दिली. तसेच दाखल एफ.आय.आर. व गुन्‍हा नोंदविल्‍याची बाब मान्‍य केली. दाखल दस्‍तऐवज मान्‍य केले. गैरअर्जदार क्र. 3 ने 12.05.2009 ला रु.1,21,764/- चा धनादेश तक्रारकर्तीस दिल्‍याचे मान्‍य केले. तक्रारकर्तीस अपघाती मृत्‍युबाबत लाभ देण्‍याकरीता आवश्‍यक कागदपत्राची मागणी केली, त्‍यामध्‍ये एफ.आय.आर., शव विच्‍छेदन अहवाल समावेश होता, ती तक्रारकर्तीने मे 2009 मध्‍ये सादर केली. गैरअर्जदाराने 1.05.2009 चा केमीकल अनालायसीस रीपोर्ट व पोलिस समरी सादर करण्‍याबाबत कळविले व त्‍या अनूषंगाने स्‍मरणपत्र पाठविले. केमीकल अनालायसीस रीपोर्ट प्राप्‍त झाल्‍यावर अपघाती मृत्‍यू देण्‍यास असमर्थ असल्‍याबाबत 25.09.2009 चे पत्राद्वारे कळविले. कारण पॉलिसीतील अटीचे उल्‍लंघन झालेले आहे व अपघाती मृत्‍यु दावा देण्‍याचे कारण न घडल्‍याने सदर दावा नामंजूर केला. गैरअर्जदाराने 10.2 बी चे काटेकोरपणे पालन होणे आवश्‍यक आहे असे नमूद करुन अटींचे विवरण नमूद केले. गैरअर्जदाराने पॉलिसीतील अपघाती दाव्‍याचा निर्णय घेताना केमीकल अनालायसीस रीपोर्टचा विचार करुन लाभ देता येणार नाही असे कळविले. केमीकल अनालायसीस रीपोर्टमध्‍ये तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या विसेरा सँपल स्‍टमक, लूप ऑफ इंटैस्‍टाईन, लीव्‍हर, स्‍प्‍लीन, कीडनी मध्‍ये 99 मी.ग्रॅ. इथील अल्‍कोहोल आढळले. रक्‍तामध्‍ये 101 मी.ग्रॅ/100 मी.ली. ईर्थिल अल्कोहोल आढळून आले, त्‍यामुळे मृतक वाहन चालवित असतांना इथील अल्‍कोहोल प्रशन करुन वाहन चालवित होता व पॉलिसी कायद्याचे उल्‍लंघन केले आहे, त्‍यामुळे डबल एक्‍सीडेंट बेनीफिट देण्‍यास नकार दिला व तक्रारकर्तीचे इतर म्‍हणणे नाकारले. तक्रारीचे परिच्‍छेद क्र. 5 मध्‍ये रु.46,100/- बोनस रकमेबाबत गैरअर्जदाराने त्‍याचे विस्‍तृत विवरण दिले व विमा व बोनसची रक्‍कम म्‍हणून तक्रारकर्तीस दिलेली रक्‍कम रु.1,21,764/- मूळ विमा राशीच्‍या दावा बोनस लाभासह शिघ्रतेने देण्‍यात आल्‍याचे मान्‍य केले व तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली.   
 
4.          मंचाने दोन्‍ही पक्षांच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला व दाखल दस्तऐवजांचे व गैरअर्जदारांचे डॉक्‍टर श्री. बल्‍लाळ यांचे शपथपत्र, निकालपत्रे, पुस्‍तकांच्‍या रकान्‍याचे व उलट तपासणी यांचे सुक्ष्‍म अवलोकन केले.
 
-निष्‍कर्ष-
5.          तक्रारकर्तीच्‍या पतीची पॉलिसी व मूळ पॉलिसी अंतर्गत पतीचा झालेला अपघात व गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस मूळ विमा रकम बोनससह रु.1,21.764/- ही धनादेशाद्वारे 12.05.2009 ला तक्रारकर्तीला देण्‍यात आली याबाबत उभय पक्षात वाद नाही. तसेच तक्रारकर्ती वारस व उपरोक्‍त पॉलिसीची नामनिर्देशीत व्‍यक्‍ती असल्‍याने ग्रा.सं.का. अंतर्गत ग्राहक ठरते.
 
6.          गैरअर्जदाराने प्राथमिक आक्षेपात गैरअर्जदार क्र. 1 प्रींसीपल ऑफिसर यांना तक्रारीतून वगळण्‍याची विनंती केली. सदर आक्षेप तथ्‍यहीन असल्‍याने मंचाने नाकारला.
7.          तक्रारकर्तीने तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र. 5 मध्‍ये विमा पॉलिसीच्‍या स्‍टेटस रीपोर्टला आधारभूत मानून वेस्‍टेट बोनस रु.46,000/- ची मागणी केली व गैरअर्जदाराने अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍याचे म्‍हटले आहे. यावर गैरअर्जदाराने उत्‍तरात विस्‍तृत स्‍पष्‍टीकरण दिले. सदर स्‍पष्‍टीकरण मंचास विश्‍वसनीय वाटते. त्‍यामुळे वेस्‍टेड बोनससबाबतची तक्रारकर्तीची मागणी असंयुक्‍तीक स्‍वरुपाची असल्‍याने मंजूर होण्‍यास पात्र नाही व संपूर्ण वस्‍तूस्थितीचा विचार करता अज्ञानापोटी मागणी करण्‍यात आहे असे मंचास वाटते. तक्रारकर्तीने प्रतिउत्‍तरात पॉलिसीच्‍या अट क्र. 8 नुसार म्‍हटले की, सदर विमा पॉलिसीवर कर्ज देता येत नाही. गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन हे स्‍पष्‍ट झाले की, तक्रारकर्तीच्‍या पतीने पॉलिसीवर कर्ज घेतले होते व गैरअर्जदाराने विमा दावा निकाली काढतेवेळी त्‍याची केलेली कपात संयुक्‍तीक स्‍वरुपाची होती व त्‍यात कुठलेही गैरप्रकार नाही असे मंचाचे मत आहे.
8.          गैरअर्जदाराने मूळ विमा रक्‍कम बोनससह तक्रारकर्तीला दिल्‍यानंतर डबल एक्‍सीडेंट बेनीफिटच्‍या रकमेची तक्रारकर्तीची मागणी मंजूर न केल्‍यामुळे उद्भवले आहे. तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यू 24.04.2009 ला झाल्‍यानंतर गैरअर्जदाराने 12.05.2009 ला म्‍हणजे एक महिन्‍याच्‍या आत मूळ विमा रक्‍कम बोनससह रु.1,21,764/- देऊन मंजूर केला होता व त्‍यानंतर डबल एक्‍सीडेंट बेनीफिटची रक्‍कम रु.1,00,000/- रक्‍कम न दिल्‍यामुळे आणि गैरअर्जदाराने 25.09.2009 चे पत्राद्वारे दावा नाकारल्‍याने वादाचे कारण 25.09.2009 ला घडल्‍याने सदर तक्रार 23.05.2011 ला दाखल केल्‍याने ग्रा.सं.का.चे अंतर्गत दोन वर्षात दाखल केलेली असल्‍याने तक्रार मुदतीत आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदारानुसार तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा अपघातात जरीही झाला असला तरीही त्‍याने विमा पॉलिसीच्‍या अट क्र. 10.2 चे उल्‍लंघन केले असल्यामुळे व विमा धारकाने द्रव्‍य प्राशन केल्‍यामुळे, अपघाती मृत्‍यू लाभाची रक्‍कम देता येत नाही असे म्‍हटले व त्‍यास तक्रारीत दाखल केमिकल एनालिसीस रीपोर्टचा आधार घेतलेला आहे. केमीकल अनालायसीस रीपोर्टमध्‍ये तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या विसेरा सँपल स्‍टमक, लूप ऑफ इंटैस्‍टाईन, लीव्‍हर, स्‍प्‍लीन, कीडनी मध्‍ये 99 मी.ग्रॅ. इथील अल्‍कोहोल आढळले. रक्‍तामध्‍ये 101 मी.ग्रॅ/100 मी.ली. ईर्थिल अल्कोहोल आढळून आले, त्‍यामुळे मृतक वाहन चालवित असतांना इथील अल्‍कोहोल प्रशन करुन वाहन चालवित होता व पॉलिसी कायद्याचे उल्‍लंघन केले आहे.(पृष्‍ट क्र. 57, 58)
 
9.                                          गैरअर्जदाराने 20.10.2011 चे मेडीकल रेफरीचे शपथपत्र दाखल केले. त्‍यामध्‍ये त्‍यांनी नमूद केले की, मृतकाचा मृत्‍यू हा महत्‍वाच्‍या अवयवांना दुखापत व इतर कॉम्‍पलीकेशनमुळे झाल्‍याचे दिसते व शव विच्‍छेदन अहवालामध्‍ये अल्‍कोहोल मृत्‍यूपूर्वी प्राशन केल्‍याचे दिसून येते व केमीकल अनालायझरच्‍या रीपोर्टवरुन आढळून आलेल्‍या बाबी नमूद केले व मेडीकल पाठयपुस्‍ताकवरुन 80 ते 200 मी.ग्रॅ./100 मी.ली. रक्‍तामध्‍ये आढळले तर सदर व्‍यक्‍ती मादक द्रव्‍याच्‍या प्रभावाखाली होता असे मानण्‍यात येते आणि त्‍यामुळे शारिरीक अवयवांनी ताबा आणि मानसिक संतुलन गमावण्‍याची दाट शक्‍यता असते असे नमूद केले. सदर व्‍यक्‍तीवाहन चालविण्‍यास सक्षम नसतो असे म्‍हणून ईथिल अल्‍कोहोलच्‍या प्रभावाखाली असल्‍याने त्‍याचा अपघात झाला असा निष्‍कर्ष काढला. डॉ. बल्‍लाळ यांनी उलट तपासणीत हे मान्‍य केले की, त्‍यांना कंपनीचे पॅनेलवर असल्‍यामुळे कंपनीकडून मोबदला मिळतो व त्‍यांचे मूळ शिक्षण जनरल मेडिसिन यामध्‍ये आहे व फारेंसिक सायंन्‍समध्‍ये कुठलाही डिप्‍लोमा किंवा स्‍पेशलायझेशन नाही हे मान्‍य केले. डॉ. बल्‍लाळ हे सांगू शकले नाही की, गैरअर्जदारांनी त्‍यांच्‍यासोबत केव्‍हा संपर्क साधला होता. डॉ. बल्‍लाळने प्रतिज्ञापत्रातील मजकूर मी सागितला व त्‍याला पोस्‍ट मॉर्टेम रीपोर्ट व केमीकल अनालायझर रीपोर्ट आधारीत आहे असे म्‍हटले. परंतू प्रतिज्ञालेखातील मजकूर स्‍वतः सांगितला हे प्रतिज्ञालेखात नमूद नाही. डॉ. बल्‍लाळ यांनी उलट तपासणीत म्‍हटले की, त्‍यांनी दाखल केलेला प्रतिज्ञालेख त्‍यांच्‍या लॉ आफिसरने करुन आणला व मी त्‍यावर स्‍वाक्षरी केली. मी नोटरीकडे प्रतिज्ञालेखी करण्‍यास स्‍वतः गेलो नाही व नोटरी कोण आहे हे मला माहित नाही, त्‍यामुळे उलट तपासणीच्‍या सुरुवातीस प्रतिज्ञालेखातील मजकूर मी सांगितला या डॉ. बल्‍लाळ यांच्‍या म्‍हणण्‍यास पूर्णतः तडा जातो व पूर्णतः अविश्‍वसनीय ठरतो व मूळ प्रतिज्ञालेख त्‍यांच्‍या लॉ ऑफिसरने तयार केला व डॉक्‍टरांनी त्‍यावर सही केली. जेव्‍हा की, प्रतिज्ञालेख करणा-यांनी व्‍यक्‍तीशः नोटरीकडे जाऊन तशी पुस्‍तकात नोंद घेऊन शपथेसह करावे लागते. त्‍यामुळे डॉ. बल्‍लाळ यांनी दाखल केलेले शपथपत्र संदीग्‍ध व अविश्‍वसनीय वाटते. डॉ. बल्‍लाळ यांनी उलट तपासणीत पोस्‍ट मार्टेमनंतर सँपल कशाप्रकारे स्‍टोर केले जातात, त्‍याकरीता कोणत्‍या केमिकलचा वापर केला जातो याबाबत स्‍पष्‍ट विधान मंचासमोर करु शकले नाही. तसेच डॉ. बल्‍लाळ हेसुध्‍दा सागू शकले नाही की, ज्‍या केमिकलचा सँपलचा प्रीझर्व्‍ह करण्‍याकरीता वापर केल्‍या जाते, त्‍याचा सँपलवर काय परिणाम होतो, किती अवधीत ते चांगल्‍या अहवालाकरीता वापरु शकतो याबाबत काहीही डॉ. बल्‍लाळ सांगू शकले नाही. तसेच कोणत्‍या प्रकारे सँपल पीझर्व्‍ह करण्‍यात आले होते हे पोस्‍ट मार्टेम रीपोर्टमध्‍ये व डॉ. बल्‍लाळ यांचे प्रतिज्ञालेखामध्‍ये नमूद नाही. तसेच सँपल extreme condition मध्‍ये exposed झाल्‍यास गुणधर्मातील बदल काय होतात हे मला सांगता येत नाही व प्रतिज्ञापत्रात कोणत्‍या टेक्‍सट्बुकचा आधार घेतला हे नमूद नाही. तसेच HWV Cox या वैद्यकीय पुस्‍तक लिहणा-या विषयी माहिती नसल्‍याचे सांगितले त्‍या पुस्‍काचे 7.5.1 मध्‍ये नमूद टेबल मेडीकल ज्‍युरीसप्रीडेंस अँड टॉक्‍सीकॉलॉजीमध्‍ये 50 ते 140 मी.ग्रॅ./100 मी.ली. प्रमाणात जर अल्‍कोहोल आढळले तर ती व्‍यक्‍ती Happy, gay and vivacious हे मान्‍य केले. डॉक्‍टरांनी हे सुध्‍दा मान्‍य केले की, अपघात कसा घडला मला हे माहित नाही व निरनिराळया प्रकारचे मद्य वेगवेगळया प्रमाणात प्रभावित करतात, हे मला मान्‍य आहे. मात्रा, वारंवारीता व पीण्‍याचा कालावधी याबाबत intoxication संबंधित व्‍यक्‍ती मद्याच्‍या अंमलाखाली आहे यासोबत निगडीत आहे आणि वारंवार मद्य घेणारी व्‍यक्‍ती अंमलाखाली जाण्‍याची शक्‍यता कमी असते व अशी व्‍यक्‍ती त्‍याचे काम बरोबर करु शकतात. यावरुन हे स्‍पष्‍ट झाले की, मात्रा, वारंवारीता, पीण्‍याचा कालावधी यावर त्‍याचे प्राशन करणा-यावर कितपत परिणाम होईल हे अवलंबून होते. वरील Cox च्‍या पुस्‍तकावरुन जर अल्‍कोहोलचे प्रमाणे 50 ते 140 मी.ग्रॅ./100 मी.ली. आढळले तर सदर व्‍यक्‍ती प्रसन्‍न, आनंदी, उत्‍साही असतो हे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे मृतकाचे रक्‍तात व अवयवात आढळलेले प्रमाण हे वरील पुस्‍तकात नमूद केल्‍याप्रमाणे मृतकाचे शरीरात कमी प्रमाणात होते व त्‍यामुळे मृतकाचे वाहन चालविण्‍यावरील संतुलन बिघडले व त्‍या एकमेव कारणामुळे अपघात झाला असा निष्‍कर्ष गैरअर्जदार काढणे असंयुक्‍तीक स्‍वरुपाचे आहे. गैरअर्जदाराने त्‍याचे उत्‍तरात म्‍हटल्‍याप्रमाणे डॉ. बल्‍लाळ यांचे शपथपत्र व उलट तपासणी त्‍यांना मदत करु शकले नाही. उलट पक्षी, गैरअर्जदाराच्‍या निष्‍कर्षास तडे गेले आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
10.                                      गैरअर्जदाराने पृष्‍ट क्र. 84 ते 92 वर Cerebral poison, Chapter 29 हे दाखल केले. सदर पुस्‍तकाचे रकाने कोणत्‍या पुस्‍तकातील व कोणत्‍या लेखकाचे आहे, आवृत्‍ती कोणती आहे याबाबतचा उल्‍लेख नाही. त्‍यामुळे सदर गैरअर्जदाराने दाखल केलेले म्‍हणणे मंचास पूर्णतः मंजूर नसून मंचाने तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या Cox या पुस्‍तकातील निदान, निष्‍कर्ष मंचास जास्‍त संयुक्‍तीक वाटतात व सदर तक्रारीस लागू पडतात असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
गैरअर्जदारानुसार म्‍हटले आहे की, तिचा विमा दावा हा मृतक/विमाधारक दारुच्‍या नशेत असल्‍याने विमा अटीच्‍या शर्तीचा भंग केल्‍यामुळे नाकारला हे चुकीचे आहे. गैरअर्जदारांनी सदर बाब आपल्‍या उत्‍तरामध्‍ये तक्रारकर्तीचा विमा दावा विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार नाकारण्‍यात आला असे म्‍हटले आहे.
      तक्रारकर्तीने तक्रारीसोबत Regional Forensic Science laboratory चा अहवाल दस्‍तऐवज क्र. 6 वर दाखल केलेला आहे. सदर दस्‍तऐवजामध्‍ये Result of Analysis याप्रकारे नमूद केला आहे.
 
-                     Exhibit No.s (1) & (2) contain (120) milligrams and (99) milligrams of Ethyl alcohol per (100) grams respectively---
-                     Exhibit no (3) contains (101) milligrams of Ethyl alcohol per (100) milliliters. 
 
11.                                       यावरुन विमाधारक यांच्‍या मृत्‍यूचेवेळी त्‍यांच्‍या रक्‍तामध्‍ये 101 मिलिग्रॅम इथिल अल्‍कोहोल होते ही बाब स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याच्‍या वकीलांनी युक्‍तीवादाचेवेळी नमूद केले विसेरा रीपोर्टकरीता रक्‍त व शरीराचे भाग संग्रहीत करतांना योग्‍य काळजी घेतली नसल्‍यास बहुतांश वेळा Decompositionमुळे अल्‍कोहोलचे प्रमाण आढळून येते. त्‍यामुळे सदर विसेरा रीपोर्ट प्राप्‍त करीत असतांना रक्‍त व शरीराचे भाग वैद्यकीय व शास्त्रिय पध्‍दतीने संग्रहीत केले होते काय हे महत्‍वाचे आहे.
 
सदर दोन्‍ही पत्रांचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये मुख्‍यत्‍वे, Influence of drug or incapable of exercising proper control over the vehicle याचा उल्‍लेख आहे. त्‍यामुळे जरीही विसेरा रीपोर्टमध्‍ये अल्‍कोहोलचे प्रमाण आढळले असले तरीही तक्रारकर्तीचे पती वाहन चालविण्‍यास सक्षम होते किंवा नव्‍हते किंवा नशेत धुंद होते ही बाब स्‍पष्‍ट होत नाही. तक्रारकर्तीने मंचासमक्ष II (2007) CPJ 287,  HIMACHAL PRADESH ROAD TRANSPORT CORPORATION LTD.   VS. NEW INDIA ASSURANCE COMPANY LTD. निवाडा दाखल केलेला आहे. सदर निवाडयाचे अवलोकन केले असता स्‍पष्‍ट होते की, फक्‍त दारु पीणे म्‍हणजे दारुच्‍या प्रभावाखाली येणे होत नाही. तसेच सदर न्‍यायनिवाडयातील परीच्‍छेद क्र. 4 मध्‍ये Medical Jurisprudence and Toxicology, 7th Edition, By HWV Cox, Table 7.5.1 दिलेला आहे. त्‍यामध्‍ये 50 ते 140 मिलिग्रॅम प्रती 100 मिलि रक्‍तामध्‍ये जर अल्‍कोहोल आढळले तरीही व्‍यक्‍ती वाहन चालविण्‍यास सक्षम राहू शकते असे नमूद आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या दुसरा हिमाचल प्रदेश राज्‍य ग्राहक आयोग, शिमला यांचा न्‍यायनिवाडा III (2008) CPJ 418, LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA & ANR. VS. SULAKSHANA SHARMA @ SONIA  दाखल केलेला आहे. सदर न्‍यायनिवाडयाचा सारांश बघितला असता अपघात हा जर नशेमुळे झाला नसेल किंवा विमा धारकाचा अपघात हा त्‍याच्‍या दारुच्‍या प्रभावामुळे झाला नसेल तर तो विमादावा मिळण्‍यास पात्र ठरतो असे विदित केले आहे. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, नवि दिल्‍ली यांचा IV (2008) CPJ 100 (NC), NATIONAL INSURANCE COMPANY LTD. VS. SUMAN KANWAR हा निवाडा दाखल केलेला आहे. या न्‍यायनिवाडयात मा. राष्‍ट्रीय आयोगाने दारुच्‍या नशेमुळे विमाधारकाचा तोल गेला किंवा दारुची नशा ही अपघाताला कारणीभूत ठरली या बाबी सिध्‍द करण्‍याची जबाबदारी विमा कंपनीवर असते असे नमूद आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने चौथा मा. कर्नाटक राज्‍य ग्राहक आयोग, बेंगलोर यांचा 2009 CPJ 112, MOHAN SINGH VS. CITYBANK N.A. & ANR. दाखल केलेला आहे. या न्‍यायनिवाडयानुसार पोस्‍टमॉर्टेम रीपोर्ट तयार करण्‍या-या डॉक्‍टरचे प्रतिज्ञापत्र दाखल करणे विमा कंपनीचे कार्य असते व ते जर नसेल तर विमाधारक हा विमा दावा मिळण्‍यास पात्र ठरतो. तसेच तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले न्‍यायनिवाडे IV (2009) CPJ 39, LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA & ANR. VS. SEEMA AGARWAL,    R.P.NO.1879 OF 2005, United India Insurance Company Ltd. Vs. Gaj Pal Singh Rawat यांचे अवलोकन केले असता सदर न्‍यायनिवाडे तक्रारकर्तीच्‍या म्‍हणण्‍याशी व तक्रारीस पूरक आहेत असे मंचाचे मत आहे. सदर प्रकरणातील विसेरा रीपोर्टमध्‍ये अल्‍कोहोलचे प्रमाण 101 मिलिग्रॅम इतके दर्शविले आहे. हिमाचल प्रदेश राज्‍य ग्राहक आयोग यांचे निर्णयानुसार 140 मिलिग्रॅमपर्यंत व्‍यक्‍ती वाहन चालविण्‍याकरीता सक्षम राहू शकतो. तसेच इतर न्‍यायनिवाडयांचा निष्‍कर्ष घेतला असता विमाधारक हा दारुच्‍या नशेत असतांना दारुच्‍या प्रभावामुळे अपघात झाला ही बाब सिध्‍द करण्‍याची जबाबदारी विमा कंपनीवर असते. परंतू सदर प्रकरणामध्‍ये विमा कंपनीने दारुच्‍या नशेमुळे अपघात झाला हे सिध्‍द केले नाही. तसेच कर्नाटक राज्‍य आयोगाच्‍या निवाडयानुसार पोस्‍टमॉर्टेम करणा-या डॉक्‍टरचे प्रतिज्ञापत्र दाखल केले नसल्‍यामुळे  विसेरा अहवालाकरीता पाठविलेले अवयव कोणत्‍या परीस्थितीत होते हे स्‍पष्‍ट झाले नाही, त्‍यामुळे गैरअर्जदारांची बचावात्‍मक बाजू सिध्‍द होऊ शकत नाही. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले न्‍यायनिवाडे सदर तक्रारीशी सुसंगत असल्‍याचे मंचाचे मत आहे.
     
12.                                      तक्रारकर्तीने राष्‍ट्रीय आयोगाचे 2011 भाग 3 सीपीजे 232 लाईफ इंशुरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वि. रंजित कौर हे निकाल पत्र दाखल केले. Life Insurance – Double Accident Benefit- death due to electric shock- insured under influence of liquor claim repudiated- forum allowed complaint- state commission rejected appeal-hence revision-contention, insure under influence of alcohol beyond permissible limits-not accepted-specific clinical picture of alcohol intoxication depends on quantity and frequency of consumption and duration of drinking at that level-mere presence of alcohol even above usually prescribed limits is not conclusive proof of intoxication-no nexus between death caused by electric shock and liquor- order of fora upheld
 
13.         वरील विवेचनावरुन व निकालपत्रात प्रमाणित केल्‍यानुसार, हे स्‍पष्‍ट झाले की, शव विच्‍छेदन अहवालामध्‍ये व केमिकल एनालायझर रीपोर्टमध्‍ये अल्‍कोहोलचे प्रमाण आढळले तरीही निव्‍वळ त्‍या कारणामुळे मृतकाचे वाहन चालवितेवेळी वाहनावरील संतुलन गेले व त्‍यामुळे अपघात झाला हे सिध्‍द करण्‍यास गैरअर्जदार पूर्णपणे अपयशी ठरले आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. उलटपक्षी तक्रारकर्तीने तक्रारीत स्‍पष्‍ट केले की, मृतक स्‍वीफ्ट कारने भंडारा रोडने नागपूरला येत असतांना विरुध्‍द दिशेने येणा-या ट्रकने समोरुन येणा-या कारला जोरदार धडक दिली व त्‍यातच त्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे मृतक हा काही प्रमाणात अल्‍कोहोल जरीही घेतले असले तरीही त्‍याचा सरळ-सरळ अपघातासोबत काहीही संबंध नाही असा मंचाचा निष्‍कर्ष आहे व तक्रारकर्तीचे म्‍हणणे विश्‍वसनीय वाटते आणि सदर बाब खोडून काढण्‍यास गैरअर्जदार पूर्णपणे अपयशी ठरले व त्‍यांनी काढलेला निष्‍कर्श चुकीचा व नेहमीच्‍या पध्‍दतीने घेतलेला निर्णय आहे असे मंचाचे मत आहे. ग
14.         गैरअर्जदाराने महाराष्‍ट्र लॉ जर्नलच्‍या 2010 (1) 396, Miscellane Marketiers Pvt. Ltd. Vs. Sun “n” Hotel Pvt. Ltd. हे निकालपत्र डॉ. बल्‍लाळ यांच्‍या म्‍हणण्‍यास समर्थन मिळावे म्‍हणून दाखल केले आहे. परंतू डॉ. बल्‍लाळ यांचे प्रतिज्ञापत्रात म्‍हटले की, माझी सही आहे व त्‍यातील मजकूर बरोबर आहे, परंतू शपथपत्रातील मजकूर हा सत्‍य व खरा असल्‍याबाबत कुठलीही नोंद नाही. डॉ. बल्‍लाळ यांनी उलट तपासणीत प्रतिज्ञापत्रात पूर्णतः तडे जाऊन अविश्‍वसनीय ठरले आहे, त्‍यामुळे सदर निकालपत्र डॉ. बल्‍लाळ यांच्‍या प्रतिज्ञापत्रास पाठपुरावा करीत नाही व ते सदर तक्रारीत लागू पडत नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
15.         वरील विवेचनावरुन हे स्‍पष्‍ट झाले की, तक्रारकर्तीचा नाकारलेला दावा हा गैरकायदेशीर व असंयुक्‍तीक असल्‍यामुळे तक्रारकर्ती Double Accident Benefit ची रक्‍कम रु.1,00,000/- दि.25.09.2009 पासून तक्रारकर्त्‍याच्‍या हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्‍याजासह द्यावी. तसेच मानसिक व शारिरीक त्रासासाठी भरपाई म्‍हणून रु. 10,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्‍यास तक्रारकर्ती पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
 
-आदेश-
1)          तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)          गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्तीला Double Accident Benefit ची     रक्‍कम रु.1,00,000/- दि.25.09.2009 पासून संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत  द.सा.द.शे. 9% व्‍याजासह द्यावी.
3)          गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक त्रासासाठी      भरपाई म्‍हणून रु. 10,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- द्यावे.
4)          गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी सदर आदेशाचे पालन संयुक्‍तपणे किंवा     पृथ्‍थकपणे आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे अन्‍यथा  आदेश क्र. 2 वरील रकमेवर द.सा.द.शे. 9 % व्‍याजाऐवजी   12% व्‍याज  देय राहील.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.