Maharashtra

Bhandara

CC/15/75

Smt. Divya Dineshkumar Goyanka - Complainant(s)

Versus

Bhartiya Jeevan Bima Nigam, Through Branch Manager - Opp.Party(s)

Adv. N.S. Talmale

14 Sep 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/15/75
 
1. Smt. Divya Dineshkumar Goyanka
R/o. Pawankhari, Tah. Tumsar, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
2. Sau. Tanvi Mohit Agrawal
R/o. Bachlar Road, Wardha
Wardha
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bhartiya Jeevan Bima Nigam, Through Branch Manager
Tumsar, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.G.CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA MEMBER
 
For the Complainant:Adv. N.S. Talmale, Advocate
For the Opp. Party:
Dated : 14 Sep 2016
Final Order / Judgement

श्री. मनोहर चिलबुले, अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

 

आ दे श -

      (पारित दिनांक - 14 सप्‍टेंबर, 2016)

 

                                                                                                                             तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये   दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण येणेप्रमाणे.

 

 

1.                तक्रारकर्ती क्र. 1 चे पती व क्र. 2 चे वडील दिनेशकुमार गोयंका यांनी वि.प. भारतीय‍ विमा निगम यांचेकडून दि.28.12.2010 रोजी सुरु होणारी व अंतिम भुगतान तीथी 28.12.2029 असलेली मनी बॅक पॉलिसी क्र. 977515576 लाभासह (दुर्घटना हितलाभासह) रु.5,00,000/- ची खरेदी केली. पॉलिसीधारक दिनेशकुमार गोयंका यांचा दि.10.06.2013 रोजी मृत्यु झाला. तक्रारकर्ता क्र. 1 व 2 ह्या त्‍यांचे वारस आणि नॉमिनी असल्‍याने त्‍यांनी पॉलिसी मृत्‍यु लाभ मिळावे म्‍हणून वि.प.कडे विमा दावा सादर केला. मात्र वरिष्‍ठ विभागीय प्रबंधक, नागपूर,  मंडल प्रबंधक (झोनल मॅनेजर) मुंबई आणि मध्‍य कार्यालय हक्‍क परिक्षण कमेटी मुंबई यांनी अनुक्रमे दि.05.04.2014, 10.02.2015 आणि 05.08.2015 च्‍या पत्रांन्‍वये नामंजूर केला. दि.05.04.2014 च्‍या पत्रांन्‍वये विमा दावा नाकारण्‍याचे कारण पॉलिसी धारकाने प्रस्‍ताव अर्जात प्रकृती व आजाराबाबत माहिती लपविल्‍याने विमा रक्‍कम देता येत नाही असे नमूद केले.

 

                  विमा धारक पॉलिसी काढल्‍यानंतर 2 वर्षानंतर मरण पावल्‍यामुळे विमा अधिनियम 1938 च्‍या कलम 45 अन्‍वये विमित व्‍यक्‍तीचे आजाराबाबत चुकीची माहिती देऊन पॉलिसी मिळविल्‍याचे कारणाने विमा दावा नाकारता येत नाही. मात्र वि.प.ने कलम 45 चा योग्‍य विचार न करता विमा दावा नाकारला आहे. मृतक दिनेशकुमार यांनी त्‍यांच्‍या आजाराबाबत प्रस्‍ताव अर्जात कोणतेही खोटे कथन केले नाही. दिनेशकुमारचे आजाराबाबत संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्रातील निदान बरोबर किंवा चूक होते हे सांगण्‍याची वि.प.ने तक्रारकर्त्‍यांना कोणतीही संधी दिली नाही. पॉलिसी काढण्‍यापूर्वी वि.प.च्‍या वैद्यकीय अधिका-यांनी संपूर्ण तपासणी केली होती. प्रस्‍ताव अर्ज दिनेशकुमार यांनी भरला नव्‍हता, फक्‍त सही केली होती. दिनेशकुमार यांनी प्रस्‍ताव सादर केला तेव्‍हा प्रकृतीने स्‍वस्‍थ होते व 22.08.2007 ते 15.08.2010 या कालावधीत तंटामुक्‍त समितीचे अध्‍यक्ष होते व त्‍यानंतर 16.08.2010 पासून 18.12.2010 रोजी विमा प्रस्‍ताव सादर करेपर्यंत देखील तंटामुक्‍त समितीचे कार्य पार पाडित होते. दिनेशकुमार स्‍वतःच्‍या 45 एकर शेतीची स्‍वतः कास्‍तकारी व देखभाली करीत होते. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्‍यांचा विमा दावा नामंजूरीची वि.प.ची कृती बेकायदेशीर आणि विमा लाभार्थ्‍याप्रती सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे, म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

 

  1. विमा पॉलिसीची रक्‍कम रु.5,00,000/- आणि बोनस रु.1,15,000/- दि.10.06.2013 पासून प्रत्‍यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजासह देण्‍याचा वि.प.विरुध्‍द आदेश व्‍हावा.
  2. तक्रार खर्च रु.50,000/- मिळावा.

 

                  तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दिनेशकुमारचा मृत्‍यु दाखला, पॉलिसी स्‍टेट्स रीपोर्ट, वरिष्‍ठ विभागिय प्रबंधक यांनी दिलेले पत्र, मंडल प्रबंधक जिवन निबंधक मुंबई यांचे पत्र, मध्‍य कार्यालय हक्‍क परिक्षण कमेटी मुंबई यांचे पत्र आणि तंटामुक्‍ती समितीचा दाखला असे दस्‍तऐवज दाखल केले आहेत.

 

2.                वि.प.क्र. 1 ते 3 यांनी लेखी जवाबाद्वारे तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. मृतक दिनेशकुमार गोयंका यांनी वि.प.कडे तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे पॉलिसी काढली होती व त्‍यासाठी तक्रारकर्त्‍यांचे नाव नॉमिनी म्‍हणून नमूद होते आणि दिनेशकुमार गोयंका दि.10.06.2013 रोजी मरण पावल्‍याचे वि.प.नी कबूल केले आहे. तसेच तक्रारकर्त्‍यांनी पॉलिसी मृत्‍यु लाभ मिळावा म्‍हणून वि.प.कडे सादर केलेला दावा व त्‍यावरील पुनर्विचार अर्ज आणि अपिल वि.प.क्र. 1 ते 3 यांनी तक्रारीत नमूद पत्रान्वये नामंजूर केल्‍याचेदेखिल वि.प.नी मान्‍य केले आहे.

 

                  त्‍यांनी आपल्‍या लेखी जवाबात पुढे म्‍हटले आहे की, विमा अधिनियम 1938 च्‍या कलम 45 अन्‍वये विमा धारकाने आरोग्य व आजारासंबंधी खोटी माहीती देऊन पॉलिसी मिळविली तरी आरंभ तिथिपासून 2 वर्षानंतर तो मरण पावल्‍यास पॉलिसी लाभ मिळण्‍यास वारस पात्र असतात हे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे चुकीचे आहे. पॉलिसी करार हा महत्‍तम विश्‍वासाचा असल्‍याने विमा प्रस्‍तावात संपूर्ण माहिती सत्‍य व प्रामाणिकपणे देणे प्रस्तावकावर बंधनकारक आहे. त्‍यामुळे पॉलिसी धारकाने प्रस्‍तावातील प्रश्‍नांना चुकीची, खोटी, अप्रामाणिक उत्‍तरे दिली तर विमा दावा 2 वर्षानंतर सुध्‍दा नाकारण्‍याचा विमा कंपनीस अधिकार आहे. तसेच जर विमा कंपनीच्‍या वैद्यकीय अधिका-याने पॉलिसी प्रस्‍तावाचे वेळी पॉलिसी धारकाचे स्‍वास्‍थ्‍य चांगले होते असे प्रमाणित केले असले तरी ती बाब महत्‍वाची ठरत नाही असे निवाडे मा. सर्वोच्‍च न्‍यायालय, तसेच राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत. सदर प्रकरणात प्रस्‍तावात प्रश्‍न क्र. 11 मध्‍ये विचारलेल्‍या प्रश्‍नांची प्रस्‍तावकाने खोटी व चुकीची उत्‍तरे दिली असून त्‍याबाबत घोषणापत्र लिहून दिले की, दिलेली माहिती खरी आहे, ती विमा पॉलिसी कराराचा आधार आहे, जर दिलेली माहिती असत्‍य आढळून आली तर पॉलिसी करार मुळापासून रद्द होऊन अवैध ठरेल.

 

                  पॉलिसी घेतल्‍यापासून पॉलिसी धारकाचा मृत्‍यु 2 वर्षे 5 महिने 12 दिवसांतच झाला, म्‍हणून वि.प.ने सखोल चौकशी केली असता पॉलिसी घेण्‍यापूर्वीपासून तो डायबिटीज व कॅन्‍सरने ग्रस्‍त होता व त्‍याला दारुचे व्‍यसन असल्‍याने लिव्‍हर सिरॉसीस सुध्‍दा झाला होता व त्‍यासाठी वेगवेगळया हॉस्‍पीटलमधून उपचार घेतले होते हे सिध्‍द झाले. डायबिटीज 10-12 वर्षापासून होता व त्‍यासाठी विमाधारक औषधोपचार घेत असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. त्‍याच्‍या मृत्‍युचे कारण Cirrhosis of Liver, recurrent ascitis, Cancer of oesophagus, Low blood pressure असल्‍याचे डॉ. एस.डी.हरदास यांनी दिलेल्‍या मृत्‍यु प्रमाणपत्रात नमूद आहे. पॉलिसीधारकाने केमोथेरपी, रेडिओथेरपी व इ.साठी डॉ. आनंद पाठक व राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्‍सर हॉस्पिटल, नागपूर, चिखले मल्टिस्‍पेशालिटी अॅन्‍ड कॅन्‍सर हॉस्पिटल नागपूर, गेटवेल हॉस्पिटल, डॉ.कोचर नर्सिंग होम, डॉ. बेलसरे यांचेकडे उपचारांसाठी भरती होतांना व उपचारादरम्‍यान त्‍याच्‍या पूर्वीच्‍या आजाराबाबत माहिती  (History) सांगितली व ती त्‍याच्‍या ट्रीटमेंट पेपरमध्‍ये नमूद केली आहे. संबंधित दस्‍तऐवज वि.प.ने दाखल केले आहेत. मात्र मृतकाने प्रस्‍ताव अर्जात हेतूपूरस्‍सर त्‍याच्‍या गंभीर आजारांबाबतची माहिती लपवून ठेवली व खोटी माहिती दिली. वरील सर्व माहितीच्‍या आधारावर पॉलिसी करारातील अटी व शर्ती आणि पॉलिसी धारकाचे घोषणापत्र यांचे आधारावर वि.प.ने कायदेशीर कारणावरुन दि.05.04.2014 रोजीच्‍या पत्राप्रमाणे तक्रारकर्त्‍यांनी सादर केलेला मृत्‍यु दावा नाकारला असल्‍याने त्‍याद्वारे सेवेत कोणताही न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब घडलेला नाही.

 

                  प्रस्‍ताव फॉर्म कोणी भरुन दिला हा महत्‍वाचा मुद्दा ठरत नाही. पॉलिसी धारकाने प्रमाणपत्र दिले आहे की, प्रस्‍ताव अर्जातील मजकूर त्‍यास श्री. आर. एच. नीखाडे (एल आय सी एजंट) यांनी पूर्णपणे समजावून सांगितला आणि त्‍याने तो समजून घेतला आणि सही केली. तसेच श्री. आर.एच.नीखाडे यांनीदेखील घोषणापत्र दिले आहे की, प्रस्‍तावातील सर्व प्रश्‍न प्रस्‍तावलाकाला समजावून सांगितले,  प्रस्‍तावकाने दिलेली उत्‍तरे त्‍याने प्रमाणिकपणे प्रस्‍तावात दिली आहेत. त्‍यामुळे दिनेशकुमार यांनी प्रस्ताव अर्ज भरला नाही व फक्‍त सही केली हा मुद्दा गौण आहे.

 

                  पॉलिसीधारक तंटामुक्‍त समितीचा अध्‍यक्ष म्‍हणून पॉलिसी काढेपर्यंत काम करीत होता याचा पॉलिसीशी संबंध नाही. डायबिटीज किंवा कॅन्‍सर सारख्‍या आजाराच्‍या सुरुवातीच्‍या काळात रोगाने ग्रस्‍त व्‍यक्‍ती आपली दैनंदिन कामे करु शकतात. आजार जास्‍त वाढला तरच त्‍यांचे कार्य बंद होते. तक्रारकर्त्‍यांची तक्रार निराधार व खोटी असल्‍याने खारीज करावी अशी वि.प.नी विनंती केली आहे.

 

                  वि.प.ने लेखी उत्तरासोबत स्‍पेशल क्‍वेरी फॉर्म, हॉस्पिटल ट्रीटमेंटचे प्रमाणपत्र, मेडीकल अटेंडंस सर्टिफिकेट, डॉ. हरदास यांनी दिलेले मृत्‍यु प्रमाणपत्र, गेटवेल हॉस्पिटलची डिस्‍चार्ज समरी, डॉ. संतोष कोचर यांचा अहवाल, गेटवेल हॉस्‍पीटलचा दि.24.11.2012 रोजीचा अहवाल, डॉ. संतोष कोचर यांचा दि.19.11.2012 चा अहवाल, डिस्‍चार्ज समरी रा.सं.तु.म. हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉसि्पटल यांचा अहवाल, डॉ. गिरीश मोघे यांचा अहवाल, चिखले हॉस्पिटलचा अहवाल व डिस्‍चार्ज कार्ड, डॉ. किरण बेलसरे यांचा अहवाल, चिखले हॉस्पिटलचे डिस्‍चार्ज कार्ड व मृत्‍यु प्रमाणपत्र या  दस्‍तऐवजांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.

 

     

3.                तक्रारकर्तींचे व वि.प.चे कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.

 

 

          मुद्दे                                       निष्‍कर्ष

 

 

1) वि.प.ने न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार केलेला आहे काय ?              नाही.

2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?      नाही.

3) आदेश काय ?                                   अंतिम आदेशाप्रमाणे.

 

 

  •  

 

4.    मुद्दा क्र. 1 ते 3 बाबत – सदरच्‍या प्रकरणात मृतक दिनेशकुमार गोयंका यांनी वि.प.कडे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे दि.28.12.2010 रोजी रु.5,00,000/- ची मनी बॅक पॉलिसी (लाभासहीत) काढली होती याबाबत उभय पक्षात वाद नाही.  

 

                  वि.प.चे अधिवक्‍त्यांनी आपल्‍या युक्तीवादात सांगितले की, विमा प्रस्‍ताव अर्जामध्‍ये प्रश्‍न क्र. 11 प्रमाणे प्रस्तावकाचे आरोग्‍य व आजाराबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नांना दिनेशकुमार गोयंका यांनी खालीलप्रमाणे उत्‍तरे दिली होती. 

  1. During the last five years did you consult a Medical Practitioner for any ailment requiring treatment for more than a week ?

 

No

  1. Have you ever been admitted to any hospital or nursing home for general check-up, observation, treatment or operation ?

No

  1. Have you remained absent from place of work on rounds of health  during the last 5 years ?

No

  1. Are you suffering from or have you ever suffered from ailment pertaining to Liver, Stomach, Heart, Lungs, Kidney, Brain or Nervous System ?

No

  1.  Are you suffering from or have you ever suffered from Diabetes,   Tuberculosis, High Blood Pressure, Low Blood Pressure, Cancer, Epilepsy, Hernia, Hydrocele, Leprosy or any other disease ?

No

  1. Do you have any bodily defect or deformity ?

No

  1. Did you ever have any accident or injury ?

No

  1. Do you use or have you ever used ?

Alcoholic drinks.

  •  

Any other drugs.

Tobacco in any forms.

No

  1. What has been your usual state of health ?

Good

  1. Have you ever received or at present availing/undergoing medical advice treatment or test in connection with Hepatitis B or AIDS related condition.

No

 

 

 

तसेच खालीलप्रमाणे घोषणापत्र लिहून दिले होते.

 

“I,  D. R. Goenka the person whose life is hereinbefore proposed to be assured, do hereby declare that the foregoing statements and answers have been given by me after fully understanding the questions and the same are true and complete in every particular and that I have not withheld any information and I do hereby agree and declare that these statements and this declaration shall be the basis of the contract of assurance between me and the Life Insurance Corporation of India and that if any untrue averment ne contained therein the said contract shall be absolutely null and void and all money which shall have been paid in respect thereof shall stand forfeited to the Corporation.”   

 

दिनेशकुमार यांनी दि.10 नोव्‍हेंबर 2010 रोजी प्रस्‍ताव सादर करण्‍यापूर्वीपासून ते मधुमेह तसेच इतर व्‍याधींनी ग्रस्‍त होते व या सर्व बाबींची माहिती असतांना त्‍यांनी पॉलिसी मिळविण्‍यासाठी हेतूपुरस्‍सर मधुमेह व इतर व्‍याधीची माहिती लपवून ठेवली आणि आरोग्‍यविषयक प्रश्‍नाना खोटी उत्‍तरे देऊन पॉलिसी मिळविली. त्‍यामुळे घोषणापत्राप्रमाणे सदर पॉलिसी रद्द आणि मुळापासूनच शून्‍यवत ठरत असल्‍याने तक्रारकर्त्‍यां कोणताही विमा लाभ मिळण्‍यास पात्र नाहीत. आपल्‍या युक्‍तीवादाचे पुष्‍टयर्थ वि.प.च्‍या अधिवक्‍त्यांनी खालील वैद्यकीय प्रमाणपत्र व दस्‍तऐवज दाखल केले आहेत.

 

  1. दस्‍तऐवज क्र. डी/15 – चिखले मल्टिस्‍पेशालिटी अॅन्‍ड कॅन्‍सर हॉस्पिटल नागपूरचे डिस्‍चार्ज कार्ड.

मृतक दिनेश सदर हॉस्पिटलमध्‍ये दि.20.08.2011 ते 23.08.2011 पर्यंत उपचारासाठी भरती होते.

 

रोग निदान – Squamoys cell carcinoma oesophagus (अन्‍न नलिकेचा कॅन्‍सर)

केलेले उपचार – Pt. admitted for chemotherapy. He responded well to the whole treatment given.

 

  1. दस्‍तऐवज क्र. डी/14 – डॉ. किरण बेलसरे (M.D.Medicine)  Date - 29/08/2011

 carcinoma oesophagus

Referred by Dr. Ashish Chikhale

History – Diabetes X 1999 (11 years)

Cirrhosis.i spleen enlargement.

 

  1. दस्‍तऐवज क्र. डी/13 – चिखले मल्टिस्‍पेशालिटी अॅन्‍ड कॅन्‍सर हॉस्पिटल नागपूरचे डिस्‍चार्ज कार्ड.

भरती दि.13.09.2011 ते 14.09.2011 होते.

रोग निदान आणि केलेले उपचार वरील क्र. 1 प्रमाणे.

 

  1. दस्‍तऐवज क्र. डी/12 – चिखले मल्टिस्‍पेशालिटी अॅन्‍ड कॅन्‍सर हॉस्पिटल प्रमाणपत्र दि.15.09.2011.

हॉस्पिटलमध्‍ये दि.10.08.2011 ते 15.09.2011 पर्यंत भरती दिनेश गोयंका हे कॅन्‍सरने ग्रस्‍त असून उपचारासाठी भरती  होते.

 

  1. दस्‍तऐवज क्र. डी/11 – गिरीश एम. मोघे M.D. (Pathology)

Report on bone marrow aspiration Dt.21/11/2011

cli. features :  carcinoma oesophagus on chemotherapy  

 

  1. दस्‍तऐवज क्र. डी/10 – लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर दि.28.12.2011

 Pt. is diabetic.

 

  1. दस्‍तऐवज क्र. डी/9 – राष्‍ट्रसंत तुकडोजी कॅन्‍सर हॉस्पिटल नागपूर डिस्‍चार्ज समरी.

भरती 21.05.2012 डिस्‍चार्ज 12.07.2012होते.

Final Diagnosis –  carcinoma oesophagus  

 

  1. दस्‍तऐवज क्र. डी/8 –  डॉ. संतोष कोचर दि.19.11.2012

History – D.M.Since 10-12 years

 

  1. दस्‍तऐवज क्र. डी/7 –  गेटवेल हॉस्पिटल दि.24.11.2012

k/c/o carcinoma oesophagus since : 3 yrs.

                                   

  1. दस्‍तऐवज क्र. डी/6 –  डॉ. संतोष कोचर दि.26.03.2013

Cirrhosis of liver Ascitis, CA oesophagus (Lower) stenting done.

 

  1. दस्‍तऐवज क्र. डी/5 –  गेटवेल हॉस्पिटल  Discharge

भरती  दि.29.05.2013 डिसचार्ज 03.06.2013

Diagnosis :  carcinoma oesophagus  SEMS done.

Cirrohosis of Liver

Diabetes mellitus

L

Post History : Known history of cirrhosis of liver, carcinoma of lower oesophagus had undergone orsophageal stentiny (SEMS)

 

  1.  दस्‍तऐवज क्र. डी-4 - केअर हॉस्‍पीटल, दि.10.06.2013
  2.  

Death Certificate

 

Mr. Dinesh Radheshyam Goenka was suffering from Cirrohisis of liver and ascitis from many years and also underwent treatment for Carcinoma of oesophagus 2 years back. He was treated by gastroenterologist, Oncologist and Physicians and was hospitalized several times in specifically hospitals of Nagpur. He had diabetes from many years.

 

He died due to severe cachexia (malnutrition), recurrent ascities, electrolyte imbalance, severe diabetes, low blood pressure at his younger brother’s residence at Dhantoli at 2:30 PM today on 10th June 2013.

 

              

               वरील पुराव्‍यावरुन वि.प.ने हे सिध्‍द केले आहे की, 10 नोव्‍हेंबर 2010 रोजी विमा प्रस्‍ताव सादर करण्‍याचे 8, 9 वर्षापासून दिनेश गोयंका हे मधुमेह तसेच लिव्‍हर सोरेसिसच्‍या व्‍याधीने ग्रस्‍त होते. तसेच त्‍यांना अन्‍न नलिकेच्‍या कॅन्‍सरचा देखील त्रास होता असे असतांना पॉलिसी प्रस्‍तावामध्‍ये आरोग्‍य विषयक प्रश्‍नांची हेतूपुरस्‍सर खोटी उत्‍तरे देऊन त्‍यांना असलेल्‍या मधुमेह आणि लिव्‍हर सोरेसिसबद्दलची माहिती लपविली आणि वि.प.ची दिशाभूल केली असल्‍याने पॉलिसी प्रस्‍तावात दिलेल्‍या घोषणेप्रमाणे पॉलिसी करार रद्द ठरत असल्‍याने वि.प. पॉलिसीच्‍या हप्‍त्‍यांची भरलेली रक्‍कम जप्‍त करण्‍यास पात्र आहे. वरील वस्‍तुस्थितीमुळे जरी दिनेश गोयंका यांचा मृत्‍यु पॉलिसी सुरु झाल्‍यापासून 2 वर्ष 5 महिन्‍यांनी झाला असला तरी पॉलिसी रद्द करण्‍यास विमा अधिनियमाचे कलम 45 ची बाधा येत नाही. म्‍हणून वि.प.ची दि.05.04.2014, 10.02.2015 आणि 05.08.2015 च्‍या पत्राप्रमाणे विमा दावा नाकारण्‍याची तसेच त्‍यावरील पुनर्विचार अर्ज नामंजूरीची कृती विमा शर्ती व अटीस अनुसरुन असल्‍याने त्‍याद्वारे सेवेत कोणताही न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब झालेला नाही म्‍हणून तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. आपल्‍या युक्‍तीवादाचे पुष्‍टयर्थ वि.प.च्‍या अधिवक्‍त्‍यांनी मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या  खालील न्‍याय निर्णयाचा दाखला दिला आहे.

 

Divisional Manager, Life Insurance Corporation of India and Others Vs. Anupama & Ors. [2007] Insc 1160 (17 April, 2012) (Arising out of Revision Petition No.s 3794-3796 of 2007)  

 

 

सदर निर्णयात मा. राष्‍ट्रीय आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

 

“This Commission is LIC of India Vs. Krishan Chander Sharma II (2007) CPJ 53 (NC) has ruled that if there is other credible evidence to prove the fact of a pre-existing disease, mere absence of an affidavit of the concerned treating doctor is not an adequate reason to reject the proof.  

 

It is well established that a contract of insurance is made in utmost good faith and suppression of any material fact by the insuree would entitle the Insurance Company to repudiate the claim.”

 

               याऊलट, तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद असा कि, वि.प.ने मृतक दिनेशकुमार गोयंका याच्‍या आजाराचे जे दस्तऐवज दाखल केले आहेत ते सिध्‍द करण्‍यासाठी संबंधित डॉक्‍टरांचे शपथपत्र दाखल केले नाही. तसेच सदर दस्‍तऐवजांत दिनेशकुमार यांना अनेक वर्षापासून म्‍हणजे प्रस्‍ताव अर्ज सादर करण्‍यापूर्वीपासून मधुमेह व लिव्‍हर सीरोसिस असल्‍याबाबत रुग्‍णाचा इतिहास कोणी सांगितला हे सदर प्रमाणपत्रांत नमूद नाही म्‍हणून डॉक्‍टरांचे प्रमाणपत्रातील सदर आजाराबाबतचा कालावधी सिध्‍द होऊ शकत नसल्‍याने दिनेशकुमार हे प्रस्‍ताव अर्ज सादर करण्‍यापूर्वीपासून सदर आजाराने ग्रस्‍त होते हे वि.प.चे म्‍हणणे ग्राह्य धरता येणार नाही.

 

               याशिवाय, तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्यांचा युक्‍तीवाद असा कि, विमा अधिनियमाच्‍या कलम 45 प्रमाणे पॉलिसी निर्गमित केल्‍यापासून 2 वर्षाच्‍या कालावधीनंतर सदर पॉलिसी प्रस्तावात विमा धारकाने चुकीची माहिती दिली किंवा माहिती लपवून ठेवली अशा कारणाने पॉलिसी रद्द करण्‍याचा विमा कंपनीचा अधिकार नाही म्‍हणून दिनेशकुमार यांचा मृत्‍यु पॉलिसी निर्गमित केल्‍यानंतर 2 वर्षाच्‍या कालावधीनंतर झाला असल्‍याने त्‍यांनी प्रस्‍तावामध्‍ये चुकीची माहिती दिली किंवा माहिती लपवून ठेवली अशा कारणाने विमा पॉलिसी रद्द करण्‍याचा वि.प.ला अधिकार नसल्‍याने सदर पॉलिसी रद्द करुन तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूरीची वि.प.ची कृती सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे, म्‍हणून तक्रारकर्ते तक्रारीतील मागणी मंजूर होण्‍यास पात्र आहे.

 

               उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज आणि त्‍यांच्‍या अधिवक्‍त्यांच्‍या युक्‍तीवादावरुन हे स्‍पष्‍ट होते कि, मृतक दिनेश गोयंका हे दि.10 नोव्‍हेंबर 2010 रोजी विमा प्रस्‍ताव सादर करण्‍यापूर्वी 8-9 वर्षापासून मधुमेह तसेच लिव्‍हर सोसेसिसच्‍या आजाराने ग्रस्‍त होते. ते सदर आजारासाठी तसेच अन्‍न नलिकेच्‍या कॅन्‍सरवरील उपचारांसाठी वेळोवेळी वेगवेगळया डॉक्‍टरांकडे गेले आहेत आणि रुग्‍णावर उपचार करण्‍यापूर्वी त्‍याचा आरोग्‍य विषयक इतिहास डॉक्‍टरांनी विचारला असता त्‍यांना मधुमेह आणि लिव्‍हर सोरेसिसचा आजार ब-याच पूर्वीपासून असल्‍याचे सांगितल्‍यामुळेच डॉक्‍टरांनी तसे आपल्‍या दस्‍तऐवजात (Treatment paper, Discharge record, Death Certificate) नमूद केले आहे. दिनेश गोयंका यांना वरील आजारांची पूर्ण माहिती असतांनादेखिल प्रस्‍ताव अर्जात आरोग्‍य विषयक इतिवृत्‍तात प्रश्‍न क्र. 11   (a), (b), (d) (e) (i) ची खोटी उत्‍तरे दिली आणि वि.प.ची दिशाभूल करुन विमा पॉलिसी मिळविली आहे. मधुमेह आणि लिव्‍हर सोरोसिस हे  घातक आजार असून दिनेश गोयंका यांच्‍या मृत्‍युस सदर आजारदेखिल कारणीभूत असल्‍याचे डॉक्‍टरांनी मृत्‍यु प्रमाणपत्रात नमूद केले आहे. म्‍हणून आरोग्‍याबाबत सदर आजारांविषयी स्‍वतःला असलेली महत्‍वपूर्ण माहिती लपवून पॉलिसी मिळविली असल्‍याने पॉलिसी धारकाने प्रस्‍ताव अर्जातील घोषणापत्रात लिहून दिल्‍याप्रमाणे सदर पॉलिसी रद्द करण्‍याचा व स्विकारलेली विमा हप्‍त्‍यांची रक्‍कम जप्‍त करण्‍याचा वि.प. विमा कंपनीला कायदेशीर अधिकार आहे.

 

               विमा अधिनियम 1938 च्‍या कलम 45 अंतर्गत तरतूदीचासाराश खालीलप्रमाणे आहे.                              

 

 

“No policy of life insurance shall, after the expiry of two years from the date on which it was effected, be called in question by an insurer on the ground that a statement made in the proposal for insurance or in any report of medical officer or referee, or friend of the insured, or in any other document leading to the issue of the policy, was inaccurate or false. Unless the insurer shows that such statement was on material matter or suppressed facts which it was material to disclose and that it was fraudulently made by the policyholder and that the policyholder knew at the time of making it that the statement was false or that it suppressed facts which it was material to disclose.”

               विरुध्‍द पक्षाने सादर केलेल्‍या पुराव्‍यावरुन दिनेश गोयंका यांनी माहित असलेल्‍या मधुमेह व लिव्‍हर सोरेसिस आजाराबाबतची महत्‍वपूर्ण माहिती हेतूपुरस्‍सर लपवून वि.प.ची फसवणूक करुन पॉलिसी मिळविली असल्‍याने तक्रारकर्त्‍यांना विमा अधिनियमाचे कलम 45 चा लाभ मिळू शकत नाही.

 

               वरील कारणांमुळे तक्रारकर्त्‍यांचा विमा दावा नामंजूरीची वि.प.क्र. 1 ते 3 ची कृती विमा पॉलिसीचे व प्रस्‍ताव अर्जातील अटी व शर्तीस अनुसरुन असल्‍याने त्‍याद्वारे सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब घडलेला नाही म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.

 

               मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्षाप्रमाणे वि.प.कडून सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब घडला नसल्‍याने तक्रारकर्त्‍यांनी मागणी केलेली दाद मिळण्‍यास अपात्र आहेत, म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

 

                        वरील निष्‍कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यांत          येत आहे.

-आदेश-

 

            1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

            2)    उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.

            3)    तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्‍यास परत कराव्‍यात.

            4)    आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्‍य पुरवावी.

 

 
 
[HON'BLE MR. M.G.CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.