Maharashtra

Chandrapur

CC/13/12

Shri Yugraj keshavrao bobade - Complainant(s)

Versus

Bhartiya Axa Genral Insurance Company limited - Opp.Party(s)

Adv Dhanvijay

30 Oct 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/13/12
 
1. Shri Yugraj keshavrao bobade
Behind Bank Of Maharashtra Ganpati Ward Ballarpur
Chandrapur
maharshtra
...........Complainant(s)
Versus
1. Bhartiya Axa Genral Insurance Company limited
FIRST floar Vishnu Complex Block B,Pam Road Akashvani Chowck Civil Lines nagpur
Nagpur
maharshtra
2. Shri Rahul Aakuwar Through Bahartiya axa genral Insurance Company Through
jaika moters nagpur road chandrapur
chandrapur
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. Kalpana Jangade MEMBER
 HON'BLE MRS. Kirti Gadgil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: नि का :::

(मंचाचे निर्णयान्‍वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक :- 30/10/2014 )

 

 

अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.

अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणे.

 

 

1.    अर्जदाराने तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 मार्फत गैरअर्जदार क्रं. 1 कडून त्‍यांचे मालकीची टाटा इंडिगो मान्‍झा एम एच 34 ए ए 1662 चा इंन्‍शुरंन्‍स दि. 23/4/12 ते दि. 22/4/13 च्‍या कालावधी करीता काढलेला होता. अर्जदाराने त्‍याकरीता गैरअर्जदाराकडे नियमाप्रमाणे विमा प्रिमियम सुध्‍दा भरलेले होते. दि. 24/9/12 रोजी अर्जदार सदर वाहनामध्‍ये बल्‍लारपुर ते राजुरा जात असतांना रेल्‍वे क्रॉसिंगवर सदर वाहन बंद पडले.यासंदर्भात अर्जदाराने गैरअर्जदाराला वेळोवेळी सुचना दिली तसेच सदर वाहन टाटा कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर जयका मोटर्स चंद्रपूर येथे टोचन करुन दुरुस्‍तीकरीता दिले. सदर वाहनाची पाहणी करुन सदर वाहन दुरुस्‍त करण्‍याकरीता एकूण खर्च 1,30,803.36/- रु. येणार आहे असे जयका मोटर्सने अंदाजे खर्च अर्जदाराला दिले. सदर वाहनाचा विमा पॉलिसी गैरअर्जदाराकडून काढलेला असल्‍याने दि. 26/9/12 रोजी योग्‍य दस्‍ताऐवजासह विमा क्‍लेम फॉर्म जमा केला. दि. 21/10/12 पर्यंत त्‍याबाबत गैरअर्जदाराकडून कोणतीही दखल न घेतल्‍यामुळै अर्जदाराने दि. 22/10/12 रोजी गैरअर्जदार क्रं. 1व 2 यांना त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यामार्फत नोटीस पाठविली गैरअर्जदार क्रं. 1 ने त्‍याच्‍या कार्यालयाचा पत्‍ता अर्जदाराला कोणतीही सुचना न देता बदलविला म्‍हणून सदर नोटीस गैरअर्जदार क्रं. 1ला नविन पत्‍यावर दयावा लागला.  गैरअर्जदार क्रं. 1 ला नोटीस मिळाल्‍यानंतर परस्‍पर मेसर्स जयका तोटर्स यांना विमा दावा म्‍हणून रु. 7,631/- रु. चे भुगतान केले व त्‍याची माहीती अर्जदाराला दिली नाही. त्‍याच्‍यानंतर दि. 31/12/12 रोजी गैरअर्जदार क्रं. 1 ने सदर माहीती पञाव्‍दारे अर्जदाराला दिली. सदर वाहन दुरुस्‍ती करीता अर्जदाराने दि. 6/10/12 रोजी 40,000/- रु. अॅडव्‍हांस म्‍हणून जयका मोटर्सला दिले होते गाडी दुरुस्‍ती झाल्‍यानंतर उर्वरित 42,933/- रु अर्जदाराने जयका मोटर्सला दिले. अर्जदाराने गाडी दुरुस्‍ती करीता 42,933/- रु. स्‍वतः पासून खर्च केले. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, वाहनाचे एकूण दुरुस्‍ती खर्च 90,720/- रु. आले त्‍यापैकी विमा कंपनीनी अर्जदाराला न कळविता परस्‍पर 7,631/- फक्‍त रु. चा भुगतान केले म्‍हणून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्‍यवहारपध्‍दतीची अवलंबना करुन सेवेत ञुटी दिली आहे सबब अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.  

 

2.    अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, अर्जदाराने दुरुस्‍तीकरीता केलेला खर्च रु. 82,933/- रु. व्‍याजासह गैरअर्जदाराकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावा व अर्जदाराला झालेला शारिरीक, मानसिक ञास व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून देण्‍यात यावा.

 

3.    अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार क्रं. 1 व 2 विरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हे हजर होवून त्‍यांनी त्‍यांचे लेखीउत्‍तर नि. क्र. 13 व 15 वर दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रं. 2 ने त्‍याच्‍या लेखीउत्‍तरात असे सांगितले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले सर्व आरोप खोटे असून नाकबुल आहे. गैरअर्जदार क्रं. 2 यांनी अर्जदाराकडून कोणताही मोबदला घेतला नाही व अर्जदाराची मागणी गैरअर्जदार क्रं. 1 च्‍या विरुध्‍द असल्‍यामुळे गैरअर्जदार क्रं. 2 च्‍या विरुध्‍द केलेली तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्रं. 1 ने सुध्‍दा त्‍याच्‍या लेखीउत्‍तरात असे सांगितले कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले सर्व आरोप खोटे असून नाकबुल आहे. गैरअर्जदार क्रं. 1 ने पुढे कथन केले आहे कि, अर्जदाराने विमा पॉलिसी सेक्‍शन 1 मधील कव्‍हर 6 व अट नं. 4 प्रमाणे कलम 11 मध्‍ये विमा नाकारलेल्‍या दुरुस्‍तीचे कारण स्‍पष्‍ट केलेले आहे. सदर तक्रार दाखल करण्‍याचे अर्जदाराकडून कोणतेही कारण घडले नव्‍हते व गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्‍यवहारपध्‍दतीची अवलंबना न करुन सेवेत कोणतीही ञुटी दिली नाही म्‍हणून अर्जदाराने तक्रारीत केलेल्‍या मागणीस पाञ नाही. गैरअर्जदाराने नेमलेल्‍या सर्व्‍हेअरनी केलेला विमा दाव्‍याचे आकलन व अर्जदाराचे फक्‍त रु. 7,787.27/- चे नुकसान झाले होते व ते तेवढेच भरपाई मिळण्‍यास पाञ होते. गैरअर्जदार क्रं. 1 ने पुढे असे कथन केले आहे कि, अर्जदारास Principle Of  Estoppels ची बाधा असल्‍यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.

 

4.    अर्जदाराचा अर्ज, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्‍तीवाद तसेच गैरअर्जदार क्रं. 1 व 2 चे लेखीउत्‍तर, दस्‍ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्‍तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.

 

            मुद्दे                                               निष्‍कर्ष

 

 

1) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 चा ग्राहक आहे काय ?                   होय.        

 

         

2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्‍युनतापूर्ण सेवा दिली आहे         

काय ?                                                      होय.

 

3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला

आहे काय ?                                                  होय.                                           

                               

4) आदेश काय ?     अंतीम आदेशा प्रमाणे.

 

 

                         कारण मिमांसा

 

मुद्दा क्रं. 1 बाबत ः- 

 

5.    अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 मार्फत गैरअर्जदार क्रं. 1 कडून त्‍यांचे मालकीची टाटा इंडिगो मान्‍झा एम एच 34 ए ए 1662 चा इंन्‍शुरंन्‍स दि. 23/4/12 ते दि. 22/4/13 च्‍या कालावधी करीता काढलेला होता. अर्जदाराने त्‍याकरीता गैरअर्जदाराकडे नियमाप्रमाणे विमा प्रिमियम सुध्‍दा भरलेले होते. ही दोन्‍ही पक्षांना मान्‍य असून अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. 1 चा ग्राहक आहे असे सिध्‍द होत असल्‍याने मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः- 

 

6.    अर्जदाराने नि. क्रं. 4 वर सदर वाहनाचे पंजिकरण कार्ड, विमा पॉलिसी, प्रिमियम पावती ईस्‍टीमेंटेंट खर्च पञ, दावा फॉर्म, नोटीस, नोटीस पावती, टॅक्‍स इनव्‍हाईस व अर्जदाराने जयका मोटर्स मध्‍ये भरलेल्‍या पैशाच्‍या पावत्‍या दाखल केलेल्‍या आहेत. यावरुन असे सिध्‍द होते कि अर्जदाराला सदर वाहन दुरुस्‍तीकरीता एकूण खर्च रु. 90,720/- आला होता. गैरअर्जदार क्रं. 1 ने नि. क्रं. 16 वर दस्‍त क्रं. ब- 2 “ Satisfaction Letter “  दाखल केले आहे. सदर पञावर काोणतीही तारीख नमुद नाही तसेच सदर पञावर अर्जदाराचे सही व जयका मोटर्सचे सिल आहे. सदर पञावर असे नमुद आाहे कि, “I Accept the settlement to be full  & final and discharged BHARTI AXA GIG LTD. Of all  liabilities arising out of this claim. “सदर पञावर क्‍लेम देण्‍याची व घेण्‍याची तारीख 29/12/12 असा शेरा आहे. परंतु सदर तक्रारीत अर्जदाराने असे नमुद केले आहे कि गैरअर्जदार क्रं. 1 चे कंपनीने रु. 7,787/- परस्‍पर जयका मोटर्स यांना विमा क्‍लेम म्‍हणून अर्जदाराला न कळविता देण्‍यात आले होते. अर्जदाराने दाखल नि. क्रं. 4 वर दस्‍त क्रं. अ- 12 ची पडताळणी करतांना असे दिसले कि अर्जदाराने विमा क्‍लेम संबंधित पाठविले नोटीस गैरअर्जदाराला दि. 26/10/12 ला पाठविला.

 

मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगानी दिलेल्‍या न्‍यायनिर्णयानुसार

 

  1. 2013 NCJ 205(NC)

Upendra kumar V/s. The New India Assurance Company ltd. Decided on 14/02/2013

Insurance Claim- Scope of discharge Voucher- Held- Mere execution of discharge voucher would not always deprive the consumer from preferring claim with respect to deficiency in service..

 

सदर प्रकरणात सुध्‍दा जरी अर्जदाराने Discharge Voucher मध्‍ये सही केली असली तरी सुध्‍दा सदर वाहनाची दुरुस्‍ती करीता त्‍यांनी भरलेले पैसे मागणीकरीता पाञ आहे.

 

 

            मा. सवोच्‍च न्‍यायालयांनी दिलेल्‍या न्‍यायनिर्णयानुसार

 

  1. IV(2009) CPJ 46 ( SC)

NEW INIDA ASSURANCE CO. LTD. V/S. PRADEEP KUMAR  Decided on 9.4.2009.

Insurance Act, 1938- Section 64UM(2)- Insurance-Assessment of loss- Pre-requisite for settlement of claim- Surveyor’s report not last and final Word- It may be basis for settlement of claim but neither binding upon insurer nor insured- Complainant’s claim accepted by Consumer for  as duly supported by original vouchers, bill and receipts- No interference required in appeal.

 

म्‍हणून गैरअर्जदार क्रं. 1 चे असे म्‍हणणे कि, सदर वाहनाचे नेमलेल्‍या विषेतज्ञांकडून अहवाल मागवून अर्जदाराचा विमा क्‍लेम देण्‍यात आला ही बाब ग्राहय धरण्‍यासारखी नाही. गैरअर्जदार क्रं. 1 चे कंपनीने अर्जदाराला केलेल्‍या वास्‍तवी‍क खर्चावर विमा क्‍लेमची रक्‍कम दयायला पाहिजे होती परंतु गैरअर्जदार कंपनीने फक्‍त विषेतज्ञांच्‍या अहवालावर परस्‍पर फक्‍त रु. 7,787/- जयका मोटर्सला विमा क्‍लेम दिला. अर्जदाराला उर्वरित रक्‍कम स्‍वतः भरावी लागली म्‍हणून मंचाच्‍या मताप्रमाणे गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराला न्‍युनतापूर्ण सेवा दिली आाहे व अनुचित व्‍यवहार पध्‍दतीची अवलंबना केली आहे असे सिध्‍द होते सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. 4 बाबत ः- 

 

7.    अर्जदार हे गैरअर्जदार क्रं. 2 चे ग्राहक नसल्‍यामुळे गैरअर्जदार क्रं. 2 चे विरुध्‍द कोणताही आदेश पारीत करण्‍यात येत नाही. तसेच मुद्दा क्रं. 1 ते 3 च्‍या विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

//अंतीम आदेश//

1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2) गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराला वाहन दुरुस्‍ती करीता आलेला खर्च रु. 82,933/- आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आत दयावे.

3) अर्जदाराला झालेल्‍या शारिरीक व मानसिक ञासापोटी रु. 5,000/- गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराला आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आत दयावे.

4) उभयपक्षांनी आापआपला खर्च सहन करावा.

5) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी.

 

 

चंद्रपूर

दिनांक -   30/10/2014

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kirti Gadgil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.