तक्रार क्र. CC/ 12/ 77 दाखल दि. 31.08.2012
आदेश दि. 15.09.2014
तक्रारकर्ता :- कु.त्रुतुश्री हेमंत केसलकर,
वय – 6 वर्षे,
अज्ञान तर्फे श्री हेमंत श्रावण केसलकर,
रा.राजगोपालाचारी वार्ड,भंडारा,
ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. भारती अक्सा लाईफ इंशुरन्स कंपनी लिमीटेड
मार्फत व्यवस्थापक, रा.भुरानी
कॉम्प्लेक्स,तळमजला,105 माउुंट रोड,
सदर इन आय.टी.सी.बिल्डींग
सेव्हन डेज शाळेजवळ आणि उपवन लॉन जवळ,
नागपुर.
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा.सदस्य हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.मोहमंशी व अॅड.विनोद भोले
वि.प.एकतर्फी
.
(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 15 सप्टेंबर 2014)
1. तक्रारकर्ता हेमंत केसलकर यांची मुलगी कु.त्रुतूश्री केसलकर ही जेसीस कॉन्व्हेंट,भंडारा येथे शिकत असून विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मुलीची आजीवन आनंद विमा पॉलीसी काढली. परंतु तक्रारकर्त्याला सदरहू पॉलीसी पुढे चालविणे नसल्यामुळे ठराविक मुदतीत पैशाची मागणी केल्यामुळे व ती रक्कम विरुध्द पक्षाने न दिल्यामुळे सदरहू तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्त्याची मुलगी त्रुतूश्री केसलकर ही जेसीस कॉन्व्हेंट, भंडारा येथे परीक्षेमध्ये प्रथम आल्यामुळे विरुध्द पक्षाच्या योजनेनुसार तक्रारकर्त्याच्या मुलीची आजीवन आनंद विमा पॉलीसी, भंडारा येथून काढली. तक्रारकर्तीचा पॉलीसी क्रमांक 5008387655 असून सदरहू पॉलीसी 28/2/2012 रुपये 10,000/- रक्कम भरुन काढण्यात आली. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने पॉलीसी काढल्याची कागदपत्रे दिनांक 18/19 मार्च 2012 ला दिली.
तक्रारकर्त्याला काही दिवसांनी पॉलीसीमधील Terms & Conditions for Payment of Primium नुसार असे लक्षात आले की पॉलीसी करीता प्रिमीयम वार्षिक रुपये 10,000/- भरावे लागतात पण तक्रारकर्त्याची आर्थिक स्थिती मजबुत नसल्यामुळे विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्याप्रमाणे Key Feature Document अंतर्गत अनुक्रमांक 6 नुसार Free law Option या Clause नुसार 15 दिवसांच्या आंत जर पॉलीसी बंद करायची असली तर अर्ज देवून बंद केल्या जावू शकते, असे नमुद असल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 22/3/2012 ला पॉलीसी बंद करण्याचा अर्ज विरुध्द पक्षाकडे केला.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची पॉलीसी बंद न केल्यामुळे व रुपये 10,000/- परत न केल्यामुळे अर्जदाराने वकीलामार्फत तक्रारकर्त्याचे वकील श्री विनोद भोले, भंडारा यांचे मार्फत दिनांक 13/5/2012 ला नोटीस पाठविली. सदरहू नोटीस विरुध्द पक्षास दिनांक 31/5/2012 ला मिळाली परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला नोटीस प्रमाणे कार्यवाही न केल्यामुळे सदरहू प्रकरण पॉलीसीचे रुपये 10,000/-, तसेच नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाकरीता रुपये 5,000/- मिळण्यासाठी सदरहू प्रकरण मंचामध्ये दाखल केले आहे.
4. तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन दिनांक 31/8/2012 ला विरुध्द पक्षास नोटीस पाठविण्यात आल्या.
5. विरुध्द पक्षाला दिनांक 27/9/2012 ला नोटीस मिळून सुध्दा सदरहू प्रकरणात गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे विरुध्द सदरहू प्रकरण एकतर्फी चालविण्यात यावे, असा आदेश दिनांक 7/3/2013 ला पारित करण्यात आला.
6. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये विरुध्द पक्षाने काढलेली आजीवन आनंद सुरक्षा विमा पॉलीसी पान नं.13 वर दाखल केली आहे. भारती एक्सा लाईफ जीवनचे Feature Document पान नं.27 वर दाखल केले आहे. विरुध्द पक्षाचे एप्रील 2012 चे पत्र पान नं.28 वर दाखल केले आहे. तसेच विरुध्द पक्षाचे मार्च 28,2012 चे पत्र पान नं.29 वर दाखल केले आहे. विरुध्द पक्षाचे पॉलीसी काढल्याबद्दलचे पत्र पान नं.36 वर, Personal Accident Policy चे Certificate पान नं. 39 वर दाखल आहे. रुपये 10,000/- जमा केल्याची पावती पान न.42 वर, विरुध्द पक्षाला पाठविलेली नोटीस पान न.44 वर, पॉलीसी रद्द करण्याबद्दलचे तक्रारकर्त्याचे दिनांक 22/3/2012 चे पत्र पान नं.47 वर दाखल आहे. विरुध्द पक्षाला दिनांक 12/4/2012 चे पॉलीसी बंद करण्याचे पत्र पान नं.48 वर दाखल केले आहे.
7. तक्रारकर्त्याचे वकील अॅड.विनोद भोले यांनी लेखी युक्तीवाद सदरहू प्रकरणात दाखल केला आहे. तक्रारकर्त्याचे वकील यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याची मुलगी ही भंडारा येथे जेसीस कॉन्व्हेंट मध्ये शिकत होती. विरुध्द पक्ष ही विमा कंपनी असून विरुध्द पक्षाने भंडारा येथील शाळेमध्ये परीक्षा घेवून ज्या विदयार्थ्यांना जास्त मार्कस मिळाले त्यांना लाभ म्हणून त्यांची पॉलीसी काढली. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे व सदरहू न्यायमंचाला सदरहू प्रकरण चालविण्याचा अधिकार आहे. तक्रारकर्त्याची मुलगी शाळेमध्ये प्रथम आल्यामुळे विरुध्द पक्षाने आजीवन आनंद विमा पॉलीसी काढली. तक्रारकर्त्याने रुपये 10,000/- दिनांक 29/2/2012 ला पावती क्र.9 नुसार दिले, ते सदरहू प्रकरणात दाखल आले. तक्रारकर्त्याला पॉलीसीची कागदपत्रे दिनांक 18/19 मार्च 2012 ला प्राप्त झाली. त्यावेळी तक्रारकर्त्यास कळले की पॉलीसीच्या प्रिमीयमचे 10,000/- रुपये तक्रारकर्त्यास दरमहा भरावे लागतील व याबद्दल त्यास पुर्वकल्पना नसल्यामुळे तक्रारकर्त्याची आर्थिक परिस्थिती पाहता तक्रारकर्ता दरमहा 10,000/- पॉलीसीच्या प्रिमीयमचे भरण्यास असमर्थ असल्यामुळे तक्रारकर्त्याने पॉलीसी मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आंत पॉलीसीच्या नियमाप्रमाणे Free Look Option द्वारे पुर्वी भरलेले 10,000/- रुपये परत मागितले, परंतु विरुध्द पक्षाने ते न दिल्याने व तक्रारकर्त्याने वारंवार नोटीस पाठवून सुध्दा विरुध्द पक्षाने न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरण नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केले आहे.
8. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, कागदपत्रे यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.
1. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – होय.
कारणमिमांसा
9. तक्रारकर्त्याची मुलगी भंडारा येथे जेसीस कॉन्व्हेंट मध्ये शिकत होती व विरुध्द पक्षाने तेथे परीक्षा घेतली असता तक्रारकर्त्याची मुलगी ही प्रथम आल्यामुळे विरुध्द पक्षाच्या योजनेनुसार विरुध्द पक्षाने तक्रारक्र्त्याच्या मुलीची पॉलीसी काढली. तक्रारकर्त्याने दिनांक 28/2/2012 ला रुपये 10,000/- पॉलीसीचे वार्षिक प्रिमीयम भरल्याची जमा पावती दिनांक 29/2/012 जी पान नं.43 वर दाखल केली आहे, त्यावरुन दिसून येते. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने पॉलीसीचे Certificate व पॉलीसीचे Document सुध्दा दिलेले आहे, ते सदरहू प्रकरणात तक्रारकर्त्याने दाखल केले आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मुलीची शाळेत जावून परीक्षा घेतल्यामुळे भंडारा येथील न्यायमंचाला प्रकरण चालविण्याचा निश्चितच अधिकार आहे. कारण की ‘Part Of Cause Of Action arises Within the Jurisdiction Of Bhandara Forum’.
10. तक्रारकर्त्याने दाखल केलेले आजीवन आनंद सुरक्षा पॉलीसीच्या Clause No 13 Free Look Option मध्ये असे म्हटलेले आहे की, ‘In case you opt for the freelook option as mentioned in the welcome letter sent along with this Policy bond, the Policy will be cancelled and an amount equal to the Premium less stamp duty and underwriting expenses will be refunded to you’.
त्याप्रमाणे तक्रारकर्त्याला सदरहू पॉलीसी पुढे चालविणे नसल्यामुळे त्याने पॉलीसीची कागदपत्रे मिळाल्यापासून म्हणजेच दिनांक 18/19 मार्च 2012 पासून 15 दिवसांत म्हणजेच दिनांक 2 2/3/2012 ला तक्रारकर्त्याला त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे पॉलीसी पुढे चालविणे नसल्यामुळे ती रद्द करुन पॉलीसीच्या Terms & Conditions नुसार रुपये 10,000/- परत मिळावे असा अर्ज दिला. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला पैसे परत न दिल्याने तक्रारकर्त्याने पुन्हा दिनांक 10/12/2012 ला स्मरणपत्र पाठविले. तरी सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला पॉलीसीचे पैसे न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला वकीलामार्फत दिनांक 23/5/2012 ला नोटीस पाठविली. विरुध्द पक्षास नोटीस मिळून सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची मागणी मान्य केलेली नाही. विरुध्द पक्षाच्या पॉलीसीप्रमाणे व पॉलीसीच्या Terms & Conditions द्वारे पॉलीसीमधील Clause 13 Free Look Option मध्ये असलेल्या नियमाप्रमाणे तक्रारकर्त्याने मुदतीत पैसे परत मिळण्याचा अर्ज विरुध्द पक्षाकडे केलेला आहे. त्या अर्जाची प्रत सदरहू प्रकरणात दाखल आहे. त्या अर्जावर विरुध्द पक्षाने अर्ज स्विकृती सुध्दा दर्शविली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने Clause 13 Free Look Option प्रमाणे त्याचा कायदेशीर हक्क बजावला आहे. तक्रारकर्त्याला पॉलीसी काढतेवेळी भरलेले 10,000/- रुपये न देणे म्हणजेच ही विरुध्द पक्षाने स्वतःचे Terms & Conditions चे उल्लंघन केले आहे व त्यासाठी विरुध्द पक्षाने कुठलेही संयुक्तिक कारण नसतांना कराराचा भंग करणे म्हणजे सेवेतील त्रृटी होय. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला पॉलीसी रद्द करुन तक्रारकर्त्याने पॉलीसीचे भरलेले पैसे मुदतीत परत मागितले असता ते विरुध्द पक्षाने संयुक्तीक कारणाशिवाय न देणे म्हणजे विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी होय. करीता विरुध्द पक्ष हा तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई देण्याकरीता जबाबदार आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या आजीवन आनंद सुरक्षा पॉलीसी क्र.500-8387655 चे भरलेले 10,000/- रुपये द.शा.द.शे.10 टक्के दराने विरुध्द पक्षास तक्रार दाखल झाल्यापासून म्हणजेच दिनांक 31/8/2012 पासून ते संपुर्ण पैसे तक्रारकर्त्यास मिळेपर्यंतचे व्याजासह दयावे.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास मानसिक त्रासासाठीनुकसान भरपाई म्हणून 10,000/- (दहा हजार) दयावे.
4. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- (पाच हजार) दयावे.
5. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
6. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी तक्रारकर्त्यास सदर आदेशाची प्रत नियमानुसार विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.