Maharashtra

Nagpur

CC/425/2015

Om Shivam Buildcon Pvt Ltd - Complainant(s)

Versus

Bharti Axa General Insurance Co. Ltd - Opp.Party(s)

Y. Ramani Patro

08 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/425/2015
( Date of Filing : 11 Aug 2015 )
 
1. Om Shivam Buildcon Pvt Ltd
Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Mr. Vijay Dayal Giri
Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bharti Axa General Insurance Co. Ltd
Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Y. Ramani Patro, Advocate for the Complainant 1
 
Dated : 08 Apr 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्‍या कलम  ३५ नुसार दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्ता क्रं.2 एम एच 40 वाय-२५१४ या ट्रकचा मालक असुन त्यांने त्याचे वाहनाचा विमा पॉलीसी क्रमाक FCV/11462876/DI/12/M1D11C,अन्वये दिनांक 28.12.2013 ते 27.12.2014 याकालावधीकरिता विमा मूल्य रुपये 21,04,200/- एवढया रक्कमेचा विमा उतरविला होता. वि.प.विमा कंपनीने विमा पॉलीसी सोबत पॉलीसीच्या अटी व नियम पूरविल्या नव्हत्या.
  3. दिनांक 1.6.2014 रोजी ठिक 2.00 वाजता वि.प.क्रं.1 मे. ओम शिवम बिल्डकॉम प्रा.लि.सोंदेपार(मिहान) यांचे परिसरात गिट्टी खाली करण्‍याकरिता ट्रक क्रमांक एम एच 40 वाय-२५१४ ने प्रवेश केलापरंतु ट्रक रिकामा करीत असतांना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सूटला आणि वि.प.क्रं.1 चे HOPPER BIN PLANT  ला ठोकले अपघातामूळे वाहनाचे व मे. ओम शिवम बिल्डकॉमचे  नुकसान झाले. सदरची माहिती तक्रारदाराने वि.प.विमा कंपनीच्या कार्यालयाला कळविली व पोलीस स्टेशन सोनेगाव यांनी क्रिमीनल केस क्रं. 3050/2014 दिनांक 6.6.2014 अन्वये सदर गुन्हयाची नोंद केली आहे.
  4. तक्रारदाराने दिनांक 6.6.2014, 11.6.2014 आणि वैयक्तीक भेटीव्दारे आणि दुरध्‍वनीव्दारे विंनती करुन वि.प.विमा कंपनीकडे वाहनाला तसेच प्लान्टला झालेल्या नुकसानीची मागणी केली.  तक्रारदाराने वि.प.कडे विमा दावा दाखल केला. वि.प.विमा कंपनीने विमा दाव्याचे अनुशंगाने दस्तऐवजांची मागणी केली व त्यानुसार तक्रारदाराने आवश्‍यक सर्व दस्तऐवज विमा दावा निकाली काढण्‍याकरिता वि.प.कडे सादर केला. तक्रारदार क्रं.2 च्या वाहनाला झालेल्या नुकसानीची भरपाई विमा रक्कम भरपाई केली परंतु वि.प.क्रं.1 च्या प्लांन्ट ला झालेल्या नुकसानीची भरपाई अदा केली नाही. वि.प. विमा कंपनी वि.प.कं.1 ला झालेल्या नुकसान भरपाई  3rd party claim निकाली करण्‍यास अपयशी ठरली आहे. वि.प.ने तक्रारकर्ता क्रं.2 च्या वाहनाचा विमा काढतांना तक्रारकर्ता क्रं.2 ला आश्‍वासित केले होते की, तकारदाराच्या विमाकृत वाहनाचा अपघात झाल्यावर त्याची नुकसान भरपाई देण्‍यात येईल तसेच तिस-य व्यकतीची तका्ररकर्ता क्रं.2 च्या वाहनाने नुकसान झाल्यावर विमा कंपनी स्वखर्चाने  वाहनाचे विमा धारकास नुकसान भरपाई देईल परंतु तकारदाराने आवश्‍यक दस्तऐवज वि.प.ला सादर करुनही वि.प.ने तिस-या व्यकतीचे म्हणजे तक्रारकर्ता क्रं.1 चे नुकसान भरपाई दिली नाही व त्याबाबत काहीही कळविले नाही.
  5. वि.प. ने तक्रारदाराचा विमा दावा निकाली न काढल्याने तक्रारदाराने वि.प.ला कायदेशीर नोटीस पाठविली परंतु वि.प.ने नोटीसची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे. वि.प. ला यांना निर्देश देण्‍यात यावे की वि.प.ने तक्रारदाराला विमा दावा रक्कम 13,15,356/-, 18 टक्के व्याजासह तक्रादाराला प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यत द्यावी. तसेच तक्रारकर्ता    झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च देण्‍यात यावा.
  6. तक्रारकर्ते यांची तक्रार दाखल करुन वि.प. यांना  आयोगा मार्फत नोटीस काढण्‍यात आली असता नोटीस मिळल्याने वि.प. तक्रारीत हजर झाले व आपले लेखी उत्तर तक्रारीत दाखल केले.
  7.  तक्रारकर्ता क्रं.2 एम एच 40 वाय-२५१४ या ट्रकचा मालक असुन त्यांने त्याचे वाहन विमा पॉलीसी क्रमाक FCV/11462876/DI/12/M1D11C, अन्वये दिनांक 28.12.2013 ते 27.12.2014 याकालावधीकरिता विमा पॉलीसीच्या अटी व नियमांचे अधीन राहून एकुण मूल्य रुपये 21,04,200/- एवढया रक्कमेचा विमा उतरविला होता याबाबत वाद नाही. वि.प.ने तक्रारदाराचे झालेल्या नुकसानीचे मुल्यांकन करण्‍याकरिता सव्हेअरची नेमणूक केली नव्हती परंतु तक्रारदाराने सरकारमान्य सव्हेअर यांची नुकसानीचे मूल्यांकन करण्‍याकरिता नेमणूक केल्याची बाब माहिती अभावी नाकारण्‍यात येत आहे. वि.प. च्या वाहनाचे नुकसान तसेच तिस-या व्यक्तीचे वाहनामूळे झालेल्य नुकसानीची भरपाई देते परंतु प्रत्येक विमा दाव्याकरिता काही कार्यपध्‍दती आहेत व त्याचे पालन करण्‍यात येते. सदर प्रकरणी वाहनाचा विमा दावा सादर करण्‍यात आला व त्याबाबतची कार्यपध्‍दती वि.प.ने अमंलात आणली आहे. परंतु तिस-या व्यकतीचे (3rd party claim) जिल्हा आयोगाचे कार्यक्षेत्रात येते नाही त्यामूळे कार्यपध्‍दतीचा अंमल करण्‍यात आला नाही. अशा प्रकरणी वि.प. विमा दावा तकारदाराला अदा करु शकत नाही. वि.प.ने तक्रारदाराला कोणतीही त्रुटीपर्ण सेवा दिली नाही म्हणुन तक्रारदाराची तक्रार दंडासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
  8. तक्रारकर्ते यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्‍तावेजांचे व लेखी युक्तीवादाचे अवलोकन करता व तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

मुद्दे                                                                   उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                          होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकत्याला दोषपूर्ण सेवा दिल काय ?           नाही
  3. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय?     नाही
  4. काय आदेश                                                         अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारकर्ता क्रं.2 एम एच 40 वाय-२५१४ या ट्रकचा मालक असुन त्यांने त्याचे वाहन विमा पॉलीसी क्रमाक FCV/11462876/DI/12/M1D11C  अन्वये दिनांक 28.12.2013 ते 27.12.2014 याकालावधीकरिता विमा मूल्य रुपये 21,04,200/- एवढया रक्कमेचा विमा उतरविला होता हे नि.क्रं.2(1) वरील दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते.  तसेच वि.प. विमा कंपनी कडुन तक्रारकर्ता कं.2 यांना विमा पॉलीसी अंतर्गत देय असलेली रक्कम प्राप्त झाली याबाबत उभयपक्षात वाद नाही. तक्रारकर्ता क्रं.2 चं वाहनाने तक्रारकर्ता क्रं.1 चे नुकसान झाले याबाबतचा विमा दावा (3rd party claim) या आयोगासमोर चालू शकत नाही व याबाबतची मागणी तक्रारकर्ता क्रं.1 ने मोटार अपघात दावा प्राधिकरण एमएंसीटी यांचेकडे करावयास पाहिजे असे आयोगाचे मत आहे सबब आदेश खालीलप्रमाणे पारित करण्‍यात येतो. 

अंतीम आदेश

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्‍यात येते
  2. उभयपक्षाने आपआपला खर्च स्वतः सोसावा.
  3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.