Maharashtra

Nagpur

CC/477/2017

SHRI. BALU PREMANAND MANKAR - Complainant(s)

Versus

BHARTI AXA GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH AUTHORIZED OFFICER - Opp.Party(s)

ADV. MANJUSHREE JOSHI

18 May 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/477/2017
( Date of Filing : 01 Nov 2017 )
 
1. SHRI. BALU PREMANAND MANKAR
R/O. DURGAPUR, WARD NO. 1, CHANDRAPUR
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BHARTI AXA GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH AUTHORIZED OFFICER
B-BLOCK 222, VAIBHAVVISHNU COMPLEX, UPON I.C.I.C.I. BANK CIVIL LINE, PLAM ROAD, NAGPUR-440001
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. MANJUSHREE JOSHI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 18 May 2022
Final Order / Judgement

आदेश

आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12  नुसार दाखल केलेली आहे.
  2. तक्रारदाराने त्यांचे वापरात असलेले स्कॉपिओ वाहन क्रं. एमएच-34,एएम-3707 या वाहनाचा विमा वि.प.विमाकंपनी कडुन कव्हर नोट कं.34325889 दिनांक 19.8.2015 ते दि.18.8.2016 या कालावधीकरिता विमामूल्य रुपये 6,53,335/- करिता विमा काढला होता. सदरहू विमा पॉलीसी ही काम्प्रेनेसीव्ह होती.
  3. तक्रारदाराचा मित्र स्व.अजय बोमनवार इतर मित्रांसमवेत भिवापूरला लग्नाला गेले होते. लग्नावरुन परत येतांना दिनांक 16.4.2016 ला तक्रारदाराचे वाहनाला नागपूर ते चंद्पूर रोडवर घोडाझरी फाटयाजवळ अपघात झाला व वाहन पूर्णतः क्षतीग्रस्त झाले. नागभिड पोलीस स्टेशनला दाखल अपघात क्रं. 121/2016 अन्वये गुन्हा नोंदविण्‍यात आला. तक्रारदाराने वाहनाला अपघात झाल्याबाबत वि.प.ला त्वरीत माहिती दिली व त्यानंतर सदरचे वाहन प्रोव्हेंन्शियल अॅटोमोबाईल येथे दुरुस्तीकरिता नेण्‍यात आले. त्यांनी वाहनाला रुपये 15,94,440/- इतका खर्च येणार असल्याचे सांगीतले.
  4. तक्रारदाराने विमाकृत वाहनाची वि.प.कडे विमा रक्कमेची मागणी केली असता, वि.प.ने तकारदाराला दिनांक 7.9.2016 ला पत्रान्वये विमा रक्कमेची मागणी तक्रारदाराने गाडी भाडेतत्वावर दिली होती. अपघाताचे वेळी वाहन चालकाचा वाहन परवाना संपलेला होता व तो पुन्हा नुतनीकरण केलेला नव्हता. तसेच गाडीत अकरा प्रवासी बसलेले होते या कारणास्तव नाकारण्‍यात आला. परंतु तक्रारदाराने गाडी भाडेतत्वावर दिली नव्हती तसेच वाहन चालकाकडे वाहन चालविण्‍याचा परवाना होता व परवाना वाढवून घेण्‍याची मुदत त्याच्याकडे होती. परंतु त्याचा या अपघातात मृत्यु झाल्यामूळे वाहन परवान्याची मुदत तो वाढवू शकला नाही. मोटर वाहन कायद्याच्या कलम 15 नुसार वाहन चालकाला एक महिन्यापर्यत परवाना नुतनीकरण करण्‍याची मुदत असते. परंतु यात वाहनचालक अजय बोमनवार मृत्यु पावल्यामूळे त्याचे वाहन परवान्याचे नुतनीकरण होऊ शकले नाही. त्यामूळे अपघाताचे वेळी त्याचेकडे वाहन चालविण्‍याचा परवाना नव्हता हे म्हणणे चूकीचे आहे. वाहनात 11 प्रवासी नव्हते आणि प्रवासी जास्त असल्यामूळे गाडीचे नुकसान भरपाईचा दावा देता येत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. वि.प.ने तक्रारदाराचा विमा दावा नाकारल्यामूळे तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 14.3.2017 ला वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु वि.प.ने नोटीसची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन वि.प. ने तक्रारदाराचे वाहनाचे विमामूल्य रुपये 6,53,335/- तक्रारदाराला द्यावे. तसेच सदर रक्कमेवर दिनांक 16.4.2016 पासुन द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह तक्रार दाखल केल्यापासून रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो येणारी रक्कम अदा करावी. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मिळावा.
  5. वि.प. यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस प्राप्त होऊन वि.प. तक्रारीत हजर झाले व त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले. वि.प. आपले लेखी उत्तरात नमुद करतात की, तक्रारदाराने विमा पॉलीच्या शर्ती व अटीचा भंग केला आहे व त्या खालीलप्रमाणे नमुद आहेत.
  1. तक्रारदाराचे विमाकृत वाहनाची एलएमव्ही कार म्हणुन नोंदणी करण्‍यात आली होती व विमा पॉलीसी प्रायव्हेट कार पॅकेज पॉलीसी अंतर्गत विमाकृत करण्‍यात आले होते व तक्रारदाराचे वाहन अपघाताचे वेळी भाडेतत्वावर होते.
  2. अपघाताचे वेळी तक्रारदाराचे वाहन चालविण्याचा वाहन चालकाजवळ वैध वाहन परवाना नव्हता. अपघाताचे वेळी वाहन चालकाजवळ असलेला वाहन परवाना संपूष्टात आला होता. सदरचे विमाकृत वाहन चालविण्याचा वाहन परवाना कालबाह्य झालेला होता.
  3. वाहनाला मोटारवाहन कायद्याअंतर्गत नऊ व्यक्तीना बसण्‍याची परवानगी असतांना घटनेचे वेळी 11 व्यक्ती बसुन होते म्हणुन वाहन कायद्याचा भंग झाला.
  1. तक्रारदाराने विमा पॉलीसीच्या शर्ती व अटीचा भंग केल्याचे माहित असुन सुध्‍दा तक्रारदाराने वि.प.ला त्रास देण्‍याकरिता मा. मंचाकडे चूकीची तक्रार दाखल केल्यामूळे सदर तक्रार दंडासह खारीज करण्‍यात यावी. अशी मागणी केली आहे.
  2. उभयपक्षाने अभिलेखावर दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता व लेखी जवाब व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केल्यावर व  तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

   मुद्दे                                                                        उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                           होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?            नाही
  3. विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी

पध्‍दतीचा  अवलंब केला आहे काय ?                                            नाही

  1. काय आदेश                                                                            अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने त्यांचे वापरात असलेले स्कॉपिओ वाहन क्रं. एमएच-३४,एएम-3707 या वाहनाचा विमा वि.प. विमा कंपनीकडुन कव्हर नोट कं.34325889 दिनांक 19.8.2015 ते दि.18.8.2016 या कालावधीकरिता विमामूल्य रुपये 6,53,335/- चा विमा काढला होता. याबाबत उभयपक्षात वाद नाही. तकारदाराचे वाहनाला नागपूर ते चंद्रपूर रस्त्यावर घोडाझरी येथे दिनाक 16.4.2016 ला अपघात झाला. अपघाताचे वेळी वाहन चालकाजवळ वैध वाहन परवाना नव्हता हे नि.क्रं.2(4) वर दाखल दस्तऐवजावरुन स्पष्‍ट होते. यावरुन वि.प. ने तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन तक्रारदाराला कोणतीही त्रुटी पूर्ण सेवा दिली नाही असे आयेागाचे स्पष्‍ट मत आहे.

सबब आदेश खालीलप्रमाणे ....

अंतिम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. 2.तक्रारीचा खर्च उभयपक्षकारांनी आपआपला सोसावा.
  3. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.