Ramchandra Sundarrao Padalkar filed a consumer case on 14 Jan 2015 against Bharti Aksa General Insucance Co Ltd in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/12/468 and the judgment uploaded on 17 Mar 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद
________________________________________________________________________________________________________________
ग्राहक तक्रार क्रमांक :-468/2012
तक्रार दाखल तारीख :-01/12/2012
निकाल तारीख :- 14/01/2015
________________________________________________________________________________________________________________
श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष
श्रीमती संध्या बारलिंगे,सदस्या श्री.के.आर.ठोले,सदस्य
रामचंद्र सुंदरराव पाडळकर,
रा. फलॅट नं.202, सारा रेसिडेंसी, सत्यमनगर,
प्लॉट नं.23, एन-5, सिडको, औरंगाबाद …….. तक्रारदार
विरुध्द
भारती अक्सा लाईफ जनरल इंश्युरन्स कं.लि.,
हेड- ऑपरेशनस अँड ऑथोराईजड सिग्नेटरी,
3 रा मजला, आर्चीत आयकॉन, ऑफ कॉलेज रोड,
निअर बिग बझार, नाशिक-422 005 ........ गैरअर्जदार
________________________________________________________________________________________________________________
तक्रारदारातर्फे – अॅड. एम.एम.दाभोळगर
गैरअर्जदारातर्फे – अॅड. आर.एच.दहाट
निकाल
(घोषित द्वारा – श्रीमती. संध्या बारलिंगे, सदस्या)
तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्ये दाखल केली आहे.
तक्रारदाराने दि.17/10/10 रोजी रु.4,25,357/- इतक्या किंमतीत टाटा इंडिका विस्टा घेतली. सदर गाडीचा विमा गैरअर्जदाराकडून घेतला आणि त्यासाठी रु.13,911/- इतके प्रीमियम भरले. पॉलिसीचा कालावधी दि.17/10/10 ते 16/10/11 असा होता. दि.14/8/11 रोजी नाशिक येथे सदर गाडी चोरीला गेली. त्याची तक्रार अंबड पोलिस स्टेशन येथे दि.15/8/11 रोजी केली. दि.1/2/12 रोजी चोरीला गेलेली गाडी न मिळाल्याचे पोलिसांचे पत्र प्राप्त झाले. चोरीच्या घटनेची खबर विमा कंपनीस कळवली. परंतु दि.20/4/12 रोजी गैरअर्जदाराने विमा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे तक्रारदार विमा दाव्याची रक्कम व नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.
गैरअर्जदाराने त्याचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सदर गाडी Private Use करिता असताना सुद्धा त्याचा व्यावसायिक कारणाकरिता वापर केलेला आहे. गाडी चोरीला गेल्याबद्दल गैरअर्जदार विमा कंपनीस उशीरा कळवण्यात आले. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
आम्ही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, गैरअर्जदाराचा लेखी जवाब आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले.
तक्रारदाराने कार घेतल्याची पावती, Registration ची प्रत, पॉलिसीची प्रत, FIR ची प्रत आणि विमा प्रस्ताव नामंजूर केल्याबाबत मिळालेल्या पत्राची प्रत दाखल केली आहे.
तक्रारदाराने दि.17/10/10 रोजी रु.4,25,357/- इतक्या किंमतीत टाटा इंडिका विस्टा ही गाडी खरेदी केल्याची पावती दाखल केली आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या विमा प्रमाणपत्राचे निरीक्षण केले. विम्याचा कालावधी दि.17/10/10 ते 16/10/11 पर्यंतचा आहे. चोरीची घटना विम्याच्या कालावधीत घडलेली आहे. तक्रारदाराने त्याची गाडी चोरी गेल्याबाबत पोलिसात केलेली तक्रार व त्यासंबधित कागदपत्रे दाखल केली आहेत.
विमा पॉलिसी घेताना सदर गाडीचे वर्णन Private Car असे केलेले आहे. त्यामधील Limitation To Use च्या अटींनुसार घटनेच्या वेळेस गाडीचा वापर ‘Hire And Reward करिता केलेला असेल तर विमा दाव्याची नुकसान भरपाई मिळणार नाही.
गैरअर्जदार विमा कंपनीने दि.20/4/12 रोजी दिलेल्या पत्राचे आम्ही निरीक्षण केले. त्यात असे नमूद केलेले आहे की, सदर गाडीची विमा पॉलिसी Private Car करिता घेतलेली होती. परंतु त्या गाडीचा औरंगाबाद –नाशिक- कल्याण- नाशिक या मार्गावर भाडेतत्वावर वापर केलेला आहे. Rc Book मध्ये देखील गाडीचे वर्णन Private Car असे नमूद आहे. घटनेच्या वेळेस सदर गाडी चालवत असलेल्या ड्रायव्हरचे स्टेटमेंट घेतलेले आहे. त्यावरून सदर गाडीचा वापर व्यावसायिक कारणाकरिता केलेला आहे. त्यामुळे विमा दावा नामंजुर केल्याचे सदर पत्रात नमूद केलेले आहे.
गैरअर्जदाराने Private Car Insurance Policy चे नियम दाखल केले आहेत. तसेच इन्वेस्टिगेशन रिपोर्ट आणि ड्रायव्हर रामसिंग सुरडकरचे स्टेटमेंट मंचासमोर दाखल केले आहे. इन्वेस्टिगेशन रिपोर्ट मध्ये ज्या बाबीं ठळकपणे नमूद केल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत:- विमाधारक म्हणजेच तक्रारदार सदर कार Personal आणि Commercial कारणाकरिता वापरत होता. दि.15/8/11 रोजी चोरीच्या घटनेची अंबड पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवलेली होती. चोरीला गेलेल्या सदर कारचा थांगपत्ता लागलेला नाही. सदर कारच्या Job Card चे आणि Service History चे अवलोकन केल्यावर ती कार प्रती महिमा 4000 Km चालल्याचे दिसून येत आहे. यावरून सदर कार व्यावसायिक कारणाकरिता वापरली गेल्याचे दिसून येते. त्यामुळे विमाधारकास कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही.
गैरअर्जदाराने ड्रायव्हर रामसिंग सुरडकरचे शपथ पत्र सादर केले आहे. त्यात त्याने म्हटलेले आहे की, सदर कार Pick Up And Drop या व्यावसायिक कारणाकरिता वापरली जात होती. दि.13/8/11 रोजी नाशिकला 4 प्रवाश्यांना नाशिक येथे Drop करायचे होते. त्याकरिता त्यांच्याकडून प्रती प्रवासी रु.600/- घेतलेले होते.
वरील निरीक्षणावरून असे दिसून येते की, तक्रारदाराने सदर गाडीची पॉलिसी Private Car असे दाखवून घेतलेली असून ही तो त्या गाडीचा त्याचा वापर व्यावसायिक कारणाकरिता करीत होता. इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट मध्ये नमूद केलेल्या बाबीं संयुक्तिक आहेत. ड्रायव्हरच्या शपथ पत्रावरून सदर कार व्यावसायिक कारणाकरिता वापरली जात असल्याचे दिसून येते. Private Car Insurance Policy मधील Limitation To Use च्या अटींनुसार सादर कारचा वापर Hire And Reward करिता केलेला असेल तर विमा धारकाला विमा दाव्याची नुकसान भरपाई मिळू शकत नाही.
वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
(श्रीमती संध्या बारलिंगे) (श्री.किरण.आर.ठोले) (श्री.के.एन.तुंगार)
सदस्या सदस्य अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.