तक्रारदारातर्फे वकील : श्री. निलेश पार्टे हजर.
सामनेवाले क्रमांक 1 व 2 : एकतर्फा
निकालपत्रः- मा. श्री. शां. रा. सानप, सदस्य ठिकाणः बांद्रा
न्यायनिर्णय
एकतर्फा
1. तक्रारदार व सामनेवाले तक्रारीतील नमूद केलेल्या पत्यावर राहतात व व्यवसाय करतात.
2. सामनेवाले क्रमांक 1 ही तक्रारदारांना सेवा पुरविणारी संस्था आहे तर सामनेवाले क्रमांक 2 हे सामनेवाले क्रमांक 1 चे प्रतिनिधी असून तक्रारदारांना सामनेवाले क्रमांक 1 यांचेतर्फे विविध सेवा पुरविणारे आहेत.
3. तक्रारदारांचे तक्रारीतील कथने, निवेदने व मागणी पुढील प्रमाणे आहे. तक्रारदार हे सामनेवाले क्रमांक 1 व 2 चे ग्राहक आहेत, व सदरची तक्रार ही त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2(1)(G) व 2(1)(r) अन्वये दाखल केली आहे. सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली आहे.
4. सामनेवाले क्रमांक 1 ही संस्था कंपनी कायदा 1956 अन्वये स्थापन झालेली असून मोबाईल सेवा पुरविणारी संस्था आहे तर सामनेवाले क्रमांक 2 हे सामनेवाले क्रमांक 1 यांचे प्रतिनिधी असून ग्राहकांना विविध सेवा पुरविणारी संस्था आहे.
5. तक्रारदारांचे असेही कथन आहे की, सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली आहे ती पुढीलप्रमाणे आहे.
6. तक्रारदाराचे असे निवेदन आहे की, तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून सन 2009 पासून GSM Mobile Phone क्रं. 09867879997 वर मासिक आकारणी (Post paid connection) या तत्वावर सेवा घेत आहेत, व या अगोदर सामनेवाले क्रमांक 1 यांनी पाठविलेल्या देयकांच्या रकमा तक्रारदारांनी वेळोवेळी अदा केलेल्या आहेत (Annexure A Coolly).
7. तक्रारदाराचे तक्रारीत असेही कथन आहे की, सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना पाठविलेले देयक रुपये 847.08 चे, क्रमांक 934766284 दिनांक 11/6/2009 ते 10/07/2009 कालावधीच्या देयकाची रक्कम तक्रारदारांनी J. S. Bank चा धनादेश क्रं. 267497 दिनांक 20/07/2009 हा दिनांक 27/07/2009 रोजी सी.एस.टी. स्थित असलेल्या Drop Box मध्ये टाकला होता.
8. तक्रारदाराचे पुढे असे कथन आहे की, सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना पाठविलेले देयक रुपये 2071.86 चे क्रं. 75047626, दिनांक 11/07/2009 ते 10/08/2009 हया कालावधीचे देयक बघून तक्रारदारांना आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या बिलात मागिल कालावधीच्या बिलाची थकबाकी रुपये 887.08 व लेट फी म्हणून रुपये 75.00 दर्शविण्यात आले होते. त्यांनतर तरीही तक्रारदारांनी मागच्या कालावधीच्या थकीत देयकाची रक्कम अधिक लेट फी अधिक चालू कालावधीच्या देयकात दर्शविण्यात आलेली रक्कम अशी एकूण रक्कम रुपये 2072.86 चा जे. एस. बँकचा धनादेश क्रमांक 272061 दिनांक 20/08/2009 द्वारे दिनांक 25/08/2009 रोजी सामनेवाले क्रमांक 2 यांच्या गॅलरीतील ड्रॉप बॉक्समध्ये टाकला. कारण सामनेवाले क्रमांक 2 यांनी तो घेण्यास नकार देऊन ड्रॉप बॉक्समध्ये टाकण्याचे सांगितले आहे.
9. तक्रारदारांचे पुढे असेही कथन आहे की, दिनांक 25/09/2009 रोजी सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना टेलीफोन द्वारे असे कळविले आहे की, तक्रारदारांचा दुसरा धनादेश क्रमांक 272061 दिनांक 20/08/2009 रक्कम रुपये 2071.86 हा सामनेवाले क्रमांक 1 यांना मिळाला नाही. तरी अप्रीय घटना टाळण्यासाठी कृपया लवकरारात लवकर रुपये 2822.00 चा भरणा सामनेवाले क्रमांक 1 यांचे कंपनीकडे करावा त्यानुसार तक्रारदारांनी रोख रक्कम रुपये 2822.00 हे दिनांक 25/09/2009 रोजी सामनेवाले क्रमांक 2 यांचेकडे रोखीने रक्कम अदा केली (Annexure B Coolly) व सामनेवाले क्रमांक 2 यांनी सदर रोख रक्कम रुपये 2822.00 स्विकारुन पावती (Receipt) दिली (Annexure C colly).
10. तक्रारदाराने पुढे असेही कथन केले आहे की, त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 29/09/2009 पासून सतत सामनेवाले क्रमांक 1 यांचेशी E-mail द्वारे पत्रव्यवहार केला व यापुढे ते Airtel च्या Gallary मध्ये जाऊन धनादेशाद्वारे देयकाची रक्कम अदा करतील अशी विनंती त्यांनी सामनेवाले क्रमांक 1 कडे केली व तक्रारदारांना सदर देयकात दर्शविलेल्या रकमेची पोचपावती (Acknowledgement) मिळावी अशीही विनंती केली. परंतु त्यानंतरही तक्रारदार यांना सदर बाबतीत सामनेवाले यांचेकडून सामधानकारक उत्तर बरेच E-Mail पाठवून मिळाले नाही Annexure D Coolly.
11. तक्रारदाराचे तक्रारीत पुढे असेही कथन आहे की, सामनेवाले यांना पुढील कारणासाठी दोषी धरण्यात यावे कारण त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली आहे. ती कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
ए) सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारांकडून देयकाची संपूर्ण रक्कम व लेट फी स्विकारुनही व सदरचे धनादेश त्यांच्याच ड्रॉप बॉक्समध्ये टाकूनही त्या रकमांची पोचपावती (Acknowledgement) दिली नाही म्हणून सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांना दोषी धरण्यात यावे.
बी) तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेले दोन धनादेश क्रमांक 267497 व 272061 हरविल्याबद्दल व त्याप्रित्यर्थ तक्रारदारांना द्यावी लागलेली लेट फी रुपये 178.59 बद्दल दोषी धरण्यात यावे.
सी) तसेच धनादेश क्रमांक 272061 वर तक्रारदारांनी केलेली सही बँकेतील दप्तरातील सहीशी जुळत नसल्यामुळे धनादेश वटला नाही असे सामनेवाले क्रमांक 1 यांनी सांगितले परंतु सदरचा धनादेश व मेमो सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना परत केला नाही म्हणूनही सामनेवाले क्रमांक 1 यांना दोषी धरण्यात यावे व म्हणून सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली आहे असे जाहीर करण्यात यावे.
12. तक्रारदारांचे तक्रारीत असेही कथन आहे की, सदर मंचाने सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांचेसह इतर Telecom Service Provider कंपन्यानाही असे आदेश देण्यात यावेत की तक्रारदारांनी/ग्राहकांनी देयकाची रक्कम धनादेशाद्वारे अदा केल्यास त्यांना पोचपावती देण्यात यावी असा आदेश मंचाने द्यावा. अन्यथा ग्राहकाचे नुकसान होईल म्हणून सदरची तक्रार तक्रारदारांनी मंचात दाखल केली आहे व सदर तक्रारीत पुढील मागण्या केल्या आहेत.
ए) सदर तक्रार दाखल करुन घेण्यात यावी.
बी) सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारांना अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली आहे असे जाहिर करण्यात यावे.
सी) मानसिक त्रासाबद्दल सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई पोटी रुपये 50,000/- अदा करावेत असा आदेश देण्यात यावा.
डी) सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदाराकडून वसूल केलेली लेट फी रुपये 178.9 हे 8.5 टक्के द.सा.द.शे. व्याजासह परत करावे असा आदेश देण्यात यावा.
ई) तक्रार खर्चाबद्दल सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना रुपये 1000/- अदा करावे असा आदेश देण्यात यावा.
13. सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांना त्यांच्या पत्यावर तक्रारीची नोटीस दिनांक 15/12/2010 रोजी पाठविल्याचे दिसून येते व त्यांना ती प्राप्त झालेली आहे. सदर पावत्या संचिकेत दाखल आहेत. सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांना नोटीस मिळून सुध्दा व वारंवार संधी देऊनही ते मंचासमोर हजर होऊन त्यांनी आपली कैफियत दाखल केली नाही. अतएव सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांचेविरुध्द प्रकरण दिनांक 06/07/2011 रोजी एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला, व तक्रारदारांना आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर तक्रारदार हे दिनांक 17/10/2011 रोजी हजर झाले व तक्रारदारातर्फे त्यांच्या वकीलांनी वकालतनामा व Affidavit of Service दाखल करुन, पुराव्याचे शपथपत्र दाखल करणेकामी मुदतीची विनंती केली व ती मंजूर करण्यात आली. त्यानंतर तक्रारदारांच्या वकीलांनी दिनांक 18/07/2012 रोजी मंचासमोर हजर होऊन निवेदन केले की, तक्रारदारांची तक्रार व त्यासोबतचे Affidavit in support of complaint व सोबतचे कागदपत्रे हेच त्यांचे पुराव्याचे शपथपत्र समजण्यात यावे. मंचाने त्याच दिवशी (18/07/2012) तक्रारदारांना लेखी युक्तीवाद दाखल करण्याचे आदेश दिले परंतु तक्रारदार व त्यांचे वकील वारंवार गैरहजर राहीले. परंतु त्यांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला नाही. शेवटी मंचाने सदर प्रकरण जुने असल्यामुळे व तक्रारदार हे मंचासमोर हजर होऊन लेखी युक्तीवाद दाखल करीत नसल्यामुळे सदर प्रकरण तोंडी युक्तीवादासाठी नेमण्यात आले. शेवटी दिनांक 20/02/2015 रोजी तक्रारदारांचे वकील मंचापुढे हजर झाले व तोंडी निवेदन केले की त्यांना लेखी युक्तीवाद दाखल करावयाचा नाही व नंतर मंचाने त्यांची तोंडी विनंती मान्य करुन त्यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला व प्रकरण न्यायनिर्णयकामी नेमण्यात आले.
14. प्रस्तुत मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या तक्रारीसोबत, पुराव्याचे शपथपत्र, ई-मेल द्वारे केलेला पत्रव्यवहार, कागदपत्र, रक्कम अदा केलेल्या रकमांच्या पावत्या, व देयके दाखल केले आहेत त्यांचे प्रस्तुत मंचाने काळजीपूर्वक वाचन केले व निरिक्षण केले. तसेच तक्रारदारांचा तोंडी युक्तीवादही ऐकण्यात आला. त्यानुसार तक्रार एकतर्फा निकालकामी खालील मुद्दे उपस्थित होतात, मंचाने त्यावर आपला निष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविला आहे.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून देयकाची रक्कम, लेट फी स्विकारुन व पोच पावती न देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असल्याचे तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदारांनी ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेले दोन धनादेश रुपये 847.08 क्रं. 267497 दिनांक 20/07/2009 व रुपये 2071.86 क्रं. 272061 दिनांक 20/08/2009 यांची पोच पावती सामनेवाले यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत काय? | नाही. |
3 | सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून स्विकारलेली ले फी तक्रारदार परत मिळणेस पात्र आहेत काय व ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय? | नाही. |
| | |
4 | तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेस पात्र आहेत काय? | नाही. |
5 | अंतीम आदेश? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारण मिमांसा
मुद्दा क्रमांक 1 व 2
15. तक्रारदार हे मोबईल नंबर 9867879997 सह GSM सेवा घेणारे व मासिक देयक अदा करणारे (Post paid), हे सामनेवाले क्रमांक 1 (Bharati Airtel Limited) या कंपनीचे ग्राहक आहेत व सामनेवाले क्रमांक 2 हे सामनेवाले क्रमांक 1 चे एजंट आहेत. याबाबत उभयपक्षांमध्ये दुमत नाही. तक्रारदार यांनी विवादीत (Alleged) पहिला धनादेश, Bill No 934766284, Bill period 11/06/2009 जव 10/07/2009 या कालावधीचे बिल रक्कम रुपये 847.08 चा Cheques No. 267497 दिनांक 20/07/2009 हा J. S. Bank चा धनादेश, हा छत्रपती शिवाजी टर्मिनल्स(CST) येथील र्डॅाप बॉक्स मध्ये दिनांक 27/07/2009 रोजी टाकला. त्यानंतर दुसरा विवादीत (Alleged) धनादेश, Bill No. 75047626, Bill period 11/07/2009 ते 10/08/2009, Bill Amountरुपये 2071.86, Cheque No. 272061 दिनांक 20/08/2009 चा जे. एस.बँकेचा धनादेश हा सामनेवाले क्रमांक 2 यांच्या कार्यालयातील ड्रॉप बॉक्स मध्ये दिनांक 25/08/2009 रोजी टाकला याबाबतीतही उभयपक्षात दुमत नाही.
16. अतएव सर्वसाधारण प्रथे प्रमाणे (Practice in Vogue) व नियमाप्रमाणे देयकाची रक्कम कार्यालयात जाऊन अदा करणे तक्रारदाराचे कर्तव्य आहे जेथे धनादेशाद्वारे भरणा केला जातो त्यानंतर प्रॉपर अकाऊंटला डेबिट व क्रेडिट गेल्यानंतर पावती देण्यात येते. परंतु जरधनादेश न वटल्यास प्रशासनाचा खर्च वाढतो. सदर मंच येथे स्पष्टपणे नमूद करीत आहे की, सामनेवाले क्रमांक 1 यांनी कोणताही मोबदला न घेता, ग्राहकांच्या (तक्रारदारांच्या सेवेसाठी, सुविधेसाठी, वेळ वाचविण्यासाठी, प्रवास व इतर खर्च वाचविण्यासाठी तसेच दूरवर सामनेवाले यांच्या कार्यालयात अथवा Gallary, Outlet मध्ये तक्रारदारांना जावे लागू नये म्हणून सामनेवाले यांनी रेल्वे स्टेशन, बसस्टॅण्ड, विमानतळ, टॅक्सी स्टॅण्ड, रिक्षा स्टॅण्ड, शासकिय कचेरीजवळ, शहरातील मोक्याच्या ठिेकाणी व सामनेवाले यांचे Gallary, Outlet मध्ये असे विविध उद्देश लक्षात घेऊन ग्राहकांच्या सोयीसाठी ड्रॉप बॉक्सची अतिरिक्त सुविधा (Additional Facility) विनामूल्ये सुविधा उपलब्ध करुन दिलेली दिसते. याबाबत सामनेवाले क्रमांक 1 यांनी कोणतेही अतिरिक्त शूल्क वसूल केलेले नाही. परंतु Ultimately सामनेवाले यांना सदर धनादेश विविध ठिकाणाहून गोळा करणेसाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावे लागलेले दिसतात. अशा परिस्थितीमध्ये सदर ड्रॉप बॉक्समधून एखादा धनादेश गहाळ झाला (Misplaced) अथवा तो ग्राहकाच्या खात्यातूनही वटविला गेलेला नाही. अशा अनैसर्गिक परिस्थितीमध्ये व Unexpected Incident बाबत सामनेवाले यांना जबाबदार धरुन ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेला धनादेश वटण्यापूर्वीच पोचपावती देणे योग्य नाही व मागणी करणे योग्य नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
17. तसेच सामनेवाले क्रमांक 1 ही कंपनी/संस्था, कंपनी कायदा 1956 अन्वये स्थापन झालेली कंपनी आहे व सदर कंपनीमध्ये सर्वसाधारण जनता/भागधारक यांचा पैसा गुंतविलेला असतो म्हणजेच कोणतीही खाजगी कंपनी तोटयात, त्यांचे प्रशासन चालवू शकत नाही. परंतु कमीत कमी कायद्याने निर्धारीत नफा मिळविण्याच्या उद्देशाने कंपन्या चालविल्या जातात. त्यामुळे सदर कंपन्या सध्याच्या गळेकापू (Cut Throat competition) स्थर्धेत टिकून राहण्यासाठी ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करुन खर्चात काटकसर/खर्च कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात व त्यात काही वावगेही नाही, व अशा परिस्थितीत ग्राहकांनी, सामनेवाले यांच्या कार्यालयातील ड्रॉप बॉक्समध्ये धनादेश टाकला व तो Insufficient Balance, Miss match of signature, difference in written amount and actual figure, wrong dates, Wrong Account No. Spelling mistake अशा अनेक इतर कारणामुळे धनादेशाचा अनादर होण्याची शक्यता असते. जर धनादेश अनादर झाल्यावर ग्राहक व कंपनी यांना अतिरिक्त खर्च व वेळेस सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये सामनेवाले कंपन्या हया धनादेश वटल्यानंतरच पोचपावती देण्याबाबत आग्रही असतात. अतएव, सदर दुसरा धनादेश तक्रारदारांनी जरी सामनवेाले यांच्या कार्यालयातील ड्रॉपबॉक्समध्ये टाकला होता, व तो गहाळ झालेला नव्हता परंतु Signature Miss matched म्हणून वटवला गेला नव्हता हे तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले आहे. तसेच तक्रारदाराकडे सामनेवाले क्रमांक 1 यानी वारंवार विचारणा/मागणी करुनही त्यांच्या खात्याच्या pass book च्या Xerox प्रती का पुरविल्या नाहीत हयाबाबतचे कारण तक्रारदारांना निश्चितच माहित असावे (Reasons are best known to them). अशा परिस्थितीमध्ये तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे सदर न वटलेल्या धनादेशाची मागणी करणे अयोग्य वाटते. सदर धनादेश तक्रारदारांनी जे. एस. बँकेमध्ये जाऊन स्वतः मिळवावयास हवा कारण तो तक्रारदारांनी इश्यू केलेला होता. त्यांनी त्या प्रित्यर्थची सेवाही सामनेवाले यांचेकडून अगोदर घेतलेली होती व अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक बाबतीत कोणतीही कंपनी अतिरिक्त कर्मचा-याची नियुक्ती करुन खर्च वाढवू इच्छित नाही म्हणून जरी कंपनीच्या ऑफीसातील ड्रॉप बॉक्स मध्ये धनादेश टाकल्यावर त्याची पोचपावती लगेचच कंपनीला देणे शक्य नाही, व सदर रकमेची पोचपावती तक्रारदारांनी सामनेवालेंकडून मागणी करणे मंचाच्या मते योग्य नाही. फक्त जर देयकाची रक्कम रोखीने भरणा केली असल्यास तक्रारदार (ग्राहक) पोचपावती मिळविण्यास पात्र आहेत.
18. तसेच मंच असेही नमूद करीत आहे की, ड्रॉप बॉक्सची सेवा सुविधा ही कोणताही मोबदला न घेता अतिरिक्त सुविधा म्हणून सामनेवाले यांनी तक्रारदारांना उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर प्रकरणातील तक्रारदार हे Post Paid Customer आहेत तर अशा ग्राहकांना दर महिन्यास देयक देण्यात येते. त्या देयकाचे मंचाने वाचन व निरिक्षण केले असता असे निदर्शनास येते की, देयकातील रकाने जसे Previous bill balance, payments Adjustment, This bill charges, Amount payable on, Amount payable after हे सर्व रकाने स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे धनादेश ड्रॉपबॉक्समध्ये टाकला असेल व तो सामनेवाले यांना मिळाला नाही व तो धनादेश वटविला गेलेला नाही अशा परिस्थितीत सामनेवाले यांना जबाबदार धरण्यात येऊ नये, व लेट फी परत करण्याचाही प्रश्न उद्भवू शकत नाही असे मंचाचे मत आहे. फक्त रोख रकमेचीच पावती देणे योग्य वाटते. तसेच त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांना रुपये 2822.00 चे अधिदान केल्यानंतर सामनेवाले क्रं. 2 यांनी दिनांक 25/09/2009 रोजी पावती क्रमांक 26788 नुसार रक्कम मिळाल्याची पोचपावती (Receipt) दिलेली आहे. अतएव सदर मंच मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांक 3 व 4
19. सामनेवाले क्रं. 1 यांना तक्रारदाराकडून वेळेत देयकाची रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारदाराकडून लेट फी वसूल करण्याचा सामनेवाले क्रं. 1 यांचा हक्क आहे हे निर्विवाद सत्य मंच नजरेआड करु शकत नाही. तसेच लेट फी वसूल करणे हा कराराची एक अट आहे हे मंच येथे स्पष्ट करीत आहे, त्यामुळे लेट फी परत मिळण्यास तक्रारदार पात्र नाहीत हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. तसेच सामनेवाले क्रं. 1 यांनी तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली. अथवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली आहे हे तक्रारदार सिध्द करु शकले नाही. पुन्हा मंच हे ही स्पष्ट करीत आहे की की, ड्रॉप बॉक्सची सेवा/सुविधा ही अतिरिक्त, विनामूल्य सेवा सामनेवाले यांनी तक्रारदारांना पुरविलेली आहे. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांना लेट फीची रक्कम परत करणे, व दोषपूर्ण सेवा दिली अथवा सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली आहे हे शाबीत करण्यास तक्रारदारांना अपयश आले आहे म्हणून लेट फीचा परतावा नुकसानभरपाई व तक्रार खर्च सामनेवाले क्रं. 1 यांनी तक्रारदारांना देणे उचित व योग्य होणार नाही अथवा तक्रारदारांनी सामनेवाले क्रं. 1 व 2 यांच्या कार्यालयात जाऊन देयकाचा रोखीने भरणा करणे इष्ट ठरते अथवा ECS अथवा Dr Cr Credit Card चा पर्याय स्विकारणे आवश्यक होते असे मंचाचे स्पष्ट मत आहे. अतिरिक्त विनामूल्य सेवेबाबत सामनेवाले क्रं. 1 यांना जबाबदार धरणे योग्य नाही तसेच देयकातील Credit Limit रुपये 3500/- च्या बाबतीत तक्रारदारांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. अतएव सदर मंच मुद्दा क्रमांक 3 व 4 चे उत्तर नकारार्थी देत आहे.
20. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत व मागणीत असे निवेदन केले आहे की, सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांचेसह सर्व टेलीकॉम कंपन्यांना मंचाने असे आदेश द्यावेत की तक्रारदारांनी ड्रॉप बॉक्समध्ये अथवा सामनेवाले क्रं. 1 व 2 यांच्या कार्यालयात व गॅलरीमध्ये धनादेशाद्वारे रक्कम अदा केल्यास त्याची पोच पावती सर्व तक्रारदारांना/ग्राहकांना देण्यात यावी असे मंचाने निर्देश द्यावे. परंतु मंच येथे स्पष्टपणे नमूद करीत आहे की, कोणताही मोबदला न घेता सामनेवाले यांनी तक्रारदारांना/ग्राहकांना ड्रॉप बॉक्सची अतिरिक्त सेवा सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. सामनेवाले हे फक्त गॅलरीतील काऊंटरवर रोख रक्कम स्विकारल्यावरच पोचपावती देतात कारण धनादेश वटल्यानंतरच पावती देणे व्यावहारीक दृष्टीकोनातून योग्य वाटते असे मंचाचे मत आहे. तसेच धनादेशाचा काही कारणास्तव अनादर झाल्यास त्याबाबत परत ग्राहकाकडून रक्कम वसूलीसाठी खर्च वाढून सामनेवाले यांच्या खर्चात वाढ होणे अपेक्षित असल्यामुळे हे गृहीत धरुनच सामनेवाले हे काऊंटरवर धनादेश स्विकारत नाही त्यामुळे पोचपावतीचा प्रश्नच निर्माण होत नाही हे ही मंच येथे नमूद करीत आहे. तसेच सदर तक्रार ही वैयक्तिक स्वरुपाची तक्रार असून फक्त एकाच संस्थेविरुध्द दाखल केलेली आहे अनेक तक्रारदार (ग्राहक) एकत्र येऊन संयुक्तिक तक्रार सामनेवाले यांचेविरुध्द दाखल केलेली नाही त्यामुळे सदरील मंच सामनेवाले क्रं. 1 व 2 सह इतर टेलीकॉम कंपनीलाही आदेश देऊ शकत नाही ते योग्य व संयुक्तिक होणार नाही. थोडक्यात सदर अनेक ग्राहकांच्या वतीने दाखल केलेली नाही म्हणून तक्रारदारांची मागणी मान्य करता येण्याजोगी नाही. अतएव सदर मंच मुद्दा क्रमांक 5त चे उत्तर नकारार्थी देत आहे.
21. वरिल चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रार क्रमांक 497/2010 फेटाळण्यात येते.
2) उभयपक्षांनी आपापला खर्च सोसायचा आहे.
3) आदेशाच्या प्रमाणित प्रती उभयपक्षांना विनामूल्य पाठविण्यात यावी.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 07/03/2015.