निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* आदेश तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- 1. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांकडे क्रमांक 9867362740 व क्रमांक 9892206980 असे दोन भ्रमणध्वनी संच होते. त्यापैकी भ्रमणध्वनी संच क्रमांक 9867362740 हा प्रिपेड होता. तर दुसरा क्र. 9892206980 या हा भ्रमणध्वनी संच पोस्टपेड होता. 2. तक्रारदारांची सा.वाले यांचे विरुध्द खालील प्रमाणे तक्रारी आहेत. 1. तक्रारदारांच्या नांवे नसलेली/कधीही न वापरलेल्या भ्रमणध्वनीसंच क्र.9987696485 या भ्रमणध्वनी संचाच्या वापराबद्दलचे बिल रु.9,574.06 सा.वाले यांनी दिनांक 5.01.2010 रोजी पाठविले. व त्याबद्दल सततची मागणी करु लागले. 2. तसेच तक्रारदारांची भूमणध्वनी संच क्र. 9892206980 यावर इंटरनेट वापरलेले नसतांनासुध्दा त्यावर इंटरनेटच्या वापराची आकारणी करुन बिले पाठविले. दि.13.01.2010 रोजी रु.14,035.09 व दि.3.2.2010 रोजी रु.13,735.09 रुपयाची बिले पाठविली व त्यानुसार मागणी केली. <!--[if !supportLists]-->3. <!--[endif]-->भ्रमणध्वनी संच क्र. 9867362740 याचे खात्यावर रु.300/- <!--[if !supportLists]-->3.<!--[endif]-->शिल्लक असताना सा.वाले यांनी हा भ्रमणध्वनी संच बंद केला. <!--[if !supportLists]-->4. <!--[endif]-->9892206980 या भ्रमणध्वनी संचाचे क्रेडीट लिमिट रु.1200/- असताना सा.वाले यांनी तक्रारदारांचे संमतीशिवाय <!--[if !supportLists]-->4.<!--[endif]-->त्याचे क्रेडीट लिमिट 5,900/- पर्यत केले. 3. यामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला म्हणून तक्रारदार यांनी या ग्राहक मंचापुढे तक्रार नोंदऊन खालील प्रमाणे मागण्या केल्या. अ) सा.वाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना बिलाची वारंवार मागणी केल्याने, त्यांचे घरी वारंवार फोन करीत असल्याने,खोटे बिले पाठविल्यामुळे व तसेच मागणीसाठी वसुलीसाठी एजंट लोकांना घरी पाठवून धमकी दिल्यामुळे, व त्यांचा फोन बंद केल्यामुळे तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासामुळे नुकसान भरपाई म्हणून सा.वाले क्र.1 व 2 यांनी रु.4,99,999/- इतकी रक्कम 18 टक्के व्याज दराने व्याजासह परत करावी. 4. तक्रारदाराने तक्रार अर्ज, शपथपत्र, व अनुषंगीक कागदपत्रे मंचासमोर दाखल केली आहेत. 5. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर दाखल करावे अशी नोटीस मंचाकडून पाठविण्यात आली. सा.वाले क्र.1 व 2 यांना नोटीस मिळूनही सा.वाले क्र.1 व 2 हजर राहीले नाहीत व तक्रार अर्जास उत्तर दाखल केले नाही. म्हणून दि.29.12.2010 रोजी सा.वाले यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला होता व त्याच दिवशी युक्तीवाद ऐकुन प्रकरण निकालासाठी राखुन ठेवले होते. दिनांक 19.01.2011 रोजी सा.वाले मंचासमोर हजर होऊन त्यांनी प्रकरण बोर्डावर घेण्याचा अर्ज व एकतर्फा आदेश रदद करुन कैफियत स्विकारण्याचा अर्ज केला. त्यानंतर प्रकरण दि.17.02.2011 रोजी ठेवण्यात आले. दिनांक 17.02.2011 रोजी सा.वाले यांचे विरुध्द एकतर्फा आदेश आधीच देण्यात आल्यामुळे सा.वाले कैफियत स्विकारली नाही व प्रकरण आदेशासाठी राखुन ठेवले. 6. तक्रारदारांचा तक्रार अर्ज व अनुषंगीक कागदपत्रांची पडताळणी करुन पाहिली असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तर | 1. | तक्रारदार सा.वाले यांच्या सेवेतील कमतरता सिध्द करतात काय ? | होय. | 2. | तक्रारदार सा.वाले यांचेकडून रु.4,99,999/- झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 18 टक्के व्याज दराने व्याजासह नुकसान भरपाई मागू शकतात काय ? | होय. रु.15,000/- फक्त सा.वाले क्र.1 व 2 यांचेकडून मागू शकतात. | 3. | आदेश ? | आदेशा प्रमाणे. |
कारण मिमांसा 7. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांकडे क्रमांक 9867362740 व क्रमांक 9892206980 असे दोन भ्रमणध्वनी संच होते. त्यापैकी भ्रमणध्वनी संच क्रमांक 9867362740 हा प्रिपेड होता. तर दुसरा क्र. 9892206980 या हा भ्रमणध्वनी संच पोस्टपेड होता. 8. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या परिच्छेद 2 मध्ये अशी तक्रार केली आहे की, सा.वाले यांनी दि.5.1.2010 रोजी तक्रारदारांकडून भ्रमणध्वनीसंच क्रमांक 9987696485 या क्रमांकाच्या भ्रमणध्वनीबाबतच्या बिलाच्या देय रक्कमेची मागणी केली. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, भ्रमणध्वनी क्र. 9987696485 हया क्रमांकाचा भ्रमणध्वनीसंच त्यांच्या मालकीचा नाही किंवा कधीही त्यांनी तो वापरलेला नाही. त्यांनी त्यांचे मालकीच्या नसलेल्या/वापरलेल्या नसलेल्या भ्रमणध्वनी संचाचे वापराबद्दल सा.वाले यांनी बिल पाठविले व बिलाच्या देय रक्कमेची वारंवार मागणी करत राहीले. यावर सा.वाले यांचेकडून तक्रारदारांचे म्हणणे खोडले गेले नाही. तक्रारदाराने 5.1.2010 चे पत्र अर्जासोबत पृष्ट क्र.48 वर दाखल केले आहे. यावरुन तक्रारदारांचे म्हणणे सा.वाले यांनी तक्रारदारांचे नांवे नसलेल्या भ्रमणध्वनी संचाच्या वापराच्या बिलाची मागणी केली यात तथ्य असल्याचे दिसून येते. 9. तक्रारदार तक्रार अर्जाच्या परिच्छेद क्र.3,4,6 व 7 मध्ये असे म्हणतात की, सा.वाले यांनी तक्रारदारांना पाठविलेल्या बिलात इंटरनेट वापराबद्दल आकारणी लावलेली आहे. परंतु तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी कधीही इंटरनेट वापरलेले नाही. सा.वाले यांनी पाठविलेले बिल हे खोटे आहे. दि.12.12.2009 व दि.13.1.2010 रोजी बिलाच्या देय रक्कमेची मागणी केली. व शेवटी तक्रारदारांचा भ्रमणध्वनीसंच क्र. 9892206980 हा बंद केला. यावर तक्रारदारांनी सा.वाले यांचेशी ई-मेल वर सतत संपर्क साधले व कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु सा.वाले यांचेकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही व नोटीसीस उत्तरही मिळालेले नाही. याउलट सा.वाले हे वारंवार बिलाच्या देय रक्कमेची मागणी करु लागले व फौजदारी कार्यवाही करणार असल्याबद्दल धमकी देत राहीले. वेळी अवेळी तक्रारदारांच्या घरी धमकीचे फोन करीत राहीले. हे ही म्हणणे सा.वाले यांनी हजर राहून खोडले नाही. तसेच तक्रारदार यांनी क्र. 9892206980 या भ्रमणध्वनी संचाचे ऑक्टोबर, ते जानेवारी पर्यतची बिलं त्यांनी तक्रार अर्जासोबत जोडलेली आहेत. त्याचे बारकाईने निरीक्षण केले असता नोव्हेंबर व डिसेंबरच्या बिलामध्ये इंटरनेटचा वापर (जीपीआरएस) सातंत्याने केलेला दिसून येतो. व तसेच डयुरेशन व्हाल्युममध्येपण खुप सारखेपणा आहे. कुणीही रात्रंदिवस नेटवरुन मोबाईलचा वापर करीत असेल हे पटण्यासारखे नाही. नोव्हेंबर, 2009 चे बिल व डिसेंबर 2009 चे बिल यामधील नेट वापराचे सातंत्य व डयुरेशन व्हाल्युममधील सारखेपणा यावरुन ही बिल संशयास्पद वाटतात. सा.वाले यांची बिलींग सिस्टीम जरी इलेट्रॉनिक असेल तरी त्यात बिघाड असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा चुकीच्या पध्दतीने आकारणी केली असेल हीही शक्यता नाकारता येत नाही. 10. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, भ्रमणध्वनी क्र. 9867362740 यामध्ये रु.300/- शिल्लक असताना तो सा.वाले यांनी बंद केला. याबद्दल तक्रारदारांनी कोणताही पुरावा दाखल केला नाही. म्हणून तक्रारदारांचे हे म्हणणे ग्राहय धरता येत नाही. 11. तक्रारदारांची अशीही तक्रार आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांच्या भ्रमणध्वनी क्र. 9892206980 क्रेडीट लिमिट रु.1200/- असताना रु.5,900/- तक्रारदारांच्या संमतीशिवाय वाढविली. बिलाची पडताळणी केली असता बिलावर क्रेडीट लिमिटच्या कॉलममध्ये क्रेडीट लिमिट Dynamic in nature असे लिहिले आहे. त्यामुळे तक्रारदारांचे म्हणणे ग्राहय धरता येत नाही. 12. वरील विवेचनावरुन तक्रारदारांना त्यांच्या मालकीचा नसलेला/वापर केलेला नसलेला भ्रमणध्वनी संच क्र.9987696485 याच्या वापराबद्दची मागणी तक्रारदाराकडून केली. तसेच इंटरनेटच्या वापराबद्दलची संशयास्पद बिलं पाठविली व त्याबद्लची मागणी केली. यात सा.वाले यांच्या सेवेतील कमतरता दिसून येते. येवढेच नाहीतर मागणीसाठी सा.वाले यांनी तक्रारदारांचेकडे वसुली एजंट/रिकव्हरी एजंट पाठविले. तक्रारदारांना सा.वाले यांचेकडून सतत धमकीचे फोन येऊ लागले याबद्दल तक्रारदारांना मानसिक त्रास होणे सहाजिकच आहे. तक्रारदाराने मानसिक त्रासाबद्दल रु.4,99,999/- 18 टक्के व्याजदराने व्याजासह नुकसान भरपाई म्हणून मागीतले आहेत. परंतू तक्रारदारांनी मागीतलेली मागणी ही अवास्तव वाटते. केवळ सा.वाले यांचेविरुध्द एकतर्फा सुनावणी झालेली आहे म्हणून येवढया मागणीची रक्कम मान्य करणे हे योग्य होणार नाही. सा.वाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.15,000/- देणे न्यायिकदृष्टया योग्य राहील असे मंचास वाटते. 13. वरील विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 166/2010 अंशतः मान्य करण्यात येते. 2. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना रु.15,000/-मानसिक त्रासामुळे झालेले नुकसान भरपाई म्हणून द्यावे. 3. वरील आदेशाची पुर्तता सामनेवाले क्र.1 व 2 यांनी आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासुन 6 आठवडयाचे आत करावयाची आहे, अन्यथा विलंबापोटी रु.500/- दंडात्मक रक्कम प्रतिमास सा.वाले यांनी तक्रारदार यांना द्यावी.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |