ग्राहक तक्रार निवारण मंच, मुंबई उपनगर जिल्हा यांचेसमोर
प्रशासकिय इमारत, तिसरा मजला, चेतना कॉलेजजवळ,
बांद्रा-पूर्व, मुंबई-400 051.
तक्रार क्र.ग्रातनिमं/मुंउजि/390/2015
आदेश दिनांकः-23/12/2015
भारतीय सौर 2 पौष,1937 शके
श्री.प्रदीप क्रिष्णधन बनीक
पत्ता-रहिवाशी संघ, एस.व्ही.रोड,
शांतीधारा बिल्डींग,
बोरीवली,(पु),मुंबई-400066 .......तक्रारदार
विरुध्द
मे.भारती एअरटेल लिमीटेड,
1.अनुषा सिंग (स्टोअर मॅनेजर),
2.अरविंद मांडा (मॅनेजर),
पत्ता-7 वा माळा, बिल्डींग नं.7,
माइंडस्पेस, मालाड (प) मुंबर्इ-400064 .......सामनेवाले.
मंचः- श्री.एम.वाय. मानकर, अध्यक्ष श्री.एस.आर.सानप, सदस्य.
तक्रारदाराकरीता ः स्वतः
सामनेवाले ः
आदेश- श्री.एम.वाय.मानकर, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
तक्रार दाखल कामी आदेश
तक्रारदारांना तक्रार दाखल कामी ऐकण्यात आले.
2. तक्रार व सोबत दाखल केलेली कागदपत्रे पाहण्यात आली.
3. तक्रारदार हे आधी युनिनॉर गॅलेरी चालवत होते. परंतु त्यानंतर माहे फेब्रुवारी, 2013 मध्ये ती गॅलेरी बंद करुन एअरटेल ची गॅलेरी सुरु करण्याचे निश्चीत केले व त्याप्रमाणे त्यांनी सामनेवाले यांच्याकडे प्रक्रियेचा एक भाग म्हणून रु.25,000/- जमा केले व काही कागदपत्रांची पुर्तता केली. परंतु मार्च 2013 मध्ये त्यांचा अपघात झाल्यामुळे ते अंदाजे चार महिने धंदा करु शकले नाही. त्यांच्या गैरहजेरी मध्ये त्यांची मुलगी दुकान चालवत होती. परंतु सामनेवाले यांनी दिलेले टारगेट पुर्ण न झाल्यामुळे सामनेवाले यांनी त्यानी राजीनामा देण्यासाठी सांगितले व काही अंतरावरच एअरटेलची दुसरी गॅलेरी चालू करण्यात आली. तक्रारदारांनी कंपनीशी पत्र व्यवहार केला व त्यांना भरलेले पैसे त्यांनी परत करावे अशी विनंती केली. परंतु सामनेवाले यांनी काही प्रतिसाद दिला नाही. सबब, ही तक्रार दाखल करुन तक्रारदारांनी रु.85,000/- व मानसिक, शारिरीक त्रासाकरिता नुकसान भरपाईची मागणी केली होती.
4. तक्रारदार यांनी त्यानी सामनेवाले यांना पाठवलेल्या पत्राची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये त्यानी सामनेवाले यांच्या सोबत पुढे काम करायचे नाही असे स्पष्ट केले आहे. त्यावरुन असे म्हणता येईल की, उभयपक्षातील करार संपुष्टात आला आहे. तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये फक्त रक्कमेबाबत मागणी केलेली आहे. तक्रारदारांनी सेवेबद्दल कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे ही तक्रार एक प्रकारे “मनी सुट” आहे असे म्हणता येईल. ग्राहकमंचाने मनी सुट चालवावा हे अपेक्षीत नाही व ते योग्य सुध्दा होणार नाही. सबब,खालील प्रमाणेः-
आदेश
1. तक्रार क्र. 390/2015 ही ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 12 (3) प्रमाणे फेटाळण्यात येते.
2. खर्चा बाबत आदेश नाही.
3. अतिरिक्त संच तक्रारदाराना परत करण्यात यावेत.
4. या आदेशाची प्रत उभयपक्षाना विनामुल्य पाठवावी/देण्यात यावी.
5. तक्रारदार योग्य त्या मा.दिवाणी न्यायालयात दावा दाखल करु शकतात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 23/12/2015
db/-