निकालपत्र :- (दि.15/09/2010) (सौ. वर्षा एन.शिंदे,सदस्या.) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊन ते वकीलांमार्फत मे.मंचासमोर हजर होऊन लेखी म्हणणे कामात दाखल केले आहे. तक्रारदाराच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सामनेवाला गैरहजर. प्रस्तुतची तक्रार सामनेवाला कंपनीने बीलामध्ये बेकायदेशीरपणे जादा आकारणी केलेने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार हे इचलकरंजी येथील रहिवाशी असून ते वकीली व्यवसाय करतात. सामनेवाला हे कंपनी कायदयाप्रमाणे स्थापन केलेली टेलिकम्युनिकेशन कंपनी आहे. तक्रारदाराने सामनेवालांकडून पोस्टपेड सेलफोन सेवा सामनेवालांच्या इचलकरंजी शाखेतून घेतलेली होती. त्याचा खाते क्र.112100097198 असा आहे. तर सेल फोन नं.9890171270 आहे. त्याचप्रमाणे आपले कुटूंबाकरिता श्री ओमप्रकाश जैन या कुटूंबातील व्यक्तीचे नांवे अॅड ऑन पोस्टपेड सेल फोन सर्व्हीस ही जादाची सेवा घेतलेली होती. त्याचा अकौन्ट नं.112-101046141 असा असून सेल फोन नं.9960641270 असा आहे. तक्रारदाराने त्यांचे प्राथमिक सेल फोन नंबर वर Local A2M @0.30p@Rs.85-MH हा प्लॅन घेतलेला होता. परंतु सदरचा प्लॅन दि.20/09/2007 रोजी तक्रारदाराने खंडीत केला व तशी नोंद सामनेवालांच्या इचलकरंजी येथील कार्यालयामध्ये सर्व्हीस रजिस्टरमध्ये केलेली आहे. असे असतानाही सामनेवाला यांनी बेसीक चार्जपेक्षा जादाचा चार्ज आकारलेला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे. Sr.No. | Bill | Date | Plan rate | Tax | 1 | 659260457 | 06/09/2007 | Rs.54.84 | Rs.6.78 | 2 | 67055715 | 06/10/2007 | Rs.85.00 | Rs.10.51 | 3 | 683363172 | 06/11/2007 | Rs.38.39 | Rs.4.75 | | Total Rs. | Rs.178.23 | Rs.22.04 | Grand Total | Rs.200.27 |
वर नमुद आकारलेली रक्कम ही बेकायदेशीरपणे आकारलेली आहे. तसेच दोनदा टॅक्सची आकारणी केलेली आहे. तसेच नमुद प्लॅनसेवा खंडीत केली असतानाही आकारणी केलेली आहे. याबाबत सामनेवाला यांचे अधिकृत प्रतिनीधी पल्लवी मोरे, पुणे यांचेशी दि.05/10/2007 रोजी व सुमीत चौधरी मुंबई यांचेशी दि.25/10/2007 रोजी विचारणा केली. त्यांनी याची दखल घेतली नाही. तदनंतर सामनेवालांनी दि.05/11/2007 रोजी दोन्ही मोबाईलवरील सेवा खंडीत केली. त्यामुळे तक्रारदारास त्याच्या क्लायंटशी संवाद साधता आला नाही. हे त्यांच्या वकीली व्यवसायाचे दृष्टीने महत्वाचे होते. सामनेवालांच्या या कृत्यामुळे सदरचे बेकायदेशीर चार्जेस तक्रारदारास भरणे भाग पडले व तदनंतरच सेवा दि.06/11/2007 रोजी सुरु केली. तदनंतर सामनेवालांच्या चुक लक्षात आलेबरोबर प्रायमरी सेलवर रक्कम रु.138.84 तक्रारदाराचे खातेस क्रेडीट केलेबाबतचा तसेच ऑड नंबरवर तक्रारदारचे खातेस रक्कम रु.20.16 क्रेडीट केलेचा मेसेज आला. मात्र सामनेवालांनी सदरची रक्कम त्यात्या खातेस क्रेडीट केली नाही. त्याबबात दि.29/02/2008 रोजी सामनेवालांना नोटीस पाठवली. सदरची नोटीस सामनेवालांना मिळालेली आहे. तरीही त्यांनी त्याबाबत कोणतेही पाऊल उचलेले नाही. सामनेवालांच्या या बेजबाबदार व बेकायदेशीर कृत्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास भोगावा लागलेला आहे. तसेच बेकायदेशीर चार्जेस अदा करावे लागलेमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन सामनेवालांना तक्रारदारास बेकायदेशीरपणे आकारणी केलेली रक्कम रु.200.27तसेच नोटीसचा खर्च रु.250/-मानसिक त्रास व व्यावसायिक नुकसानीपोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदाराने सामनेवाला यांची तीन बील व रक्कम भरलेची पावती, नोटीस, पोष्टाची पावती व पोहोच पावती इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. (4) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारीतील कथने व आरोप चुकीची, खोटी लबाडीची आहेत. सबब सामनेवाला त्याचा इन्कार करतात. प्रस्तुतची तक्रार तक्रारदार सामनेवालांकडून रक्कम उकळण्याच्या हेतूने दाखल केलेली आहे. तसेच प्रस्तुतची तक्रार चालविणेचे अधिकार सदर मंचास येत नाही. कलम 1 मधील मजकूर खोटा व चुकीचा आहे. कलम 2 मधील मजकूर बरोबर आहे. कलम 3 मधील मजकूर सामनेवालांना त्याचे ज्ञान नसलेने मान्य नाही. कलम 4 मधील मजकूर मे.मंचाची दिशाभूल करणारा आहे. तक्रारदार कधीही सामनेवाला यांना भेटलेला नाही अथवा प्रस्तुतचा प्लॅन कधीही रद्द केलेला नाही. तसेच सामनेवालांकडून कसल्याही प्रकारचे सर्व्हीस रजिस्टर ठेवलेले नाही. सामनेवाला यांच्या कस्टमर सर्व्हीस नंबर 121 टोल फ्री असून त्यावर कधीही तक्रारदाराने तक्रार नोंदवलेली नाही. अथवा कोणत्याही प्रकारची विनंती केलेली नाही. तक्रारीतील नमुद प्लॅन खंडीत करणेबाबत सामनेवाला यांना कधीही विनंती केलेली नाही. तक्रारदाराने मागणी केलेल्या रक्कम सामनेवाला यांना मान्य व कबूल नाहीत. दिलेली बीले ही योग्य आहेत. तसेच तक्रारदारास वादातील बीलाबाबतच्या रक्कमांचे समायोजन/सुट करुन दिलेली आहे. सदरच्या रक्कमा हया बील दि.6,सप्टेंबर-07, 6 ऑक्टो-07 व 6 नोव्हें-07 अनुक्रमे रक्कम रु.74.86, 56.71 आणि 14 प्रमाणे समायोजीत केलेल्या आहेत. तसेच इन्व्हाईस नंबर 635517986 दि.06/07/2007, 647693811 दि.06/08/2007 व 695364043 दि.03/12/2007 रोजी अनुक्रमे रक्कम रु.25, 20.97 व 50 प्रमाणे सोडून दिलेल्या म्हणजेच वेव्ह केलेल्या आहेत. सदर रक्कमा वेव्ह करुन देऊन सुध्दा तक्रारदाराने बेकायदेशीरपणे प्रस्तुत रक्कमांची केलेली मागणी मान्य करता येणार नाही. तक्रारदाराने वादातील बीलापासून 30 दिवसांचे आत सामनेवालांच्या रिलेशनसेंटरकडे विचारणा करावयास हवी होती ती केलेली नाही. तसेच तक्रारदाराचे एसएमएस चे ओव्हरडयु रक्कम रु.167/- देणेबाबत दि.29/10/2007 रोजी कॉल व्दारे स्मरण केलेले होते. प्रस्तुतची रक्कम ही दि.06/10/2007 ची असून ती दिलेली नाही. तसेच प्रस्तुतची सेवा ही तक्रारदाराने वाणिज्य हेतुने घेतलेची तक्रारीत मान्य केले आहे. तक्रारदारने कलम 6 व 7 मध्ये नमुद केलेप्रमाणे सामनेवालांच्या प्रतिनिधी तक्रारदाराने कधीही बोलणी केलेली नाहीत. कलम 9 मध्ये प्रस्तुत रक्कम क्रेडीट करणेबाबत मेसेज दिलेला होता हे मान्य व कबूल नाही. सामनेवालांनी त्यांच्या कस्टमर यांना पाठवण्याचे एसएमएस तपासणी केली आहे. परंतु असा कोणताही मेसेज तक्रारदारास पाठविलेला नाही. प्रस्तुतची तक्रार निव्वळ सामनेवालांकडून रक्कम उकळण्याचे दृष्टीने दाखल केली असलेने खर्चासह नामंजूर करणेत यावी तसेच तक्रारदारास रक्कम रु.50,000/- दंड ठोठवावा व सामनेवाला यांना रक्कम रु.10,000/- तक्रारदाराकडून देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केलेली आहे. (5) सामनेवालांनी आपल्या म्हणणे शपथपत्रासह दाखल केलेले आहे. अन्य कोणतेही कागदपत्र दाखल केलेली नाहीत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व तक्रारदारचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवा त्रुटी केली आहे काय? --- नाही. 2. काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने आपल्या तक्रारीत सामनेवालांकडून पोस्टपेड सेलफोन सेवा सामनेवालांच्या इचलकरंजी शाखेतून घेतलेली होती. त्याचा खाते क्र.112100097198 असा आहे.तर सेल फोन नं.9890171270 आहे. त्याचप्रमाणे आपले कुटूंबाकरिता श्री ओमप्रकाश जैन या कुटूंबातील व्यक्तीचे नांवे अॅड ऑन पोस्टपेड सेल फोन सर्व्हीस ही जादाची सेवा घेतलेली होती. त्याचा अकौन्ट नं.112-101046141 असा असून सेल फोन नं.9960641270 असा आहे. तक्रारदाराने त्यांचे प्राथमिक सेल फोन नंबर वर Local A2M @0.30p@Rs.85-MH हा प्लॅन घेतलेला होता. परंतु सदरचा प्लॅन दि.20/09/2007रोजी तक्रारदाराने खंडीत केला व तशी नोंद सामनेवालांच्या इचलकरंजी येथील कार्यालयामध्ये सर्व्हीस रजिस्टर मध्ये केलेली आहे याबाबतचा कोणताही लेखी पुरावा प्रसतुत कामी दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदाराने फोनवरुन अथवा लेखी अर्जाव्दारे सदर प्लॅनची सेवा खंडीत करणेबाबत सामनेवाला यांना कळवलेबाबतचा कोणताही लेखी पुरावा दिसून येत नाही. तसेच तक्रारदाराने तक्रारीत नमुद केलेले जादाची आकारणी त्यांचे खातेस क्रेडीट केलेचा मेसेज सामनेवाला यांनी नाकारलेला आहे. बीलाबाबत काही वाद असलेस सामनेवाला यांचे रिलेशन सेंटरकडून सदर वादाचे निराकरण केले जाते. त्याप्रमाणे तक्रारदाराने वाद केलेल्या बील दि.6,सप्टेंबर-07, 6 ऑक्टो-07 व 6 नोव्हें-07 अनुक्रमे रक्कम रु.74.86, 56.71 आणि 14 प्रमाणे समायोजीत केलेल्या आहेत. तसेच इन्व्हाईस नंबर 635517986 दि.06/07/2007, 647693811 दि.06/08/2007 व 695364043 दि.03/12/2007 रोजी अनुक्रमे रक्कम रु.25, 20.97 व 50 प्रमाणे सोडून दिलेल्या म्हणजेच वेव्ह केलेल्या आहेत.याचा विचार करता तक्रारदाराने कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय सामनेवाला यांनी बेकायदेशीरपणे जादा रक्कमेची आकारणी केलेबाबतची बाब तक्रारदार सिध्द करु शकलेला नाही. तक्रारदाराने दि.29/02/2008 रोजी नोटीस पाठवलेली आहे. तर वादातील बीले ही सप्टेंबर-07, ऑक्टो-07 व नोव्हें-07 मधील आहेत व सदर बीलाबाबतचे वादाचे सामनेवाला यांनी वर नमुद कृतीव्दारे निराकरण केलेचे दिसून येते. सबब सामनेवाला यांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवली नसलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी ठेवली नसलेने हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. 2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |