Maharashtra

Chandrapur

CC/18/149

Chandra Raj Pandey - Complainant(s)

Versus

Bhartat Sanchar Nigam Limited through the Account officer - Opp.Party(s)

Adv. Pandey

10 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/149
( Date of Filing : 26 Sep 2018 )
 
1. Chandra Raj Pandey
Mudhuraj Priti Sungam Colony Opp Chavan Colony Vivekanand marg Chandrpur
chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bhartat Sanchar Nigam Limited through the Account officer
At the officer pf BSNL Chandrpur Tah Chandrapur
chandrapur
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 10 Feb 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

(मंचाचे निर्णयान्‍वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्‍या)

(पारित दिनांक :- १०/०२/२०२२)

तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अंतर्गत विरुद्ध पक्ष सदर तक्रार दाखल केलेली आहे
१.   तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांच्याकडून दूरध्वनीची सेवा घेतली असून दूरध्वनी क्रमांक २५२२३७  हा होता. परंतु सदर दूरध्वनी ला मागील चार-पाच महिन्यांपासून डायल टोन नसल्यामुळे तो फोन काम करीत नव्हता . तक्रारदाराने त्याबद्दल तोंडी तक्रार विरुद्ध पक्ष यांच्याकडे दिली परंतु विरुद्ध पक्ष यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व तक्रारीचे निराकरण केले नाही. त्याउलट विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्याला त्या कालावधीचे बिल पाठवले ज्या कालावधीत तक्रार कर्त्याने वादातील टेलिफोन वापरला नव्हता. त्यांनी तक्रारीत पुढे असं नमूद केले की बंद झालेला टेलिफोन चालू करण्याऐवजी विरुद्ध पक्ष यांनी बंद कालावधीतले   बिल तक्रारकर्त्याला पाठवले, ही बाब तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्यूनता आहे तोंडी तक्रार करूनही काही उपयोग न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने  दिनांक 25 .6 .2018 रोजी कायदेशीर नोटीस विरुद्ध पक्षाला पाठविला, परंतु नोटीस चे  काहीही उत्तर विरुद्ध पक्ष यांनी दिले नाही, उलट १२७०/- रुपयाचे बिल विरुद्ध पक्ष यांनी तक्रार कर्त्याला पाठवून ते २७.०८.२०१८  पर्यंत भरायला सांगितले. तक्रार कर्त्याला बंद फोनचे बिल पाठवण्याची विरुद्ध पक्षाची तक्रारकर्त्याप्रती सेवेतील न्यूनता असल्यामुळे सदरची तक्रार आयोगासमोर दाखल केलेली आहे
२.   तक्रारकर्ता यांची तक्रार स्वीकृत करून विरुद्ध पक्ष यांना नोटीस काढण्यात आले.
३.   विरुद्ध पक्ष यांनी सदर प्रकरणात उपस्थित होऊन सुद्धा त्यांचे लेखी उत्तर दाखल न केल्यामुळे प्रकरण विरुद्ध पक्ष यांच्या लेखी उत्तरात शिवाय पुढे चालवण्याचे आदेश दिनांक १८.०४.२०१९  रोजी करण्यात आले 

  

4.   तक्रारकर्ता  ह्यांचे तक्रारीतील कथन ,दस्त ऐवज या अनुषंगाने केलेल्‍या युक्‍तीवादावरून आयोगाच्‍या निर्णयास्‍तव कारणे व निष्‍कर्ष खालीलप्रमाणे आहेतः-                         

                      कारणमीमांसा

5.    तक्रारकर्ता यांनी विरुद्ध पक्ष भारत संचार निगम कडून दूरध्वनीची सेवा घेतली आहे ही बाब तक्रारी दाखल निशाणी क्रमांक ४ दस्त क्रमांक १ करून सिद्ध होत आहे, तक्रारकर्ता हे विरुद्ध पक्ष यांचे ग्राहक आहे. सदर प्रकरणातील तक्रार कर्ता यांचा दूरध्वनी चार पाच महिन्यापासून बंद असल्यामुळे त्यांनी त्याबद्दल तक्रार तोंडी विरुद्ध पक्ष यांच्याकडे केली परंतु त्यानंतर त्यांचा दूरध्वनी चालू न झाल्यामुळे त्यांनी २५.०६.२०१८ रोजी विरुद्ध पक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठवली, त्या नोटीसचे वाचन केले असता त्यात विरुद्ध पक्ष यांनी दूरध्वनी चा डायलटोन चालू करण्यास विनंती केली, परंतु त्यानंतरही विरुद्ध पक्ष यांनी तक्रार करण्याचा दूरध्वनी ला डायलटोन चालू केला नाही याउलट विरुद्ध पक्ष यांनी  तक्रार कर्त्याला  दिनांक 4.०८.२०१८ रोजी चे १२७०/- रुपयांचे बिल पाठवून सदर बिल दिनांक २७.०८.२०१८  च्या आधी भरण्यास सांगितले दूरध्वनी सेवा बंद असताना तक्रारकर्त्याला बिल पाठवणे तसेच दूरध्वनी सेवेबद्दल केलेल्या तक्रारीचे निवारण न करणे ही विरुद्ध पक्ष यांची तक्रारकर्त्याप्रती असलेली सेवेत न्यूनता आहे असे आयोगाचे मत आहे,तसेच आयोगात तक्रार दाखल झाल्यानंतरही तक्रारीत उपस्थित राहून पुरेशी संधी देऊनही विरुद्ध पक्ष ह्यांनी त्यांचे उत्तर दाखल  करून तक्रारकर्त्याच्या तक्राररीतील मुद्दे खोडून त्यांचे त्यावर त्यांचे काय म्हणणे आहे हे नमूद केलेले नाही.
आयोगाच्या मते विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्ता प्रती सेवेय न्यूनता दिली आहे हि बाब सिद्ध होत असल्यामुळे   आयोग खालील आदेश पारित करीत आहे. 

 

अंतिम आदेश

  1. तक्रार क्रमांक सी.सी.१४९/१८ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुद्ध पक्ष ह्यांनी तक्रार कर्त्याला दि.४.०८.२०१८ रोजी पाठविलेले बिल रद्द करण्यात येत आहे.
  3. विरुद्ध पक्ष ह्यांनी तक्रारकर्त्याचा दूरध्वनी चालू करून द्यावा
  4. विरुद्ध पक्ष तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारखर्चापोटी रक्कम रु १०००/- तक्रारकर्त्याला द्यावेत.  
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.