Maharashtra

Sangli

CC/08/614

SHRI.MUSA MAHABUB SHEIKH & OTHER 5 - Complainant(s)

Versus

BHARITIYA UDYOG SAMOUH & OTHER 6 - Opp.Party(s)

ADV.S.S.SHETE

26 Dec 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/08/614
 
1. SHRI.MUSA MAHABUB SHEIKH & OTHER 5
AT.POST ASHTA, TAL.WALVA,DIST.SANGLI
...........Complainant(s)
Versus
1. BHARITIYA UDYOG SAMOUH & OTHER 6
TAL.WALVA, DIST.SANGLI
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:ADV.S.S.SHETE, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

                                           नि.नं. ३०
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
 
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
 
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ६१४/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख     - ०३/०६/२००८
तक्रार दाखल तारीख   - २१/०६/२००८  
निकाल तारीखः       - २६/१२/२०११
----------------------------------------------
 
१. श्री मुसा मेहबूब शेख
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय काही नाही
२. कु.तबस्‍सुम मुसा शेख
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय काही नाही
३. सौ मैमुन्निसा मुसा शेख
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय काही नाही
४. फराह मुसा शेख
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय काही नाही
५. सौ शबनम महंमदशफी सय्यद
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय काही नाही
६. शमीमबानू मुसा शेख
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय काही नाही
    सर्व रा.आष्‍टा, ता.वाळवा जि.सांगली    
७. कु.आसमतबी महंमदशफी सय्यद
    अ.पा.क. मुसा मेहबूब शेख
८. श्री महंमदशमना मुसा शेख
    व.व. २०, व्‍यवसाय शिक्षण
    दोघे रा.आष्‍टा, ता.वाळवा जि.सांगली                .... तक्रारदार
विरुध्‍द
 
१. भारतीय उद्योग समूह
   कचेरी रोड, शनि मंदिराशेजारी, इस्‍लामपूर    
   ता.वाळवा जि. सांगली        
२. श्री संभाजीराव आनंदराव पाटील, अध्‍यक्ष
    वय वर्षे सज्ञान, व्‍यवसाय उद्योजक
३. श्री संजय पांडुरंग पाटील, उपाध्‍यक्ष
    वय वर्षे सज्ञान, व्‍यवसाय उद्योजक
 
४. डॉ सौ उषादेवी संभाजीराव पाटील, संचालिका
    वय वर्ष सज्ञान, व्‍यवसाय उद्योजक
 
५. श्री एस.एल.पाटील, व्‍यवस्‍थापक
    वय वर्ष सज्ञान, व्‍यवसाय उद्योजक
    (मंचाचे दि.३/२/११ चे आदेशानुसार वगळले.)
 
६. श्री संतोष भगवान पाटील, व्‍यवस्‍थापक
    वय वर्ष सज्ञान, व्‍यवसाय उद्योजक
   (मंचाचे दि.३/२/११ चे आदेशानुसार वगळले.)
 
७. सौ अर्चना धिरेश सुर्यवंशी, व्‍यवस्‍थापक
    वय वर्ष सज्ञान, व्‍यवसाय उद्योजक
    सर्व रा. द्वारा भारतीय उद्योग समूह,
    कचेरी रोड, शनि मंदिराशेजारी, इस्‍लामपूर    
    ता.वाळवा जि. सांगली
    (मंचाचे दि.३/२/११ चे आदेशानुसार वगळले.)            ..... जाबदार
 
 
                            तक्रारदार तर्फे - +ìb÷. श्री एस.एस.शेटे
                            जाबदार क्र.१, २ व ४ एकतर्फा
                            जाबदार क्र. ३ नो से
                            जाबदार क्र. ५ ते ७ वगळले
 
नि का ल प त्र
 
द्वारा- मा. सदस्‍या- गीता घाटगे
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार उद्योग समूहाने मुदत ठेवी अन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार भारतीय उद्योग समूह इस्‍लामपूर (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे उद्योग समूह असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या. यातील सर्व ठेवींच्‍या मुदती पूर्ण झाल्‍या आहेत.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची उद्योग समूहाकडे मागणी केली असता उद्योग समूहाने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण २३ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. १, २ व ४ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होऊनसुध्‍दा ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्‍यांचेविरुध्‍द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्‍यात आले. जाबदार क्र. ३ हे प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले परंतु त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले नाही. सबब त्‍यांचेविरुध्‍द नो से चा आदेश करण्‍यात आला. जाबदार क्र.५ ते ७ यांना मंचाचे दि.३/२/११ चे आदेशानुसार प्रस्‍तुत प्रकरणातून वगळणेत आले.
 
३.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार उद्योग समूहाबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. २ ते ४ यांना  पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून उद्योग समूहाने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने तो उद्योग समूहच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरतो असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो.
     
४.    प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी नि.२६ अन्‍वये पुरशिस दाखल करुन जाबदार क्र.५ ते ७ हे जाबदार संस्‍थेचे कर्मचारी असलेने त्‍यांचेविरुध्‍द कोणतीही दाद मागणेची नाही असे नमूद केले आहे. त्‍यानुसार नि.१ वर मंचाने आदेश देखील केलेला आहे.  सबब, प्रस्‍तुत निकालपत्रामध्‍ये जाबदार क्र.५ ते ७ यांचेबाबत कोणताही आदेश पारीत करण्‍यात आलेला नाही.
 
५.    सर्व तक्रारदार हे एकाच कुटुंबातील असल्‍याचे नि.१ वरील नमूद टायटलवरुन दिसून येते, सबब ठेवींतील रकमा तक्रारदारांना मंजूर करण्‍यात येत आहेत.
 
६.  प्रस्‍तुत प्रकरणी दाखल मुदत ठेवपावत्‍यांचे अवलोकन केले असता सर्व ठेवींची मुदत पूर्ण झाली आहे व त्‍यावर त्‍यांना व्‍याज प्राप्‍त झालेले नाही. सबब, त्‍यातील गुंतविण्‍यात आलेल्‍या रकमा ठेव ठेवल्‍या तारखेपासून पावतीवर नमूद व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत. 
 
सबब, मंचाचा आदेश की,
 
दे
 
१. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७१२ मधील रक्‍कम रु.२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) दि.३१/३/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००४९२ मधील रक्‍कम रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्‍नास हजार फक्‍त) दि.२४/३/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
३. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ००२२९० मधील रक्‍कम रु.४,२२०/- (अक्षरी रुपये चार हजार दोनशे वीस फक्‍त) दि.२९/७/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
४. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ००२२९२ मधील रक्‍कम रु.२६,३७५/- (अक्षरी रुपये सव्‍वीस हजार तिनशे पंचाहत्‍तर फक्‍त) दि.१९/७/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.११ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
५. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ००२२८८ मधील रक्‍कम रु.३१,६५०/- (अक्षरी रुपये एकतीस हजार सहाशे पन्‍नास फक्‍त) दि.१५/७/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
६. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.०००७३८ मधील रक्‍कम रु.२१,०००/- (अक्षरी रुपये एकवीस हजार फक्‍त) दि.१७/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
७. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७४३ मधील रक्‍कम रु.२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) दि.२४/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
८. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७३२ मधील रक्‍कम रु.२६,०००/- (अक्षरी रुपये सव्‍वीस हजार फक्‍त) दि.१५/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
९. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७३६ मधील रक्‍कम रु.२१,०००/- (अक्षरी रुपये एकवीस हजार फक्‍त) दि.१७/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१०. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ००२२८७ मधील रक्‍कम रु.१,१२०/- (अक्षरी रुपये एक हजार एकशे वीस फक्‍त) दि.३१/३/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
११. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७३० मधील रक्‍कम रु.४१,०००/- (अक्षरी रुपये एक्‍केचाळीस हजार फक्‍त) दि.१५/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१२. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७३५ मधील रक्‍कम रु.२८,०००/- (अक्षरी रुपये अठठावीस हजार फक्‍त) दि.१७/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१३. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७३७ मधील रक्‍कम रु.२५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्‍त) दि.१७/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१४. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७४० मधील रक्‍कम रु.२१,०००/- (अक्षरी रुपये एकवीस हजार फक्‍त) दि.२४/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१५. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७४१ मधील रक्‍कम रु.२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) दि.२४/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१६. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००४९३ मधील रक्‍कम रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्‍नास हजार फक्‍त) दि.२४/३/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१७. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७१३ मधील रक्‍कम रु.२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) दि.३१/३/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१८. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७४२ मधील रक्‍कम रु.२१,०००/- (अक्षरी रुपये एकवीस हजार फक्‍त) दि.२४/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१९. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ००२२९१ मधील रक्‍कम रु.३४,५०४/- (अक्षरी रुपये चौतीस हजार पाचशे चार फक्‍त) दि.१८/७/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२०. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७३४ मधील रक्‍कम रु.१०,९००/- (अक्षरी रुपये दहा हजार नऊशे फक्‍त) दि.१५/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२१. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७१८ मधील रक्‍कम रु.१,०००/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) दि.३१/३/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२२.  यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७३३ मधील रक्‍कम रु.२५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्‍त) दि.१५/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२३. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०००७३१ मधील रक्‍कम रु.२६,०००/- (अक्षरी रुपये सव्‍वीस हजार फक्‍त) दि.१५/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२४. यातील जाबदार उद्योग समूह व उद्योग समूहातर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
२५. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.७/२/२०१२ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांकò: २६/१२/२०११    
 
 
                 (गीता सु.घाटगे)                   (अनिल य.गोडसे÷)
                 सदस्‍या                                   अध्‍यक्ष           
               जिल्‍हा मंच, सांगली                   जिल्‍हा मंच, सांगली.  
 
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.