VISHANU DAWLU PATIL filed a consumer case on 10 Jun 2015 against BHARATMATA MAHILA NAGRI PATHASANSTHA in the Satara Consumer Court. The case no is CC/13/200 and the judgment uploaded on 10 Aug 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 200/2013.
तक्रार दाखल दि.28-11-2013.
तक्रार निकाली दि. 10-6-2015.
1. श्री.विष्णु दौलु पाटील.
2. सौ.शशिकला विष्णु पाटील.
3. श्री.विकास विष्णु पाटील.
4. कु.अधिराज जीवन पाटील.
5. माधुरी जीवन पाटील.
6. कु.रोहिणी नंदकुमार पाटील.
नं.6 चे अ.पा.क.आजोबा तक्रारदार क्र.1 स्वतः.
सर्व सध्या रा.पुनर्वसन गणेशनगर
वसाहत, मु.पो.माहुली, ता.खानापूर.
जि.सांगली. .... तक्रारदार
विरुध्द
1. भारतामाता महिला ना.सह.प.सं., कराड.
2. श्री.अधिकराव शिवाजी सोमदे, संस्थापक,
3. सौ.मंगलादेवी रामानंद माने, चेअरमन.
4. सौ.विमल चंद्रकांत पवार, व्हा.चेअरमन.
5. सौ.कविता अधिकराव सोमदे, संचालक.
6. सौ.प्रभावती वसंतराव पाटील, संचालक.
7. सौ.वैशाली अजय कदम, संचालक.
8. सौ.अंजली जयकर कदम, संचालक.
9. सौ.छाया निवासराव पाटील, संचालक.
10. सौ.आशालता पुरुषोत्तम कुलकर्णी, संचालक.
11. सौ.भागीर्थी त्रिंबक थोरात, संचालक.
12. सौ.सुजाता संजय साळुंखे, संचालक.
13. सौ.भारती सर्जेराव कदम,संचालक.
क्र.1,2,5 रा.जुळेवाडी, ता.कराड, जि.सातारा.
क्र.4 रा.मु.पो.मलकापूर, ता.कराड, जि.सातारा.
क्र.6 रा.मु.पो.शेरे, ता.कराड, जि.सातारा.
क्र.7. रा.मु.पो.वडगावहवेली, ता.कराड,जि.सातारा.
क्र.8 रा.मु.पो.नेर्ले, ता.वाळवा, जि.सांगली.
क्र.3,9 ते 11 रा.साई प्लाझा, शनिवार पेठ,
मार्केटयार्ड, गेट क्र.5 समोर, कराड, जि.सातारा.
क्र.12 रा.मु.पो.महिंद, ता.पाटण, जि.सातारा.
क्र.13, रा.मु.पो.गुढे, ता.पाटण, जि.सातारा. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.पी.आर.इनामदार.
जाबदार क्र.3,4,12,13 तर्फे– ए.आर.कदम.
जाबदार क्र.1,2,5,6,7 व 9 ते 11- एकतर्फा.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या यानी पारित केला
तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
1. तक्रारदार हे अर्जात नमूद पत्त्यावर कायमस्वरुपी रहिवासी आहेत. जाबदार भारतमाता महिला नागरी सह.पतसंस्था मर्या.कराड ही महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये नोंदणीकृत पतसंस्था असून सदर पतसंस्थेचे मुख्य कार्यालय कराड, जि.सातारा येथे आहे. जाबदार संस्थेचा बँकींग स्वरुपाचा व्यवसाय आहे. या अर्जाचे कलम 2 मध्ये नमूद केलेप्रमाणे तक्रारदारानी जाबदार पतसंस्थेच्या कराड येथील शाखेत मुदतठेवी ठेवलेल्या आहेत, त्यामुळे तक्रारदार हे जाबदार पतसंस्थेचे ग्राहक आहेत. सदर ठेवीवर जाबदार पतसंस्थेने व्याज दयावयाचे असून मुदतपूर्तीनंतर तक्रारदारास सव्याज रकमा परत करावयाच्या असतात या बोलीवरच जाबदारानी रकमा ठेवून घेतल्या आहेत. तक्रारदारानी खालीलप्रमाणे मुदतठेव म्हणून जाबदार पतसंस्थेमध्ये खालीलप्रमाणे मुदतठेवी ठेवलेल्या आहेत-
1. विष्णू दौलू पाटील- .
अ.क्र | मुदतठेव पावती क्र | रक्कम रु | ठेव ठेवलेची तारीख | मुदत संपलेची तारीख |
1 | 44 | 15,000/- | 13-1-2007 | 13-7-2013 |
2 | 45 | 15,000/- | 13-1-2007 | 13-7-2013 |
3 | 65 | 10,000/- | 5-7-2007 | 5-1-2014 |
4 | 126 | 22,300/- | 29-12-2008 | 29-12-2014 |
5 | 407 | 54,780/- | 11-10-2008 | 11-10-2011 |
6 | 421 | 20,000/- | 26-12-2007 | 26-12-2010 |
7 | 512 | 50,000/- | 21-4-2010 | 21-4-2011 |
8 | 667 | 5,000/- | 17-1-2010 | 17-1-2012 |
9. सौ.शशिकला विष्णू पाटील- पा.क्र.128, दि.17-1-2009 ते 17-12-2014 रु.1,000/-
10. श्री.विकास विष्णू पाटील- पा.क्र.42, दि.13-12-2006 ते दि.13-6-2013 रु.25,000/-
11. अधिराज जीवन पाटील- पा.क्र.55, दि.12-5-2007 ते 12-11-2012, रु.15,000/-
12. माधुरी जीवन पाटील, पा.क्र.41, दि.13-12-2006 ते दि.13-6-2013- रु.25,000/-
13. कु.रोहिणी नंदकुमार पाटील. पा.क्र.104, दि.28-3-2008 ते दि.28-3-2014- रु.3,000/-
2. तक्रारदार हे शेतकरी कुटुंबातील रहाणारे असून त्यानी त्यांचे कुटुंबाचे कायदेशीर गरजेसाठी शेती हा प्रमुख व्यवसाय असताना त्यांची जमीन 'वांग मराठवाडी धरण' या धरणामध्ये गेल्यामुळे त्यांची जमीन विस्थापित झालेमुळे त्यांना स्थलांतरित व्हावे लागले, तसेच त्यांना मिळालेल्या रकमेतून सदरची रक्कम सदर पतसंस्थेत ठेवलेली होती व पुढे कुटुंबास आधार म्हणून भविष्याची तरतूद म्हणून व उतारवयात औषधोपचारासाठी लागणा-या रकमेचा उपयोग होईल व मुलांचे शिक्षण तसेच स्वतःचे आजारपणासाठी रकमेचा उपयोग होईल म्हणून सदर रक्कम पतसंस्थेत दामदुप्पटीपोटी ठेवलेली होती. सदर भाग दुष्काळी असलेमुळे व उत्पन्नाचा दुसरा मार्ग नसलेमुळे उपासमारीची वेळ आलेली आहे, तसेच वेळप्रसंगी आत्महत्या करणेशिवाय अन्य मार्ग रहाणार नाही असे त्यांनी बोलून दाखवले आहे, तरी त्याना सदर रकमेची आवश्यकता असूनही ती वेळेत मिळत नाही. तक्रारदार हे मुदतठेवीची रक्कम सव्याज परत मागणेसाठी जाबदारांचे कार्यालयात गेले असता आज देतो, उदया देतो असे आश्वासन देऊन व काहीतरी खोटीनाटी कारणे सांगून तक्रारदाराना मुदतठेवीची व त्यावरील व्याजाची रक्कम देणेस टाळाटाळ केली आहे व करत आहेत. वर कलम 2 मध्ये नमूद केलेप्रमाणे जाबदारानी तक्रारदारांची मुदत ठेवीच्या परताव्याची रक्कम देणेस टाळाटाळ केल्यामुळे तक्रारदारानी दि.25-9-13 रोजी वकीलांमार्फत रजि.पोस्टाने नोटीस पाठवून तक्रारदारांच्या मुदतठेवीवरील परताव्याच्या रकमेची मागणी केली होती तथापि सदर नोटीस स्विकारुनही जाबदार क्र.3 यांची नोटीस त्यावरील लेफ्ट शे-याने परत आलेली आहे. जाबदार पतसंस्थेने तक्रारदारांच्या मुदतठेवीची व त्यावरील होणा-या व्याजाची वेळोवेळी मागणी करुनही तक्रारदाराना परत दिलेली नाही त्यामुळे जाबदारांकडून तक्रारदारांचे सेवेत अक्षम्य त्रुटी झालेली आहे. तक्रारदारानी मागणी करुनही रकमा न मिळाल्याचा मानसिक त्रास तक्रारदाराना झालेला आहे तसेच सदर रक्कम परत घेणेसाठी तक्रारदारांना वेळोवेळी जाबदारांचे कार्यालयात हेलपाटे मारावे लागले आहेत त्यामुळे तक्रारदाराना शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळणे न्यायोचित होणार आहे. तक्रारदार हे जाबदार पतसंस्थेचे ग्राहक आहेत. जाबदारांचे मुख्य कार्यालय, कराड, जि.सातारा येथे असून त्यांचा कराड शाखेमध्ये व्यवसाय आहे. या मंचाचे अधिकारक्षेत्रात व स्थळसीमेत तक्रारीस कारण घडलेले आहे. त्यामुळे सदर अर्ज दाखल करुन घेणेचा व त्यावर निर्णय देणेचा मंचास अधिकार आहे, तसेच तक्रारदारानी अशा स्वरुपाचा अर्ज वा दाद अन्य कोणत्याही कोर्टात मागितलेली नाही.
सबब तक्रारदारानी खालीलप्रमाणे मे.मंचाला विनंती केलेली आहे-
अ) अर्जाचे कलम 2 मध्ये नमूद केलेल्या तक्रारदार क्र.1 ते 16 यांचे नावे ठेवलेल्या दामदुप्पट ठेवीची एकूण रक्कम रु.2,61,080/-व त्यावरील नमूद केलेप्रमाणे होणा-या व्याजासह रक्कम जाबदारानी तक्रारदाराना देणेचा आदेश व्हावा.
ब) कलम (अ) मध्ये नमूद केलेली रक्कम प्रत्यक्ष वसूल होऊन मिळेपर्यंत सदर रकमेवर द.सा.द.शे.15 टक्के दराने व्याज जाबदारानी तक्रारदारांस देणेचा आदेश व्हावा.
क) जाबदाराना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- जाबदारानी तक्रारदाराना देणेचा आदेश व्हावा.
ड) अर्जाचा खर्च रु.15,000/- जाबदारानी तक्रारदाराना देणेचा आदेश व्हावा.
3. नि.11 कडे जाबदार क्र.3,4,12 व 13 यानी खालीलप्रमाणे म्हणणे दाखल केलेले आहे-
तक्रारअर्जातील कलम 1 मधील मजकुराबाबत जाबदारांना काहीही माहिती नाही. तक्रारदारांचे कलम 2 मधील संपूर्ण मजकूर धादांत खोटा व लबाडीचा असून तो जाबदाराना मुळीच मान्य व कबूल नाही. जाबदार हे वर नमूद पतसंस्थेवर कधीही संचालक नव्हते व नाहीत. तक्रारदारांचे कलम 4 व 5 मधील संपूर्ण मजकूर जाबदारांना मान्य व कबूल नाही. तक्रारदारानी जाबदारांना कधीही कोणत्याही प्रकारची नोटीस पाठवलेली नव्हती व नाही किंवा नोटीस पाठवणेचे काहीही कारण नाही. तक्रारदारांचे अर्ज कलम 6 मधील संपूर्ण मजकूर जाबदारांना मान्य व कबूल नाही. तक्रारदार हे वर सदर जाबदारांचे ग्राहक होणेचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. तक्रारदारांचे कलम 7 मधील संपूर्ण मजकूर जाबदारांना मुळीच मान्य व कबूल नाही. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक नाहीत. त्यामुळे तक्रारदारांना जाबदारांमुळे शारिरीक व मानसिक त्रास होणेचा कोणताच प्रश्न उद्भवत नाही तसेच कलम 8 मध्ये नमूद केलेले तक्रारअर्ज दाखल करणेस घडलेले कारण जाबदारांना मान्य व कबूल नाही. ते लबाडीने नमूद केलेले आहे. तक्रारदारांचे कलम 9 व 10 मधील केलेली मागणी ही संपूर्णतः बेकायदेशीर असून ती जाबदाराना अमान्य व नाकबूल आहे. जाबदारांचा वर नमूद पतसंस्थेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. जाबदार क्र.2 हे वर नमूद पतसंस्थेचे संस्थापक असून जाबदार क्र.5 हया जाबदार क्र.2 यांच्या पत्नी आहेत तसेच जाबदार क्र.8 या जाबदार क्र.2 यांची बहीण आहे. सदर जाबदारांनी वर नमूद पतसंस्थेत लाखो रुपयांची अफरातफर केलेली आहे. सदर जाबदार हे वर नमूद पतसंस्थेचे ठेवीदार असून जाबदारांनी सदर पतसंस्थेत बरीच मोठी रक्कम ठेव स्वरुपात गुंतविलेली आहे. सदर रक्कम जाबदार हे जादबार क्र.2 व 5 यांचेकडे वारंवार मागणी करणेस गेले असता जाबदार क्र.2 व 5 यांनी जाणीवपूर्वक सदर जाबदारांची ठेव रक्कम बुडवणेचे दुष्ट हेतूने कोणत्याही प्रकारची निवडणूक न घेता किंवा कायदेशीर तरतुदींचा वापर न करता बेकायदेशीररित्या सदर जाबदारांची संचालक मंडळाचे यादीत नावे नमूद केली आहेत. सदर जाबदार हे या पतसंस्थेवर कधीही संचालक नव्हते व नाहीत किंवा सदर जाबदारांनी पतसंस्थेच्या कोणत्याही कागदपत्रांवर सहया केलेल्या नाहीत किंवा कोणत्याही दैनंदिन कारभारात भाग घेतलेला नाही. अशी वस्तुस्थिती असताना वर नमूद जाबदार क्र.2, 5, 8 यांनी परस्पर संगनमताने बरीच मोठी ठेव रक्कम बुडवणेचे दुष्ट हेतूने संचालक मंडळाचे यादीत नावे नमूद केलेली आहेत. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कराड यानी दिलेल्या संचालक मंडळाचे यादीत सदर जाबदारांची नावे नमूद नाहीत या एकमेव बाबीवरुन जाबदार हे वर नमूद पतसंस्थेचे संचालक नव्हते व नाहीत ही बाब निःसंशयपणे शाबीत होत आहे तसेच जाबदार क्र.3 व 4 हे पतसंस्थेचे साधे सभासदही नाहीत, या बाबीवरुनही सदर जाबदार हे वर नमूद पतसंस्थेचे संचालक नव्हते व नाहीत ही बाब सिध्द होत आहे. तक्रारदारानी जाबदार हे वर नमूद पतसंस्थेचे संचालक आहेत वा नाहीत या बाबीची शहानिशा न करता, सदर जाबदारांविरुध्द खोटा तक्रारअर्ज दाखल केलेबाबत कलम 26 प्रमाणे तक्रारदाराना रक्कम रु.1,00,000/- दंड करुन सदर दंडाची प्रत्येकी रक्कम रु.25,000/- जाबदारांना देणेचा आदेश व्हावा व तक्रारदारांचा सदर तक्रारअर्ज जाबदाराविरुध्द खर्चासह फेटाळणेत यावा. येणेप्रमाणे तक्रारअर्जास जाबदारांचे म्हणणे असे.
4. नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे तक्रारदार क्र.1 चे प्रतिज्ञापत्र, नि.3 कडे तक्रारदार क्र.2 चे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे तक्रारदार क्र.3 यांचे प्रतिज्ञापत्र, नि.5 कडे तक्रारदार क्र.5 चे प्रतिज्ञापत्र, नि.6 कडे तक्रारदाराचा अँड.पी.आर.इनामदार यांचे वकीलपत्र दाखल करणेसाठीचा अर्ज, नि.7 कडे तक्रारदारातर्फे अँड.इनामदार यांचे वकीलपत्र, नि.8 कडे तक्रारदाराची कागदयादी, नि.8/1 ते 8/7 कडे तक्रारदाराच्या ठेवपावत्यांची झेरॉक्स प्रती, नि.8/8 कडे तक्रारदारानी जाबदाराना पाठवलेली नोटीस, नि.8/9 कडे जाबदारांच्या पोहोचपावत्या, नि.8/10 कडे लेफ्ट शे-याने परत आलेला जाबदार क्र.3 च्या नोटीसचा लखोटा, नि.9 कडे तक्रारदाराची पत्ता पुरसीस, नि.10 कडे जाबदार क्र.3 च्या नोटीसची पोहोचपावती, नि.11 कडे जाबदार क्र.12च्या नोटीसची पोहोचपावती, नि.11/1 कडे जाबदार क्र.4 चा नोटीसचा रिफ्यूज्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.11/2 कडे जाबदार क्र.9 चा लेफ्ट शे-याने परत आलेला लखोटा, नि.11/3 कडे जाबदार क्र.10 चा लेफ्ट शे-याने परत आलेला लखोटा, नि.11/4 कडे जाबदार क्र.11 चा लेफ्ट शे-याने परत आलेला लखोटा, नि.12 कडे जाबदार क्र.2,5 व 13 ची पोहोचपावती, नि.13 कडे जाबदार क्र.8 चा नॉट क्लेम्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.13/ए कडे तक्रारदाराचा जाबदार क्र.7 व 9 ते 11 याना जाहीर नोटीस काढणेबाबतचा मसुदा देणेचा अर्ज दाखल, अर्ज मंजूर. नि.14 कडे जाबदार क्र.7 चे आडनावात फरक असलेमुळे न स्विकारता परत आलेला लखोटा, नि.14/ए कडे जाहीर नोटीसीचा मसुदा दाखल, नि.15 कडे तक्रारदाराचा कागद दाखल करणेचा परवानगी अर्ज, नि.16 कडे दै.तरुणभारतमध्ये दिलेल्या जाहीर नोटीसचे पेपरची प्रत, नि.17 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल, नि.18 कडे तक्रारदाराची पुरावा संपलची पुरसीस, नि.19 कडे मंगलादेवी माने यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.20 कडे जाबदार क्र.3,4,12,13 तर्फे पुरावा संपलेची पुरसीस. प्रस्तुत कामी येणेप्रमाणे तक्रारदार व जाबदारांनी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. तक्रारदारांची तक्रार, त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, जाबदार क्र. क्र.3,4,12,13 यांनी दाखल केलेले म्हणणे व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद व उभय विधिज्ञांचा युक्तीवाद यांचा विचार करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व
सेवापुरवठादार असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
3. जाबदार हे तक्रारदारांच्या रकमा देणे लागतात काय? होय.
4. अंतिम आदेश काय? शेवटी नमूद केलेप्रमाणे.
विवेचन
6. मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. जाबदार पतसंस्था ही लोकांचे पैसे विविध खात्यांवर ठेवून घेते व त्यावर ठेवीदारास व्याज देते. तसेच ती लोकांना कर्जरुपाने पैसे देते व त्यावर व्याज घेते अशा प्रकारे जाबदारांचा व्यवहार-व्यापार चालतो. तक्रारदारांनी जाबदार पतसंस्थेत ठेवपावत्या ठेवलेल्या होत्या. यावरुन तक्रारदार जाबदार पतसंस्थेचे ग्राहक असून त्यांचा व जाबदार पतसंस्थेचा व्यवहार होता हे सिध्द होते. तसेच जाबदार पतसंस्था रकमा ठेवून घेते व त्यावर व्याज देते त्यामुळे जाबदार पतसंस्था ही ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्था ठरते. तक्रारदारानी जाबदारांकडे वारंवार रकमांची मागणी करुनही आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्कम सव्याज परत केलेली नाही यावरुन जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे हे सिध्द होते. जाबदारानी तक्रारदाराना त्यांच्या रकमा त्यांना सव्याज परत केल्या पाहिजेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. परंतु, जाबदार क्र. 1,2,5 ते 11 यांना मंचाची नोटीसा मिळूनही ते मंचासमोर गैरहजर राहीले व त्यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील म्हणणेही खोडून काढले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश झाले आहेत. जाबदार क्र.3,4,12 व 13 यांना याकामी जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही. प्रस्तुत कामी जाबदार क्र.3,4,12 व 13 तर्फे नि. 11 ला दि.10/2/14 रोजी म्हणणे दाखल केले आहे. प्रस्तुत म्हणण्यात जाबदारांनी ते संचालकच काय परंतु पतसंस्थेचे सभासदही नसल्याचे म्हटले आहे. प्रस्तुत कामात तक्रारदारांनी संचालक मंडळाची यादी दाखल केलेली नाही व असा कोणताही पुरावा दाखल केला नाही की ज्यामुळे जाबदार क्र.3,4,12 व 13 हे संचालक आहेत हे सिध्द होईल. नि. 11 कडे दाखल केलेल्या म्हणण्यात जाबदार क्र.3,4,12 व 13 यांनी आपण संचालक नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ते संचालक आहेत हे सिध्द करणेची जबाबदारी (Burden of proof) तक्रारदार यांचेवर येते. परंतु, तक्रारदारांनी जाबदार क्र.3,4,12 व 13 हे संचालक आहेत हे दाखविणारा कोणताही पुरावा दाखल केला नाही. वास्तविक त्यांचेविरुध्द पुरावा दाखल करणेची जबाबदारी तक्रारदार याचीच होती. परंतु त्यांनी कोणताही पुरावा दाखल केला नाही व त्यांचे म्हणणे खोडून काढले नाही. त्यामुळे जाबदार क्र.3,4,12 व 13 यांनी दिलेले म्हणणे मे मंचास ग्राहय धरणे अनुचित वाटते व जाबदार क्र.3,4,12 व 13 यांना या कामातून वगळणेत येते. येथे आम्ही मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत. जाबदार हेच संस्थेचे सर्वेसर्वा असतात व सर्व कारभार तेच पहात असतात म्हणूनच तक्रारदारांचे पैसे परत करणेस co-operate corporate veil नुसार जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2, 5 ते 11 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरीत आहे.
7 सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदार क्र.5 यांना त्यांचे खाते क्र.190 रक्कम रु.25,000/- व त्यावर दि.13-12-06 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
3. तक्रारदार क्र.1 यांना त्यांचे खाते क्र.193 रक्कम रु.15,000/- व त्यावर दि.13-1-07 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
4. तक्रारदार क्र.1 यांना त्यांचे खाते क्र.194 रक्कम रु.15,000/- व त्यावर दि.13-1-07 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
5. तक्रारदार क्र.1 यांना त्यांचे खाते क्र.271 रक्कम रु.22,300/- व त्यावर दि.29-12-08 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
6. तक्रारदार क्र.1 यांना त्यांचे खाते क्र.212 रक्कम रु.10,000/- व त्यावर दि.5-7-07 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
7. तक्रारदार क्र.2 यांना त्यांचे खाते क्र.273 रक्कम रु.1,000/- व त्यावर दि.17-1-09 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
8. तक्रारदार क्र.1 यांना त्यांचे खाते क्र.601 रक्कम रु.50,000/- व त्यावर दि.21-4-09 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
9. तक्रारदार क्र.1 यांना त्यांचे खाते क्र.729 रक्कम रु.5,000/- व त्यावर दि.17-1-10 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
10. तक्रारदार क्र.1 यांना त्यांचे खाते क्र.507 रक्कम रु.54,780/- व त्यावर दि.11-10-08 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
11. तक्रारदार क्र.1 यांना त्यांचे खाते क्र.397 रक्कम रु.20,000/- व त्यावर दि.26-12-2007 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
12. तक्रारदार क्र.3 यांना त्यांचे खाते क्र.191 रक्कम रु.25,000/- व त्यावर दि.13-12-2006 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
13. तक्रारदार क्र.4 यांना त्यांचे खाते क्र.202 रक्कम रु.15,000/- व त्यावर दि.12-5-2007 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
14. तक्रारदार क्र.6 यांना त्यांचे खाते क्र.250 रक्कम रु.3,000/- व त्यावर दि.28-3-2008 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
15. तक्रारदाराना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना अदा करावेत.
16. वरील आदेशाचे पालन जाबदार क्र.1,2,5 ते 11 यानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे. तसे न केल्यास आदेश पारित तारखेपासून रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत एकूण रकमेवर द.सा.द.शे.6 टक्केप्रमाणे व्याज दयावे लागेल.
17. वरील आदेशाचे पालन जाबदारानी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदारांना त्यांचेविरुध्द कलम 25 व 27 नुसार मंचाकडे दाद मागणेची मुभा राहील.
18 सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
19 सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 10– 6-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.