नि.नं. २३
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ४४७/२०१०
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख - २७/०८/२०१०
तक्रार दाखल तारीख - ३०/०८/२०१०
निकाल तारीखः - १७/११/२०११
----------------------------------------------
१. श्रीमती कुसूम वामन पाटील
वय व.७६, धंदा – घरकाम
रा.शिंदे चौक, आष्टा, ता.वाळवा जि.सांगली .... तक्रारदार
विरुध्द
१. भारतीय नागरी सह.पतसंस्था मर्या. इस्लामपूर
शाखा आष्टा
(सदरची नोटीस सेक्रेटरी यांचेवर बजावणेत यावी)
२. उषादेवी संभाजी पाटील
वय वर्ष ३६, धंदा - नोकरी,
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
३. संजय पांडुरंग पाटील
वय व.४४, धंदा – नोकरी
रा.इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी, रा.इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
४. श्री संभाजी आनंदराव पाटील
वय व.४४, धंदा – नोकरी
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
५. विजया गणपतराव पाटील
वय व.सज्ञान, धंदा – घरकाम,
रा.प्राध्यापक कॉलनी, शिराळा,
ता.शिराळा जि.सांगली
६. सौ रेखा जयकर पाटील
वय व.सज्ञान, धंदा – घरकाम,
रा. ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
(मे.मंचाचे दि.१५/११/११ चे आदेशान्वये वगळले)
७. सुरेखा चंद्रकांत मगदूम
वय व.सज्ञान, धंदा – घरकाम,
रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
८. श्री शिवाजी रंगराव पाटील
वय व.४७, धंदा – शेती,
रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
९. आनंदा नारायण जाधव,
वय व.४२, धंदा – शेती,
रा.शिवाजी चौक, ऊरण-इस्लामपूर,
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
१०. सौ मंगल नागनाथ पाटील
वय व.सज्ञान, धंदा – घरकाम,
रा.एम.एस.ई.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
११. सचिन आनंदा हांडे
रा. शिवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
१२. श्री संतोष बजरंग पवार
रा.अनंतगंगा, महादेवनगर, इस्लामपूर,
ता.वाळवा, जि. सांगली.
१३. विनायक बाळकृष्ण लोले
वय व.सज्ञान, धंदा – शेती,
रा.यादवनगर, पेठवडगांव,
ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
१४. माधवी गोरक्ष पवार,
वय व.सज्ञान, धंदा – घरकाम,
रा.शिवाजी चौक, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
१५. प्रशासक, श्री बी.जी.शेळके
भारतीय नागरी सह.पतसंस्था मर्या. इस्लामपूर
शाखा स्टॅंडजवळ, इस्लामपूर,
वय सज्ञान, धंदा – नोकरी
इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री आर.व्ही.बसुगडे
जाबदार क्र.१ ते ५ व ७ ते १५ – एकतर्फा
जाबदार क्र. ६ – वगळले
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेव व दामदुप्पट ठेवअन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर शाखा आष्टा (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्या होत्या. यातील सर्व ठेवींच्या मुदती निकाल तारखेपूर्वी पूर्ण झाल्या आहेत. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ४ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. १ ते ५ व ७ ते १५ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आले. जाबदार क्र.६ यांना मे.मंचाचे दि.१५/११/२०११ चे आदेशान्वये प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात आले.
३. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २ ते ५ व ७ ते १५ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या पतसंस्थेमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
४. प्रस्तुत प्रकरणी दाखल ठेवपावत्यांचे सत्यप्रतींचे अवलोकन करता तक्रारदारांना ठेवींत गुंतविलेल्या रकमांवर कोणतेही व्याज मिळाल्याचे दिसून येत नाही. तसेच तक्रारदारांनी नि.१९ ला दाखल केलेल्या व्याजनिवेदनामध्येही त्यांना जाबदार यांचेकडून व्याजाची रक्कम मिळाली नसल्याचे नमूद केले आहे. निकाल तारखेपूर्वी सर्व ठेवींच्या मुदतीही पूर्ण झालेल्या आहेत. सबब दामदुप्पट ठेवींतील मुदतीनंतर मिळणा-या रकमा मुदत संपल्याच्या दुस-या दिवशीपासून १० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत व मुदत ठेवीतील रक्कम ठेव ठेवल्याचे तारखेपासून ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे. हे व्याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००१८१५ मधील रक्कम रु.४३,०००/- (अक्षरी रुपये त्रेचाळीस हजार फक्त) दि.२७/७/२००५ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१२ टक्के व्याजासह अदा करावी.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना धनराशी दामदुप्पट ठेव पावती क्र.००१८५९ मधील मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम रु.१,३७,०००/- (अक्षरी रुपये एक लाख सदतीस हजार फक्त) दि.११/९/२०११ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजासह अदा करावी.
३. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना धनराशी दामदुप्पट ठेव पावती क्र.००१८४६ मधील मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम रु.९०,०००/- (अक्षरी रुपये नव्वद हजार फक्त) दि.२५/८/२०११ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजासह अदा करावी.
४. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (दोन हजार फक्त) अदा करावेत.
५. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.२/१/२०१२ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: १७/११/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११