नि.41
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 741/2008
तक्रार नोंद तारीख : 30/06/2008
तक्रार दाखल तारीख : 14/07/2008
निकाल तारीख : 26/07/2013
----------------------------------------------
1. श्री पांडुरंग नारायण नलवडे
2. सौ मंगल पांडुरंग नलवडे
सर्व रा.रेठरे धरण. ता.वाळवा जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. भारतीय नागरी सह.पतसंस्था मर्या. इस्लामपूर भारतीय उद्योग समूह
रजी.नं. SAN/MVA/RSR/CR/1253 भारतीय अॅग्री इंडस्ट्रीज प्रा.लि.
ता.वाळवा जि. सांगली ता.वाळवा जि. सांगली
(वगळले)
2. भारतीय नागरी सह.पतसंस्था मर्या. इस्लामपूर
उपशाखा इस्लामपूर, शनिमंदिराजवळ, इस्लामपूर
3. सौ उषादेवी संभाजीराव पाटील, चेअरमन
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
4. श्री संजय पांडुरंग पाटील
रा.इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी, इस्लामपूर,
ता.वाळवा
5. श्री संभाजीराव आनंदराव पाटील
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
6. सौ सुरेखा चंद्रकांत मगदूम
रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
7. सौ विजया गणपती पाटील
मु.पो. शिराळा, ता.शिराळा जि.सांगली
(वगळले)
8. सौ रेखा जयकर पाटील
रा. ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
9. सौ मंगल नागनाथ पाटील
रा.एम.एस.सी.बी.जवळ, इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
10. श्री शिवाजी रंगराव पाटील
रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
11. श्री सचिन आनंदराव हांडे
रा. शिवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
12. श्री संतोष बजरंग पवार
रा. महादेवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
13. विनायक बाळकृष्ण लोले
रा. पेठवडगांव, ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
14. श्री आनंदा नारायण जाधव,
रा.शिवाजी चौक, ऊरण-इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री पी.एम.मैंदर्गी
जाबदार क्र.3 व 5 तर्फे : अॅड श्री आर.बी.साळुंखे
जाबदारक्र.1,2,4,6,8 ते 13 : एकतर्फा
जाबदारक्र.7 : वगळले
जाबदारक्र.14 : अॅड श्री एस.पी.पाटील
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांनी मागणी करुनही ठेव रक्कम अदा न केलेने दाखल केली आहे. सामनेवाला क्र.1 ते 14 यांना नोटीस आदेश झाला. सामनेवाला क्र.1,2,4,6,8 ते 13 यांना नोटीस लागूनही ते हजर झाले नाहीत. सबब त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविणेचा आदेश करणेत आला. नि. 35 वर मे.मंचाने पारीत केलेल्या आदेशानुसार सामनेवाला भारतीय उद्योग समूह, भारतीय अॅग्री इंडस्ट्रीज प्रा.लि. यांना तर नि. 36 वर मे.मंचाने पारीत केलेल्या आदेशानुसार सामनेवाला क्र.7 यांना प्रस्तुत प्रकरणातून वगळलेले आहे. सामनेवाला क्र.14 व सामनेवाला क्र.3 व 5 यांनी या प्रकरणी हजर होवून त्यांचे म्हणणे दाखल केले आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी –
तक्रारदार हे एका कुटुंबातील असून त्यांचे नावे खालील तपशीलाप्रमाणे सामनेवाले यांचेकडे ठेवी ठेवल्या होत्या. सामनेवाला क्र.1 ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यान्वये नोंदणीकृत संस्था असून सामनेवाला क्र.2 ही सामनेवाला क्र.1 ची उपशाखा, सामनेवाला क्र.3 हे चेअरमन तर सामनेवाला क्र.4 ते 14 हे संचालक आहेत. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 पतसंस्थेमध्ये मुदत ठेव अंतर्गत खालील तपशीलाप्रमाणे ठेवी ठेवलेल्या होत्या.
अ.क्र. |
नाव |
रक्कम |
ठेवतारीख |
खाते/ पावती क्र. |
मुदत संपणेची तारीख |
मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1 |
पांडुरंग नारायण नलवडे |
40000 |
27/12/05 |
009257 |
28/12/11 |
80000 |
2 |
पांडुरंग नारायण नलवडे |
35000 |
29/9/05 |
008876 |
21/10/08 |
35000 |
3 |
सौ मंगल पांडुरंग नलवडे |
35000 |
29/9/05 |
008877 |
21/09/11 |
70000 |
4 |
पांडुरंग नारायण नलवडे |
8950 |
1/1/08 |
रिक.खाते क्र.755 |
1/1/08 |
8950 |
तक्रारदारांना घरगुती अडचणीसाठी, औषधपाण्यासाठी व आर्थिक देणी भागविणेसाठी सदर रकमेची आवश्यकता असलेने सदर रकमेची व्याजासहीत मागणी सामनेवाला क्र.1 ते 14 यांचेकडे केली असता सदर रक्कम देणेस नकार दिलेने सेवात्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदारास प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले आहे. सबब, वर नमूद तपशीलाप्रमाणे ठेव रक्कम व त्यावर संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के व्याज सामनेवाला क्र.1 ते 14 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तरित्या वसूल होऊन मिळावे, तसा हुकूम सामनेवालांना व्हावा तसेच सदोष सेवा दिलेने झालेल्या आर्थिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देणेबाबत हूकूम व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि. 3 ला शपथपत्र व नि.5 चे फेरिस्तप्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. सामनेवाला क्र.14 ने दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार त्याने तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. प्रस्तुतची तक्रार मंचासमोर चालणेस पात्र आहे का ? हा प्राथमिक मुद्दा काढून सुनावणी घ्यावी, तक्रारअर्ज मुदतीत नाही, तक्रारदार हा ग्राहक नाही, त्यामुळे सदरचा वाद मंचासमोर चालू शकत नसलेने तक्रारअर्ज फेटाळणेत यावा, तक्रारीस कारणे वेगवेगळी घडलेली आहेत, तक्रारदाराने सदर संस्थेबरोबर भारतीय उद्योग समूह व भारतीय अॅग्री इंडस्ट्रीज यांना पक्षकार केले आहे. त्यांच्याशी सामनेवाला क्र.14 चा संबंध नाही. अनेक संस्थेविरुध्दच्या मागण्या एकाच अर्जात कायद्याने करता येणार नाहीत. सदर नं.1 संस्थेवर मा.उपनिबंधक, वाळवा यांनी फेब्रुवारी 2008 मध्ये प्रशासकाची नेमणूक केली आहे. सदर कामी प्रशासकास पक्षकार केलेले नाही. प्रत्येक संस्थेचे संचालक मंडळ वेगवेगळे आहे, त्यासंदर्भात कोणताही पुरावा दिलेला नाही. सबब वरील कारणामुळे तक्रार चालणेस पात्र नसलेने फेटाळणेत यावी. सामनेवाला क्र.14 ने दि.5/4/07 रोजी संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्याची पोच सोबत हजर करीत आहे, तो मंजूर झालेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
5. सामनेवाला क्र.3 व 5 यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र. 3 व 5 यांनी तक्रारदाराची तक्रार, मान्य केल्या कथनाखेरिज, परिच्छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला क्र. 14 चे वरील म्हणणेतील मजकूर व सामनेवाला क्र. 3 व 5 यांचेही म्हणणे बहुतांश समानच आहे. सामनेवाला क्र. 3 व 5 चे म्हणण्यानुसार तक्रारदारास ठेव रक्कम मुदतीनंतरच व्याजासह देणेत येईल असे अभिवचन सामनेवाला संस्थेने दिले आहे. यानंतर सामनेवाला क्र.1 संस्थेचा ताबा फेब्रुवारी 2008 पासून प्रशासकाकडे असल्याने तक्रारदारांनी या सामनेवालांकडे रकमेची मागणी कधीही केलेली नाही. तक्रारदारांच्या ठेव पावत्या प्रिमॅच्युअर असलेने त्यांची गरज असलेबाबतची कागदपत्रे संस्थेस दाखवून मोडून घेणे आवश्यक असते. अशी कोणतीही कागदोपत्री कारवाई तक्रारदाराने पूर्ण केलेली नाही. तक्रारदाराने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या रकमांची मागणी केलेली नाही. फेब्रुवारी 2008 पासून सामनेवाला क्र.3 ते 14 हे संस्थेवर संचालकपदावर नाहीत, त्यामुळे तक्रारदारांची रक्कम देण्यास ते जबाबदार राहू शकत नाहीत. तक्रारदाराने दाखल केलेली यादी दि.31/3/07 चे लेखी परिक्षणापूर्वीची असून तत्पूर्वीच प्रशासकाने संस्था ताब्यात घेतली. प्रशासकांना पक्षकार केलेले नाही. सबब प्रस्तुत प्रकरणास नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाचा बाध येतो. काही सामनेवालांविरुध्द तांत्रिक कारणास्तव पोलिस केसेस झालेल्या आहेत. त्याच गैरफायदा घेवून केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती मे मंचास केली आहे.
6. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ कोणतीही कागदपत्रे मंचासमोर हजर केलेली नाहीत.
7. तक्रारदाराची तक्रार, सामनेवालाचे म्हणणे व पुराव्यादाखल कागदपत्रे यांचा विचार करता सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे सामनेवालांचे ग्राहक होतात काय ? होय.
2. प्रस्तुतची तक्रार मुदतीत आहे काय ? होय.
3. प्रस्तुतचे तक्रारअर्जास नॉन जॉंइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाचा
बाध येतो काय ? नाही.
4. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? होय.
5. तक्रारदार ठेव रकमा व्याजासह व अन्य मागण्या मिळण्यास पात्र
आहे काय ? होय.
6. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
कारणे
मुद्दा क्र.1
8. तक्रारदाराने सामनेवाला पतसंस्थेत धनराशी दामदुप्पट योजना, भारतीय पेन्शन योजना या अंतर्गत ठेवी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवालांचे ठेवीदार ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2
9. तक्रारदारांनी ठेव रकमांची मागणी करुनही अद्यापपर्यंत प्रस्तुत रकमा अदा केलेल्या नाहीत. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये प्रस्तुत रकमा अदा केलेबाबत कथन केलेले नाही. सबब अद्यापही तक्रारदारांना सदर ठेव रकमा व्याजासहीत देणेच्या असल्यामुळे प्रस्तुत तक्रारीस सातत्याने कारण उद्भवत आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदारांचा रकमा जोपर्यंत अदा होत नाहीत, तोपर्यंत प्रस्तुत तक्रार मुदतीतच आहे असे म्हणावे लागेल. सबब प्रस्तुतची तक्रार मुदतीत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.3
10. सामनेवाला याने नॉन-जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाचा बाध येत आहे असा आक्षेप घेतला आहे. सदर संस्थेवर संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकांची नेमणूक झाली आहे याबाबतचा कोणताही पुरावा सामनेवालाने दिलेला नाही. तसेच प्रशासक हे सुध्दा संस्थेचे केवळ प्रतिनिधी असतात. तक्रारदाराने नमूद पतसंस्थेस सामनेवाला क्र.1 म्हणून समाविष्ट केलेले आहे. त्यामुळे जरी प्रशासकांना याकामी पक्षकार म्हणून समाविष्ट केले असते तरी केवळ ते प्रातिनिधीक स्वरुपात राहिले असते. यामध्ये मूळ संस्था पक्षकार असलेमुळे त्याअनुषंगाने येणारे प्रतिनिधी म्हणून प्रशासकांना समाविष्ट केले अथवा नाही केले तरी त्याचा प्रस्तुत तक्रारीच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही. सबब सामनेवालांचा सदरचा आक्षेप हे मंच फेटाळीत आहे व सदरची तक्रार या मंचास चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.4
11. तक्रारदाराने नि.39 वर सहकार कायदा कलम 88 चा चौकशीचा अहवाल दाखल केलेला आहे. सदर चौकशी अहवालामध्ये संचालकांच्या वैयक्तिक दायित्वाबाबत बराच ऊहापोह केलेला दिसून येतो. सदर अहवालाच्या पान 54 वर संबंधीत जबाबदार संचालकांची उत्तरदायित्वाची यादी दिलेली आहे. तसेच पान 56 वर त्याअनुषंगाने अंतिम आदेशही पारीत केलेला आहे. सदर आदेशानुसार नमूद संस्थेचे संचालक श्री संभाजी आनंदराव पाटील, संस्थेच्या अध्यक्षा सौ उषादेवी संभाजी पाटील, संस्थेचे व्यवस्थापक श्री गणपतराव नाना पाटील, संस्थेचे अंतर्गत तपासणीस श्री हणमंत विलास पाटील यांना वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार धरुन निश्चित केलेल्या रकमा तीन महिन्याच्या आत संस्थेत भरणा करणेबाबत आदेश केलेला आहे. तसेच संस्थेच्या सचिव सौ माधवी गोरक्ष पवार यांनी केलेल्या अपहाराची रक्कम रु.48,854/- आदेशीत तारखेपासून तीन महिन्याचे आत भरणेबाबत आदेश केलेला आहे. तसेच चौकशी खर्चासाठीही श्री संभाजी आनंदराव पाटील व सौ उषादेवी संभाजी पाटील यांना वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार धरलेले आहे.
प्रस्तुत प्रकरणी समाविष्ट असणारे पक्षकार सामनेवाला नं.4, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 या पक्षकारांना सदर चौकशी अहवालामध्ये वैयक्तिक जबाबदार धरलेले नाही तसेच त्यांचेवर कोणत्याही स्वरुपाची जबाबदारी निश्चित केल्याचे दिसून येत नाही. तसेच तक्रारदारांनी सामनेवाला क्र.7 यांना तत्कालीन मंचाच्या दि.2/2/12 च्या आदेशानुसार वगळलेले आहे. सबब दाखल पुराव्याचा विचार करता तक्रारदारांची आदेशीत रकमा देण्याची वैयक्तिक व संयुक्त जबाबदारी सामनेवाला क्र.1, 2, 3 व 5 यांचेवरच येते या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब वर नमूद उर्वरीत सामनेवालांच्या विरुध्द हे मंच कोणताही आदेश पारीत करीत नाही.
12. तक्रारदार क्र.1 व 2 हे पती-पत्नी आहेत. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार एकत्रितरित्या दाखल केली आहे. नि.5/2, 5/3, 5/4 व 5/5 प्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे खालील तपशीलाप्रमाणे ठेवी ठेवलेल्या होत्या.
अ.क्र. |
नाव |
रक्कम |
ठेवतारीख |
खाते/ पावती क्र. |
मुदत संपणेची तारीख |
मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1 |
पांडुरंग नारायण नलवडे |
40000 |
27/12/05 |
009257 |
28/12/11 |
80000 |
2 |
पांडुरंग नारायण नलवडे |
35000 |
29/9/05 |
008876 |
21/10/08 |
35000 |
3 |
सौ मंगल पांडुरंग नलवडे |
35000 |
29/9/05 |
008877 |
21/09/11 |
70000 |
4 |
पांडुरंग नारायण नलवडे |
8950 |
1/1/08 |
रिक.खाते क्र.755 |
1/1/08 |
8950 |
सामनेवाला क्र.3 व 5 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदारांनी कधीही ठेवीची मागणी त्यांचेकडे केली नव्हती असे कथन केले आहे. तसेच तक्रारदाराने मुदतपूर्व ठेवीची मागणी केली आहे मात्र त्यापुष्ठयर्थ सबळ कारणांसहीत लेखी अथवा मौखिक मागणी केलेली नाही. तक्रारदाराने ठेव मागणी केल्याबाबत धादांत खोटे कथन केले आहे. या सामनेवालांच्या म्हणण्याचा विचार करता तक्रारदार याने जरी मुदतपूर्व मागणी केली असली तरी सामनेवाला यांनी अद्यापपावेतो ठेव रकमा अदा केलेल्या नाहीत.
13. सदर वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीवर अंतिम आदेश पारीत होईपर्यंत प्रस्तुत ठेवींच्या मुदती संपलेल्या आहेत. सबब ठेव कालावधी पूर्ण झाल्यामुळे मुदतीनंतर पावती क्र.9257 आणि 8877 अन्वये मिळणा-या दामदुप्पट राशीच्या रकमा अनुक्रमे रु.80,000/- व रु.70,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच ठेवपावती क्र.8876 वरील मूळ ठेव रक्कम रु.35,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदर ठेवपावतीवर मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.35,000/- एवढीच नोंदविलेली आहे. तसेच व्याजदर देणेबाबत कोणताही तपशील नमूद नाही. यावरुन प्रस्तुत रक्कम बिनव्याजी मुदतीसाठी ठेवलेली दिसून येते. सदर तिनही ठेव रकमांवर अनुक्रमे 28/12/2011, 29/1/2011 व 21/10/2008 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईतोपावेतो सदर ठेवरकमांच्या मूळ मुद्दल रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्केप्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच रिकरिंग खाते क्र.755 वरील शिल्लक रक्कम रु.8,950/- व त्यावर दि.1/1/2008 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होइपर्यंत द.सा.द.शे. 4 टक्केप्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
14. सामनेवाला यांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे, त्यामुळे झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रकमा मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
सबब, खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला नं. 1, 2, 3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या वर नमूद
कलम 13 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मुदतीनंतर मिळणा-या ठेवरकमा तसेच दिले
निर्देशाप्रमाणे व्याज अदा करावे.
3. तक्रारदार यांना सामनेवाला नं. 1, 2, 3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या शारीरिक
आर्थिक, मानसिक ञासापोटी रुपये 5,000/- अदा करावेत.
4. तक्रारदार यांना सामनेवाला नं. 1, 2, 3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारीच्या
खर्चापोटी रुपये 2,000/- अदा करावेत.
5. जर सामनेवाला यांनी या आदेशाचे तारखेपूर्वी तक्रारदार यांना वर नमूद खात्यातील काही
रक्कम अदा केली असेल तर सदरची रक्कम वळती करुन घेण्याचा सामनेवाला यांचा हक्क
सुरक्षित ठेवण्यात येतो.
6. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत
करणेची आहे.
7. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 26/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष