नि.नं.४२
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १५०/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – २/०१/२००८
तक्रार दाखल तारीखः – ११/०२/२००८
निकाल तारीखः - १६/०८/२०११
----------------------------------------------
१. श्री रघुनाथ भाऊराव जाधव
वय वर्षे ६३, धंदा – पेन्शनर
२. सौ शकुंतला रघुनाथ जाधव
वय वर्षे ६०, धंदा – घरकाम
रा.घर नं.२९९, उदय चौक,
गणपती मंदिराशेजारी, ऊरण इस्लामपूर .... तक्रारदार
विरुध्द
१. भारतीय नागरी सह. पतसंस्था मर्या. इस्लामपूर
ता.वाळवा जि. सांगली
२. सौ उषादेवी संभाजी पाटील,(चेअरमन)
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
३. श्री संजय पांडुरंग पाटील,(व्हा.चेअरमन)
रा.इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी, इस्लामपूर,
४. श्री संभाजीराव आनंदराव पाटील,(संचालक)
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
५. सौ सुरेखा चंद्रकांत मगदूम, (संचालिका)
रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
(नि.४० वरील मंचाच्या आदेशानुसार वगळले.)
६. सौ. विजया गणपतराव पाटील, (संचालिका)
रा.शिराळा ता.शिराळा जि.सांगली
७. सौ रेखा जयकर पाटील,(संचालिका)
रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
८. सौ मंगल नागनाथ पाटील,(संचालिका)
रा. इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
९. श्री शिवाजी रंगराव पाटील, (संचालक)
रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
१०. सचिन आनंदा हांडे,(संचालक)
रा. शिवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
११. संतोष बजरंग पवार,(संचालक)
रा.महादेवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
१२. विनायक बाळकृष्ण लोले,(संचालक)
रा. पेठवडगांव, ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
१३. श्री आनंदा नारायण जाधव,(संचालक)
रा. ऊरण-इस्लामपूर, शिवाजी चौक,
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
जाबदार नं.२ ते १३ सर्व सज्ञान, धंदा-समाजसेवा ..... जाबदार
तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री बी.एम.पाटील
जाबदार क्र.१, ३, ६ ते ९, १२, १३ – एकतर्फा
जाबदार क्र. २, ४, १०, ११ – नो से
जाबदार क्र. ५ – वगळले.
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी अन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्या होत्या. यातील दोन्ही ठेवींच्या मुदती पूर्ण झाल्या आहेत. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण २ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. १, ३, ६ ते ९, १२, १३ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आले.
३. जाबदार क्र. २, ४, १० व ११ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी झालेवर ते विधिज्ञांमार्फत हजर झाले परंतु त्यांनी त्यांचे म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द नो से चा आदेश नि.१ वर करण्यात आला.
४. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.५ यांना नि.४० अन्वये दाखल करण्यात आलेल्या अर्जावरील मंचाच्या आदेशान्वये वगळणेत आले.
५. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.२, ३ व १० यांचेतर्फे म्हणणे दाखल करण्यात आले. परंतु जाबदार क्र.२ व १० यांचे विरुध्द त्यापूर्वीच नो से आदेश पारीत करण्यात आले होते तर जाबदार क्र.३ यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले होते. वस्तुत: सदरहू आदेश रद्द करुन घेवून तक्रारदारांनी त्यांचे म्हणणे दाखल करुन घेणे आवश्यक होते तथापि त्यांनी तसे केले नाही. सबब त्यांचेतर्फे दाखल करण्यात आलेले म्हणणे प्रस्तुत प्रकरणी विचारात घेण्यात आलेले नाही.
६. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २ ते १३ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या पतसंस्थेमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
७. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी मुदत ठेवपावती क्र.००१३८९ या क्रमांकाच्या पावतीमध्ये गुंतविण्यात आलेल्या रकमेची मागणी केलेली आहे. परंतु या ठेवपावतीच्या सत्यप्रतीचे अवलोकन करता त्यावर या क्रमांकाची मूळ ठेवपावती पोलिस निरिक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी तपासकामासाठी ताब्यात घेण्यात आलेली आहे असा शेरा दिसून येतो. त्यामुळे जोपर्यंत हे तपासकाम प्रलंबित आहे, तोपर्यंत या ठेवींतील रक्कम मंजूर करणे योग्य ठरणार नाही. तसेच सदरहू मूळ ठेवपावती पोलिसांमार्फत जप्त करतेवेळी ती नेमकी कोणाच्या ताब्यातून जप्त करण्यात आली, म्हणजेच या मूळ ठेवपावतीची निश्चित मालकी कोणाची आहे याचा खुलासा प्रस्तुत प्रकरणी होवू शकत नाही. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी या ठेवीतील रकमेची तक्रारदारांची मागणी नामंजूर करणेत येत आहे. मात्र तपासकाम पूर्ण झालेनंतर तक्रारदारांना या पावतीअन्वये गुंतविलेल्या रकमेबाबत दाद मागणेची मुभा राहील.
८. उर्वरीत ठेवपावतीवर तक्रारदारांना अद्यापी कोणत्याही प्रकारचे व्याज मिळाल्याचे ठेवीच्या मागील भागाचे अवलोकन केले असता दिसून येत नाही. सबब, या ठेवीत गुंतविलेली मूळ रक्कम ठेव ठेवल्या तारखेपासून पावतीवर नमूद व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.०११३९६ मधील रक्कम रु.४०,०००/- (चाळीस हजार फक्त) दि.१७/४/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११.५ टक्के व्याजासह अदा करावी.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (दोन हजार फक्त) अदा करावेत.
३. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.३०/९/२०११ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: १६/०८/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११