नि.नं. ५१
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ५४१/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – ०७/०५/२००८
तक्रार दाखल तारीखः – १६/०५/२००८
निकाल तारीखः - २१/१२/२०११
----------------------------------------------
श्री नामदेव बंडू चिवटे
व.व.७०, धंदा – शेती
रा.साखराळे, ता.वाळवा जि.सांगली .... तक्रारदार
विरुध्द
१. भारतीय नागरी सह.पतसंस्था मर्या. इस्लामपूर
२. उषादेवी संभाजी पाटील
वय व.३५, धंदा – नोकरी
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
३. श्री संभाजी आनंदराव पाटील
वय व.४२, धंदा – नोकरी
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
४. श्री संजय पांडुरंग पाटील
वय व.४२, धंदा – नोकरी
रा.इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी,
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
(मंचाचे दि.१/१२/११ चे आदेशानुसार वगळले.)
५. सौ. विजया गणपती पाटील
वय व.सज्ञान, धंदा – घरकाम,
रा.प्राध्यापक कॉलनी, शिराळा
ता.शिराळा जि.सांगली
६. सौ रेखा जयकर पाटील
धंदा – घरकाम, रा. ओझर्डे,
ता.वाळवा, जि. सांगली.
७. सौ मंगल नागनाथ पाटील
वय सज्ञान, धंदा – घरकाम,
रा.एम.ए.सी.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
८. शिवाजी रंगराव पाटील
वय व.४५, धंदा – शेती
रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
९. संतोष बजरंग पवार
वय व.४२, धंदा – शेती
रा.अनंतगंगा, महादेवनगर, इस्लामपूर,
ता.वाळवा, जि. सांगली.
१०. सौ सुरेखा चंद्रकांत मगदूम
रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
११. आनंदा नारायण जाधव
वय व.४०, धंदा – शेती
रा. शिवाजी चौक, ऊरण-इस्लामपूर,
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
१२ सचिन आनंदा हांडे
वय व.३०, धंदा – शेती
रा. शिवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
१३. विनायक बाळकृष्ण लोले, संचालक
वय व.सज्ञान, धंदा – शेती
रा.यादवनगर, पेठवडगांव,
ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
१४. दिपा बळवंत फाळके,
वय सज्ञान, धंदा – घरकाम
रा.विठ्ठलवाडी, ता.वाळवा जि.सांगली
१५. संभाजी बळवंत पडवळ
वय सज्ञान, धंदा – शेती
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे - +ìb÷. श्री यू.जे.चिप्रे
जाबदार क्र.१, ६ ते १३ व १५ – एकतर्फा
जाबदार क्र.२, ३ व ५ – नो से
जाबदार क्र. १४ – स्वत:
जाबदार क्र.४ – वगळले
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी अन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्या होत्या. यातील सर्व ठेवींच्या मुदती पूर्ण झाल्या आहेत. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ५ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. १, ६ ते १३ व १५ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर “ एकतर्फा” आदेश करण्यात आले. जाबदार क्र.२, ३ व ५ यांनी याकामी हजर होवूनही त्यांचे म्हणणे दाखल केले नाही. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर “ नो से ” आदेश करण्यात आले. जाबदार क्र.४ यांना मंचाचे दि.१/१२/११ चे आदेशान्वये प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात आले.
३. जाबदार क्र.१४ यांनी मंचाच्या नोटीसीची बजावणी त्यांचेवर झालेवर विधिज्ञांमार्फत हजर होवून त्यांचे म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल केले. त्यांचे म्हणण्यात त्यांनी तक्रारदारांनी जेव्हा जाबदार पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवल्या, तेव्हा त्या संस्थेमध्ये संचालक म्हणून कार्यरत नव्हत्या. तसेच त्या तक्रारदारांनी ठेव ठेवल्याच्या कालावधीमध्ये जाबदार पतसंस्थेच्या संचालिका असल्याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. आणि म्हणून त्यांना तक्रारदारांच्या ठेवींसाठी जबाबदार धरता येणार नाही असे नमूद केले आहे. मात्र सदरहू जाबदारांनी ज्या कालावधीमध्ये तक्रारदारांनी ठेवी ठेवल्या व त्या परत मागितल्या त्या कालावधीमध्ये त्या पतसंस्थेच्या संचालक नव्हत्या असेही या जाबदारांनी नमूद करुन त्यांच्या या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ संचालक मंडळाची सन १९९९ ते २००८ या कालावधीतील डी.डी.आर.कडील यादी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहे आणि या सर्वांचा विचार करुन सदरहू जाबदारांचा कसलाही संबंध नसताना त्यांचेविरुध्द तक्रार दाखल केल्याने त्यांना झालेले नुकसान म्हणून रक्कम रु.२,०००/- मिळावेत अशी विनंती या जाबदारांनी केली आहे. त्याचप्रमाणे त्यांना जो मानसिक त्रास झाला त्याकरिता म्हणून रक्कम रु.१०,०००/- ची मागणी देखील या जाबदारांनी केली आहे व त्यांच्या विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती करुन त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
४. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
नि.५०/१ अन्वये तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८८ व नियम ७२ अन्वये चौकशी अहवाल, निकालपत्र व आदेश दाखल केलेला आहे. हा चौकशी अहवाल, निकालपत्र व आदेश हा भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इस्लामपूर या संस्थेतील गैरव्यवहार, पैशाचा गैरवापर व अफरातफर या मुद्यांबाबत आहे. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर या संस्थेविरुध्द सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वर नमूद रिट पिटीशनमध्ये जो निष्कर्ष काढलेला आहे, त्यानुसार नि.५०/१ अन्वये दाखल करण्यात आलेला हा चौकशी अहवाल व त्याचा निकाल व आदेश प्रस्तुत प्रकरणी अत्यंत महत्वाचा ठरतो. या आदेशामध्ये सखोल चौकशी होवून संस्था संचालक संभाजी आनंदराव पाटील, संस्थेच्या अध्यक्षा सौ उषादेवी संभाजी पाटील म्हणजेच अनुक्रमे जाबदार क्र.३ व २ यांना वैयक्तिक व संयुक्तिकपणे संस्थेच्या गैरव्यवहारास जबाबदार धरण्यात आलेले आहे. त्यामुळे सन्मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाच्या वर नमूद आदेशानुसार व नि.५० अन्वये दाखल निकालपत्राच्या आधारे जाबदार क्र.२ व ३ हे तक्रारदारांच्या ठेवीस वैयक्तिक व संयुक्तिकपणे जबाबदार ठरतात असा मंचाचा स्पष्ट निष्कर्ष निघतो. नि.५०/१ अन्वये दाखल करण्यात आलेल्या चौकशी अहवाल, निकालपत्र व आदेशामध्ये तक्रारदारांनी नि.१ मध्ये नमूद केलेल्या अन्य जाबदारांना जबाबदार धरण्यात आलेले नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या ठेवींच्या जबाबदारीस जाबदार क्र.५ ते १५ यांना जबाबदार धरण्यात येत नाही. सबब, प्रस्तुत प्रकरणी केवळ जाबदार पतसंस्था किंवा पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी आणि जाबदार क्र.२ व ३ यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येते.
५. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी नि.४८/१ अन्वये ठेवपावत्यांच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. या सत्यप्रतींचे अवलोकन करता त्यातील केवळ दोन ठेवींवरती तक्रारदारांना काही कालावधीपर्यंतचे व्याज प्राप्त झाल्याचे दिसून येते. सबब, या ठेवींतील गुंतविण्यात आलेल्या रकमा व्याज मिळाल्याच्या दुस-या दिवशीपासून पावतीवर नमूद व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. ज्या ठेवींवर तक्रारदारांना व्याज प्राप्त झालेले नाही, त्यातील गुंतविण्यात आलेल्या रकमा ठेव ठेवल्या तारखेपासून पावतीवर नमूद व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी आणि जाबदार क्र.२ व ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ००९४४६ मधील रक्कम रु.५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) दि.१४/२/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११.५ टक्के व्याजासह अदा करावी.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी आणि जाबदार क्र.२ व ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ००९४४५ मधील रक्कम रु.५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) दि.१४/२/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११.५ टक्के व्याजासह अदा करावी.
३. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी आणि जाबदार क्र.२ व ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०१२०२७ मधील रक्कम रु.५४,०००/- (रुपये चोपन्न हजार फक्त) दि.६/१०/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १०.५ टक्के व्याजासह अदा करावी.
४. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी आणि जाबदार क्र.२ व ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०१२०२० मधील रक्कम रु.५३,०००/- (रुपये त्रेपन्न हजार फक्त) दि.२४/९/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११.५ टक्के व्याजासह अदा करावी.
५. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी आणि जाबदार क्र.२ व ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०११५८० मधील रक्कम रु.४१,०००/- (रुपये एक्केचाळीस हजार फक्त) दि.१४/६/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११.५ टक्के व्याजासह अदा करावी.
६. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी आणि जाबदार क्र.२ व ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (दोन हजार फक्त) अदा करावेत.
७. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.६/२/२०१२ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: २१/१२/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११