Maharashtra

Sangli

CC/09/1494

Sambhaji Dadoba Bhosale - Complainant(s)

Versus

Bharatiya Nag.Sah.Pat.Mar.Islampur - Opp.Party(s)

P.M.Maindargi

23 Nov 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/09/1494
 
1. Sambhaji Dadoba Bhosale
Islampur, Tal.Walva, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. Bharatiya Nag.Sah.Pat.Mar.Islampur
Bhartiya Uddyog Samuha, Bhartiya Agro Industries Pvt. Ltd., Tal.Walva, Dist.Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:P.M.Maindargi, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

                                           नि.नं. ३४
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
 
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
 
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १४९४/२००९
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख      ०२/०२/२००९
तक्रार दाखल तारीखः  १२/०२/२००९                
निकाल तारीखः      - २३/११/२०११
----------------------------------------------
 
१. श्री संभाजी दादोबा भोसले
    व.व.७०, धंदा शेती
२. सौ शोभा संभाजी भोसले
    व.व.६५, धंदा घरकाम
३. सौ स्‍नेहलता अजित भोसले
    व.व.३५, धंदा घरकाम
    रा.मु.पो.इस्‍लामपूर, ता.वाळवा जि.सांगली             .... तक्रारदार
विरुध्‍द
 
१. भारतीय नागरी सह.पतसंस्‍था मर्या. इस्‍लामपूर        
    रजी.नं.SAN/MVA/RSR/CR/1253
    ता.वाळवा जि. सांगली                        
 
    भारतीय उद्योग समूह
    भारतीय ग्री इंडस्‍ट्रीज प्रा.लि.
    (मंचाचे दि.२५/६/१० चे आदेशानुसार वगळले.)
 
२. भारतीय नागरी सह.पतसंस्‍था मर्या. इस्‍लामपूर
    उपशाखा
 
३. सौ उषादेवी संभाजीराव पाटील, चेअरमन
    रा.कापुसखेड नाका, ता.वाळवा जि.सांगली
 
४. श्री संजय पांडुरंग पाटील
    रा.इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी, इस्‍लामपूर,
    ता.वाळवा जि.सांगली
 
५. श्री संभाजीराव आनंदराव पाटील
    रा.कापुसखेड नाका, इस्‍लामपूर,
    ता.वाळवा जि.सांगली
 
६. सौ सुरेखा चंद्रकांत मगदूम
    रा.मु.पो.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्‍हापूर
 
७. सौ. विजया गणपतराव पाटील
    मु.पो. शिराळा ता.शिराळा जि.सांगली
 
८. सौ रेखा जयकर पाटील
    रा. मु.पो.ओझरडे, ता.वाळवा, जि. सांगली.
 
९. सौ मंगल नागनाथ पाटील, संचालक
    रा.एम.एस.सी.बी.जवळ, इस्‍लामपूर,
    ता.वाळवा जि.सांगली
 
१०. श्री शिवाजी रंगराव पाटील, संचालक
    रा.मु.पो.ओझरडे, ता.वाळवा, जि. सांगली.
 
११. सचिन आनंदराव हांडे, संचालक
    रा. इस्‍लामपूर, सिंहनगर, ता.वाळवा जि.सांगली
 
१२. श्री संतोष बजरंग पवार, संचालक
    रा.माधवनगर, इस्‍लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
 
१३. विनायक बाळकृष्‍ण लोले, संचालक
    मु.पो.पेठवडगांव, ता.हातकणंगले जि.कोल्‍हापूर
 
१४. आनंदा नारायण जाधव,
     मु.पो. ऊरण-इस्‍लामपूर, शिवाजी चौक,
     ता.वाळवा जि.सांगली        
 
 
१५. प्रशासक, भारतीय नागरी सह.पतसंस्‍था मर्या.
     इस्‍लामपूर, ता.वाळवा जि.सांगली                   ..... जाबदार
 
 
                      तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री पी.एम.मैंदर्गी
                      जाबदार क्र.१,,, ६ ते १५ एकतर्फा
                      जाबदार क्र. ३ व ५ तर्फे +ìb÷. श्री आर.बी.साळुंखे
 
   नि का ल प त्र
 
द्वारा- मा. सदस्‍या- गीता घाटगे
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने मुदत ठेव, बचत खाते व रिकरिंग खाते अन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार भारतीय नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. इस्‍लामपूर (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या. यातील सर्व ठेवींच्‍या मुदती पूर्ण झाल्‍या आहेत.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची पतसंस्‍थेकडे मागणी केली असता पतसंस्‍थेने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण १३ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. १,,, ६ ते १५ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होऊनसुध्‍दा ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्‍यांचेविरुध्‍द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्‍यात आले. जाबदार भारतीय उद्योग समूह व भारतीय ग्री इंडस्‍ट्रीज प्रा.लि. यांना मंचाचे दि.२५/६/१० चे आदेशान्‍वये प्रस्‍तुत प्रकरणा‍तून वगळण्‍यात आले.
 
३.    जाबदार क्र.३ व ५ यांनी मंचाच्‍या नोटीसीची बजावणी त्‍यांचेवर झालेवर विधिज्ञांमार्फत हजर होवून त्‍यांचे म्‍हणणे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले. त्‍यांचे म्‍हणण्‍यात त्‍यांनी तक्रारदारांच्‍या सर्व तक्रारी अमान्‍य केल्‍या आहेत. संस्‍थेवर प्रशासकाची नेमणूक झाल्‍याने ठेवीसाठी हे जाबदार जबाबदार ठरत नसल्‍याचे त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यात नमुद केले आहे. जाबदार पुढे असेही नमुद करतात की, मुळातच तक्रारदारांनी ठेवीतील रकमेबाबत पतसंस्‍था किंवा प्रशासकाकडे मागणी केल्‍याचे आढळून येत नसल्‍याने ती रक्‍कम नाकारुन त्‍यांना जाबदारांनी सदोष सेवा दिल्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. त्‍याचप्रमाणे सदरहू पतसंस्‍था ही महाराष्‍ट्र सहकारी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत संस्‍था असल्‍याने, या कायद्याअंतर्गत असलेल्‍या तरतुदीनुसार, तक्रारदारांनी जाबदारांना दावा दाखल करणेपूर्वी नोटीस देणे कायदयाने आवश्‍यक आहे. तथापि, तशी नोटीस जाबदारांना देणेत आलेली नाही. जाबदारांचे पुढे असेही म्‍हणणे आहे की, या पतसंस्‍थेच्‍या संचालकांविरुध्‍द फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे. तसेच सहकार कायदा कलम ८८ नुसार अद्यापी त्‍यांची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्‍यामुळे अशी वस्‍तुस्थिती असताना तक्रारदारांना तक्रार अर्ज दाखल करता येत नाही. या सर्व कारणांचा विचार करता जाबदारांनी तक्रारदारांना कोणत्‍याही प्रकारची सदोष सेवा दिलेली नाही आणि म्‍हणून तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी जाबदारांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यात विनंती केली आहे. या जाबदारांनी ठेवीच्‍या मुदती अपूर्ण असल्‍याने त्‍या प्रिमॅच्‍युअर असताना त्‍यातील रकमा तक्रारदारांना मागता येणार नाहीत असाही आक्षेपाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. 
      त्‍याचप्रमाणे तक्रारदारांनी दोन वेगवेगळया संस्‍थांना जाबदार म्‍हणून सामील करुन त्‍यांचेविरुध्‍द एकाच तक्रारअर्जात दाद मागितल्‍याने देखील तक्रारअर्ज नामंजूर होणेस पात्र ठरतो असे म्‍हणणे मांडले आहे. जाबदारांनी त्‍यांचे म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. 
 
४.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते. आणि म्‍हणून जाबदार क्र. ३ ते १४ यांना  पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही, तसेच जाबदार क्र.१५ यांची पतसंस्‍थेवर प्रशासक म्‍हणून नेमणूक झाली असल्‍याने त्‍यांनाही तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो. पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो. 
      जाबदारांनी दोन वेगवेगळया संस्‍थांना जाबदार म्‍हणून सामील करुन त्‍यांचेविरुध्‍द दाद मागितल्‍याने तक्रारअर्ज नामंजूर होणेस पात्र असल्‍याचाही आक्षेप घेतला आहे. तथापि तक्रारदारांनी भारतीय उद्योग समूह भारतीय ग्री इंडस्‍ट्रीज प्रायव्‍हेट लि. या संस्‍थेस प्रकरणातून वगळल्‍याने या मुद्याबाबत कोणताही ऊहापोह प्रस्‍तुत निकालपत्रात करणेत येत नाही.
 
५.  प्रस्‍तुत प्रकरणी दाखल मुदत ठेवपावत्‍यांचे अवलोकन केले असता त्‍यापैकी एका मुदत ठेवपावतीवर मुदतीनंतर परत मिळणा-या रकमेचा उल्‍लेख आहे. सबब सदरच्‍या ठेवीतील मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम ठेवीची मुदत संपलेनंतरचे दुसरे दिवशीपासून द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत तर ज्‍या ठेवींवर व्‍याजदर नमुद आहे व ज्‍या ठेवींवर तक्रारदारांना नि.३२ अन्‍वये दाखल व्‍याजनिवेदनानुसार व्‍याज प्राप्‍त झाले आहे, त्‍यातील रकमा त्‍यांना व्‍याज मिळाल्‍याच्‍या दुसरे दिवशीपासून पावतीवर नमूद व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत व ज्‍या ठेवींतील रकमांवर व्‍याज मिळाले नाही त्‍यातील रकमा ठेव ठेवल्‍या तारखेपासून पावतीवर नमूद व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत.  प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी काही रकमा पेन्‍शन ठेवीत गुंतविल्‍या आहेत त्‍यातील ज्‍या पावत्‍यांवर व्‍याजदर नमूद नाही, त्‍यातील रकमांवर द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याज मंजूर करण्‍यात येत आहेत. तसेच बचत खात्‍यातील व रिकरिंग खात्‍यातील शेवटच्‍या तारखेस शिल्‍लक असलेल्‍या रकमा त्‍या शेवटच्‍या तारखेपासून द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याज दराने मंजूर करण्‍यात येत आहेत. हे व्‍याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्‍या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्‍याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे.
 
६.    तक्रारदारांनी व्‍याजनिवेदनात बचत खाते क्र.१२४० मधील रकमेबाबतही नमूद केले आहे. तथापि या खात्‍यावरील रकमेची त्‍यांनी तक्रारअर्जात मागणी केलेली नाही. सबब यातील रकमेबाबत कोणतेही आदेश करण्‍यात आलेले नाहीत.
 
सबब, मंचाचा आदेश की,
 
दे
 
१. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ००६८४३ मधील रक्‍कम रु.३०,०००/- (रुपये तीस हजार फक्‍त) दि.२५/३/२०१० पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना पेन्‍शन ठेव पावत्‍या क्र. ००७५०३ मधील रक्‍कम रु.५०,०००/- (रुपये पन्‍नास हजार फक्‍त) दि.२/१२/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत प्रतिमाह रु.५००/- व्‍याजासह अदा करावी.
 
३. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना पेन्‍शन ठेव पावती क्र. ००८४८१ मधील रक्‍कम रु.३०,०००/- (रुपये तीस हजार फक्‍त) दि.२/१२/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
४. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०१२०२२ मधील रक्‍कम रु.१४,०००/- (रुपये चौदा हजार फक्‍त) दि.३/१०/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १०.५ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
५. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ०१२०७१ मधील रक्‍कम रु.२०,०००/- (रुपये वीस हजार फक्‍त) दि.१६/१०/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १०.५ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
६. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना पेन्‍शन ठेव पावती क्र. ०१२०२३ मधील रक्‍कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्‍त)दि.२/१२/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
७. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना पेन्‍शन ठेव पावती क्र. ०११८५९ मधील रक्‍कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्‍त) दि.२/१२/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
८. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ००८४८२ मधील रक्‍कम रु.३०,०००/- (रुपये तीस हजार फक्‍त) दि.२/१२/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
९. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना पेन्‍शन ठेव पावती क्र. ००७५०२ मधील रक्‍कम रु.५०,०००/- (रुपये पन्‍नास हजार फक्‍त) दि.२/१२/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१०. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना बचत खाते क्र. ७६ मधील रक्‍कम रु.३,७१८/- (रुपये तीन हजार सातशे अठरा फक्‍त) दि.२९/१२/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
११.  यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना बचत खाते क्र. ७५/८६ मधील रक्‍कम रु.७,८१६/- (रुपये सात हजार आठशे सोळा फक्‍त) दि.२९/१२/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१२. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना रिकरिंग खाते क्र. ७७८ मधील रक्‍कम रु.११,५००/- (रुपये अकरा हजार पाचशे फक्‍त) दि.१४/११/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१३. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
१४. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.८/१/२०१२ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांकò: २३/११/२०११    
 
 
                 (गीता सु.घाटगे)                      (अनिल य.गोडसे÷)
                 सदस्‍या                                     अध्‍यक्ष            
               जिल्‍हा मंच, सांगली                      जिल्‍हा मंच, सांगली.  
 
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.