नि.नं. ३०
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ९६५/२००९
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – २२/०१/२००९
तक्रार दाखल तारीखः – १०/०२/२००९
निकाल तारीखः - २३/०९/२०११
----------------------------------------------
१. श्री अर्जुन दत्तू शिवदास
२. सौ वनिता अर्जुन शिवदास
३. कु.शितल अर्जुन शिवदास
४. धनाजी अर्जुन शिवदास
५. दत्तू भाऊ शिवदास
सर्व रा. श्री दत्त निवास, मु.पो.ओगलेवाडी
ता.कराड जि. सातारा .... तक्रारदार
विरुध्द
१. भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
रजी.नंबर SAN/MVA/RSR/CR/1253
ता.वाळवा जि. सांगली
२. भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
३. सौ उषादेवी संभाजी पाटील,
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
४. श्री संजय पांडुरंग पाटील, संचालक
रा.इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी, इस्लामपूर,
ता.वाळवा
५. श्री संभाजीराव आनंदराव पाटील, संचालक
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
६. सौ सुरेखा चंद्रकांत मगदूम, संचालक
रा.मु.पो.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
७. सौ. विजया गणपती पाटील, संचालक
रा.मु.पो. शिराळा, ता.शिराळा जि.सांगली
(मंचाच्या दि.९/९/११ रोजीच्या आदेशान्वये वगळले)
८. सौ रेखा जयकर पाटील, संचालक
रा.मु.पो.ओझरडे, ता.वाळवा, जि. सांगली.
९. सौ मंगल नागनाथ पाटील, संचालक
रा.एम.एस.सी.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
१०. श्री शिवाजी रंगराव पाटील, संचालक
रा.ओझरडे, ता.वाळवा, जि. सांगली.
११. श्री सचीन आनंदराव हांडे, संचालक
रा.इस्लामपूर, सिंहनगर, ता.वाळवा जि. सांगली
१२. संतोष बजरंग पवार, संचालक
रा.माधवनगर, इस्लामपूर,
ता.वाळवा, जि. सांगली.
१३. श्री विनायक बाळकृष्ण लोले, संचालक
मु.पो.पेठ वडगांव, ता.हातकणंगले
जि.कोल्हापूर
१४. श्री आनंदा नारायण जाधव, संचालक
मु.पो. उरुण इस्लामपूर, शिवाजी चौक,
ता.वाळवा जि.सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री पी.एम.मैंदर्गी
जाबदार क्र.१, २, ४, ६, ८, ९, १०, ११, १२, १३, १४ – एकतर्फा
जाबदार क्र. ३ व ५ तर्फे – श्री आर.बी.साळुंखे
जाबदार क्र. ७ – वगळले.
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी अन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे मुदत ठेवीत रकमा गुंतविलेल्या होत्या. यातील सर्व ठेवींच्या मुदती पूर्ण झाल्या आहेत. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ९ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. १, २, ४, ६, ८, ९, १०, ११, १२, १३, १४ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आले.
३. जाबदार क्र.३ व ५ यांनी मंचाच्या नोटीसीची बजावणी त्यांचेवर झालेवर विधिज्ञांमार्फत हजर होवून त्यांचे म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल केले. त्यांचे म्हणण्यात त्यांनी तक्रारदारांच्या सर्व तक्रारी अमान्य केल्या आहेत. संस्थेवर प्रशासकाची नेमणूक झाल्याने ठेवीसाठी हे जाबदार जबाबदार ठरत नसल्याचे त्यांनी त्यांचे म्हणण्यात नमुद केले आहे. त्याच बरोबर संस्थेवर प्रशासक असूनही त्यांना या कामी जाबदार म्हणून सामिल केले नाही, म्हणून प्रस्तुत प्रकरणी नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाचा बाधा येते असेही नमूद केले आहे. जाबदार पुढे असेही नमुद करतात की, मुळातच तक्रारदारांनी ठेवीतील रकमेबाबत पतसंस्था किंवा प्रशासकाकडे मागणी केल्याचे आढळून येत नसल्याने ती रक्कम नाकारुन त्यांना जाबदारांनी सदोष सेवा दिल्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्याचप्रमाणे सदरहू पतसंस्था ही महाराष्ट्र सहकारी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत संस्था असल्याने, या कायद्याअंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार, तक्रारदारांनी जाबदारांना दावा दाखल करणेपूर्वी नोटीस देणे कायदयाने आवश्यक आहे. तथापि, तशी नोटीस जाबदारांना देणेत आलेली नाही. जाबदारांचे पुढे असेही म्हणणे आहे की, या पतसंस्थेच्या संचालकांविरुध्द फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे. तसेच सहकार कायदा कलम ८८ नुसार अद्यापी त्यांची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अशी वस्तुस्थिती असताना तक्रारदारांना तक्रार अर्ज दाखल करता येत नाही. या सर्व कारणांचा विचार करता जाबदारांनी तक्रारदारांना कोणत्याही प्रकारची सदोष सेवा दिलेली नाही आणि म्हणून तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी जाबदारांनी त्यांचे म्हणण्यात विनंती केली आहे. जाबदारांनी त्यांचे म्हणण्याचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
४. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. ३ ते १४ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या पतसंस्थेमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
५. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी दाखल केलेल्या ठेवपावत्या क्र.०१०६१८, ०१०६१७, ०१०६१२, ०१०६११, ०१०६१५ यांच्या मागील भागावर त्यांना दि.२९/६/२००७ पर्यंत व्याज देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सदरची बाब तक्रारदार यांनी नि.२६ ला दाखल केलेल्या व्याजनिवेदनामध्येही मान्य केली आहे. सबब या ठेवींतील गुंतविलेल्या रकमा दि.३०/६/२००७ पासून म्हणजेच व्याज मिळालेच्या दुस-या दिवसापासून ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.
६. मुदत ठेव पावत्या क्र.००१२६६ व ००१२६७ मधील रकमांची तक्रारदारांनी तक्रारअर्जात मागणी केलेली आहे. तथापि या ठेवपावत्यांच्या सत्यप्रतिंचे अवलोकन करता त्यावर “शाखास्टॅंड” इस्लामपूर असा शिक्का आढळून येतो. तक्रारअर्जात तक्रारदारांनी जाबदार क्र.१ म्हणून “भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर, रजी.नंबर SAN/MVA/RSR/CR/1253 ता.वाळवा जि. सांगली” व जाबदार क्र. २ म्हणून “भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर उपशाखा ” असे नमूद केले आहे. मात्र ही उपशाखा नेमकी कोणती आहे याचा उल्लेख करणेत आलेला नाही. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांच्या ठेवीतील रकमांसाठी सर्वस्वी पतसंस्थेलाच जबाबदार धरणेत आलेले आहे. या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुदत ठेवपावत्या क्र. ००१२६६ व ००१२६७ मध्ये गुंतविण्यात आलेल्या रकमा तक्रादारांना मंजूर करणे योग्य व न्याय्य होणार नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब या ठेवींतील रकमांबाबत प्रस्तुत निकालपत्रात कोणतेही आदेश करणेत येत नाहीत. मात्र योग्य त्या शाखेचा स्पष्ट उल्लेख करुन तिला जाबदार म्हणून सामील करुन या ठेवींतील रकमांबाबत दाद मागणेची मुभा तक्रारदारांना राहील.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेवपावत्या क्र.०१०६१८, ०१०६१७, ०१०६१२, ०१०६११, ०१०६१५ मधील रक्कम प्रत्येकी रु.१,००,०००/- (एक लाख फक्त) दि.३०/६/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्के व्याजासह अदा करावी.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (दोन हजार फक्त) अदा करावेत.
३. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.८/११/२०११ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: २३/०९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११