नि. २५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.६००/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २७/१२/२०१०
तक्रार दाखल तारीख : ०३/०२/२०११
निकाल तारीख : ०८/०२/२०१२
-------------------------------------------
श्री दत्तात्रय महादेव सोकाशी (पाटील)
वय – ६०, धंदा – सेवानिवृत्त
रा.शितल, दत्तवसाहत, आष्टा,
ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. प्रशासक, भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
२. उषादेवी संभाजी पाटील,
वय वर्षे – ३६, धंदा – नोकरी,
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
३. संजय पांडुरंग पाटील,
वय वर्षे – ४२, धंदा – नोकरी,
रा.इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी, रा.इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
४. संभाजी आनंदराव पाटील,
वय वर्षे – ४३, धंदा – नोकरी,
रा.कापुसखेड, ता.वाळवा जि.सांगली
५. विजया गणपती पाटील,
वय वर्षे – ६२, धंदा – घरकाम,
रा.प्राध्यापक कॉलनी, शिराळा ता.शिराळा जि.सांगली
६. रेखा जयकर पाटील,
वय वर्षे – ४०, धंदा – घरकाम,
रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
७. सुरेखा चंद्रकांत मगदूम,
वय वर्षे – ३८, धंदा – नोकरी,
रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
८. शिवाजी रंगराव पाटील,
वय वर्षे – ६२, धंदा – शेती,
रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
९. आनंदा नारायण जाधव,
वय वर्षे – ४१, धंदा – नोकरी,
रा. शिवाजी चौक, ऊरण-इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
१०. मंगल नागनाथ पाटील,
वय वर्षे – ३९, धंदा – शेती व घरकाम,
रा.कापूसखेड ता.वाळवा जि.सांगली
११. सचिन आनंदा हांडे
वय वर्षे – ३६, धंदा – शेती/व्यवसाय,
रा. शिवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
१२. संतोष बजरंग पवार,
वय वर्षे – ३२, धंदा – नोकरी,
रा. महादेवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
१३. विनायक बाळकृष्ण लोले,
वय वर्षे – ४०, धंदा – शेती/व्यवसाय,
रा. पेठवडगांव, ता.हातकणंगले जि.कोल्हापूर ..... जाबदार
तक्रारदारú तर्फेò : +ìb÷.ए.ए.पितांबरे
जाबदार क्र.१ ते १३ : एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा.अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी अन्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर यांचेकडे मुदतठेवी अंतर्गत रक्कम गुंतविली होती. तक्रारदार यांच्या मुदत ठेवीची रक्कम मागणी करुनही जाबदार यांनी अदा केली नाही. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.४ अन्वये एकूण ३० कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.१ ते १३ यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
३. तक्रारदारांनी त्यांची रक्कम जाबदार पतसंस्थेमध्ये गुंतविल्याबाबतच्या ठेवपावत्यांच्या सत्यप्रती नि.४ चे यादीने दाखल केल्या आहेत. यापैकी ठेवपावत्यांचे प्रतींचे अवलोकन केले असता ठेवपावती क्र.२३२५, २८०१, १४३४, ११२५ या ठेवपावत्या या तक्रारदार श्री दत्तात्रय महादेव सोकाशी यांचे नावाच्या आहेत. परंतु उर्वरीत ठेवपावत्या या सौ दिपा दत्तात्रय सोकाशी, संदीप दत्तात्रय सोकाशी, शितल दत्तात्रय सोकाशी यांचे नावच्या आहेत. सदर पावत्यांवर नमूद असलेल्या सौ दिपा दत्तात्रय सोकाशी, संदीप दत्तात्रय सोकाशी, शितल दत्तात्रय सोकाशी यांना तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी सामील पक्षकार केलेले नाही. तक्रारदार यांनी नि.४/२७ व ४/२८ ला सौ दिपा दत्तात्रय सोकाशी, संदीप दत्तात्रय सोकाशी, शितल दत्तात्रय सोकाशी यांनी लिहून दिलेले मुखत्यारपत्र दाखल केलेले आहे. परंतु ज्यांच्या नावे ठेवपावत्या आहेत त्यांना प्रस्तुत प्रकरणी आवश्यक पक्षकार म्हणून सामील करणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी त्यांना आवश्यक पक्षकार म्हणून सामील न केल्याने सौ दिपा दत्तात्रय सोकाशी, संदीप दत्तात्रय सोकाशी, शितल दत्तात्रय सोकाशी यांच्या नावे असलेल्या ठेवपावत्या प्रस्तुत प्रकरणी विचारात घेण्यात आलेल्या नाहीत. तथापि, तक्रारदार यांना आवश्यक त्या पक्षकारांना सामील करुन योग्य त्या कायदेशीर मुदतीत सदर ठेवपावत्यांचे रकमेबाबत दाद मागण्याची मुभा देण्यात येत आहे. तक्रारदार यांचे नावे असलेल्या ठेवपावत्यांच्या प्रतींचे अवलोकन केले असता ठेवपावती क्र.००२३२५ व ००२८०१ या ठेवपावत्यांची मुदत पूर्ण झाली आहे. सदरचे ठेवपावत्यांवर तक्रारदारांना काहीही व्याज मिळाले नाही असे तक्रारदारांनी त्यांचे व्याजनिवेदनामध्ये नमूद केले आहे. सबब सदरचे ठेवपावत्यांवरील रक्कम ठेव ठेवल्याचे तारखे पासून ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या ११ टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे. ठेवपावती क्र.००१४३४ व ००११२५ या ठेवपावत्यांची मुदत पूर्ण झाली आहे. सदरचे ठेवपावत्यांवर तक्रारदारांना व्याजाची काही रक्कम मिळाली आहे परंतु दि.१/११/०७ पासून व्याजाची रक्कम मिळाली नाही असे तक्रारदारांनी त्यांचे व्याजनिवेदनामध्ये नमूद केले आहे. सबब ठेवपावती क्र.१४३४ ची रक्कम दि.१/११/०७ पासून ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे १३ टक्के दराने व्याजासह मंजूर करण्यात येत आहे. ठेवपावती क्र.११२५ वर कोणताही व्याजाचा दर नमूद नाही परंतु सदर पावतीवर दरमहा रु.३००/- प्रमाणे व्याज देण्याचे नमूद आहे. सबब सदरची रक्कम दि.०१/११/०७ पासून मंजूर करण्यात येत आहे व सदर पावतीवर दरमहा रु.३००/- प्रमाणे व्याज देणेचा आदेश करण्यात येतो.
४. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार जाबदार संस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २ ते १३ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. रकमेची मागणी करुनही ती न देवून जाबदार संस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या पतसंस्थेमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो. जाबदार क्र.१ हे जाबदार पतसंस्थेवर नेमण्यात आलेले प्रशासक आहेत. सबब त्यांनाही तक्रारदारांचे ठेवपावतीसाठी जबाबदार धरण्यात येत नाही.
५. तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्कम मिळण्यासाठी या न्यायमंचात धाव घ्यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्यामुळे सदरची मागणी अंशत: मान्य करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार क्र.१ संस्था व संस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००२३२५ वरील रक्कम रु.१,०००/- (रुपये एक हजार फक्त) व या रकमेवर दि.२३/१०/२००६ पासून द.सा.द.शे. ११% दराने व्याज अदा करावे.
२. यातील जाबदार क्र.१ संस्था व संस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००२८०१ वरील रक्कम रु.३०,०००/- (रुपये तीस हजार फक्त) व या रकमेवर दि.३१/१०/२००७ पासून द.सा.द.शे.११% दराने व्याज अदा करावे.
३. यातील जाबदार क्र.१ संस्था व संस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००१४३४ वरील रक्कम रु.२५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त) व या रकमेवर दि.१/११/२००७ पासून द.सा.द.शे. १३% दराने व्याज अदा करावे.
४. यातील जाबदार क्र.१ संस्था व संस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००११२५ वरील रक्कम रु.२१,५००/- (रुपये एकवीस हजार पाचशे फक्त) व या रकमेवर दि.१/११/२००७ पासून दरमहा रक्कम रु.३००/- प्रमाणे व्याज अदा करावे.
५. यातील जाबदार क्र.१ संस्था व संस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
६. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.२३/३/२०१२ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: ०८/०२/२०१२
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.