Maharashtra

Sangli

CC/09/969

Ananda Kisan Shinde etc.7 - Complainant(s)

Versus

Bharatiya Nag.Sah.Pat.Mar. etc.14 - Opp.Party(s)

23 Sep 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/09/969
 
1. Ananda Kisan Shinde etc.7
Ratnanand Banglow, Siddhivinayak Society, Mala Ward, Station Road, Ogalewadi, Tal.Karad, Dist.Satara
...........Complainant(s)
Versus
1. Bharatiya Nag.Sah.Pat.Mar. etc.14
Islampur, Tal.Walva, Dist.Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                           नि.नं. २९
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
 
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
 
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ९६९/२००९
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख      २२/०१/२००९
तक्रार दाखल तारीखः  ३१/०१/२००९                
निकाल तारीखः      - २३/०९/२०११
----------------------------------------------
 
१. आनंदा किसन शिंदे
२. रत्‍नाबाई आनंदा शिंदे
३. विष्‍णु आनंदा शिंदे
४. वृषाली विष्‍णु शिंदे
५. विलास कृष्‍णा ननावरे
६. वंदना विलास ननावरे
७. ताई दत्‍तू शिवदास
सर्व रा. रत्‍नानंद बंगला, सिध्‍दीविनायक सोसायटी,
मळा वॉर्ड, स्‍टेशन रोड, मु.पो. ओगलेवाडी
ता. कराड जि.सातारा                                .... तक्रारदार
विरुध्‍द
 
१. भारतीय नागरी सह.पतसंस्‍था मर्या. इस्‍लामपूर
    रजी.नं.SAN/MVA/RSR/CR/1253
       ता.वाळवा जि.सांगली
 
२. भारतीय नागरी सह.पतसंस्‍था मर्या. इस्‍लामपूर
    उपशाखा
 
३. सौ उषादेवी संभाजीराव पाटील, चेअरमन, संचालक
    रा.कापुसखेड नाका, ता.वाळवा जि.सांगली
 
 
४. श्री संजय पांडुरंग पाटील, संचालक
    रा.इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी, इस्‍लामपूर,
    ता.वाळवा जि.सांगली
 
५. श्री संभाजीराव आनंदराव पाटील, संचालक
    रा.कापुसखेड नाका, इस्‍लामपूर,
    ता.वाळवा जि.सांगली
 
६. सौ सुरेखा चंद्रकांत मगदूम, संचालक
    रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्‍हापूर
 
७. सौ. विजया गणपतराव पाटील, संचालक
    रा.मु.पो. शिराळा ता.शिराळा जि.सांगली
    (मंचाचे दि.९/९/११ चे आदेशानुसार वगळले.)
 
८. सौ रेखा जयकर पाटील, संचालक
    रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
 
९. सौ मंगल नागनाथ पाटील, संचालक
    रा.एम.एस.सी.बी.जवळ, इस्‍लामपूर,
    ता.वाळवा जि.सांगली
 
१०. श्री शिवाजी रंगराव पाटील, संचालक
   रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
 
११. सचिन आनंदराव हांडे, संचालक
    रा. इस्‍लामपूर, सिंहनगर, ता.वाळवा जि.सांगली
 
१२. श्री संतोष बजरंग पवार, संचालक
    रा.माधवनगर, इस्‍लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
 
१३. विनायक बाळकृष्‍ण लोले, संचालक
    रा. पेठवडगांव, ता.हातकणंगले जि.कोल्‍हापूर
 
१४. आनंदा नारायण जाधव,
     रा. ऊरण-इस्‍लामपूर, शिवाजी चौक,
     ता.वाळवा जि.सांगली                              ..... जाबदार
 
 
                                       
                      तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री पी.एम.मैंदर्गी
                      जाबदार क्र.१,,, ६ व ८ ते १४ एकतर्फा
                      जाबदार क्र. ३ व ५ तर्फे श्री आर.बी.साळुंखे
                      जाबदार क्र. ७ वगळले.
 
 
   नि का ल प त्र
 
द्वारा- मा. अध्‍यक्ष अनिल य. गोडसे
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने मुदत ठेवी अन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार भारतीय नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. इस्‍लामपूर (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे मुदत ठेवीअन्‍वये रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या. यातील सर्व ठेवींच्‍या मुदती पूर्ण झाल्‍या आहेत.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची पतसंस्‍थेकडे मागणी केली असता पतसंस्‍थेने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण १० कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. १,,, ६ व ८ ते १४ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होऊनसुध्‍दा ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्‍यांचेविरुध्‍द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्‍यात आले. जाबदार क्र.७ यांना मंचाचे दि.९/९/११ चे आदेशान्‍वये प्रस्‍तुत प्रकरणातून वगळण्‍यात आले.
 
३.    जाबदार क्र.३ व ५ यांनी मंचाच्‍या नोटीसीची बजावणी त्‍यांचेवर झालेवर विधिज्ञांमार्फत हजर होवून त्‍यांचे म्‍हणणे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले. त्‍यांचे म्‍हणण्‍यात त्‍यांनी तक्रारदारांच्‍या सर्व तक्रारी अमान्‍य केल्‍या आहेत. संस्‍थेवर प्रशासकाची नेमणूक झाल्‍याने ठेवीसाठी हे जाबदार जबाबदार ठरत नसल्‍याचे त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यात नमुद केले आहे त्‍याच बरोबर संस्‍थेवर प्रशासक असूनही त्‍यांना या कामी जाबदार म्‍हणून सामिल केले नाही, म्‍हणून प्रस्‍तुत प्रकरणी नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्‍वाचा बाधा येते असेही नमूद केले आहे. जाबदार पुढे असेही नमुद करतात की, मुळातच तक्रारदारांनी ठेवीतील रकमेबाबत पतसंस्‍था किंवा प्रशासकाकडे मागणी केल्‍याचे आढळून येत नसल्‍याने ती रक्‍कम नाकारुन त्‍यांना जाबदारांनी सदोष सेवा दिल्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. त्‍याचप्रमाणे सदरहू पतसंस्‍था ही महाराष्‍ट्र सहकारी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत संस्‍था असल्‍याने, या कायद्याअंतर्गत असलेल्‍या तरतुदीनुसार, तक्रारदारांनी जाबदारांना दावा दाखल करणेपूर्वी नोटीस देणे कायदयाने आवश्‍यक आहे. तथापि, तशी नोटीस जाबदारांना देणेत आलेली नाही. जाबदारांचे पुढे असेही म्‍हणणे आहे की, या पतसंस्‍थेच्‍या संचालकांविरुध्‍द फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे. तसेच सहकार कायदा कलम ८८ नुसार अद्यापी त्‍यांची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्‍यामुळे अशी वस्‍तुस्थिती असताना तक्रारदारांना तक्रार अर्ज दाखल करता येत नाही. या सर्व कारणांचा विचार करता जाबदारांनी तक्रारदारांना कोणत्‍याही प्रकारची सदोष सेवा दिलेली नाही आणि म्‍हणून तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी जाबदारांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यात विनंती केली आहे. जाबदारांनी त्‍यांचे म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. 
 
४.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. ३ ते १४ यांना  पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने ज्‍या पतसंस्‍थेमध्‍ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो.
                                                   
५.    सदरचे तक्रारअर्जामध्‍ये तक्रारदार यांनी तक्रारदार हे एकाच कुटुंबातील व्‍यक्‍ती असल्‍याने प्रस्‍तुत तक्रारअर्ज एकत्रित स्‍वरुपात दाखल केला आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जाच्‍या पुष्‍ठयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार हे एका कुटुंबातील आहेत असे तक्रारदार यांनी तक्रारअर्जात नमूद केलेने सदर तक्रारदार यांचा एकत्रित केलेला तक्रारअर्ज विचारात घेण्‍यात येतो. 
 
६.    प्रस्‍तुत प्रकरणी दाखल मुदत ठेव पावती क्र. १०६२०, १०६०६ व १४५४ या मुदत ठेवीतील रकमेवर तक्रारदारांना दि.२९/६/२००७ पर्यंतचे व्‍याज प्राप्‍त झाले आहे असे ठेवपावतीच्‍या मागील भागावरील नोंदीवरुन समजून येते. सदरची बाब तक्रारदार यांनी नि.२५ वर दाखल केलेल्‍या व्‍याजनिवेदनामध्‍ये मान्‍य केली आहे. सबब या तीन ठेवींमधील रक्‍कम व्‍याज मिळालेल्‍या दुस-या दिवशीपासून पावतीवर नमूद व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहे. 
प्रस्‍तुत प्रकरणी दाखल अन्‍य ठेवपावत्‍यांचे सत्‍यप्रतींचे अवलोकन करता तक्रारदारांना ठेवींत गुंतविलेल्‍या रकमांवर कोणतेही व्‍याज मिळाल्‍याचे दिसून येत नाही. ठेवींच्‍या मुदतीही पूर्ण झालेल्‍या आहेत. सबब या सर्व ठेवींतील मुदतीनंतर मिळणा-या रकमा ठेव ठेवल्‍याचे तारखेपासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत पावतीवर नमूद व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहे. ठेवपावती क्र.०११६५४ वर व्‍याजाचा दर नमूद नाही. सबब सदरचे ठेवपावतीमधील रक्‍कम द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह मंजूर करणेत येत आहे. हे व्‍याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्‍या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्‍याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे.
 
सबब, मंचाचा आदेश की,
 
दे
 
१. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००२०७३ मधील रक्‍कम रु.१,००,०००/- दि.१/६/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१२ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. ००२१०६, ००२१०७, ००२१०८, ००२१०९ मधील रकमा प्रत्‍येकी रक्‍कम रु.१,०००/-दि.८/८/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१२ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
३. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावत्‍या क्र. १०६२० मधील रक्‍कम रु.१,००,०००/- दि.३०/६/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१२ टक्‍के व्‍याजासह अदा कराव्‍यात.
 
४. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावत्‍या क्र. १०६०६ मधील रक्‍कम रु.१,००,०००/- दि.३०/६/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१२ टक्‍के व्‍याजासह अदा कराव्‍यात.
 
५. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावत्‍या क्र. १४५४ मधील रक्‍कम रु.१,५०,०००/- दि.३०/६/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१२ टक्‍के व्‍याजासह अदा कराव्‍यात.
 
६. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.०११६५४ मधील रक्‍कम रु.१,००,०००/- दि.७/७/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
७. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
८. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.८/११/२०११ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांकò: २३/०९/२०११    
 
                  (गीता सु.घाटगे)                     (अनिल य.गोडसे÷)
                       सदस्‍या                                       अध्‍यक्ष           
                          जिल्‍हा मंच, सांगली                      जिल्‍हा मंच, सांगली.  
 
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.