Maharashtra

Bhandara

CC/19/73

JUGALKISHOR TARACHAND GABHANE - Complainant(s)

Versus

BHARATIYA JIVAN VIMA NIGAM - Opp.Party(s)

MR.SUKHDEOSING J. CHAUHAN

27 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/19/73
( Date of Filing : 26 Jun 2019 )
 
1. JUGALKISHOR TARACHAND GABHANE
KHAT. TAH DIST NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BHARATIYA JIVAN VIMA NIGAM
TROUGH THE MANAGER BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:MR.SUKHDEOSING J. CHAUHAN, Advocate
For the Opp. Party:
Dated : 27 Jan 2020
Final Order / Judgement

                                        (पारीत व्‍दारा  श्री. भास्‍कर बी. योगी, अध्‍यक्ष)

                                                                                                 (पारीत दिनांक–27 जानेवारी, 2020)

   

01.  तक्रारदाराने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम विमा कंपनी विरुध्‍द दाखल केलेली असून तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, तक्रारकर्ता हा सन 2013 ला विद्युत सहाय्यक म्‍हणून महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी येथे कार्यरत असतांना विरुध्‍दपक्ष विमा कंपनीच्‍या शाखेतुन न्‍यु जिवन आनंद टेबल क्रं. 815 (लाभासहित) विमा पॉलीसी काढली होती तिचा पॉलीसी क्रंमाक 979010053 व दिनांक 24/02/2015 असा असुन त्‍या पॉलीसीचा प्रिमीयम हप्‍ता रुपये 12,502/- चा भरणा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे जमा केला होता.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले आहे की, त्‍याची बदली कल्‍याण झोन, सर्कल पेन, विभागीय कार्यालय, रोहा, उपविभाग कार्यालय, मुरुड, जंजीरा, सेक्‍शन कार्यालय नांदगाव येथे झाली होती व सदर विभागात कर्तव्‍य करीत असतानां दिनांक 15/06/2015 रोजी तक्रारकर्त्‍याला विजेचा धक्‍का लागल्‍याने तो चाळीस फुट उंचीच्‍या विद्युत खांबावरुन पाठीच्‍या भारावर खाली पडल्‍यामुळे पाठीच्‍या मनक्‍यात गंभीर दुखापत झाल्‍यामुळे त्‍याच्‍या संपूर्ण शरीराच्‍या भागात अंपगत्‍व आले. त्‍याकरीता तक्रारकर्त्‍यास शासकीय रुग्‍णालय अलीबाग (रायगड) येथे नेण्‍यात आले, परंतु तक्रारदाराची स्थिती अतिशय नाजुक असल्‍यामुळे त्‍याला त्‍वरीत उन्‍नती हॉस्‍पीटल, पनवेल येथे डॉक्‍टर गणेश हांडे यांच्‍या कडे हलविण्‍यात आल्‍यानंतर त्‍याची एम. आर. आय. व इतर तपासण्‍या करुन त्‍यांनी कळविले की, ‘’लेवल सी-6 व सी-7 हे मणके पुर्णपणे मोडल्‍या गेलेले असून मणक्‍याला व स्‍पॅनल कॉडला इजा झाली आहे व त्‍यामुळे त्‍याचे पुर्ण शरीराची हालचाल करता येत नसल्‍यामुळे त्‍याला पुर्ण अंपगत्‍व आल्‍यामुळे डॉक्‍टरांनी दिनांक 17/06/2015 रोजी शस्‍त्रक्रिया केली व दोन महिने सदरहु दवाखान्‍यात भरती राहावे लागले. सदरची शस्‍त्रक्रिया केल्‍यानंतरही तक्रारकर्त्‍याच्‍या प्रकृतीमध्‍ये कोणतीही सुधारणा झाली नाही, म्‍हणून त्‍याला मानकेअर हॉस्‍पीटल, हडपसर येथे हलविण्‍यात आले, परंतु तेथेही कोणतीही सुधारणा झाली नसल्‍यामुळे शेवटी त्‍याला घरी आणण्‍यात आले.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याने ज्‍या अभिकर्त्‍याकडून विमा पॉलीसी काढली होती ते अभिकर्ता श्री. अनिल धावडे यांनी सांगितले की, पॉलिसीचे लाभ मिळण्‍या करीता त्‍याला जिल्‍हा शासकीय रुग्‍णालय, भंडारा येथून कायम अंपगत्‍वाचा दाखला मिळविणे गरजेचे आहे. त्‍यानुसार त्‍याने जिल्‍हा शासकीय रुग्‍णालय, भंडारा येथे दाखला मिळण्‍याकरीता अर्ज केल्‍यानंतर त्‍याला दिनांक 20/06/2017 रोजी जिल्‍हा शासकीय रुग्‍णालय, भंडारा यांनी दाखला दिल्‍यानंतर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे विमा दावा अर्ज सादर केला. सदरच्‍या विमा दावा अर्जावर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक 25/06/2018 रोजी उत्‍तर देऊन कळविले की, तक्रारकर्त्‍यास अपघाता नंतर 180 दिवसाचे आत कायमस्‍वरुपी अंपगत्‍व न आल्‍यामुळे विम्‍याचे लाभ देय नाही.  त्‍यानंतर त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयातील अधिकारी यांची भेट घेऊन विमा दावा मंजूर करण्‍याची विनंती केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे  त्‍याने पत्र व्‍यवहारही केला, परंतु त्‍याला कोणतेही समाधानकारक उत्‍तर मिळाले नाही. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने अपघाता नंतर सुध्‍दा विमा पॉलीसीपोटी सन 2016 व 2017 चे हप्‍ते सुध्‍दा स्विकारलेले आहेत. त्‍याने संपूर्ण दस्‍ताऐवजांची पुर्तता केल्‍यानंतरही विरुध्‍दपक्षाने विमा क्‍लेम दिला नाही.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, दिनांक 15/06/2015 रोजी त्‍याचा अपघात झाला व  वयाच्‍या 22 व्‍या वर्षी त्‍याला कायम अपंगत्‍व प्राप्‍त झाल्‍यामुळे पैशाची अंत्‍यत गरज असतांना विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा क्‍लेम न दिल्‍यामुळे शेवटी त्‍याने वकीलामार्फत कायदेशीर नोटीस दिनांक 14/06/2019 रोजी पाठवून विमा दाव्‍याचे रकमेची व्‍याजासह मागणी केली परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने नोटीसचे उत्‍तरही दिले नाही.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची सदरची कृती ही त्‍यांचे सेवेतील त्रुटी असल्‍यामुळे त्‍याला अतिशय मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन  विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍द खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.

 1)  विरुध्‍दपक्ष यांना आदेशीत करावे की, त्‍यांनी न्‍यु जिवन आनंद (लाभासहित) पॉलीसी क्रंमाक 979010053  चे संपूर्ण क्‍लेम पॉलीसी रक्‍कम रुपये 7,50,000/- 10 वर्षेपर्यंत प्रत्‍येक महिन्‍याला येणारी रक्‍कम रुपये 6,250/ दरमहा अपघाताच्‍या तारखेपासून 15/06/2015 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला दयावी तसेच अपघात दिनांक 15/06/2015 नंतर त्‍याने विमा हप्‍त्‍यापोटी भरलेली संपूर्ण रक्‍कम रुपये 39,651/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासहीत दिनांक 15/06/2015 पासून तक्रारदारास परत करावी.

2)   विरुध्‍दपक्षाच्‍या सेवेतील त्रृटीमुळे व निष्‍काळजीपणामुळे तक्रारदाराला झालेल्‍या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासाकरीता 1,00,000/-  व सदर तक्रारीचा खर्च रुपये 50,000/- देण्‍याचे आदेश व्‍हावे.

02.   प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये विरुध्‍दपक्ष यांना मंचाची नोटीस बजावण्‍यात आली. विरुध्‍दपक्ष यांनी हजर होवून आपले लेखी उत्‍तर सादर करुन त्‍यात असे नमुद केले की, विरुध्‍द पक्ष विमा कंपनीच्‍या शाखेतुन न्‍यु जिवन आनंद (लाभासहित) पॉलीसी क्रंमाक 979010053 व दिनांक 24/02/2015 विमा पॉलीसी काढली होती व विमा हप्‍ता रुपये 12,502/- चा भरणा विरुध्‍दपक्ष यांचेकडे जमा केला होता ही बाब मान्‍य केली. तक्रारकर्त्‍याला दिनांक 20/06/2017 रोजी जिल्‍हा शासकीय रुग्‍णालय, भंडारा यांनी कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍या बाबत दाखला दिला ही अभिलेखावरील बाब आहे. विरुध्‍दपक्षाने पुढे असे नमुद केले की, पॉलीसी मधील अटी व शर्तीनुसार अपघात दिनांका नंतर 180 दिवसांचे आत कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आले पाहिजे त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा क्‍लेम नाकारला आहे आणि तशा आशयाचे पत्र विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक 25/06/2018 रोजी तक्रारकर्त्‍याला दिले आहे.

      विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, त्‍यांनी विमा पॉलीसीपोटी सन 2016 व 2017 चे हप्‍ते सुध्‍दा स्विकारलेले आहेत. पॉलीसीतील अटी व शर्तीनुसार पॉलीसी रक्‍कम रुपये 7,50,000/- 10 वर्षापर्यत प्रत्‍येक महिन्‍याला दरमहा रुपये 6,250/-  घटनेच्‍या तारखेपासून देण्‍यात यायला हवे होते हे  तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे विरुध्‍दपक्ष विमा कंपनी पुर्णपणे नाकारत आहे. तक्रारदाराने किमान 3 वर्षे पॉलीसी सुरु ठेवल्‍यास विरुध्‍दपक्ष हे पॉलीसी बॉन्‍डवर नमुद केलेली देय असलेली मृत्‍यु दावा/पुर्णावधी दावा देण्‍यास बाध्‍य आहे. विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराच्‍या सेवेत कुठलीही त्रृटी केलेली नाही.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आपल्‍या विशेष कथनात असे ५नमुद केले की, विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराचा विमा क्‍लेम पॉलीसी मधील अटी व शर्तीनुसार नामंजूर केला आहे. पॉलीसी मध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे की, “Accidental injuries which independently of all other causes and within 180 days from the happening of such accident result in ….. shall also be deemed to constitute such disability.”  विरुध्‍दपक्षाने नमुद केले की, तक्रारदाराचा अपघात हा दिनांक 15/06/2015 रोजी झाला होता आणि तक्रारदाराचा कायम अपंगत्‍वाचा दाखल हा दिनांक 20/06/2017 रोजीचा आहे त्‍यामुळे तक्रारदारास अपंगत्‍व हे अपघातानंतर 180 दिवसानंतर आलेले आहे हे सिध्‍द होते. विमा दावा हा पॉलीसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे नसल्‍यामुळे फेटाळण्‍यात आला आहे. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष यांच्‍याकडून कोणतीही सेवेत त्रुटी नाही, करीता तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

03.   सदर प्रकरणांत तक्रारदाराने तक्रारी बरोबर दस्‍ताऐवज एकूण 01 ते 15 दाखल केलेले असून त्‍यात प्रामुख्‍याने विमा पॉलीसीची प्रत, अपंगत्‍वाचा दाखला, क्‍लेम फार्म, विमा कंपनीने दिलेले पत्र, एम.आर. आय रिपोर्ट, तक्रारदाराच्‍या वकीलांनी दिलेली कायदेशीर नोटीस अशा दस्‍तऐवजाचा समावेश आहे.

04.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, दाखल केलेले दस्‍तऐवज तसेच विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तर इत्‍यादीचे मंचातर्फे अवलोकन करण्‍यात आले. उभय पक्षांचे कथन व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे ग्राहक मंचा समोर उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

उत्‍तर

01.    

तक्रारकर्ता वि.प.विमा कंपनी कडून दाद मिळण्‍यास पात्र आहे काय?

होय

02.

तक्रारकर्त्‍याला विरुध्‍दपक्षाने सेवेत त्रुटी दिल्‍याचे दिसून येते काय?

होय

03.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारण मिमांसे प्रमाणे

                                                                                    :: कारणे व मिमांसा ::

05.   मुद्या क्रं. 1 व 2

      सदर तक्रारीसोबत तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजांचे अवलोकन केले असता विरुध्‍दपक्ष विमा कंपनीच्‍या शाखेतुन न्‍यु जिवन आनंद टेबल क्रं. 815 (लाभासहित) विमा पॉलीसी काढली होती आणि तिचा पॉलीसी क्रंमाक 979010053 व दिनांक 24/02/2015 असा असुन त्‍या पॉलीसीपोटी तक्रारकर्त्‍याने विमा हप्‍ता रुपये 12,502/- चा भरणा विरुध्‍दपक्ष यांचेकडे जमा केला होता याबाबत उभय पक्षात वाद नाही.

     तक्रारकर्त्‍यास पनवेल येथील एम.आर.आय व सीटी स्‍कॅन सेंटर यांनी दिलेल्‍या दिनांक 15/06/2015 रोजी रिपोर्टवरुन कायम अपंगत्‍व आलेले आहे.  तक्रारकर्त्‍याचा दिनांक 15/06/2015 रोजी अपघात झाल्‍यानंतर त्‍यास प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे होते व तो बरेच दिवस हॉस्‍पीटलमध्‍ये भरती होता व त्‍यांचे संपूर्ण कुटूंब त्‍याची देखभाल करीत होते. तक्रारदाराने जी विमा पॉलीसी काढली होती त्‍याचे विमा दाव्‍या संबधात कोणत्‍या दस्‍तऐवजाची पुर्तता करावी लागते याची त्‍याला कुठलीही कल्‍पना नव्‍हती. तक्रारकर्ता जेंव्‍हा आपल्‍या घरी परत आला त्‍यानंतर त्‍याने ज्‍या अभिकर्त्‍याकडून विमा पॉलीसी काढली होती त्‍याच्‍याकडे विमा दाव्‍या संबधात विचारपुस केल्‍यानंतर त्‍याला जिल्‍हा शासकीय रुग्‍णालय, भंडारा येथून कायम अपंगत्‍वाचा दाखला मिळवावा लागेल व त्‍यानंतर विमा क्‍लेम विमा कंपनीकडे सादर करावा लागेल असे कळविल्‍यानंतर त्‍याने जिल्‍हा शासकीय रुग्‍णालय, भंडारा यांचेकडे अर्ज सादर केल्‍यानंतर जिल्‍हा शासकीय रुग्‍णालय, भंडारा यांनी दिनांक 20/06/2017 रोजी त्‍यास कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍याचा वैद्दकीय दाखला दिला. तक्रारदारास जिल्‍हा शासकीय रुग्‍णालय, भंडारा यांना दाखला दिल्‍यानंतर त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे क्‍लेम फार्म दिनांक 18/08/2017 रोजी सादर केला. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक 25/06/2018 रोजीचे पत्रान्‍वये  अपघाताच्‍या दिनांकापासून 180 दिवसा नंतर कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍याने विम्‍याचे लाभ देय नाही असे त्‍याला कळविले.

          तक्रारकर्त्‍याचे अपघातानंतरही पॉलीसीपोटी सन 2016 व 2017 चे हप्‍तेसुध्‍दा स्विकारलेले आहेत व ही बाब विरुध्‍दपक्षाने मान्‍य केलेली आहे. तक्रारदार हा शरीराची कुठलीही हालचाल करु शकत नसल्‍याकारणाने त्‍याला कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍याचा दाखला मिळविण्‍याकरीता दस्‍ताऐवजांची जुळवाजुळव करणे याला उशिर होणे हे साहजीकच आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्‍याला शासकीय रुग्‍णालय भंडारा येथील वैद्दकीय समितीने त्‍याला 75 टक्‍के कायम अपंगत्‍व आल्‍याचे प्रमाणपत्र दिलेले असल्‍याने त्‍याच्‍या सर्वच शारिरीक हालचालींना मर्यादा आलेल्‍या असल्‍यामुळे त्‍याला 100 टक्‍के कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍याचा ग्राहक मंचाव्‍दारे निष्‍कर्ष काढण्‍यात येतो.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा नामंजूर करुन सेवेत त्रुटी दिल्‍याची बाब सिध्‍द होते. करीता मुद्दा क्रं. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी नमुद करीत आहोत.    

06. मुद्या क्रं. 3  

        आम्‍ही विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगमचे आनंद (815) प्‍लॅन दस्‍तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन केले त्‍यामध्‍ये विमाधारकास अपघाती मृत्‍यू  वा अपंगत्‍व आल्‍यास खालील प्रमाणे तरतुद केलेली आहे-

LIC’s Accidental Death and Disability Benefit Rider-

        LIC’s Accidental Death and Disability Benefit Rider is available as an optional rider by payment of additional premium during the policy term.

          In case of accidental death during the policy term, Accident Benefit Sum Assured will be payable as lump sum along with the death benefit under the basic plan. 

         In case of Accidental Permanent Disability arising due to accident (Within 180 days from the date of accident) an amount equal to the Accident Benefit Sum Assured will be paid in equal monthly installments spread over 10 years and future premiums for Accident Benefit Sum Assured as well as premiums for the portion of Basic Sum Assured which is equal to Accident Benefit Sum Assured under the policy, shall be waived. Rider sum assured cannot exceed the basic sum assured.

    उपरोक्‍त नमुद एल.आय.सी.आनंद (815) मधील विमाधारकाचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास पॉलिसी अन्‍वये काय फायदे मिळतील आणि जर विमाधारकास अपघाती मृत्‍यूमुळे कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍यास पॉलिसी अन्‍वये काय लाभ आणि फायदे मिळू शकतील याचे विवेचन केलेले आहे.

     हातामधील प्रकरणात तक्रारकर्ता विमाधारकास अपघातामुळे कायमस्‍वरुपी अंपगत्‍व आल्‍याची बाब जिल्‍हा शासकीय रुग्‍णालय येथील वैद्दकीय समितीने दिलेल्‍या प्रमाणपत्रावरुन सिध्‍द होते, त्‍यामुळे आम्‍ही येथे कायमस्‍वरुपी अंपगत्‍व आल्‍यास काय लाभ देय आहेत याचा येथे विचार करीत आहोत. सदर पॉलिसी मधील अटी व तरतुदी नुसार अपघात झाल्‍या पासून 180 दिवसांचे आत कायमस्‍वरुपी अंपगत्‍व आले पाहिजे आणि असे अपंगत्‍व आल्‍यास विमित राशी ही एकूण 10 वर्षामध्‍ये मासिक समान हप्‍त्‍यामध्‍ये विमाधारकास देण्‍याची तरतुद आहे तसेच अपघात झाल्‍या नंतर त्‍यापुढील विम्‍याचे हप्‍ते माफ होतील अशी देखील तरतुद केलेली आहे.

    हातातील प्रकरणातील विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये मूल बिमाकृत राशी रुपये-7,50,000/- असल्‍याने पॉलिसीतील तरतुदी प्रमाणे तक्रारकर्त्‍यास अपघातामुळे कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍यामुळे तो मूल बिमाकृत राशी रुपये-7,50,000/- एकूण 10 वर्षामध्‍ये मासिक समान हप्‍त्‍यांमध्‍ये (12 महिने X 10 वर्ष = 120 महिन्‍यां मध्‍ये) म्‍हणजेच एकूण 120 महिन्‍यां मध्‍ये प्रतीमाह समान हप्‍ता रुपये-6250/- प्रमाणे (Accidental benefit amount plus waiver of future premium) मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्त्‍याला अपघात हा दिनांक-15.06.2015 रोजी झालेला आहे आणि विमा पॉलिसीचे तरतुदी प्रमाणे अपघाता नंतर त्‍यापुढील कालावधीचे देय विम्‍याचे हप्‍ते माफ होतील अशी देखील तरतुद आहे. तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे त्‍याने अपघाता नंतर सुध्‍दा विमा पॉलिसीपोटी किस्‍तीची रक्‍कम रुपये-39,651/- भरलेली आहे, जेंव्‍हा की अपघाता नंतर विमा पॉलिसीचे किस्‍तीची रक्‍कम विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने त्‍याचे कडून घ्‍यावयास नको होती त्‍यामुळे तो सदरची रक्‍कम रुपये-39,651/- सुध्‍दा व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरामध्‍ये सदरची बाब नाकारलेली नाही. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा एवढाच बचाव आहे की, विमा पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे अपघाता नंतर 180 दिवसाचे आत कायमस्‍वरुपी अंपगत्‍व आले पाहिजे. हातातील प्रकरणात तक्रारी प्रमाणे तक्रारकर्त्‍याचा दिनांक-15.06.2015 रोजी गंभिर अपघात झाला होता व त्‍याचे लेवल-सी-6 व सी-7 हे मणके पूर्णपणे मोडल्‍या गेले होते आणि त्‍याचे स्‍पॅनल कॉडला ईजा होऊन त्‍याचे संपूर्ण शरीर लुळे पडले होते, त्‍याचेवर  दिनांक-17.06.2015 रोजी शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली होती आणि त्‍याला 2 महिने दवाखान्‍यात भरती राहावे लागले होते आणि त्‍यानंतर तो थोडाफार आजारातून सावरल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे अभिकर्त्‍याने त्‍याला शासकीय रुग्‍णालय, भंडारा येथील गठीत वैद्दकीय समिती कडून कायमस्‍वरुपी अपंगत्‍वाचा दाखला आणावयास सांगितल्‍याने त्‍या संबधीची कार्यवाही करुन त्‍याला शासकीय वैद्दकीय समितीचा दाखला दिनांक-20.06.2017रोजी मिळाला. शासकीय वैद्दकीय समितीचा कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍याचा दाखला जरी दिनांक-20.06.2017 रोजी मिळालेला असला तरी त्‍याला शारिरीक अपंगत्‍व हे दिनांक-15.06.2015 रोजी झालेल्‍या गंभिर अपघातातील दुखापतीतून आलेले आहे, त्‍यामुळे अपघाती दिनांका पासून त्‍वरीत (180 दिवसांचे आत) त्‍याला कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आलेले आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने शारिरीक अपंगत्‍वाचा दाखला शासकीय वैद्दकीय समितीने दिनांक-20.06.2017 रोजी जारी केला त्‍यादिवशी कायमस्‍वरुपी अपंगत्‍व तक्रारकर्त्‍याला आले असा जो निष्‍कर्ष काढून तक्रारकर्त्‍याचा अस्सल विमा दावा नामंजूर केला तो चुकीचे कारणा वरुन नामंजूर केल्‍याचे दिसून येते, तक्रारकर्त्‍याचा विमा दावा चुकीचे कारणावरुन नामंजूर केल्‍याने त्‍यास निश्‍चीतच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आणि शेवटी ही तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करावी लागली, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे देय विमा दाव्‍याची रक्‍कम व्‍याजासह मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल तसेच विमा पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे अपघाता नंतर विमा पॉलिसीचे हप्‍ते  (Waive) माफ झालेले असताना देखील त्‍याचे कडून विमा हप्‍त्‍यापोटी स्विकारलेली रक्‍कम स्विकारल्‍याचे दिनांकां पासून व्‍याजासह मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे तसेच त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

07.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंच प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                                                                       :: अंतिम आदेश ::

            (01)  तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02)  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी न्‍यु जिवन आनंद पॉलीसी क्रमांक 979010053 प्‍लॅन 815 तील अटी व शर्ती प्रमाणे  तक्रारकर्त्‍यास  दिनांक-15.06.2015 रोजी झालेल्‍या अपघाता नंतर देय असलेली मूळ विमा राशी (Basic Sum Assured) रुपये-7,50,000/- एकूण 10 वर्षाचे कालावधी मध्‍ये प्रतीमाह समान हप्‍ता रुपये-6250/- प्रमाणे अदा करावी, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याचा अपघात दिनांक-15.06.2015 नंतर पासून ते दिनांक-15 जानेवारी-2020 पर्यंत तक्रारकर्त्‍याला प्रतीमाह रुपये-6250/- प्रमाणे घेणे असलेली एकूण-55 मासिक हप्‍त्‍यांची  थकीत रक्‍कम रुपये-3,43,750/-(अक्षरी रुपये तीन लक्ष त्रेचाळीस हजार सातशे पन्‍नास फक्‍त) त्‍या-त्‍या मासिक देय हप्‍त्‍याचे दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला एकमुस्‍त अदा करावी  व  माहे फेब्रुवारी-2020 पासून तक्रारकर्त्‍याला घेणे असलेली मासिक विमा हप्‍त्‍याची रक्‍कम नियमितपणे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दयावी. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने  माहे फेब्रुवारी-2020 पासून मासिक हप्‍त्‍यांची देय रक्‍कम नियमित न दिल्‍यास प्रलंबित मासिक हप्‍त्‍याचे रकमेवर मासिक हप्‍ता देय दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम देण्‍याची विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची जबाबदार राहिल.

(03) विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला असेही आदेशित करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍यास दिनांक-15.06.2015 रोजी अपघातामुळे कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍यामुळे दिनांक-15.06.2015 नंतर विमा हप्‍त्‍यांची रक्‍कम माफ झालेली असतानाही अपघात दिनांका नंतर तक्रारकर्त्‍या कडून स्विकारलेली विमा हप्‍त्‍यांची रक्‍कम विमा हप्‍ता स्विकारल्‍याचे त्‍या-त्‍या दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.- 15% दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला अदा करावी.

(04) विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-1,00,000/-(अक्षरी रुपये एक लक्ष हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-30,000/-(अक्षरी रुपये तीस हजार फक्‍त) अशा नुकसान भरपाईच्‍या रकमा तक्रारकर्त्‍याला दयाव्‍यात.

(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.

(06) निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध  करुन देण्‍यात याव्‍यात.

            (07)  तक्रारकर्त्‍याला  “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात या

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.