Maharashtra

Bhandara

CC/19/124

YOGRAJ DINDYAL MUNGMODE - Complainant(s)

Versus

BHARATIYA JIVAN VIMA NIGAM TROUGH BRANCH MANAGER - Opp.Party(s)

MR.U.D. TIDAKE

22 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/124
( Date of Filing : 19 Dec 2019 )
 
1. YOGRAJ DINDYAL MUNGMODE
JANBHALI KHANBA POST. MALUTOLA TAH SAKOLI
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BHARATIYA JIVAN VIMA NIGAM TROUGH BRANCH MANAGER
LIC OFFICE MAIN BRANCH ROAD SAKOLI TAH. SAKOLI
BHANDARA
MAHARASHTRA
2. BHANDARA DISTRICT CENTRAL CO-OPERATIVE BANK
MAIN ROAD SAKOLI TAH. SOKOLI
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 22 Jul 2022
Final Order / Judgement

                                                                          (पारित दिनांक-22 जुलै, 2022)

                                                              (पारीत व्‍दारा मा. श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्‍या)

 

01.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आणि विरुदपक्ष क्रं 2  बॅंक यांचे कडून  त्‍याचे पत्‍नीचे मृत्‍यू पःश्‍चात प्रधानमंत्री जीवन ज्‍योती विमा योजने अंतर्गत विमा पॉलिसीची रक्‍कम मिळावी तसेच अन्‍य अनुषंगिक मागण्‍यासाठी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम 12 अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.

 

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

    तक्रारकर्त्‍याची पत्‍नी मृतक उषा योगराज मुंगमोडे हिने विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंके मध्‍ये बचत खाते क्रं-302/48337 दिनांक-05.09.2011 रोजी उघडले होते. तक्रारकर्त्‍याची पत्‍नी उषा मुंगमोडे  हिने विरुध्‍दपक्ष क्रं 2  बॅंकेच्‍या मार्फतीने, विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम  कंपनी कडून प्रधान मंत्री जीवन ज्‍योती बिमा पॉलिसी क्रं-900100298 एक वर्षाचे कालावधी करीता वार्षिक विमा हप्‍ता रुपये-330/- देऊन काढली होती आणि सदर विम्‍याचा कालावधी हा दिनांक-25.09.2018 ते 24.09.2019 असा होता. सदर विमा पॉलिसीच्‍या वार्षिक हप्‍त्‍याची रक्‍कम रुपये-330/- तिचे विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंके मध्‍ये असलेल्‍या बचत खाते  क्रमांक-302/48337 दिनांक-25.09.2018 रोजी कपात झाली होती व त्‍याच दिवशी ऑनलाईन ऑटो डेबीट पध्‍दतीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे स्‍थानांतरीत झालेली आहे.दरम्‍यानचे काळात तक्रारकर्त्‍याची पत्‍नी नामे उषा योगराज मुंगमोडे हिचा  दिनांक-13.12.2018 रोजी  मृत्‍यू झाला.  तिचे मृत्‍यू पःश्‍चात विम्‍याची रक्‍कम कायदेशीर वारसदार व पती या नात्‍याने एकूण रुपये-2,00,000/- तक्रारकर्त्‍यास मिळणे आवश्‍यक होते.

      तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, त्‍याचे पत्‍नीचे विम्‍याचे वार्षिक हप्‍त्‍याची  रक्‍कम  दिनांक-25.09.2018 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेव्‍दारे  कपात झाली होती म्‍हणजेच या दिवशी दिनांक-25.09.2018 रोजी  पॉलिसी अस्तित्‍वात आली होती आणि तिचा मृत्‍यू त्‍यानंतर दिनांक-13.12.2018 रोजी म्‍हणजे पॉलिसी अस्तित्‍वात आल्‍याचे दिनांका पासून जवळपास 80 दिवसा नंतर झालेला आहे. तक्रारकर्त्‍याने पत्‍नीचे मृत्‍यू पःश्‍चात देय विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला असता त्‍यांनी विमाधारक हिचा मृत्‍यू हा विमा पॉलिसी सुरु झाल्‍या पासून 45 दिवसाच्‍या आत झालेला असल्‍याने विमा रक्‍कम देऊ शकत नाही असे  दिनांक-21.05.2019 रोजीचे पत्रा मध्‍ये खोटे कारण पुढे करुन विमा दावा नामंजूर केला. परंतु वर नमुद केल्‍या प्रमाणे  विमा पॉलिसी अस्तित्‍वात आल्‍यापासून 80 दिवसानंतर मृत्‍यू झालेला आहे. अशाप्रकारे  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने चुकीचे कारण दर्शवून विमा दावा नाकारला. अशा प्रकारे  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍यामुळे त्‍याला शारिरीक  व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.  म्‍हणून त्‍याने वकीलांचे मार्फतीने दोन्‍ही विरुध्‍दपक्षांना रजिस्‍टर पोस्‍टाने कायदशीर  नोटीस पाठविली असता विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने नोटीसला खोटे उत्‍तर दिले परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेनी  नोटीसला उत्‍तर दिले नाही.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिलेल्‍या उत्‍तरा  मध्‍ये  मृतक उषाने दिनांक-06.09.2018 रोजी विमा काढण्‍या करीता कार्यवाही  केली असून तिचा विमा हप्‍ता दिनांक-25.09.2018 रोजी  विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंके कडून कपात झाला असल्‍याची बाब मान्‍य केलेली आहे परंतु सदरचा विमा हप्‍ता विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-12.12.2018 रोजी मिळाला परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे हे म्‍हणणे खोटे असून संयुक्तिक नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षांनी  दोषपूर्ण सेवा दिलेली असल्‍यामुळे त्‍याने विरुध्‍दपक्षां विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे  विरुध्‍दपक्षां  विरुध्‍द  खालील प्रकारच्‍या मागण्‍या  केल्‍यात-

 

  1. प्रधानमंत्री जीवन ज्‍योती विमा योजना पॉलिसी क्रं-900100298 अंतर्गत विमाधारक श्रीमती उषा हिचे मृत्‍यू पःश्‍चात देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍यास देण्‍याचे  आदेशित व्‍हावे आणि सदर विमा रकमेवर तिचे मृत्‍यू दिनांका पासून ते रकमेच्‍या अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्‍के दराने व्‍याज देण्‍याचे विरुध्‍दपक्षांना  आदेशित व्‍हावे.

 

  1. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक  व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- अशा रकमा विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍याला देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

3.     या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्ता याचे बाजूने मंजूर  करण्‍यात यावी.

 

 

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम तर्फे लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्‍यात आले.  त्‍यांनी लेखी तक्रारी मध्‍ये तक्रारकर्त्‍याची पत्‍नी मृतक उषा योगीराज मुंगमोडे हिने विरुदपक्ष क्रं 2 बॅंके मध्‍ये बचत खाते क्रं-302/48337(0230302000048337) दिनांक-05.09.2011 रोजी उघडले होते ही अभिलेखावरील बाब आहे असे नमुद केले. तक्रारकर्त्‍याची पत्‍नी मृतक उषा मुंगमोडे हिने प्रधानमंत्री जीवन ज्‍योती विमा योजने अंतर्गत विमा पॉलिसी क्रं-900100298  विरुदध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून रुपये-300/- चा विमा हप्‍ता देऊन विमा काढला होता ही बाब विवादास्‍पद नाही.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे असे नमुद करण्‍यात आले की,  विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंके व्‍दारे  मृतक उषा मुंगमोडे हिचा कपात केलेला विमा हप्‍ता विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला प्रत्‍यक्षात दिनांक-12.12.2018 रोजी विरुध्‍दपक्ष  क्रं 2 बॅंके कडून 02 महिने आणि 18 दिवस उशिराने मिळालेला आहे. विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीचे नियमा नुसार त्‍यांना विमा हप्‍त्‍याची प्रत्‍यक्षात रक्‍कम प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून विमा पॉलिसी अस्त्विात येत असते.  विरुध्‍दपक्ष क्रं 1  विमा कंपनीला मृतक उषा मुंगमोडे  हिचे विमा हप्‍त्‍याची रक्‍कम प्रत्‍यक्षात दिनांक-12.12.2018 रोजी मिळाल्‍यामुळे विमा जोखीम ही दिनांक-12.12.2018 पासून सुरु झाली होती. तक्रारकर्त्‍याची पत्‍नी उषा मुंगमोडे ही दिनांक-13.12.2018रोजी मरण पावली.  त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार विमा रक्‍कम मिळावी म्‍हणून  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे अर्ज सादर केला होता. विमाधारक श्रीमती उषा मुंगमोडे हिचा दिनांक-13.12.2018 रोजी मृत्‍यू झाला त्‍यावेळी विमा पॉलिसीही इनफोर्स होती आणि त्‍यामुळे CIRCULR NO.-CO/P&GS/PMJJBY/1585 दिनांक-28.03.2019 हे परिपत्रक विमा पॉलिसीला लागू होतो आणि सदर्हू परिपत्रका नुसार विमा जोखीम  स्विकारल्‍याचा दिनांक पासून 45 दिवसाचा लिन क्‍लाज लागू होतो. सदर प्रकरणात विमाधारकाचा विमा  हप्‍ता हा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-12.12.2018 रोजी प्राप्‍त झाल्‍यामुळे विमा पॉलिसीचे नियमा नुसार विमा जोखीम ही दिनांक-12.12.2018 पासून स्विकारल्‍या  गेली परंतु विमा जोखीम स्विकारल्‍याचे  दिनांका पासून म्‍हणजे  दिनांक-12.12.2018 पासून 45 दिवसाचे आत विमाधारकाचा मृत्‍यू झालेला असल्‍यामुळे विरुदपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून  विमा दावा नाकारण्‍यात आला. विमाधारक मृतक उषा मुंगमोडे  हिचे खात्‍यातून  विरुध्‍दपक्ष  क्रं 2 बॅंकेनी विमा हप्‍त्‍याची वार्षिक रक्‍कम जरी  दिनांक-25.09.2018 रोजी कपात केली होती परंतु सदर विमा हप्‍त्‍याची रक्‍कम प्रत्‍यक्षात विरुध्‍दपक्ष क्रं 1  विमा कंपनीला विरुध्‍दपक्ष      क्रं 2  बॅंकेकडून  दिनांक-12.12.2018 रोजी नेफ्टने प्राप्‍त झाली होती, ज्‍याचा  नेफ्ट    क्रं-  N-345180176704278 असा आहे.  आपले विशेष कथनात असे नमुद केले की, सामील होण्‍याची तारीख 06.09.2018 होती आणि  विरुध्‍दपक्ष  क्रं 2  बॅंकेनी विम्‍याचा वार्षिक हप्‍ता कपात करण्‍याची तारीख-25.09.2018 होती आणि  विमा हप्‍त्‍याची रक्‍कम नेफ्टव्‍दारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला प्राप्‍त झाल्‍याचा दिनांक-12.12.2018 असा होता.  विरुध्‍दपक्ष क्रं1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनीने दिनांक-21.05.2019 रोजीचे पत्र तक्रारकतर्यास पाठवून त्‍यांचा विमा दावा नामंजूर केल्‍याचे कळविले होते.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेला नेफ्ट व्‍दारे पाठविलेल्‍या प्रिमीयमची रक्‍कम  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला उशिराने का पाठविली या बाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेला खुलासा विचारावयास हवा होता.  विरुध्‍दपक्ष क्रं 2  बॅंकेकडून  विमा हप्‍त्‍याची रक्‍कम  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला 02 महिने 18 दिवसांच्‍या उशिराने मिळाली, त्‍यामुळे जो काही दोष  आहे तो विरुध्‍दपक्ष  क्रं 2 बॅंकेचा आहे आणि बॅंकेनी दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. त्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीसला उत्‍तर दिलेले आहे परंतु विरुध्‍दपक्ष  क्रं 2 बॅंकेनी नोटीसला उत्‍तर सुध्‍दा  दिलेले नाही. सबब विरुध्‍दपक्ष  क्रं 1 विमा कंपनीचे विरुध्‍दची  तक्रार खारीज व्‍हावी असे  नमुद केले. विरुध्‍दपक्ष क्रं1  भारतीय जीवन बिमा निगमचे अधिवक्‍ता श्री बिसेन यांनी  आपली भिस्‍त भारतीय जीवन बिमा निगम कंपनी मुंबई यांनी काढलेले परिपत्रक CIRCULAR NO.: PMJJBY/1564 Dated-16th October, 2018 याकडे  जिल्‍हा ग्राहक आयोगाचे लक्ष  वेधले, त्‍यामध्‍ये  Lien period of 45 days shall be applicable from the date of enrollment असे नमुद केलेले आहे. विरुध्‍दपक्ष  क्रं 1 विमा  कंपनीने आणखी  एक काढलेले परिपत्रक क्रं-PMJJBY/1585  दिनांक-28 मार्च, 2019 मध्‍ये सुध्‍दा LIEN PERIOD OF 45 DAYS UNDER PMJJBY  असे नमुद आहे.

 

 

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 भंडारा डिस्‍ट्रीक्‍ट सेंट्रल को ऑपरेटीव्‍ह बॅंक, साकोली, तालुका जिल्‍हा भंडारा यांना जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस तामील होऊनही विरुध्‍दपक्ष क्रं 2 तर्फे कोणीही जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित न झाल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 2 विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश जिल्‍हा ग्राहक आयोगाने प्रकरणात दिनांक-24.09.2021 रोजी पारीत केला.

 

05   तक्रारकर्त्‍याची  तक्रार आणि त्‍याचा शपथे वरील पुरावा व लेखी युक्‍तीवाद तसेच   विरुध्‍दपक्ष क्रं 1  विमा  कंपनीचे लेखी उत्‍तर आणि त्‍यांचा शपथेवरील पुरावा आणि दाखल दस्‍तऐवजाचे अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री यु.डी. तिडके तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री जे.जे. बिसेन यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष खालील मुद्दे न्‍यायनिवारणार्थ  उपस्थित होतात-

.  अक्रं

मुद्दा

उत्‍तर

1

विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा  कपंनीने तक्रारर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करुन  दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

2

विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेनी  तक्रारकर्त्‍याला  दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

3

काय आदेश?

अंतीम आदेशा नुसार

                                                    

   मुद्दा क्रं 1 ते 3-

06.    तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे त्‍याची  पत्‍नी सौ. उषा मुंगमोडे  हिने विरुध्‍दपक्ष क्रं 2  बॅंकेच्‍या मार्फतीने, विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम  कंपनी कडून प्रधानमंत्री जीवन ज्‍योती बिमा पॉलिसी क्रं-900100298 एक वर्षाचे कालावधी करीता वार्षिक विमा हप्‍ता रुपये-330/- देऊन काढली होती आणि सदर विम्‍याचा कालावधी हा दिनांक-25.09.2018 ते 24.09.2019 असा होता. सदर विमा पॉलिसीच्‍या वार्षिक हप्‍त्‍याची रक्‍कम रुपये-330/- तिचे विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंके  मध्‍ये असलेल्‍या बचत खाते  क्रमांक-302/48337 दिनांक-25.09.2018 रोजी कपात झाली होती. व त्‍याच दिवशी ऑनलाईन ऑटो डेबीट पध्‍दतीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा  कंपनी कडे हस्‍तांतरीत झालेली आहे. दरम्‍यानचे काळात तक्रारकर्त्‍याची पत्‍नी नामे उषा योगराज मुंगमोडे हिचा  दिनांक-13.12.2018 रोजी झाला. तिचे मृत्‍यू पःश्‍चात विम्‍याची रक्‍कम कायदेशीर वारसदार व पती या नात्‍याने एकूण रुपये-2,00,000/- तक्रारकर्त्‍यास मिळणे आवश्‍यक आहे.

 

 

06.   या उलट विरुध्‍दपक्ष क्रं 1  विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की,  मृतक उषा मुंगमोडे  हिचे विमा हप्‍त्‍याची रक्‍कम प्रत्‍यक्षात दिनांक-22.12.2018 रोजी मिळाल्‍या मुळे विमा जोखीम ही दिनांक-12.12.2018 पासून सुरु झाली होती.  विमाधारक श्रीमती उषा मुंगमोडे हिचा दिनांक-13.12.2018 रोजी मृत्‍यू झाला त्‍यावेळी विमा पॉलिसी ही इनफोर्स होती आणि त्‍यामुळे CIRCULR NO.-CO/P&GS/PMJJBY/1585 दिनांक-28.03.2019 परिपत्रका नुसार विमा जोखीम  स्विकारल्‍याचा दिनांक पासून 45 दिवसाचा लिन क्‍लाज लागू होतो, त्‍यामुळे विरुदपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून  विमा दावा नाकारण्‍यात आला. विमाधारक मृतक उषा मुंगमोडे  हिचे खात्‍यातून  विरुध्‍दपक्ष  क्रं 2 बॅंकेनी विमा हप्‍त्‍याची वार्षिक रक्‍कम रुपये-330/- जरी  दिनांक-25.09.2018 रोजी कपात केली होती परंतु सदर विमा हप्‍त्‍याची रक्‍कम प्रत्‍यक्षात विरुध्‍दपक्ष क्रं 1  विमा कंपनीला विरुध्‍दपक्ष क्रं 2  बॅंकेकडून  दिनांक-12.12.2018 रोजी नेफ्टने प्राप्‍त झाली होती ज्‍याचा  नेफ्ट क्रं-N-345180176704278 असा आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचे विम्‍याचा हप्‍ता उशिरा मिळाला त्‍या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेची चुक असल्‍याचे नमुद केले.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्‍यांना  मृतक श्रीमती उषा यांचे विमा हप्‍त्‍याची  रक्‍कम दिनांक-11.12.2018 रोजी प्राप्‍त झाल्‍या बाबत बॅंक खात्‍याची प्रत पुराव्‍यार्थ दाखल केलेली आहे.

 

 

07.     जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचा  विम्‍याचा हप्‍ता विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंके मधून दिनांक-25.09.2018 रोजी प्रत्‍यक्षात कपात करण्‍यात आला आणि तक्रारकर्त्‍याची पत्‍नी  दिनांक-13.12.2018 रोजी मृत्‍यू पावली. ज्‍या दिवशी विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेनी वार्षिक विमा हप्‍त्‍याची रक्‍कम कपात केली, तो दिनांक-25.09.2018 पासून विमा पॉलिसी लागू झाली आणि तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचा दिनांक-13.12.2018 रोजी मृत्‍यू झाला होता. विमा हप्‍ता रक्‍कम कपात दिनांक-25.09.2018 ते मृत्‍यू दिनांक-13.12.2018 असा कालावधी हिशोबात धरला तर जवळपास 79 दिवसांचा कालावधी येतो, त्‍यामुळे अशा परिस्थितीत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे वर नमुद परिपत्रकाचा  विमा जोखीम  स्विकारल्‍याचा दिनांक पासून 45 दिवसाचा लिन क्‍लाजचा उपयोग विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला होणार नाही. दुसरी महत्‍वाची बाब अशी आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंक ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी साठी कार्य करीत असल्‍याने एक प्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंक ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे एजंट म्‍हणून कार्य करीत आहे आणि एजंटचे कृत्‍या बाबत मालकाची (Vicarious liability)  जबाबदारी येते.  

 

08.   या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे खालील मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयावर भिस्‍त ठेवण्‍यात येते-

 

I)   DESU Vs.Basanti Devi”- III (1999) CPJ 15 SC.

                Honble Supreme Court in similar kind of group insurance scheme under the name of Salary Saving Scheme, that DESU is certainly not an insurance agent within the meaning of insurance Act but DESU is certainly agent as defined under Sec.182 of the Contract Act as DESU had ostensible authority to collect premium and so far as employee was concerned, DESU was an agent of the LIC to collect premium on its behalf.

 

 

II)     In I (2004) CPJ 247 “ LIC of India Vs. K. Narayan Murthy”

               It is held that premium if falls short of, it is their duty to inform Drawing and Disbursement officer and collect balance, burden to collect correct premium lies on O.P. Deficiency in service proved, O.P. liable to pay due amount and collect difference of amount payable under policy.

 

 

III)  “LIC of India Vs. Ram Sakhi”, LAWS (NCD) 2015-1-137,

          wherein Salary Saving Scheme is elaborately explained and it is observed that on non receipt of the premium, the insurance company was duty bound to give a notice to the employer as well as to the employee regarding default in payment of premium and its failure to do so could not deprive the insured of the benefits under the policy.

 

    उपरोक्‍त नमुद मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे  न्‍याय निवाडयांवरुन स्‍पष्‍ट होते की, विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंक ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची एजंट म्‍हणून कार्य करते आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेच्‍या चुकीच्‍या कृतीस विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची (Vicarious liability)  म्‍हणून जबाबदारी येते असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

 

09.    जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते विमा पॉलिसी मध्‍ये विमा कंपनी आणि संबधीत बॅंक जिने विम्‍याचे हप्‍त्‍याची रक्‍कम खातेदाराच्‍या खात्‍यातून कपात करण्‍याची जबाबदारी स्विकारलेली आहे, यांचेमध्‍ये परस्‍परां मध्‍ये योग्‍य तो समन्‍वये असणे आवश्‍यक आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेनी विमयाचा वार्षिक हप्‍ता उशिराने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला पाठविला यासाठी विमाधारकाला दोषी ठरविता येणार नाही, असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेनी सुध्‍दा मृतकाची कपात केलेली वार्षिक विमा हप्‍त्‍याची रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला उशिराने दिलेली आहे. अशाप्रकारे दोन्‍ही विरुध्‍दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारल्‍या गेल्‍याने दोषपूर्ण सेवा दिलेली आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे, त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 व क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी आलयाने मुद्दा क्रं 3 अनुसार आम्‍ही सदर तक्रारी मध्‍ये  आदेश पारीत करीत आहोत.

 

 

10.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करता विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम  कंपनीने तक्रारकर्त्‍याला त्‍याची मृतक पत्‍नी श्रीमती उषा हिचे मृत्‍यू पःश्‍चात  प्रधानमंत्री जीवन ज्‍योती बिमा पॉलिसी क्रं-900100298 अनुसार विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- दयावी आणि सदर विमा रकमेवर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-21.05.2019 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष  अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला दयावे. त्‍याच बरोबर  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंक यांनी तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍यामुळे प्रत्‍येकी रुपये-5000/- प्रमाणे एकूण रुपये-10,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च प्रत्‍येकी रुपये-5000/- प्रमाणे एकूण रुपये-10,000/- तक्रारकर्त्‍याला दयावेत असे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल, असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे, त्‍यावरुन आम्‍ही तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत-   

 

                                                                   :: अंतीम आदेश ::

  1. तक्रारकर्ता श्री योगराज दिनदयाल मुंगमोडे यांची  तक्रार  विरुध्‍दपक्ष क्रं 1  भारतीय जीवन बिमा निगम कंपनी मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक, साकोली, तालुका साकोली, जिल्‍हा भंडारा आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 भंडारा डिस्‍ट्रीक्‍ट सेंट्रल को-ऑपरेटीव्‍ह बॅंक मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक, साकोली, तालुका साकोली, जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर  करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम  कंपनी मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक, साकोली, तालुका साकोली, जिल्‍हा भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास त्‍याची मृतक पत्‍नी श्रीमती उषा योगराज मुंगमोडे हिचे मृत्‍यू पःश्‍चात  प्रधानमंत्री जीवन ज्‍योती बिमा पॉलिसी क्रं-900100298 अनुसार विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त)  दयावी आणि सदर विमा रकमेवर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-21.05.2019 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष  अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला दयावे.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1  भारतीय जीवन बिमा निगम कंपनी मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक, साकोली, तालुका साकोली, जिल्‍हा भंडारा आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 भंडारा डिस्‍ट्रीक्‍ट सेंट्रल को-ऑपरेटीव्‍ह बॅंक मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक, साकोली, तालुका साकोली, जिल्‍हा भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍यामुळे प्रत्‍येकी रुपये-5000/- (अक्षरी प्रत्‍येकी पाच हजार फक्‍त)  प्रमाणे एकूण रुपये-10,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च प्रत्‍येकी रुपये-5000/- (अक्षरी प्रत्‍येकी पाच हजार फक्‍त)  प्रमाणे एकूण रुपये-10,000/- तक्रारकर्त्‍याला दयावेत.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन  विरुदपक्ष क्रं 1  भारतीय जीवन बिमा निगम कंपनी मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक, साकोली, तालुका साकोली, जिल्‍हा भंडारा आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 भंडारा डिस्‍ट्रीक्‍ट सेंट्रल को-ऑपरेटीव्‍ह बॅंक मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक, साकोली, तालुका साकोली, जिल्‍हा भंडारा यांनी प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.

 

  1.  सर्व पक्षकारांना निकालपत्राची  प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्‍ध करुन दयावी.

 

 

  1. सर्व  पक्षकार व त्‍यांचे अधिवक्‍ता यांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्‍त संच जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.  

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.