नि.45
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 546/2008
तक्रार नोंद तारीख : 16/05/2008
तक्रार दाखल तारीख : 21/05/2008
निकाल तारीख : 08/07/2013
----------------------------------------------
1. श्री हमीद बाबालाल मुंडे
2. सौ शमाबी हमीद मुंडे
3. फिरोज हमीद मुंडे
4. रियाज हमीद मुंडे
सर्व रा.इस्लामपूर, ताकारी रोड,
विभागीय वीज बोर्डासमोर, ता.वाळवा जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. भारतीय नागरी सह.पतसंस्था मर्या. इस्लामपूर
तर्फे सेक्रेटरी
2. उषादेवी संभाजी पाटील
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
3. संभाजी आनंदराव पाटील
रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
4. संजय पांडुरंग पाटील
रा.इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी, रा.इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
5. सौ विजया गणपती पाटील
रा.प्राध्यापक कॉलनी, शिराळा,
ता.शिराळा जि.सांगली
6. सौ रेखा जयकर पाटील
रा. ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
7. सौ मंगल नागनाथ पाटील
रा.एम.ए.सी.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
8. शिवाजी रंगराव पाटील
रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
9. श्री संतोष बजरंग पवार
रा.अनंतगंगा, महादेवनगर, इस्लामपूर,
ता.वाळवा, जि. सांगली.
10. सौ सुरेखा चंद्रकांत मगदूम
रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
11. आनंदा नारायण जाधव,
रा.शिवाजी चौक, ऊरण-इस्लामपूर,
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
12. सचिन आनंदा हांडे
रा. शिवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
13. विनायक बाळकृष्ण लोले
रा.यादवनगर, पेठवडगांव,
ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
14. दिपा बळवंत फाळके,
रा.विठ्ठलवाडी, ता.वाळवा जि.सांगली
15. संभाजी बळवंत पडवळ
इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री डी.एच.पाटील
जाबदार क्र.2 व 3 तर्फे : अॅड श्री आर.बी.साळुंखे
जाबदारक्र.1, 4 ते 13 व 15 : एकतर्फा
जाबदारक्र.14 : वगळले
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांनी मागणी करुनही ठेव रक्कम अदा न केलेने दाखल केली आहे. सामनेवाला क्र.1 ते 15 यांना नोटीस आदेश झाला. सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी कुरियरमार्फत पाठविलेल्या नोटीसा स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. नि. 11 वर मे.मंचाने पारीत केलेल्या आदेशानुसार सामनेवाला क्र.14 यांना प्रस्तुत प्रकरणातून वगळलेले आहे. तदनंतर जाहीर नोटीसही बजावण्यात आलेली आहे. तक्रारीतील पान क्र.3 वर नि.13 प्रमाणे दि.5/8/10 रोजी पावती क्र.9373 ऐवजी 9673 अशीदुरुस्ती केली आहे. तसेच पान नं.4 वर पावती क्र.9122ऐवजी 8951 व रु.35,000/- रकमेऐवजी रु.50,000/- अशी दुरुस्ती केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी –
तक्रारदार हे एकत्र कुटुंबातील असून त्यांचे नावे खालील तपशीलाप्रमाणे ठेवी ठेवल्या होत्या. सामनेवाला क्र.1 ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यान्वये नोंदणीकृत संस्था असून सामनेवाला क्र.2 हे चेअरमन तर सामनेवाला क्र.3 ते 15 हे संचालक आहेत. सामनेवाला क्र.1 तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 पतसंस्थेमध्ये मुदत ठेव अंतर्गत खालील तपशीलाप्रमाणे ठेवी ठेवलेल्या होत्या.
अ.क्र. |
नाव |
रक्कम |
ठेवतारीख |
खाते/ पावती क्र. |
मुदत संपणेची तारीख |
मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1 |
सौ शमाबी हमीद मुंडे / हमीद बाबालाल मुंडे |
75000 |
20/4/06 |
2/156
009673 |
20/4/12 |
150000 |
2 |
हमीद बाबालाल मुंडे / सौ शमाबी हमीद मुंडे |
35000 |
18/11/05 |
2/101
009122 |
18/11/11 |
70000 |
3 |
रियाज हमीद मुंडे / फिरोज हमीद मुंडे |
50000 |
11/8/06 |
2/211
0010200 |
11/8/2012 |
100000 |
4 |
हमीद बाबालाल मुंडे / सौ शमाबी हमीद मुंडे |
75000 |
20/4/06 |
2/157
009674 |
20/4/12 |
150000 |
5 |
सौ शमाबी हमीद मुंडे |
35000 |
27/4/05 |
2/18
008086 |
27/4/11 |
70000 |
6 |
फिरोज हमीद मुंडे |
4000 |
18/8/2004 |
296
006540 |
18/2/2010 |
8000 |
7 |
सौ शमाबी हमीद मुंडे / हमीद बाबालाल मुंडे |
50000 |
11/10/05 |
2/102
008952 |
10/11/11 |
100000 |
8 |
हमीद बाबालाल मुंडे / सौ शमाबी हमीद मुंडे |
50000 |
11/10/05 |
2/101
008951 |
11/10/11 |
100000 |
9 |
फिरोज हमीद मुंडे / रियाज हमीद मुंडे |
50000 |
11/8/06 |
2/212
10199 |
11/8/12 |
100000 |
|
|
424000 |
|
|
|
848000 |
3. सदर ठेवींची मागणी मुदतीनंतर व्याजासह रक्कम मिळणेसाठी मागणी केली असता सामनेवाला क्र.1 यांनी सदर रकमा अदा न करुन सेवात्रुटी केली आहे. सबब, वर नमूद ठेवी व्याजासह परत मिळाव्यात, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,500/- सामनेवालाकडून वसूल होवून मिळावी अशी मागणी केली आहे.
4. तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि. 3 ला शपथपत्र व नि.5 ला ठेवपावत्यांच्या साक्षांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
5. सामनेवाला क्र.2 व 3 यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 व 3 यांनी तक्रारदाराची तक्रार मान्य केल्या कथनाखेरिज परिच्छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने अर्जकलम 2 मध्ये ठेवपावतीचा दिलेला तपशील अपुरा व चुकीचा आहे. सदर ठेवींची मुदत 20/4/12, 18/11/12, 11/8/12, 27/4/11, 18/2/10, 10/11/11, 18/11/11 या तारखांना पूर्ण होणार असल्याची दिसते. तर तक्रारदारांना दिलेली ठेवपावती पाहता सदर ठेव रक्कम ठेवतेवेळी मुदतीनंतरच रक्कम परत देणेत येईल असे अभिवचन दिले. त्यामुळे करार कायद्यातील तरतुदी पाहता कोणतीही ठेवपावती तक्रारदारास त्यास असलेल्या निकडीची गरज कागदोपत्री दाखविल्याखेरिज मुदतपूर्व रकमा देण्याची जबाबदारी सामनेवाला संस्थेवर येत नाही. तसेच तक्रारदाराने सामनेवालांकडे प्रत्यक्ष येवून कधीही ठेव रकमेची मागणी केलेली नाही. सामनेवाला हे फेब्रुवारी 2008 नंतर नमूद संस्थेच्या संचालक पदावर नव्हते अगर संस्थेचा व्यवहारही पहात नव्हते. त्यामुळे तक्रारदार जानेवारी 2008 पूर्वी कधीही संस्थेकडे रक्कम मागणेसाठी आलेले नव्हते. जाने.2008 मध्ये सदर संस्थेचा ताबा सहायक निबंधक सहकारी संस्था, इस्लामपूर यांनी सामनेवाला यांचेकडून संचालकपदाचा कार्यभार काढून घेवून प्रशासकाच्या ताब्यात देण्यासाठी संस्थेस सिल केलेले होते. फेब्रुवारी 2008 मध्ये सदर संस्थेवर सहायक निबंधक, इस्लामपूर यांची प्रशासक म्हणून नेमणूक झालेली आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रे व संस्थेचा कार्यभार त्यांच्या ताब्यात आहे. फेब्रुवारी 2008 नंतर सामनेवाला क्र.2 ते 15 हे मुळात संचालक नसलेने तक्रारदाराच्या विनंतीप्रमाणे रकमा देण्याची जबाबदारी कायदेशीरपणे सामनेवाला यांचेवर येत नाही. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, सामनेवाला संस्था व त्यांचे संचालकांविरुध्द मे. कोर्टात तक्रार दाखल करणेपूर्वी महाराष्ट्र को-ऑप. सोसायटीज अॅक्ट 1960 मधील कलम 72 प्रमाणे नोटीस दिलेखेरिज तसेच दुय्यम निबंधक, सहकारी संस्था यांची परवानगी न घेता दावा दाखल केल्याने प्रस्तुतचा दावा मे. मंचासमोर चालणेस पात्र नाही. प्रस्तुत तक्रारअर्जास नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीजचा बाध येत असलेनेही प्रस्तुत तक्रार चालणेस पात्र नाही. कारण नमूद संस्थेवरील प्रशासकांना आवश्यक पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. तसेच सामनेवाला यांना, नमूद सहकार कायद्याच्या कलम 88 प्रमाणे सदर संस्थेच्या व्यवहारांची चौकशी चालू असून अद्यापही जबाबदार धरलेले नाही. प्रस्तुत प्रकरण संबंधीत न्यायधिकरणाकडे प्रलंबित असून त्याचा निर्णय झालेखेरिज प्रस्तुत तक्रार या मंचात चालणेस पात्र नाही. सामनेवाला क्र.1 संस्था व संचालकांविरुध्द इस्लामपूर पोलिस स्टेशन इस्लामपूर यांचेकडे गु.र.नं. 69/2008 अन्वये सहायक निबंधकांनी फिर्याद दाखल केली आहे, त्याचीही चौकशी चालू आहे. सबब वरील प्रकरणामध्ये वेगवेगळे निष्कर्ष निघालेस गुंतागुंत होवून सामनेवाला यांचेवर अन्याय केल्यासारखे होणार आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार तहकूब होणे न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे. प्रस्तुत तक्रार अवास्तव व चुकीची असून तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती मे मंचास केली आहे.
6. सामनेवाला यांनी आपल्या म्हण्ण्याच्या पुष्ठयर्थ कोणतीही कागदपत्रे मंचासमोर हजर केलेली नाहीत.
7. तक्रारदाराची तक्रार, सामनेवालाचे म्हणणे व पुराव्यादाखल कागदपत्रे यांचा विचार करता सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. प्रस्तुतचे तक्रारअर्जास नॉन जॉंइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाचा
बाध येतो काय ? नाही.
2. तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 ते 13 यांचे ग्राहक होतात काय ? होय.
3. सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी
केली आहे काय ? होय.
4. तक्रारदार ठेव रकमा व्याजासह व अन्य मागण्या मिळण्यास पात्र
आहे काय ? होय.
5. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
कारणे
मुद्दा क्र.1 ते 4
8. सामनेवाला याने नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाचा बाध येत आहे असा आक्षेप घेतला आहे. सदर संस्थेवर संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकांची नेमणूक झाली आहे याबाबतचा कोणताही पुरावा सामनेवालाने दिलेला नाही. तसेच सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी त्यासंदर्भात कोणताही लेखी अर्ज दिलेला नाही. मात्र सामनेवाला क्र.14 यांनी प्रशासकांचे सहीशिक्क्याची संचालकांची यादी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहे. सदर यादी नि.36 च्या फेरिस्तसोबत आहे. यावरुन सदर यादीवर प्रशासकांचा सहीशिक्का असला तरी सदर प्रशासकांची नेमणूक नेमक्या कोणत्या कालावधीसाठी झाली याबाबत कोणताही कागद दाखल नाही. तसेच प्रशासक हे सुध्दा संस्थेचे केवळ प्रतिनिधी असतात. तक्रारदाराने नमूद पतसंस्थेस सामनेवाला क्र.1 म्हणून समाविष्ट केलेले आहे. त्यामुळे जरी प्रशासकांना याकामी पक्षकार म्हणून समाविष्ट केले असते तरी केवळ ते प्रातिनिधीक स्वरुपात राहिले असते. यामध्ये मूळ संस्था पक्षकार असलेमुळे त्याअनुषंगाने येणारे प्रतिनिधी म्हणून प्रशासकांना समाविष्ट केले अथवा नाही केले तरी त्याचा प्रस्तुत तक्रारीच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही. सबब सामनेवालांचा सदरचा आक्षेप हे मंच फेटाळीत आहे व सदरची तक्रार या मंचास चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
तसेच सामनेवाला क्र.2 व 3 यांनी नमूद सहकार कायद्याच्या कलम 88 प्रमाणे सदर संस्थेचया व्यवहाराची चौकशी चालू असून सामनेवाला यांना अद्यापी जबाबदार धरलेले नाही तसेच सामनेवाला क्र.1 संस्था व संचालकांविरुध्द इस्लामपूर पोलिस स्टेशन इस्लामपूर यांचेकडे गु.र.नं.69/2008 अन्वये सहायक निबंधकांनी फिर्याद दाखल केली आहे त्याची चौकशी चालू आहे. प्रस्तुत प्रकरण संबंधीत न्यायाधिकारणाकडे प्रलंबित असून त्याचा निर्णय झालेखेरिज प्रस्तुत तक्रार मे.मंचासमोर चालणेस पात्र नाही, त्यामुळे प्रस्तुत प्रकरणामध्ये वेगवेगळे निष्कर्ष निघाल्यास गुंतागुंत होवून सामनेवालांवर अन्याय केल्यासारखे होणार असलेने प्रस्तुत तक्रार तहकूब करणे न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे असा आक्षेप घेतलेला आहे. याचा विचार करता सदर न्यायाधिकरणाकडे दाखल केलेली प्रकरणे ही निरनिराळया विषयांशी (different subject matterand liabilities) संबंधीत आहेत. तसेच
Consumer Protection Act - Section 3 – Act not in derogation of any other law – The Provisions of this Act shall be in addition to and not in derogation of the provisions of any other law for the time being in force. याचा विचार करता प्रस्तुतचा आक्षेप हे मंच फेटाळीत आहे आणि प्रस्तुतचा तक्रारअर्ज चालविण्याचे अधिकारक्षेत्र या मंचास आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9. तक्रारदार क्र.1 व 2 हे पती-पत्नी आहेत. तक्रारदार क्र.3 व 4 तक्रारदार क्र.1 यांची मुले आहेत. सदर तक्रारदार एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार एकत्रितरित्या दाखल केली आहे. तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे खालील तपशीलाप्रमाणे ठेवी ठेवलेल्या होत्या. त्यामुळे तक्रारदार सामनेवालेचे ठेवीदार ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे.
अ.क्र. |
नाव |
रक्कम |
ठेवतारीख |
खाते/ पावती क्र. |
मुदत संपणेची तारीख |
मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1 |
सौ शमाबी हमीद मुंडे / हमीद बाबालाल मुंडे |
75000 |
20/4/06 |
2/156
009673 |
20/4/12 |
150000 |
2 |
हमीद बाबालाल मुंडे / सौ शमाबी हमीद मुंडे |
35000 |
18/11/05 |
2/101
009122 |
18/11/11 |
70000 |
3 |
रियाज हमीद मुंडे / फिरोज हमीद मुंडे |
50000 |
11/8/06 |
2/211
0010200 |
11/8/2012 |
100000 |
4 |
हमीद बाबालाल मुंडे / सौ शमाबी हमीद मुंडे |
75000 |
20/4/06 |
2/157
009674 |
20/4/12 |
150000 |
5 |
सौ शमाबी हमीद मुंडे |
35000 |
27/4/05 |
2/18
008086 |
27/4/11 |
70000 |
6 |
फिरोज हमीद मुंडे |
4000 |
18/8/2004 |
296
006540 |
18/2/2010 |
8000 |
7 |
सौ शमाबी हमीद मुंडे / हमीद बाबालाल मुंडे |
50000 |
11/10/05 |
2/102
008952 |
10/11/11 |
100000 |
8 |
हमीद बाबालाल मुंडे / सौ शमाबी हमीद मुंडे |
50000 |
11/10/05 |
2/101
008951 |
11/10/11 |
100000 |
9 |
फिरोज हमीद मुंडे / रियाज हमीद मुंडे |
50000 |
11/8/06 |
2/212
10199 |
11/8/12 |
100000 |
|
|
|
|
|
|
848000 |
10. सामनेवाला क्र.2 व 3 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदारांनी कधीही ठेवीची मागणी त्यांचेकडे केली नव्हती असे कथन केले आहे. मात्र तक्रारदाराने ठेव मागणी केल्याचे कथन केले आहे. सदर वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीवर अंतिम आदेश पारीत होईपर्यंत प्रस्तुत ठेवींच्या मुदती संपलेल्या आहेत. सबब ठेव कालावधी पूर्ण झाल्यामुळे मुदतीनंतर मिळणा-या ठेवीच्या रकमा मिळणेस तक्रारदार पात्र आहेत तसेच सदर ठेवरकमांच्या मूळ मुद्दल रकमेवर सदर रक्कम संपूर्ण मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्केप्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
11. सामनेवाला यांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे, त्यामुळे झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रकमा मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
12. प्रस्तुत वर नमूद केलेप्रमाणे रकमा देणेबाबत सामनेवाला क्र.1 ते 13 वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या वर नमूद कलम 10
मध्ये नमूद केल्याप्रमाणे मुदतीनंतर मिळणा-या ठेवरकमा तसेच दिले निर्देशाप्रमाणे व्याज
अदा करावे.
3. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या शारीरिक आर्थिक,
मानसिक ञासापोटी रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
4. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारीच्या खर्चापोटी
रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार माञ) अदा करावेत.
5. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत
करणेची आहे.
6. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 08/07/2013
( वर्षा शिंदे ) ( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्य अध्यक्ष