मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार अर्ज क्र. 89/2011 निकाल तारीख – 05/10/2011 श्री. महेंद्र एम.गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या (श्री. महेंद्र एम.गोस्वामी, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला) --------------------------------------------------------------------------------------- श्रीमती सुमन सदाशिव निकम, रा. एफ-4, तोरण अपार्टमेंट, के.बी.पी. इंजिनिअरिंग कॉलेज जवळ, सदर बझार, सातारा ......तक्रारदार विरूध्द 1. मा. सिनियर डिव्हीजनल मॅनेजर भारतीय जीवन बीमा निगम, सातारा विभागीय कार्यालय, गणपतदासदेवी पथ, मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सातारा – 415 001 2. मा. सिनियर डिव्हीजनल मॅनेजर (दि झोनल क्लेम रिव्हयू कमिटी) भारतीय जीवन बिमा निगम, वेस्टर्न झोनल ऑफीस, योगक्षेम, जीवन विमा मार्ग, मुंबई- 400 021 .......जाबदार आदेश नि. 1 वर 1. तक्रारदाराचे पतीचे मृत्यूपश्चात मिळणा-या पॉलिसीचा क्लेम विरूध्द कंपनी यांनी नाकारल्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यात आली असून सदर तक्रारीची नोटीस विरूध्द पक्षकार यांना बजावणी करण्यात आली आहे. 2. त्यानुसार कंपनीने या प्रकरणात हजर होवून त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि. 11 दाखल केले आहे तसेच या प्रकरणात लेखी युक्तीवाद नि. 26 ला दाखल करण्यात आलेला आहे. 3. दरम्यान अर्जदार तर्फे वकील यांनी नि. 28 वर पुरसिस दाखल करून आपणास विमा कंपनीने देय असलेल्या रकमेचा धनादेश दि. 4/10/11 रोजी दिला असल्याकारणाने तक्रार अर्ज काढून घेत असल्याचे स्पष्ट केले. तक्रारदार मंचासमोर हजर नाहीत परंतु त्यांची सही पुरसिसवर आहे त्यामुळे वकीलांकडून ओळखपत्र घेण्यात आले व त्यानुसार आम्ही खालील आदेश पारित करीत आहोत. आदेश 1. तक्रार अर्जातील नि. 28 वर दाखल असलेल्या पुरसिस नुसार पॉलिसीतील क्लेमची रक्कम मिळाली असल्याचे कारणावरून सदरचे प्रकरण निकाली काढणेत येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. प्रकरण नस्तीबध्द करणेत येते. सातारा दि. 5/10/2011 (श्री.महेंद्र एम. गोस्वामी) (श्रीमती सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |