सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 17/2012
श्री गणपत नारायण पाटील
वय 76 वर्षे, धंदा- सेवानिवृत्त,
राहा. औदुंबर नगर, मु.पो.ता.कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
भारतीय जीवन बिमा निगम तर्फे शाखाधिकारी,
वय सज्ञान, धंदा – वरिष्ठ शाखा प्रबंधक,
जीवन बीमा नियमन अधिनियम 1956 द्वारा संस्थापित,
संत राऊळ महाराज कॉलेज समोर, कुडाळ,
ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदारातर्फेः- व्यक्तीशः
विरुद्ध पक्षातर्फे- गैरहजर
- आदेश नि.1 वर -
(दि.28/02/2013)
मा. श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष :- विरुध्द पक्ष यांच्या विमा कंपनीकडे गुंतविलेली रक्कम मुदत संपूनही योग्य परताव्यासह तक्रारदारास परत न मिळाल्याने सदरची तक्रार जिल्हा मंचात दाखल केली आहे.
2) सदरची तक्रार दि.02/06/2012 रोजी जिल्हा मंचात नोंद करण्यात आली आहे. परंतू जिल्हा मंचाची बैठक न झाल्याने सदरचे प्रकरण दि.25/02/2013 रोजी दाखल करण्यात आले.
3) तक्रारदार यांना पुकारले असता तक्रारदार गैरहजर होते. दरम्यान उशीराने तक्रारदार दि.25/02/2013 रोजी हजर होऊन उभय पक्षात तडजोड झाली असल्याचे व त्यांना तक्रार पुढे चालवायची नसल्याची पुरसीस नि.4 वर दाखल केली असून तक्रार निकाली काढण्याची विनंती केलेली आहे. त्यामुळे आम्ही सदरचे प्रकरण निकाली करणेच्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदाराची कोणतीही मागणी शिल्लक नसल्याने तक्रारदाराने नि.4 वर दिलेल्या अर्जानुसार सदरचे तक्रार प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
3) प्रकरण नस्तीबध्द करणेत येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 28/02/2013
Sd/- sd/- sd/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग