जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/136 प्रकरण दाखल दिनांक – 18/06/2009. प्रकरण निकाल दिनांक –09/09/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. सरदार प्रतापसिंग पि. जोदसिंग सीख वय, 60 वर्षे, धंदा व्यापार रा. नगीना घाट, नांदेड. अर्जदार विरुध्द 1. भारतीय स्टेट बँक, शाखा डॉक्टरलेन वजिराबाद, नांदेड तर्फे मॅनेजर गैरअर्जदार 2. पोस्ट अन्ड टेलीग्राफिक कार्यालय, गुरुद्वारा चौक, नांदेड, तर्फे अधिकृत अधिकारी. अर्जदारा तर्फे. - अड. दिलीप मनाठकर. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - अड.आर.व्ही.राजूरकर गैरअर्जदार क्र.2 तर्फे - स्वतः निकालपत्र (द्वारा,मा.श्री. सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली म्हणून अर्जदार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हा धार्मिक पूस्तके विक्रेता असून अमृतसर येथून मागितलेल्या पूस्तकाच्या किंमतीपोटी ड्रॉफट पाठविण्यासाठी गैरअर्जदाराकडे दि.17.04.2007 रोजी रु.28,183/- चा डि.डि.नंबर 026235490 गैरअर्जदार क्र.2 यांना कमशिन देऊन खरेदी केला. हा डि.डि.मे. बि.चतरसिंग जिवनसिंग पेयेबल अट अमृतसर यांचे नांवे घेऊन दि.18.04.2007 रोजी रजिस्ट्रर पोस्टाने गैरअर्जदार क्र.2 यांचेमार्फत पाठविण्यात आला.बराच काळपर्यत संबंधीत फर्मला तो ड्रॉफट मिळाला नाही. त्यामूळे वारंवार सूचना देऊन व त्यावीषयी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे चौकशी व तक्रारही करण्यात आली. तसेच अमृतसार येथील मे. बी. चतरसिंग जिवनसिंग या फर्मने अमृतसर येथील भारतीय स्टेट बँक शाखा टाऊन हॉल अमृतसर येथे ड्राफट बददल चौकशी केली असता त्यांना असे आढळून आले की, अर्जदाराने पाठविलेला डि.डि. हा दि.27.04.2007 रोजी सैच्यूरिअन बँक यांचेकडे असलेले अमितकूमार नामक व्यक्तीचे खाते नंबर 108501000014401 या नोयडा दिल्ली येथील शाखेत जमा झाला आहे. भारतीय स्टेट बँक अमृतसर यांनी सदरील नांवाची व खातेदाराची पडताळणी न करता अमितकूमार यांचे खाती ड्रॉफट पास करुन रक्कम वर्ग केली. हे त्यांचे बेकायदेशीर कृत्य आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी रजिस्ट्रर पोस्टाने पाठविलेला डि.डि. मे.बी. चतरसिंग जिवनसिंग यांना न देता अमितकूमार नांवाचे व्यक्तीकडे जमा केला. अर्जदारानी गैरअर्जदाराकडे वारंवार येऊन ड्राफटच्या रक्कमेची मागणी केली. यानंतर दि.16.03.2009 रोजी वकिलामार्फत दोन्ही गैरअर्जदारांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्या नोटीस मिळूनही त्यांनी त्यांचे उत्तर दिले नाही. अमृतसर येथील मे. बी. चतरसिंग जिवनसिंग यांनी दि.26.03.2008 रोजी तक्रार अर्ज नंबर 213/2008 जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अमृतसर येथे सैच्यूरिअन बँक व भारतीय स्टेट बँक यांचे विरुध्द तक्रार केली होती. परंतु तक्रार ही मा. मंचाच्या अधिकार क्षेञात येत नसल्याकारणाने नामंजूर केली. त्यामूळे आता अर्जदाराने सन्माननीय मंचासमोर तक्रार दाखल केली. अर्जदाराची मागणी आहे की, ड्रॉफट रु.28,183/- दि.17.04.2007 पासून 18 टक्के व्याजाने देण्याचा हूकूम व्हावा तसेच मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- देण्याचे आदेश व्हावेत. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.वादग्रस्त डि.डि. नंबर 0262354490 दि.17.04.2007 रोजी अमृतसर शाखेत रक्कम मिळावा म्हणून अमृतसर भारतीय स्टेट बँकेचे नांवाने काढण्यात आला होता. सदरील ड्रॉफट हा सैच्यूरिअन बँक शाखा नोयडा यांचेमार्फत आला होता व अमृतसर बँकेने ती रक्कम दिली आहे. संपूर्ण व्यवहार हा अमृतसर व नोयडा दिल्ली येथे झालेला असल्यामूळै प्रकरण नोयडा मंचात दाखल करणे आवश्यक आहे. त्यामूळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचे कार्यक्षेञात ही बाब येत नाही. तसेच अमितकूमार रा. नोयडा व मे.बी.चतरसिंग जिवनसिंग रा. अमृतसर तसेच सैच्यूरिअन बँक पंजाब शाखा नोयडा यांचे अनूपस्थितीत या अर्जाचा निकाल देता येत नाही. ते आवश्यक पार्टी आहेत. सदरील तक्रार ही दि.17.04.2007 रोजीच्या ड्रॉफट बददलची आहे व तक्रार ही दि.22.06.2009 रोजी दाखल केली. म्हणून मूदतीत येत नाही. गैरअर्जदार यांचे बँकेतर्फे अर्जदाराने रु.28,183/- चा ड्रॉफट नंबर 026235490 दि.17.04.2007 रोजी मे. बी. चतरसिंग जिवनसिंग यांचे नांवे काढला हे त्यांना मान्य आहे. परंतु ड्रॉफट दिल्यानंतर पूढील संबंधीताचे व्यवहार हे दूसरे राज्यात झाल्यामूळे ड्रॉफटची माहीती नाही. त्यामूळे त्यांची माहीती देण्याचा प्रश्नच येत नाही. पूढील व्यवहार हा भारतीय स्टेट बँक शाखा अमृतसर व सैच्यूरिअन बँक शाखा नोयडा दिल्ली या दोघामध्ये झालेला असल्यामूळे या संबंधीची माहीती त्यांना नाही. अर्जदाराने वकिलामार्फत दिलेल्या नोटीसमध्ये काही सत्यता नसल्यामूळे त्यांचे उत्तर देण्याची आवश्यकता वाटली नाही. मे. बी.चतरसिंग जिवनसिंग यांनी अमृतसर येथील जिल्हा ग्राहक मंचात याबददलची कारवाई दाखल केली होती परंतु अधिकारक्षेञात येत नसल्याकारणाने नामंजूर करावी असे म्हटले आहे. अर्जदाराला न्याय मिळावा म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अमृतसर यांनी सैच्यूरिअन बँक शाखा नोयडा दिल्ली व अमितकूमार यांचे विरुध्द दावा नंबर 170/2009 दि.21,03.2009 दाखल केलेला आहे जो प्रंलबित आहे. त्यामूळे अर्जदाराचा अर्ज नामंजूर करुन खर्चासह फेटाळण्यात यावा. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. त्यात त्यांनी अर्जदार यांना त्यांचा ड्रॉफट रजिस्ट्रर पोस्टाने मे. बी.चतरसिंग जिवनसिंग अमृतसर यांना दि.18.04.2007 रोजी पाठविला तो मिळाला का नाही या बाबतची माहीती मागितली आहे परंतु अर्जदाराने रजिस्ट्रर पावतीचा नंबर, बूकींगचा दिनांक इत्यादी न दिल्यामूळे पूढील चौकशी करीता आली नाही. अजूनही अर्जदार हे सविस्तर माहीती देत असतील तर ते पूढील चौकशी करायला तयार आहेत असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. तक्रार या मंचाचे कार्यक्षेञात येते काय ? होय. 2. तक्रार ही मूदतीत आहे काय ? होय. 3. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- मे.बी.चतरसिंग जिवनसिंग अमृतसर यांनी ड्रॉफटची रक्कम त्यांना न मिळाल्याबददल स्टेट बँक ऑफ इंडिया व सैच्यूरिअन बँक यांचे विरुध्द ग्राहक न्यायमंच अमृतसर यांचेकडे तक्रार क्र.213/2008 दाखल केला होता. परंतु तक्रार ही त्यांचे कार्यक्षेञात येत नाही म्हणून नामंजूर केला होता. तो आदेश दि.14.11.2008 रोजी झालेलो आहे. यानंतर अर्जदाराने ज्या बँकेतून डि.डि.खरेदी केला व त्यांना यापोटी कमशिन दिले त्या गैरअर्जदार क्र.1 यांचे विरुध्द ही तक्रार दि.18.06.2009 रोजी दाखल केली. ड्रॉफट नांदेड येथूनच काढला गेला व तो वीशेष सूचनेसह गैरअर्जदार क्र.1 यांचे जिम्मेदारीवर तो केवळ अमृतसर येथेच वटला पाहिजे.गैरअर्जदार क्र.1 यांनी असा आक्षेप घेतला आहे की, ड्रॉफट हा अमृतसर शाखेने पास केला आहे व तो सैच्यूरिअन बँक नोयडा दिल्ली येथे जमा झाला आहे. सर्व वाद नोयडा दिल्ली व अमृतसर येथे उदभवल्यामूळे नोयडा दिल्ली येथे तक्रार दाखल करावयास पाहिजे हा त्यांचा आक्षेप अतीशय चूकीचा असून जेथे ड्रॉफट काढला म्हणजे ड्रॉफट काढण्याची कारवाई नांदेड येथच झाली आहे तर येथूनच तो पाठविण्यात आला म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच नांदेड यांनाच कार्यक्षेञ येते म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र.2 ः- ड्रॉफट हा दि.17.04.2007 रोजी काढला. यानंतर तो ड्रॉफट मिळाला नाही म्हणून अमृतसर येथील स्टेट बँकेच्या शाखेत तक्रार दिली व एवढेच नव्हे तर दि.26.03.2008 रोजी सैच्यूरिअन बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया अमृतसर यांचे विरुध्द दावा ही दाखल केला होता. त्यामध्ये दि.14.11.2008 रोजी कार्यक्षेञाच्या मूददयावर नीर्णय घेण्यात आला व यानंतर अर्जदाराने योग्य कार्यक्षेञ असलेल्या मंचात दि.18.06.2009 रोजी तक्रार दाखल केली. दि.14.11.2008 रोजी ही कॉज ऑफ अक्शनची दिनांक झाली होती. तक्रार ही दोन वर्षाचे आंत दाखल केलेली असल्याकारणाने ती मूदतीत येते यावीषयी संशय नाही. मूददा क्र.3 ः- गैरअर्जदार यांनी डि.डि. नंबर 026235490 दि.17.04.2007 रोजी अर्जदारयांनी त्यांचेकडे खरेदी केला व ती रक्कम रु.28,183/- ही मे. बी.चतरसिंग जिवनसिंग या फर्मच्या खात्यात अमृतसर येथेच देण्यात यावी अशा सूचनेसह तो ड्रॉफट खरेदी केला होता व गैरअर्जदार क्र.1 यांनी संबंधीत फर्मला अमृतसर येथेच रक्कम देण्याची जबाबदारी घेतली होती. असे असतानाही अर्जदार यांनी दि.11.04.2007 रोजी रजिस्ट्रर पोस्टाने अमृतसरला तो ड्रॉफट पाठविण्यात आला असे म्हटले आहे. तो ड्रॉफट संबंधीत फर्मच्या हाती न पडता एक अमितकूमार नांवाचे चूकीच्या व्यक्तीच्या हाती पडला, शेवटी असेही म्हणता येईल की, त्या ड्रॉफटची डिलेव्हरी चूकीने दूस-यांना देण्यात आली. यांचा फायदा अमितकूमार नामक व्यक्तीने घेऊन त्यांने स्वतःच्या नांवाने सैच्यूरिअन बँक नोयडा दिल्ली येथे त्यांचे खात्यात जमा करुन घेण्यात यश मिळविले व ही गोष्ट गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या लेखी म्हणण्यात परिच्छेद क्र.1 मध्ये मान्य केली आहे. ड्रॉफट हरवला किंवा चूकीच्या व्यक्तीच्या हाती जरी पडला तरी त्या ड्रॉफट वर मे. बी. चतरसिंग जिवनसिंग हि फर्म पेयेबल अट अमृतसर असे असताना त्या ड्रॉफटवर खोडाखोड करुन अमितकूमार हे नांव लिहून अमृतसर शाखा ऐवजी नोयडा शाखा दिल्ली येथे वर्ग केली. यांचा अर्थ स्टेट बँक ऑफ इंडिया अमृतसर शाखेने कोणतीही खातरजमा न करता खाडाखोड असलेला ड्रॉफट पास करणे म्हणजे सेवेतील अनूचित प्रकार म्हणावा लागेल. ड्रॉफट वरती थोडीशीही खाडाखोड असली तर त्यावर संबंधीत शाखा मॅनेजरची सही व शिक्का नसल्यामूळे ड्रॉफट पास होत नाही व अमृतसर येथे ड्रॉफटची रक्कम पेयेबल असताना ती शाखा नोयडा येथे वर्ग करण्यात आली म्हणजे हा तरी अतीशय कहरच झाला. जिल्हा ग्राहक मंच, अमृतसर यांनी आपल्या निकालपञात स्टेट बँक ऑफ इंडिया अमृतसर व सैच्यूरिअन बँक यांचे निष्काळजीपणा बददल ताशेरे ओढलेले आहेत. ही गोष्ट खरी आहे की, गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराने घेतलेला ड्रॉफट त्यांचे अमृतसर येथील शाखेत येऊ गेला व त्यांना त्याबददलची माहीती ही नसते परंतु अर्जदाराने ड्रॉफट वरती वीशेष सूचनासह म्हणजे नमूद केलेल्या फर्मला अमृतसर येथेच ती रक्कम देण्यात यावी अशी सूचना मान्य करुन तो ड्रॉफट दिला व या सूचनेचे पालन करण्याची जबाबदारी ही त्यांनी घेतली होती. अमृतसर येथील त्यांचे शाखेने जो काही चूक व्यवहार केला तर त्या गडबडीस गैरअर्जदार क्र.1 हे तत्वतः जबाबदार आहेत. त्यामूळे ते आपल्या जबाबदातीतून सूटू शकत नाहीत. ड्रॉफट काढण्याचा उददेशच असा असतो की, तो एकदा हरवला तरी त्यांचे पेमेन्ट स्टॉप करुन दूसरे डूप्लीकेट ड्रॉफट काढला येतो व अकाऊट पेई ड्रॉफट असल्यामूळे तो दिलेल्या संबंधीत फर्मच्या नांवे व पेयेबल अट अमृतसर असल्यामूळे त्यांच खात्यात जमा झाला पाहिजे. त्यामूळे पोस्टाने किंवा कूरिअरने ड्रॉफट पाठविण्यात कूठलाच धोका नाही. यात गैरअर्जदार हे आपली जबाबदारी नीभवण्यास कमी पडले आहेत. भारतीय स्टेट बँक अमृतसर शाखेने घोटाळा करुन देखील अर्जदाराचे समाधान करण्यास व ज्या लोकांनी फ्रॉड केला त्यांचे विरुध्द कारवाई करण्यास अतीशय निरुसाह दाखवलेला आहे. यानंतरही शेवटी काही तरी स्टेप घ्यावी म्हणून त्यांनी अमृतसर येथील दिवाणी न्यायालयात दावा नंबर 170/2009 दि.21.03.2009 रोजी दाखल केल्याची माहीती दिली आहे परंतु हया दाव्यातून जो कोणी हा फ्राड केला असेल तो कर्मचारी व अमितकूमार यांनी जी काही सजा व्हायची ती होईल. अर्जदार हे या न्यायमंचात ग्राहक या नात्याने आलेले आहेत व त्यांना गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून ञूटीची सेवा मिळाली, व झालेली बाब ही गैरअर्जदार क्र.1 नी तत्वतः मान्य केली आहे. त्यामूळे सर्वात पहिले अर्जदार हे त्यांचा ड्रॉफटची रक्कम मिळण्यास हक्कदार आहेत. ड्रॉफट हा रजिस्ट्रर पोस्टाने अमितकूमार यांचे हातात पडला असेल किंवा त्यांनी तो पास करण्याच्या उददेशाने एस.बी.आय. शाखा अमृतसर दाखविला असेल व एवढा मोठा जो फ्रांड झाला तो एकटयाने शक्य नसून तो दोघाचे संगनमताने झाला असल्याची शक्यता दिसून येते. या संबंधी गैरअर्जदार क्र.1 ने ठोस पावले उचलली पाहिजेत. हा निर्णय त्यांचा त्यांनी घ्यावा. परंतु अर्जदार यांचे ड्रॉफटची रक्कम त्यांना रोकून धरता येणार नाही. सबब गैरअर्जदार क्र.1 यांचे सेवेतील ञूटी ही सिध्द होते. गैरअर्जदार क्र.2 यांचे मार्फत रजिस्ट्रर पोस्टाने हा वादग्रस्त ड्रॉफट पाठविला असे अर्जदार म्हणत असले तरी त्याविषयीची पावती अर्जदाराने जी दाखल केली आहे. त्यात त्यांचा नंबर व कोणत्या दिनांकाला पाठविला व कोणी पाठविला हे स्पष्ट होत नाही. याशिवाय गैरअर्जदार क्र.2 नी त्यांना चौकशीसाठी रजिस्ट्ररचा नंबर, दिनांक व पत्ता मागितला आहे. त्यांस अर्जदाराने उत्तर दिलेले नाही. म्हणून तो पोस्टाने पाठविला याविषयी स्पष्ट होत नाही. म्हणून त्यांचे विरुध्द आदेश करता येणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 यांनी डि.डि. नंबर 026235490 या बददलची रक्कम रु.28,183/- व त्यावर दि.17.04.2007 पासून 8 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत, असे न केल्यास दंडणीय व्याज म्हणून 10 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासहीत दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्चाबददल रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यू.पारवेकर लघूलेखक |