नि.22
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 155/2011
तक्रार नोंद तारीख : 16/06/2011
तक्रार दाखल तारीख : 18/07/2011
निकाल तारीख : 15/07/2013
----------------------------------------------
1. श्री बबन तुकाराम बुचडे
2. सौ सिंधुताई बबन बुचडे
दोघेही रा.प्लॉट नं.77, आशिर्वाद बंगला,
परांजपे कॉलनी, पलूस, ता.पलूस जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. भारती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पलूस,
शाखा हेड ऑफिस, प्रधान कार्यालय,
सोनाई बिल्डींग, मेन रोड, पलूस 416310
2. श्री सुर्यकांत मारुती मोरे, चेअरमन
भारती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पलूस
शाखा पलूस रा.मु.पो.पलूस, ता.पलूस जि.सांगली
3. श्री जयसिंग सिताराम पाटील, व्हा.चेअरमन
भारती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पलूस
शाखा पलूस रा.मु.पो.पलूस, ता.पलूस जि.सांगली
4. श्री उत्तमराव बाबुराव जाधव, संचालक
भारती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पलूस
शाखा पलूस रा.मु.पो.पलूस, ता.पलूस जि.सांगली
5. श्री भगवान आबाजी निकम, संचालक
भारती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पलूस
शाखा पलूस रा.मु.पो.पलूस, ता.पलूस जि.सांगली
6. श्री कबीर आबुलाल शेख, संचालक
भारती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पलूस
शाखा पलूस रा.मु.पो.पलूस, ता.पलूस जि.सांगली
7. श्री संभाजी आबाजी मदने, संचालक
भारती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पलूस
शाखा पलूस रा.मु.पो.पलूस, ता.पलूस जि.सांगली
8. श्री तुकाराम बाबुराव पाटील, संचालक
भारती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पलूस
शाखा पलूस रा.मु.पो.पलूस, ता.पलूस जि.सांगली
9. श्री विष्णू दादू सिसाळ, संचालक
भारती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पलूस
शाखा पलूस रा.मु.पो.पलूस, ता.पलूस जि.सांगली
10. श्री मिलिंद यलाप्पा वाघमारे, संचालक
भारती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पलूस
शाखा पलूस रा.मु.पो.पलूस, ता.पलूस जि.सांगली
11. श्रीमती वासंती वासुदेव मेरु, संचालिका
भारती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पलूस
शाखा पलूस रा.मु.पो.पलूस, ता.पलूस जि.सांगली ........ सामनेवाला
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एस.व्ही.केळकर
सामनेवाला क्र.1 ते 11 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार सामनेवालांनी मुदत ठेवपावत्यांची रक्कम व्याजासह ठेवींची मुदत संपूनही न दिल्याने दाखल करण्यात आली आहे. प्रस्तुत तक्रार अर्ज स्वीकृत करुन सामनेवाला क्र.1 ते 11 यांना नोटीस आदेश झाला. सामनेवाला क्र.1 ते 11 यांना नोटीस लागू झाल्यानंतर ते हजर झाले. त्यांनी वकीलपत्र व म्हणणे दाखल करणेसाठी संस्थेच्या सचिवांमार्फत अर्ज नि.12 वर दाखल केला. तदनंतर नि.13 वर वकीलांनी मुदतीचा अर्ज दाखल केला व नि.14 ला वकीलपत्र दाखल केले आहे. मात्र तदनंतर सामनेवाला क्र.1 ते 11 यांनी हजर होवून म्हणणे दाखल न केल्याने सदर सामनेवालाविरुध्द एकतर्फा काम चालविणेचा आदेश पारीत करण्यात आला.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात हकीकत अशी -
तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेत खालीलप्रमाणे ठेवीची रक्कम ठेवलेली होती.
अ.नं. |
नांव |
ठेवपावती क्र. |
ठेव रक्कम |
ठेवपावतीचा दिनांक |
ठेवपरतीची तारीख |
व्याज |
1 |
बबन तुकाराम बुचडे |
004497 |
125000 |
7/1/2000 |
8/1/03 |
17.5 |
2 |
बबन तुकाराम बुचडे व सिंधुताई बबन बुचडे |
004498 |
125000 |
7/1/2000 |
8/1/03 |
17.5 |
3 |
बबन तुकाराम बुचडे |
2474 |
25000 |
8/6/02 |
8/6/05 |
16 |
4 |
बबन तुकाराम बुचडे |
सेव्हिंग्ज खाते क्र.506/17 |
30293 |
1/3/05 |
31/10/07 |
- |
तसेच सदर तिन्ही ठेव पावत्यांवरील सेव्हिंग्ज पासबुक नं.506 वरील रक्कम रु.30,293/- इतकी रक्कम दि.31/10/07 पासून सेव्हिंग्ज पासबुकाला मुदत ठेव व्याज जमा असून या तिन्ही पावत्यांचे ते व्याज असून जाबदार संस्थेकडे जमा असून ती रक्कमही जाबदार यांचेकडून अर्जदार यांना येणे आहे.
सदर ठेवपावत्यांची मुदत पूर्ण झालेली आहे, मात्र कोणत्याही रकमा तक्रारदारास मिळालेल्या नाहीत. तसेच सेव्हिंग्ज खातेवरील सुध्दा रक्कम मिळालेली नाही. तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 संस्थेचे ठेवीदार ग्राहक असून सदर संस्थेचे सामनेवाला क्र.2 ते 11 हे संचालक असल्यामुळे सदर रकमा देण्याचे बंधन त्यांचेवर आहे. सन 2006-07 ते 2010-11 या कालावधीसाठी सामनेवाला क्र.2 ते 11 हे नमूद सामनेवाला क्र.1 संस्थेचे नवीन संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यामुळे प्रचलित कायद्यानुसार सदर ठेव रकमा परत करणेसाठी सामनेवाला क्र.1 ते 11 जबाबदार असतानाही सदर ठेव रकमा परत न केल्याने दि.23/2/11 रोजी वकीलांमार्फत आर.पी.ए.डी. व यु.पी.सी.ने. नोटीस पाठवूनही रकमा परत न केल्याने तसेच वारंवार प्रत्यक्ष भेटूनही तक्रारदाराचे सध्याचे वयोमान व वैद्यकीय उपचाराच्या खर्चासाठी सदर रकमांची आवश्यकता असलेने, त्या न दिल्याने तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब सदर ठेव रकमा व सेव्हिंग्ज खातेववरील रकमा व्याजासह सामनेवाला क्र.1 ते 11 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तरित्या दि.31/10/07 पासून व्याजासह वसूल होऊन मिळावी व तसेच तक्रारर्जाचा खर्च रु.1,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.2 ला शपथपत्र व नि.4 चे कागदयादीप्रमाणे नि.4/1 ते 4/3 अन्वये ठेवपावत्यांच्या सत्यप्रती, नि.4/4 ला सेव्हिंग्ज पासबुक, नि.4/5 वर सामनेवाला संस्थेच्या संचालक मंडळाची यादी, नि.4/6 ला रक्कम मागणीची नोटीस, नि.4/7 व 4/8 ला सामनेवाला क्र.1 संस्था व चेअरमन यांना नोटीस पोचलेची पोस्टाची पोचपावती, सदर नोटीस अन्य संचालकांना पाठविल्याचे पोस्टाचे युपीसी प्रमाणपत्र अशी कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. तक्रारदाराची तक्रार, पुराव्यादाखल कागदपत्रे व युक्तिवाद यांचा विचार करता सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? होय.
2. तक्रारदार ठेव रकमा व्याजासह व अन्य मागण्या मिळण्यास पात्र
आहे काय ? होय.
3. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
कारणे
मुद्दा क्र.1 ते 3
5. तक्रारदार हा सामनेवाला पतसंस्थेचा ठेवीदार ग्राहक आहे. तक्रारदाराने दाखल केलेले नि.4/1, 4/2, 4/3 व 4/4 प्रमाणे ठेवपावत्यांच्या सत्यप्रती तसेच नि.21 प्रमाणे ठेवपावत्यांच्या साक्षांकीत प्रती दाखल केल्या आहेत. यावरुन तक्रारदाराने खालील तपशीलाप्रमाणे ठेव रकमा ठेवल्याची वस्तुस्थिती निर्विवाद आहे.
अ.नं. |
नांव |
ठेवपावती खाते क्र. |
ठेव रक्कम |
ठेवपावतीचा दिनांक |
ठेवपरतीची तारीख |
व्याज |
1 |
बबन तुकाराम बुचडे |
1855 |
125000 |
7/1/2000 |
8/1/03 |
17.5 |
2 |
बबन तुकाराम बुचडे व सिंधुताई बबन बुचडे |
1856 |
125000 |
7/1/2000 |
8/1/03 |
17.5 |
3 |
बबन तुकाराम बुचडे |
2474 |
25000 |
8/6/02 |
8/6/05 |
16 |
4 |
बबन तुकाराम बुचडे |
सेव्हिंग्ज खाते क्र.506/17 |
30293 |
1/3/05 |
31/10/07 |
- |
वरील ठेवपावत्या व सेव्हिंग्ज खाते तसेच तक्रारदाराचा युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता नमूद ठेवींवर दि.31/10/2007 अखेरीस व्याज तक्रारदाराचे सेव्हिंग्ज खातेवर जमा केलेचे तक्रारदाराने मान्य केलेले आहे. त्यामुळे सदर ठेवपावत्यांवरील मुदतीचे तसेच मुदतीनंतरही व्याज मिळाल्याची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सबब सदर मूळ ठेवपावत्या अनुक्रमांक 1, 2, 3 वर नमूद ठेव रकमांवर दि.1/11/07 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईतोपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराप्रमाणे व्याज अदा करावे तर सेव्हिंग्ज खातेवरील रक्कम रु.30,293/- व या रकमेवर दि.1/11/2007 पासून द.सा.द.शे. 4 टक्केप्रमाणे व्याज अदा करावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
6. सामनेवाला यांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे त्यामुळे तक्रारीच्या खर्चापोटी रकमा मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
7. वरील संपूर्ण रकमा देणेसाठी सामनेवाला क्र.1 ते 11 हे वैयक्तिक व संयुक्तरित्या देण्यास जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या वर नमूद कलम 5 मधील ठेवपावती अनुक्रमांक 1, 2 व 3 अन्वये अनुक्रमे अनुक्रमांक 1 व 2 ची प्रत्येकी 1,25,000/- प्रमाणे व अनुक्रमांक 3 ची रक्कम रु.25,000/- अशी एकूण रक्कम रु.2,75,000/- दि.1/11/2007 पासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने अदा करावे तर सेव्हिंग्ज खाते क्र.506/17 मधील रक्कम रु.30,293/- दि.1/11/2010 पासून द.सा.द.शे. 4 टक्के व्याजासहीत अदा करावे.
3. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- अदा करावेत.
4. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत करणेची आहे.
5. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 15/07/2013
( वर्षा शिंदे ) ( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्य अध्यक्ष