(निकालपत्र सदस्या, श्रीमती. कविता जगपती, यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तुत तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये सामनेवाल्याने सेवेत कमतरता केली म्हणून दाखल केली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, तक्रारदार ही कंपनी असुन त्यांनी सामनेवाला यांच्याकडून टेलिफोन व ब्रॉड बन्ड कनेक्शन घेतलेले होते त्यांचा ग्राहक क्र. 1011301038 आहे. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या कडून टेलिफोन क्र. 2211996 असे घेतलेले आहे. सामनेवाला तक्रारदार यांना सेवा पुरवित आहे तक्रारदार यांनी ब्रॉड बन्ड कनेक्शन घेतल्यापासुन त्यांना रु. 5,000/- ते रु. 7,500/- चे बिल वापरल्यामुळे येत होते. तसेच तक्रारदार हे सामनेवाला यांच्या कडून 9 ते 10 वर्षा पासुन ग्राहक असुन टेलिफोन बिल नियमीत भरीत आहे तसेच दि. 08/02/2011 रोजी बिल नं. 1011506480017 नुसार दि. 01/07/2011 रोजी ते दि. 31/07/2011 रोजीचे बिल रु. 64,603.64 पैसे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना अवाजवी व जास्तीचे बेकायदेशीर बिल दिले. त्यानंतर तक्रारदार यांनी सदर बिल संबंधी तक्रार सामनेवाला यांना दिलेली होती. तसेच तक्रारदार यांनी स्वतः मान्य केले आहे की, तक्रारदार यांची कंपनी सकाळी 8.30 ते 6.00 वाजेपर्यंत असते. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारी मध्ये सदर तक्रार मंजूर करण्यात यावी व तसे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दिलेले बिल दि. 01/07/2011 ते दि. 31/07/2011 चे रक्कम रु. 64,603.64 पैसे चा बिल क्र. 1011506480018 चे दि. 01/08/2011 ते दि.31/08/2011 चे बिल रक्कम रु. 30,370.38 पैसे दुरुस्त करुन दयावे व बाकी उरलेली रक्कम तक्रारदार यांना परत करण्याचे आदेश दयावे व तसेच अगोदर आलेले बिल रक्कम रु. 5,000/- व 7.500/- चे बिल देण्याचे आदेश करावे ही विनंती मंचासमोर केलेली आहे तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व अर्ज खर्च रु. 10,000/- इ.मागणी मंचासमोर केलेली आहे.
03. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारी सोबत नि. 4 सोबत दस्तऐवज यादी दाखल केली ऑथोरिटी लेटर, इनव्हाईस बिल, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना केलेली तक्रारीची प्रत, मागील बिल दि. 11/11/2011 रोजी वकीलामार्फत पाठविलेली नोटीस इ. छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत.
05. सामनेवाल्यांनी आपला खुलासा नि. 12 वर दाखल करुन प्रस्तुत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते दिलेले बिल वाजवी व योग्य आहे तक्रारदार ही कंपनी असुन त्यांनी प्रस्तुत सुविधेचा वापर केला आहे दोनही बिले बरोबर असुन ती मागे घेण्याचा प्रश्नच उध्दभवत नाही असे आपल्या खुलाष्यात नमूद केले. सामनेवाला यांनी आपल्या खुलाष्या मध्ये तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी मागणी मंचाकडे केलेली आहे.
06. उपलब्ध कागदपत्रे व सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्रे यावरुन मंचाने खालील मुदे विचारात घेतले.
07. निष्कर्षासाठींचे मुद्दे व त्यावरील मंचाचे निष्कर्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय ? नाही
2. आदेशाबाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
08. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारी मध्ये तक्रारदार ही कंपनी आहे ही बाब मान्य केलेली आहे यावरुन असे दिसते की, तक्रारदार हे व्यापारी हेतुने सामनेवाला यांच्याकडून ब्रॉड बन्ड कनेक्शन घेतलेले होते ते त्यांनी त्यांच्या तक्रारीत मान्य केलेले आहे. अशा परिस्थितीत ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 2 (1) (डी) नुसार तक्रारदार ग्राहक या संज्ञेत बसत नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र मंचाला नाही, असा निष्कर्ष मंच काढत आहे. यास्तव मुद्दा क्र. 1 चा निष्कर्ष आम्ही नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
09. मुद्दा क्र.1 च्या निष्कर्षा वरुन असे दिसते की, तक्रारदार यांनी घेतलेल्या ब्राड बॅन्ड सेवेचा वापर हा व्यापारी हेतुने केला जात असल्यामुळे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदया नुसार ग्राहक या संज्ञेत बसत नाही म्हणुन तक्रारदारांची तक्रार नामंजुर करणे न्यायोचित ठरेल असे मंचाला वाटते, यास्तव आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. उभयपक्षकारांनी ज्याचा त्याचा खर्च सोसावा.
3. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगाव
दिनांक – 18/06/2015
(श्रीमती. कविता जगपती) (श्री. विनायक रा.लोंढे)
सदस्या अध्यक्ष