- नि का ल प त्र -
व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प.कडून फोन कनेक्शन घेतलेले आहे. सदरचे कनेक्शन हे नगरपालिका नोकर हौसिंग सोसायटी जयसिंगपूर येथील प्लॉट नं. 22 मध्ये असलेल्या ऑफिसमध्ये चालू आहे. त्याचा नंबर 229922 असा असून तो सध्या चालू आहे. तक्रारदार त्याचे बिल नियमितपणे भरत आहेत. तसेच तक्रारदार यांचे घरी प्लॉट नं.22, नवजीवन हायस्कूल ग्राऊंड, सुदर्शन चौक, जयसिंगपूर येथे फोन कनेक्शन असून त्याचा नं.226022 असा आहे. वि.प. यांची नोटीस फोन क्र. 229922 करिता आलेली आहे. तक्रारदार यांचे वडील दत्ताजीराव जाधव यांनी दि. 27/11/17 रोजी वि.प. यांचेकडे तक्रारअर्ज करुन फोन कनेक्शन बंद करणेबाबत कळविले. वास्तविकरित्या, दत्ताजीराव जाधव यांनी कोणत्याही कोर्टातून आदेश न घेता तक्रारदार यांना मिळकतीतून बाहेर काढण्यासाठी पाणी व लाईट तसेच फोन सेवा बंद करणेच्या हेतूने गैरमार्गाने संबंधीत कार्यालयाकडे तक्रार अर्ज केलेले आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने वि.प. यांनी दि. 6/12/17 रोजीच्या पत्रान्वये घरमालक म्हणजेच तक्रारदार यांचे वडील दत्ताजीराव जाधव यांची संमती द्यावी अन्यथा फोन कनेक्शन 7 दिवसांत हस्तांतर करावे म्हणून कळविले आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांना भेटून अशा प्रकारे फोन कनेक्शन बंद करता येणार नाही असे सांगितले. तक्रारदार यांचे ऑफिस व घर यामध्ये फोनची नितांत आवश्यकता आहे. सदरचे फोन नंबर हे पक्षकारांना दिलेले आहेत. तक्रारदाराच्या घरातील व ऑफिसमधील फोन सेवा बंद केल्यास तक्रारदारास अडचण निर्माण होणार आहे. म्हणून तक्रारदाराचे कनेक्शन वि.प. यांनी बंद करु नये यासाठी तक्रारदारांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे व याकामी वि.प. यांना कोणाच्याही तक्रारअर्जावरुन तक्रारदार यांचे टेलिफोन कनेक्शन बंद करता येणार नाही असे जाहीर होवून मिळावे अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेले पत्र, सदर पत्रास वि.प. यांनी दिलेले उत्तर, तक्रारदार यांची टेलिफोन बिले इ. कागदपत्रे दाखल केली आहे. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
3. वि.प. हे याकामी हजर झाले परंतु त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. सबब, दि. 14/2/18 रोजी वि.प. यांचेविरुध्द नो से आदेश करण्यात आला.
4. प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून फोन कनेक्शन घेतलेले आहे. सदरचे टेलिफोन कनेक्शन हे नगरपालिका नोकर हौसिंग सोसायटी जयसिंगपूर येथील प्लॉट नं. 22 मध्ये असलेल्या ऑफिसमध्ये चालू आहे. त्याचा नंबर 229922 असा असून तो सध्या चालू आहे. तक्रारदार त्याचे बिल नियमितपणे भरत आहेत. तसेच तक्रारदार यांचे घरी प्लॉट नं.22, नवजीवन हायस्कूल ग्राऊंड, सुदर्शन चौक, जयसिंगपूर येथे फोन कनेक्शन असून त्याचा नं.226022 असा आहे. वि.प. यांची नोटीस फोन क्र. 229922 करिता आलेली आहे. ता. 27/11/17 रोजी तक्रारदारांचे वडील दत्ताजीराव जाधव यांनी वि.प. यांचेकडे तक्रारअर्ज करुन तक्रारदारांचे फोन कनेक्शन बंद करणेविषयी कळविले. सबब, दत्ताजीराव जाधव यांनी कोणत्याही कोर्टातून आदेश न घेता तक्रारदार यांना मिळकतीमधून बाहेर काढण्यासाठी पाणी व लाईट तसेच फोन सेवा बंद करणेसाठी संबंधीत कार्यालयात तक्रारअर्ज केले. त्या कारणाने वि.प. यांनी ता. 6/12/17 रोजीचे पत्रान्वये घरमालक म्हणजेच तक्रारदार यांचे वडील यांची संमती घ्यावी अन्यथा फोन कनेक्शन 7 दिवसांत हस्तांतर करावे असे तक्रारदार यांना कळविले. सबब, घरमालक यांची संमती घ्यावी अथवा 7 दिवसांचे आत हस्तांतर करावे असे कळवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत वि.प. यांनी त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. प्रस्तुत मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी तक्रारीसोबत तक्रारदार यांचे नावची टेलिफोन बिले दाखल केलेली आहेत. तसेच ता. 27/11/17 रोजी दत्ताजीराव जाधव यांनी वि.प. यांना पाठविलेले पत्र दाखल केलेले आहे. सदर पत्रामध्ये सदर मिळकत माझे मालकीची आहे. सदरचे दोन्ही फोन कनेक्शन ही ज्या पत्त्यावर आहेत, तेथे माझा थोरला मुलगा दिलीप दत्ताजीराव जाधव हा सध्या रहात नाही व त्याचा या मिळकतीशी काहीही संबंध नाही. ही सदरची मिळकत मी माझी दोन मुले विजयसिंह दत्ताजीराव जाधव, धाकटा मुलगा संदीपराव दत्ताजीराव जाधव व त्या दोघांची पत्नी व मुलांसोबत राहणेस वापरत आहे. थोरला मुलगा दिलीप दत्ताजीराव जाधव हा सध्या माझी पत्नी ताराबाई दत्ताजीराव जाधव यांचे नावे मी घेतलेल्या प्लॉट नं.622, सुदर्शन चौक, शाहूनगर, जयसिंगपूर येथील प्लॉटवरील घरात रहात आहे. तरी त्याचे नावे असलेले दोन्ही फोन कनेक्शन नं. 226022 व 229922 ताबडतोब बंद करावेत आणि आपले दफ्तरी त्याची नोंद करुन ठेवावी व मला तसे कळवावे ही नम्र विनंती, असे पत्र तक्रारदारांचे वडीलांनी वि.प. यांना दिलेले आहे. त्यानुसार वि.प. यांनी तक्रारदार यांना दि.6/12/17 रोजी तक्रारदार यांचे वडील दत्ताजीराव जाधव यांची संमती द्यावी अन्यथा फोन कनेक्शन 7 दिवसांत हस्तांतर करावे असे कळविले आहे. दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी वि.प. यांची सर्व बिले नियमितपणे भरलेचे दिसून येते. तसेच सदरचे मिळकतीचे फोन बिलावर तक्रारदारांचे नाव दिसून येते. यावरुन सदरचे फोन नंबर तक्रारदारांचे नावे आहेत हे सिध्द होते. केवळ तक्रारदारांचे वडिलांनी वि.प. यांना ता.27/11/17 रोजीचे पत्राने सदरचे मिळकतीवरील सदरचे फोन कनेक्शन बंद करण्याचे सांगितलेवरुन वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचे कनेक्शनचे एन.ओ.सी. आणणेचे अथवा 7 दिवसांत हस्तांतर करण्याचे कळविलेचे दिसून येते. परंतु तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन केले असता, तक्रारदार हे स्वतः वकील आहेत. तक्रारदार यांचे ऑफिस व घर यामध्ये फोनची नितांत आवश्यकता आहे. सदरचे फोन नंबर पक्षकारांना दिलेले आहेत. पक्षकारांच्या व तक्रारदार यांच्या कामाचे संदर्भात सदरचा फोन चालू राहणे आवश्यक आहे. सदरची टेलिफोन सेवा बंद झालेस तक्रारदार यांना अडचण निर्माण होणार आहे. दैनिक कामकाज करणे अडचणीचे होणार आहे. वि.प. यांना प्रस्तुतकामी आपले म्हणणे मांडणेची संधी देवून देखील वि.प. यांनी म्हणणे दाखल केलेले नाही अथवा पुरावा शपथपत्र दाखल केलेले नाही. दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडील फोन बिले नियमितपणे भरलेली आहेत. तक्रारदारांचे वडील दत्ताजीराव गोविंदराव जाधव कोणत्याही कोर्टाचे आदेश न घेता तक्रारदार यांना मिळकतीतून बाहेर काढण्यासाठी पाणी व लाईट तसेच फोन सेवा बंद करणेच्या हेतूने संबंधीत कार्यालयात सदरचा तक्रारअर्ज केलेचे तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्रामध्ये नमूद केलेले आहेत. या सर्व बाबींचा विचार करता, वि.प. यांना केवळ तक्रारदारांचे वडील दत्ताजीराव जाधव यांनी दिलेल्या अर्जावरुन तक्रारदारांचे सदरचे फोन कनेकशन बंद करता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. या सर्व बाबींचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांना ता. 6/12/17 रोजीचे पत्र पाठवून कोणत्याही कोर्टाचे आदेशाशिवाय सदरची फोन कनेक्शन 7 दिवसांत हस्तांतरीत करावे असे कळवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
5. सबब आदेश.
आ दे श
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. अगर तर्फे इसमांनी तक्रारदार यांचे नांवे असलेली अर्ज विषयातील टेलिफोन कनेक्शन्स कोर्टाच्या आदेशाशिवाय बंद करु नयेत.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
( | | | | | | | | |
|