जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/257 प्रकरण दाखल तारीख - 14/10/2010 प्रकरण निकाल तारीख – 04/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्यामसुंदर मदनलाल सारडा, वय वर्षे 55, धंदा व्यापार रा.हदगांव ता.हदगांव,जि. नांदेड. अर्जदार. विरुध्द भारत संचार निगम लि. द्वारा महाव्यवस्थापक गैरअर्जदार बि.एस.एन.एल.भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.बी.कारवा गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.डी.के.ढेंगे निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) - अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा हदगाव येथील रहीवासी असून गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. त्यांनी गैरअर्जदार यांचेकडून वन इंडिया प्लॅन सोबत गैरअर्जदार मार्फत देण्यात येणा-या “ यकीन नही आता ” या सेवेचा उपभोक्ता आहे. सदरील सेवेचे वैशिष्ट म्हणजे अर्जदाराकडून रु.180/- चे मासिक भांडे घेऊन त्या योजनेमध्ये परिक्षेञातील सर्व दूरध्वनी व संपूर्ण महाराष्ट्रातील बीएसएनएल चे मोबाईलवर पूर्णतः मोफत व अमर्यादित संभाषण करता येत असे. अर्जदाराचा दूरध्वनी एप्रिल 2010 पर्यत चालू होता. दि.3.06.2010 रोजी मे महिन्यातील वापराबाबतचे देयक मिळाले जे पाहून अर्जदार हा अंचबित झाला.अर्जदारास दूरध्वनीच्या वापराबददल सरासरी रु.199/- चे बिल येत असे पण त्या बिलाची रक्कम रु.1433 /- आली ? त्यानंतर अर्जदाराने दि.23.08.2010 रोजी गैरअर्जदार यांना वाढीव बिला बददल अर्ज दिला, व अर्जदारास देऊ केलेली सूवीधारदद केली काय ? या बददल विचारणा केली पण त्यांनी आम्हाला
काहीही माहीती नाही तूम्ही नांदेड येथील मूख्य कार्यालयाशी संपर्क साधा असे सांगितले. नांदेड येथील कार्यालयात जाऊन विचारणा केली असता त्यांनी त्यांची माहीती आमच्याकडे नसते तूम्ही गोदावरी कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात जा असे सांगितले. तेथे गेलो असता त्यांनी तूमची योजना चालू असून तूम्हाला जूने बिल बदलून नवीन बिल देण्यात येईल असे तोंडी सांगितले,. म्हणून अर्जदाराने बिल भरले नाही. अर्जदार हा बिलाची वाट पाहत बसला, बिल तर आलेच नाही पण गैरअर्जदाराने जून महिन्यातील वापराबददल रु.1173.59 चे देयक दिले व त्यात मागील देयकाची रक्कम रु.1433/- असे मिळून अर्जदारास रु.2607/-चे देयक दिले व बिल भरले नाही तर दूरध्वनी बंद करण्यात येईल असे सांगितले ? गैरअर्जदाराच्या सांगण्याप्रमाणे अर्जदाराने ते देयक भरले. दि.13.08.2010 रोजी बिलाचा तपशील पाहिला असता गैरअर्जदार हे चूकीचे देयक देत असून त्यांची फसवणूक करीत आहे व सेवेमध्ये ञूटी करीत आहे.महाराष्ट्रातील बीएसएनएल च्या मोबाईलवर केलेल्या कॉलबददल सूध्दा बिल आकारले आहे, जे चूकीचे आहे. अर्जदाराला गैरअर्जदाराने कधीही लेखी अथवा तोंडी कळविले नाही की, तूमची सूवीधा बंद करत आहोत. सूचना न देता सूवीधा बंद केलेली आहे. अर्जदाराने दि.23.06.2010 रोजी पञ देऊन गैरअर्जदारास वन इंडिया प्लॅन बंद केला आहे काय ? या बददल विचारले होते परंतु गैरअर्जदाराने सदरील पञाचे उत्तर दिले नाही. कोणतीही पूर्व सूचना न देता अर्जदाराची सूवीधा बंद केली असे करुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास ञूटीची सेवा दिली आहे, म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल केली असून अशी मागणी केली आहे की, त्यांना दिलेले रु.2607/-चे बिल दिले ते फक्त सरासरी रु.199/- प्रमाणे दोन महिन्याचे बिले धरल्यास अर्जदाराकडून रु.2209/- जास्तीचे घेतले आहेत ते अर्जदारास व्याजासह परत करावेत, अर्जदारास मानसिक ञासाबददल रु.25,000/-, शारीरिक ञासापोटी नूकसान भरपाई रु.10,000/- तसेच ञूटीच्या सेवेबददल रु.25,000/- तसेच तक्रारीचा खर्च रु.3000/- मिळावेत. 2. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार खोटी असून ती फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे.गैरअर्जदार कंपनीच्या दि.19.09.2007 च्या कार्यालयीन परिपञकाप्रमाणे ग्राहकांनी अड ऑन सुवीधची मागणी केल्यास संबंधीत सक्षम अधिका-याचे अड ऑन ही सूवीधा सत्य सद्यपरिस्थितीममध्ये सुरु असलेल्या दूरध्वनी क्रमांकावर देण्यात यावी, त्यामध्हये सद्य परिस्थितीमध्ये सुरु असलेल्या दूरध्वनीचे भाडे एनी प्लॉन अधिक “यकीन नही आता” चे भाडे अधिक अड ऑन पॅकेज म्हणजे वन इंडिया प्लॉन हे दोन्ही प्लॉन एकञितपणे देण्यात यावे असे नमूद केले आहे.अर्जदार यांनी दि.27.01.2007 रोजी गेरअर्जदार यांना दूरध्वनी क्रं.222340 वर “यकीन नही आता” अधिक वन इंडिया ही योजना देण्याची मागणी केली ती रु.180/- अधीक रु.99/- असे एकूण रु.279/- भरुन ती योजना दिली. अर्जदार यांनी सांगितलेले कथन हे चूक असून मंचाचे लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. अर्जदारास दि.3.6.2010 रोजीचे बिल भरु नये असे सागितले कारण नवीन बिल देणार होते ? गैरअर्जदार यांनी बिल दूरुस्तीचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते ? अर्जदाराने दिलेल्या दि.23.6.2010 रोजीच्या पञास गैरअर्जदाराने असे सांगितले की, तांञिक अडचणीमूळे ती बंद झाली आहे व अर्जदार यांस आलेल्या देयकात दूरुस्ती करुन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, व तांञिक अडचण दूर झाल्यानंतर अर्जदारास वरील सेवा देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले ? म्हणून गैरअर्जदार यांनी अर्जदारास कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. म्हणून तक्रार खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदारास मासिक देयक रु.279/- आहे व गैरअर्जदार हा अर्जदारास दिलेले वाढीव देयक दूरुस्त करुन देण्यास तयार होता परंतु अर्जदाराने ही तक्रार दाखल केली ? म्हणून अर्जदाराची तक्रार ही खारीज करावी असे म्हटले आहे. 3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्यानंतर व दोन्ही बाजूचा यूक्तीवाद ऐकल्यानंतर जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मुद्ये. उत्तरे. 1. अर्जदार हे ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदार यांने केलेली मागणी पूर्ण करण्यास गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ? होय, अंशतः 3. काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 व 2 – 4. हे दोन्ही मुद्ये एकमेकाशी पुरक असल्यामुळे ते एकत्रितरित्या चर्चीण्यात येत आहेत. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन दुरध्वनी क्र.222340 घेतल्याचे गैरअर्जदार मान्यच करतात. त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत हे निर्विवादपणे सिध्दच झालेले आहे. 5. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, अर्जदार हा मागील 20 वर्षा पासुन गैरअर्जदारांचा ग्राहक आहे व तो नियमितपणे दुरध्वनी बिल भरत आलेला आहे. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, त्यानंतर गैरअर्जदाराने राबविण्यात येत असलेल्या “यकीन नही आता” या सेवेचा देखील अर्जदार हा उपभोक्ता आहे. सदरील सेवेचे वैशिष्टय म्हणजे अर्जदारास रु.180/- मासिक भाडे देऊन “वन इंडिया” या सेवेचा सदरील सेवेमध्ये समावेश करण्यात येते. त्यामुळे अर्जदारास त्या परिक्षेत्रातील सर्व दुरध्वनी व संपुर्ण महाराष्ट्रातील बी.एस.एन.एल. कंपनीच्या मोबाईलवर पुर्णतः मोफत व अमर्याद संभाषण करता येते. म्हणुन अर्जदाराने या सुवीधेची निवड केली व तो ही सेवा अखंड घेत आहे. सदरील सेवा अर्जदाराच्या दुरध्वनीवर एप्रिल 2010 पर्यंत सुरळीत चालू होती. 6. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, त्यांना दि.03/06/2010 रोजीचे मे महिन्यातील वापराबाबतचे देयक गैरअर्जदाराकडुन मिळाले व ते पाहून अर्जदाराला अचंबा वाटला कारण सर्वसाधारणतः अर्जदारास दुरध्वनीचे वापराबद्यलचे मासीक बिल अंदाजे रु.199/- इतके येत असे परंतु सदरील मे महिन्याचे बिलाची रक्कम एकदम रु.1,433/- आली होती? त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, दि.23/06/2010 रोजी ते गैरअर्जदाराचे अभियंता यांना हदगांव येथे भेटले व सदरील वाढीव बिलाबद्यलची तक्रार अर्जदाराने त्यांच्याकडे दिली, त्यावेळी गैरअर्जदाराचे हदगांव येथील उपअभियंता यांनी तोंडी असे सांगीतले की, त्या प्रकाराबद्यल त्यांना काहीही माहीत नाही व अर्जदाराने त्याबद्यल नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा? त्यानंतर अर्जदार हे गैरअर्जदाराचे नांदेडचे मुख्य कार्यालयाचे ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून असता, तेथे त्यांना असे सांगीतले की, त्याबद्यलची माहीती त्याचेकडे नसते व अर्जदारांना गोदावरी कॉम्प्लेक्स आय.टी.आय.येथे जाऊन त्याबद्यल विचारपुस करावी? अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, त्यानंतर ते गोदावरी कॉम्प्लेक्स येथे गेले व तेथील कार्यालयाशी विचाराणा केली असता, त्यांनी सदरील सुवीधा चालू असल्याचे तोंडी सांगीतले व अर्जदारास आश्वासन दिले की, अर्जदारास लवकरच त्यांचे जूने बिल बदलून एक नवीन देयक देण्यात येईल म्हणून व अर्जदाराने 03 जून 2010 रोजीचे बिल भरु नये असे सांगीतले त्यामुळे अर्जदाराने ते बिल भरले नाही. 7. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, त्यानंतर तो दुरुस्ती बिल येण्याचा वाटच पहात होता पण त्याच वेळी त्यांच्या हातात जून महिन्यातील दुरध्वनीचे वापराचे देयक पडले व ते पाहून अर्जदारास धक्काच बसला, त्या बिलावरुन असे दिसून येते की, गैरअर्जदाराने मागील देयक तर दुरस्त करुन दिलेच नाही पण जून महिन्यातील वापराबद्यल रु.1173.59 एवढे देयक दिले व त्यामध्ये मागील देयकाची रक्कम रु.1433/- येणे असल्याचे दाखवून अर्जदारास एकुणस रक्कम रु.2607/- जमा करण्यास सांगीतले अन्यथा दुरध्वनी बंद करण्यात येईल असे सांगीतले? अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदाराचे वरील सांगण्यावरुन अर्जदाराने ते संपुर्ण देयक रक्कम भरली. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, दि.13/08/2010 रोजी अर्जदाराने जून महिन्यातील दुरध्वनीचे वापराबद्यलचे दिलेल्या देयकामध्ये कुठल्या सुवीधेबद्यल किती रक्कम आकारत असल्याचे स्पष्ट तपशिल दिले आहे ते पहाताक्षणीक असे लक्षात येईल की, गैरअर्जदार यांनी चुकीच्या पध्दतीने त्यांची मनमानी कारभाराप्रमाणे चुक देयक देऊन ग्राहकाची फसवणुक करुन सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येते. त्या देयकामध्ये गैरअर्जदारांनी अर्जदाराकडुन त्या परिक्षेत्रात केलेले कॉल्सबद्यल तसेच महाराष्ट्रातील बी.एस.एल.एल. मोबाईलवर केलेले कॉल्सबद्यल सुध्दा बिल आकारले आहे, जे चुकीचे आहे व अनुचित व्यापार पध्दत म्हणुन फसवीणारे आहे. 8. अर्जदाराची अशीही तक्रार आहे की, गैरअर्जदार यांनी लेखी अथवा तोंडी सुचना न करता वरील प्रमाणे भरमसाठ बिलाची आकारणी करुन त्यांची फसवणुक केली. त्यानंतर दि.23/06/2010 रोजी एक पत्र देऊन अर्जदाराने गैरअर्जदारास अशी विचारणा केली होती की, सदरची सुवीधा बंद झाली का? पण गैरअर्जदाराने अर्जदाराच्या वरील पत्राला उत्तर दिलेले नाही किंवा त्या पत्राची कोणत्याही प्रकारे दख्खल घेतली नाही. 9. अर्जदाराचे वारंवार म्हणणे असे की, सर्वसाधारणतः एका महिन्याचे बिल रु.199/- येत होते परंतु गैरअर्जदाराने वर उल्लेख केल्याप्रमाणे दोन महिन्याचे एकत्रित बिल रु.2607/- देऊन अनुचित पध्दतीचा वापर केला आहे.? अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदाराच्या कार्यालयात खेटे मारुन व हदगांव ते नांदेड प्रवास करुन देखील त्याला योग्य तो न्याय मिळालेला नाही. म्हणुन गैरअर्जदार हे मानसिक त्रासाबद्यल अर्जदारास रु.25,000/- देण्यास बांधील राहतील. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, त्याला एकुण आलेला प्रवास खर्च व शारिरीक त्रास व मानसिक त्रासाबद्यल रु.10,000/- मिळण्यास ते पात्र आहेत.? शिवाय अर्जदाराने अशी विनंती केली की, गैरअर्जदाराला “यकिन नही आता” ही सेवा अर्जदाराच्या दुरध्वनीवर परत चालू करण्याचा आदेश द्यावेत व अर्जदाराकडुन देयक म्हणून जास्तीचे घेतलेले रु.2209/- परत करण्यास सांगावे व सेवेतील त्रुटी केली म्हणुन रु.25,000/- देण्यास सांगावे व मानसिक त्रासाबद्यल रु.10,000/- आणी न्यायालयीन खर्च रु.3,000/- देण्यास सांगावे म्हणुन सदरील फिर्याद दाखल केली आहे. 10. गैरअर्जदारांनी स्पष्टपणे नाकारले आहे की, अर्जदारांना दर महा रु.180/- “यकीन नही आता” ही सेवा कधीच पुरविली नव्हती, त्यामुळे अर्जदाराचे वरील कथसन असत्य असल्यमुळे ते फेटाळण्यास योग्य आहे. गैरअर्जदाराचे म्हणण्याप्रमाणे त्यांच्या कंपनीचे दि.19/09/2007 च्या कार्यालयीन परिपत्रकाप्रमाणे ग्राहकाना Add on सुवीधा सध्य परिस्थीतीमध्ये सुरु असलेल्या टेलिफोन क्रमांकावर देण्यात येते, ज्यामध्ये सध्य परिस्थितीनुसार सुरु असलेले दुरध्वनीचे भाडे अधीक यकिन नही आता चे भाडे अधीक Add on package चे भाडे अधीक one India हे दोन्ही प्लॅन एकत्रीतपणे देण्यात येते असे नमुद केले आहे. 11. गैरअर्जदाराचे असेही म्हणणे की, दि.27/01/2007 रोजी “यकीन नही आता” अधीक “वन इंडिया” ही दोन्ही अर्जदाराच्या दुरध्वनी क्र.222340 वर करण्याबाबत मागणी केल्यामुळे गैरअर्जदार कंपनीचे वरील परिपत्रकातील अटीनुसार अर्जदारास अटी समजावून सांगीतले व त्यानुसारच दि.27/01/2007 पासुन ती सुवीधा म्हणजे “यकिन नही आता” अधीक “वन इंडिया प्लॅन” असे दोन्हीचे मीळून (रु.180 +99= 279) असे मासिक भाडे अर्जदाराला द्यावे लागतील असे सांगितले होते. त्याच दिवशी अर्जदाराच्या विनंतीवरुन वरील दोन्ही सुवीधा त्यांच्या वरील दुरध्वनी क्रमांकावर उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या म्हणून अर्जदार हा दर महा एकुण रु.279/- देण्यास बाध्य आहे. तसे न करता अर्जदाराने ही खोटी फिर्याद दाखल केली आहे.गैरअर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, अर्जदार यांनी अनेक वेळेला हदगांव व नांदेड ऑफिसात चकरा मारल्या हे विधान धांदात खोटे आहे. अर्जदारास ते म्हणतात त्याप्रमाणे सुचना गैरअर्जदारांनी कधीही दिली नव्हती. नियमाप्रमाणे अर्जदार प्रती महा देयक रु.279/- देण्यास बाध्य आहे.गैरअर्जदार अर्जदाराचे देयक दुरुस्त करुन देण्यास तयार होते तेवढयात अर्जदाराने ही तक्रार दाखल केली? शिवाय गैरअर्जदाराने विनंती केली की, सदरील फिर्याद खर्चासह फेटाळण्यात यावी. 12. एकंदरीत दोन्ही पक्षकारांच्या कथनावरुन असे दिसते की, गैरअर्जदाराने पारीत केलेल्या परिपत्रकाप्रमाणे अर्जदार हा एकुण दर महा रु.279/- देण्यास बांध्य आहे, असे जर ग्राहय धरले तरीही गैरअर्जदारांनी अर्जदारास सदरील देयक रु.1433/- व त्यानंतर देयक रु.1173.59 कसे दिले? हे समजून येत नाही. गैरअर्जदाराच्या लेखी म्हणण्याचे परिच्छेद क्र.12 मध्ये असा उल्लेख आहे की, ते वरील दोन्ही देयक दुरुस्त करुन देणारच होते परंतु तेवढयात अर्जदाराने ही केस दाखल केली? मुळात गैरअर्जदाराने वरील दोन्ही चुकीचे देयक जे रु.1433 व रु.1173.59 पैशाचे का व कसे दिले ? याबद्यल काहीही खुलासा केलेला नाही. वरील दोन्ही चुकीचे व भरमसाठ देयक देऊन गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. चुक लक्षात आल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच पहील्याच म्हणण्यामध्ये पहील्या चुकीची दुरुस्ती करुन रु.1433 च्या ऐवजी रु.279/- दिले गेले असते तर त्यांचा प्रामाणीकपणा काही अंशी का होईना सिध्द झाला असता, तसे न करता परत चुकीचे देयक रु.1173.59 पैशाचे दिले त्यावरुन असे स्पष्ट होते की, सदरील खोटे भरमसाठ बिल देऊन अर्जदारास गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवाच दिली आहे. 13. अर्जदाराचे वकीलांनी आमच्या लक्ष यापुर्वी आलेल्या देयकाकडे वेधले त्या देयकाच्या झेरॉक्स प्रती यादीसोबत अर्जदाराने दाखल केलेल्या आहेत. वरील सर्व देयक पहाता असे दिसून येते की, अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणेच गैरअर्जदाराने माहे मे चे देयक जूनमध्ये भरणाकरण्यासाठी म्हणुन रु.180/- चेच दिले होते त्यानंतर दि.03/07/2007 चे बिलाबद्यलचे किराया रु.180 च लावल्याचे दिसते तदवतच देयक दि.03/08/2007, दि.03/09/2007, दि.03/01/2009, दि.03 मे 2009 , दि.03/10/2009 व दि.03/11/2009 या सर्व देयकामध्ये गैरअर्जदारांनी माहे किराया प्रत्येक महिन्याला रु.180/- लावलेले आहे, त्यावरुन अर्जदाराच्या म्हणण्यास या देयकाचा दुजोरा दिसतो. 14. वरील सर्व देयक पहाता गैरअर्जदारांनी असे भरमसाठ देयके दिले कसे ? याचे सखेद आश्चर्य वाटते? ग्राहक हा राजा असतो याची भान सरकारी कर्मचा-यांना ठेवणे अत्यंत गरजेचे असते जेंव्हा सरकारी नोकरास सहाव्या वेतन आयोगाचा फायदा मिळतो, त्यावेळी त्यांच्यावर प्रामाणीकपणाने वागण्याची कठीण जबाबदारी येते. त्यांच्या अशा चुकीमुळे ग्राहक राजाला मनस्ताप होऊ शकतो याची जाण व भान सरकारी कर्मचा-यांना ठेवणे अतीशय गरजेचे आहे. लोकशाहीत जनता ही मालक आहे व सरकारी नोकर, मग तो कोणत्याही पदावर असो तो जनतेचा सेवक म्हणजे “पब्लीक सर्व्हट” आहे यांची जरी जाण-भान प्रत्येक कर्मचा-यांनी ठेवली तर अशा चुका होऊ शकत नाहीत. एखादया कर्मचा-याच्या घोड चुकीमुळे संपुर्ण खाते बदनाम होते याची जाण भान प्रत्येक कर्मचा-याने ठेवणे गरजेचे असते. एकंदरीत देयक पाहून अर्जदाराचे म्हणणे असे दिसते की, गैरअर्जदारांनी वरील दोन्ही चुकीचे भरमसाठ देयके देऊन अर्जदारावर अन्याय केलेला आहे. दर महा रु.180/- वर जरी नियमाप्रमाणे वाढ करण्यात येणार असेल तर त्याची लेखी पुर्व सुचना अर्जदाराला दिल्याचे दिसत नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार अंशतः मान्य करण्या जोगी आहे, असे आमचे मत झाले आहे. 15. वरील अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदाराने वरील दोन देयकाच्या आधारे अर्जदाराकडुन अधीकचे रु.2209/- जमा करुन घेतले ते अर्जदारास परत करण्यास ते पात्र आहेत. त्याचप्रमाणे अर्जदार हे गैरअर्जदाराचे “यकिन नही आता” ही सुवीधा पुर्ववतपणे दर महा रु.180/- च्या देयकाप्रमाणे मिळण्यास पात्र असेल, जरी गैरअर्जदाराच्या खात्याकडुन त्या देयकामध्ये वाढ करावी अशी सुचना आली असेल तर त्याबद्यलची लेखी पुर्व सुचना कमीतकमी 15 दिवस अगोदर अर्जदारास देणे गैरअर्जदारावर बांधील राहील तशा प्रकारची लेखी सुचना देऊनच त्या देयकमध्ये वाढ करण्याचा अधिकार गैरअर्जदाराला राहील. जर अर्जदाराला मानसिक त्रास झाल्यास तशा प्रकारे एखादी योजना सुरु करते वेळेस गैरअर्जदाराच्या एखाद्या कर्मचा-याकडून चुक झाली असेल तर त्याचा बडगा त्या खात्यावर लावणे उचीत होणार नाही असे आम्हास वाटते. तथापी अर्जदारास या कोर्टात येण्यास जो त्रास झाला त्याबद्यल खर्च रु.2,000/- वसुल करण्याचा अर्जदारास अधिकार राहील. वरील चर्चेवरुन आम्ही मुद्या क्र. 1 आणी 2 चे उत्तर वरील प्रमाणे दिले आहे. 16. वरील चर्चेवरुन अर्जदार हा गैरअर्जदाराने त्यांच्याकडुन जे अधीकचे रु.2209/- वसुल केले ते अर्जदारास 30 दिवसांच्या आंत परत करणे त्यांचेवर बंधनकारक राहील. त्याचप्रमाणे गैरअर्जदार हे अर्जदाराला “यकीन नही आता” ही सुवीधा पुर्वीप्रमाणे रु.180/- चे देयकाप्रमाणे चालू ठेवावी जर त्यांच्या खात्याकडुन सदरील किरायामध्ये वाढ करण्याचे सुचित केले असेल तर त्याबद्यल लेखी नोटीस अर्जदाराला कमीतकमी 15 दिवस अगोदर देऊन किराया मध्ये वाढ करता येईल. या केसचा खर्च रु.2,000/- गैरअर्जदारांना अर्जदारास 30 दिवसांच्या आंत देणे बंधनकारक राहील. 17. वरील कारणामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश परीत करीत आहोत. आदेश. अ. या निकालाची प्रत मिळाल्या पासुन 30 दिवसांच्या आंत गैरअर्जदार यांनी अर्जदारास देयकापोटी अधीकचे रु.2,209/- वसुल केलेली अर्जदारास परत करावी, तसे न केल्यास अर्जदारास वरील रक्कम त्यावर 12 टक्के व्याजाप्रमाणे वसुल करण्याचा अधिकार राहील. ब. गैरअर्जदारांने हे अर्जदारास त्याला मिळत असलेली “यकीन नही आंता”ही सुवीधा पुर्ववत रु.180/- च्या दर महा किरायावर सुरु ठेवावी, त्या किरायामध्ये वाढ करण्याची जर त्यांच्या खात्या तर्फे परिपत्रकाद्वारे सुचना असेल तर त्यांनी लेखी सुचना कमीतकमी 15 दिवस आधी अर्जदाराला देऊन नंतरच त्या किरायामध्ये वाढ करण्याचा अधिकार गैरअर्जदार यांना राहील. क. गैरअर्जदार यांनी या केसचा खर्च म्हणुन रु.2,000/- अर्जदारास 30 दिवसांच्या आंत द्यावेत व गैरअर्जदाराने त्यांचा खर्च त्यांनी सोसावा. ड. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळवावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |