(मंचाचा निर्णय: श्री. रामलाल सोमाणी- अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 14/09/2010) 1. सदर अर्जाव्दारा अर्जदाराने तक्रार क्र.319/2009 निशाणी क्र.5 वरील मंचाचा आदेश गैरअर्जदारांना मिळाल्यावरही त्यांनी तक्रारकर्त्याची दुरध्वनी सेवा खंडीत केली व मंचाचे आदेशाची अवमानना केली. म्हणून प्रस्तुत अंमलबजावणी अर्ज दाखल केलेला आहे. 2. गैरअर्जदारांना नोटीस मिळून ते हजर झाले व नमुद केले आहे की, त्यांनी कधीही अर्जदाराकडून कोणत्याही आदेशाची प्रत मिळालेली नाही आणि अश्या स्थितीत मंचाचे आदेशाचा अवमान केलेला नाही. तसेच ज्या दिवशी गैरअर्जदारांना मंचाचे आदेशाची प्रत मिळाली तेव्हा ताबडतोब नियमानुसार अर्जदाराची दुरध्वनी सेवा सुस्थापीत करण्यांत आली. गैरअर्जदारांनी कोणताही हेतूपुरस्सर मंचाचे आदेशाचा अवमान केलेला नाही. अर्जदाराची मुळ तक्रार खारिज झालेली आहे, कारण ती मंचासमक्ष चालु शकत नाही. गैरअर्जदारा विरुध्द Particular Frame करण्यांत आले असुन त्यांनी गुन्हा नाकबुल आहे, असे मंचासमक्ष सांगितले. अर्जदाराने पुरावा देणे नाही अशी पुरसिस दाखल केली. 3. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकण्यांत आला मंचासमक्ष निर्णयान्वीत करण्याकरता मत आहे की, गैरअर्जदाराने मंचाच्या आदेशाची जाणीव-बुजून अवमान केला आहे काय ? अर्जदाराने शपथपत्रावर तक्रार दाखल केलेली असुन गैरअर्जदारांनी शपथपत्रावर त्यांचे उत्तर दिलेले आहे. दि.20.06.2009 च्या आदेशाची प्रत मिळालेली नाही आणि ती मिळाल्यानंतर त्यांनी अर्जदाराची सेवा खंडीत केली आहे काय ? 4. मंचासमक्ष ही बाब स्पष्ट होते की, अर्जदाराने दि.20.06.2009 रोजी मंचाव्दारा पारित आदेशाची प्रत गैरअर्जदारांना पोचती करण्याबद्दल कोणताही दस्तावेज प्रकरणात दाखल केलेला नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून सुचना मिळाल्यानंतर ताबडतोब त्याची दुरध्वनी सेवा प्रस्थापीत केलेली आहे, असे कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. मंचाच्या आदेशाचा अवमान झाल्याचे सिध्द करण्याची जबाबदारी अर्जदारावर होती. मंचासमक्ष अर्जदाराने त्या संबंधाने कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही, त्यामुळे मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, गैरअर्जदाराने मंचाच्या आदेशाचा अवमान केल्याचे सिध्द होत नाही. म्हणून अर्जदाराचा प्रस्तुत अर्ज खारिज करण्यांत येतो. -// आ दे श //- 1. अर्जदाराचा अर्ज खारिज करण्यांत येते. 2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा. 3. तक्रारकर्त्याने मा. सदस्यांकरीता दाखल केलेल्या (ब,क) प्रति 1 महिन्याच्या आंत घेऊन जाव्यात. अन्यथा 20(5) Consumer Protection Regulation 2005 अन्वये नष्ट करण्यांत येईल. (मिलींद केदार) (रामलाल सोमाणी) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |