Maharashtra

Nagpur

CC/411/2022

SHRI. RAMESH RAMAJI DAHIWALE - Complainant(s)

Versus

BHARAT SANCHAR NIGAM LIMITED THROUGH ITS PRINCIPAL GENERAL MANAGER - Opp.Party(s)

ADV. C.F. BHAGWANI

18 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/411/2022
( Date of Filing : 06 Jun 2022 )
 
1. SHRI. RAMESH RAMAJI DAHIWALE
R/O. PLOT NO.580, RANI DURGAWATI NAGAR, BINAKI MANGALWARI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BHARAT SANCHAR NIGAM LIMITED THROUGH ITS PRINCIPAL GENERAL MANAGER
SANCHAR BHAVAN, ZERO MILES, CIVIL LINES, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. C.F. BHAGWANI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 18 Jan 2023
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, तो भारत संचार निगम या विभागातून टेलिफोन मॅकनिक या पदावरुन सेवानिवृत्‍त झालेला असून त्‍याला व त्‍याच्‍या पत्‍नीला Medical reimbursement ची सुविधा उपलब्‍ध होती. तक्रारकर्त्‍याची पत्‍नी इंदुताई रमेश दहिवाले हिला हृदयविकाराचा, उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह इत्‍यादी आजार होते. त्‍यामुळे तिला न्‍यू ईरा हॉस्‍पीटल अॅन्‍ड रिसर्च इन्‍स्‍टीटयुट, सेंट्रल एव्‍हेन्‍यू नागपूर येथे दि. 29.05.2020 रोजी भरती केले असून दि. 30.05.2020 रोजी डिस्‍चार्ज करण्‍यात आले होते व या कालावधीकरिता तक्रारकर्त्‍याला वैद्यकीय खर्च म्‍हणून दिनांक 30.05.2020 रोजी बिल.क्रं. 006457 अन्‍वये रुपये 22,620/- व औषधाकरिता रुपये 14,045/- असे एकूण रुपये 36,665/- एवढा खर्च आला होता. याकरिता तक्रारकर्त्‍याने Medical reimbursement क्‍लेम फॉर्म विरुध्‍द पक्षाकडे सादर केला असल्‍याबाबतची पोच पावती घेतली होती. परंतु विरुध्‍द पक्षाने त्‍यावर कोणतीही कार्यवाही न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 22.04.2021 व दि. 10.05.2021 रोजी पत्र दिले होते. त्‍यानंतर ही त्‍यावर कार्यवाही करण्‍यात न आल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 29.08.2021 रोजी वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली होती. त्‍यावर देखील विरुध्‍द पक्षाने कोणतीही कार्यवाही न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत या आयोगा समक्ष दाखल करुन तक्रारीत मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला Medical reimbursement ची रक्‍कम रुपये 36,665/- व त्‍यावर द.सा.द.शे. 24टक्‍के दराने व्‍याज देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाकरिता नुकसान भरपाई देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.       विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 26.09.2022 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.       तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता निकाली कामी आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

 

1 प्रस्‍तुत तक्रार या आयोगा समक्ष चालण्‍या योग्‍य आहे काय ? नाही

  1. काय आदेश ?                            अंतिम आदेशानुसार

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्ता हा भारत संचार निगम या विभागातून टेलिफोन मॅकनिक या पदावरुन सेवानिवृत्‍त झालेला असून त्‍याला व त्‍याच्‍या पत्‍नीला Medical reimbursement ची सुविधा उपलब्‍ध होती. तक्रारकर्त्‍याची पत्‍नी इंदुताई रमेश दहिवाले हिला हृदयविकाराचा, उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह इत्‍यादी आजार होते. त्‍यामुळे तिने न्‍यू ईरा हॉस्‍पीटल अॅन्‍ड रिसर्च इन्‍स्‍टीटयुट, सेंट्रल एव्‍हेन्‍यू नागपूर येथे येथे वैद्यकीय उपचार घेतले होते. तक्रारकर्त्‍याला जरी Medical reimbursement मिळण्‍याची सुविधा उपलब्‍ध असली तरी त्‍याने सदरच्‍या वादाकरिता वरिष्‍ठ कार्यालयाकडे दाद मागणे आवश्‍यक होते आणि उभय पक्षातील वाद हा ग्राहक वाद या संज्ञेत मोडत नसल्‍याने प्रस्‍तुत तक्रार या आयोगा समक्ष चालण्‍या योग्‍य नसल्‍याने खारीज करण्‍यात येते.   

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                         अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज .

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.